चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<असे एखाद्या शब्दावरून भाषेची तुलना कशी करणार ना?>>

प्राण्यांचा कळप हे केवळ एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत.

उदा. टू गूगल हे क्रियापद. अशी क्रियापदे बनवण्याची ताकद मराठीत नाही.

गुगलणे, गुगलून पाहणे असे शब्दप्रयोग हल्ली आंतरजालावर सर्रास वाचण्यात येतात की!

आता टू गुगल किंवा गुगलणे ही क्रियापदे अधिकृतरित्या अजून अनुक्रमे इंग्रजी आणि मराठीत समाविष्ट झाली नसावीत. किंवा झाली असतील तर मला माहीत नाही.

मराठी इंग्रजी तुलना (थोडावेळ) बाजूला ठेऊन भाषा समृद्धीबद्दल तुम्हाला अजूनही तुमच्या पहिल्या पोस्टप्रमाणेच वाटते का?

@गजानन

होय. एकच शब्द अनेक अर्थांनी वापरणे हे भाषेची लवचिकता दर्शवित असले तरी ते भाषेची शब्दसंपत्तीतील कमतरतादेखिल अधोरेखीत करतात, असेच वाटते.

@मी अमि

इतक्या वर्षांनंतरदेखिल तुम्हाला प्रीटी वूमन आठवते आहे, हे पाहून खरेच भरून आले! आता मात्र पूर्ण करायलाच हवे!

सुनील, माझ्या मते नविन शब्दप्रयोग हे बहुतेक वेळा तरुण पिढीकडून तयार होत असतात. त्या वयात असेलेला बंडखोरपणा, प्रस्थापिताविरुद्ध काहीतरी करण्याची मानसिक गरज आणि नाविन्याची आस याचा परीणाम भाषेवरही होतच असतो. नविन शब्दप्रयोगांपैकी काही विसरले जातात काही टिकतात. अजूनही ही प्रक्रिया घडतच असते. फक्त हल्लीची पिढी जास्त इंग्रजी शब्द वापरत असल्याने इग्रजाळलेले शब्द जास्त येतात. पूर्वी आलेल्या उर्दू / फारशी शब्दांना आपण आपलेसे केलेच ना? तसे हे ही होतील. गुगल करणे हा अजच्या मराठी पिढीचा स्टँडर्ड शब्दप्रयोग आहे मराठीत Happy

आणि प्रिटी वूमन मागे तुम्ही होतात तर? Wink मी लेखकाचे नावच विसरून गेलो होतो. लिहा पुढचे Happy

खास विदर्भीय शब्द

शीशी = बॉटल (काचेची)
हिरोति = मिर्ची पावडर ('ती' नाही)
फोकनाड = थापाड्या (ऋ= ला नागपुरी पर्यायी शब्द)
मंडई= तमाशा (नागपूर, भंडारा व गोंदिया भागात)
शान्ं = हि विदर्भीय शेपूट अशी वापरतात... जाऊनशान्ं, येऊनशान्ं, म्हणूनशान्ं... इं.

Pages