चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टगळ - एखादं काम करण्यातलं कौशल्य... 'टगळ आहे त्याला त्या कामाची'. कोल्हापूरकडचा असणार शब्दं.
नखाड - नखाएव्हढं. आग्रहाचं वाढायला आलेल्याला - 'घाला नखाड" Happy हे सुद्धा कोल्हापूरकडचच असणार.
सोपलं - सोपवलं... अंगावर घातल अशा अर्थाने

वशेळ्या मह्णजे मंगळागौर पूजणर्‍या मुली ना? काय आहे हा शब्द? व्युत्पत्ती?
>>>> मला उत्तर हवय....:स्मितः

"बागेबागे चाल ना व! "
बागेबागे म्हणजे अहिराणीत 'हळूहळू' Happy

भानशी- चुलीच्या बाजुलाच त्याच आकाराची आतुन कनेक्टेड असते ती. चुलीतले एक लाकुड तिरपे करुन ठेवले की जाळ तिकडे पोचतो. फक्त शिजायला/ भाजी उकळायला ठेवायची असेल तर भानशीवर ठेवतात. (इकडे तिला 'चुल-उल' म्हणतात बहुतेक)

सतेल- गोल बुडाचे पातेले
सान्डशी- स्वयम्पाकघरात वापरायची पकड
गडन्गनेर- केळवण

वशेळ्या मह्णजे मंगळागौर पूजणर्‍या मुली ना? काय आहे हा शब्द? व्युत्पत्ती?
>>>> मला उत्तर हवय....:स्मितः

<<<< मंगळागौरीचे पाच वर्षांचे व्रत / वसा असतो. तो वसा घेतलेल्या त्या वशेळ्या असावे.

पुर्वी मूंजीला किंवा शुभकार्यात ५ प्रकारच्या खिरी असत.

१) शेवया.. या आपल्याला माहित आहेतच.
२) गव्हले - गव्हाच्या दाण्याच्या आकाराचे असतात. हाताने वळतात.
३) नखोते - नखानेच करत असत. चंद्रकोरीच्या आकाराचे असत.
४) मालत्या - अगदी छोटासा मेदूवडा म्हणा ना. यातले छिद्र पंचपळीपात्रातल्या पळीच्या दांड्याच्या टोकाने करत असत.
५) बोटवे - छोट्याश्या कॅप्सूल्स सारख्या आकाराच्या. बोटांनी वळत असत.

या सगळ्या खिरी वेगवेगळ्या करत असत.

फारच थंडावलाय हा धागा ! Happy
मंडळी, 'म म मराठीचा' हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे . सुत्रसंचालक असणार आहेत श्री. संतोष पवार. मुंबई किंवा मुंबईलगतच्या भागात असलेल्या ज्या मायबोलीकरांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. येत्या रविवारी ठाण्यात शुट करायचं ठरत आहे. ज्या ठाणेकरांना कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा म्हणजे दोन दिवस आधी येऊन तुमच्या सोसायटी किंवा निवासस्थानी येऊन लोकेशन फायनल करता येईल.

मायबोलीशी संकेतस्थळाशी मी गेली अनेक वर्षे निगडीत आहे. आता कर्मधर्मसंयोगाने क्रिएटीव्ह म्हणून जॉईन केलय तेही मायबोली चेनलमधेच. नामसाधर्म्याचा मायबोली साईटला किती उपयोग होईल त्याची कल्पना नाही. पण होणार हे नक्कीच. Happy कारण कार्यक्रमात दिल्या जाणार्‍या भेटवस्तूंवर मायबोलीचे नाव असणारच.

मराठी संस्कृती, रिती, रुढी, भाषा यांच्याशी नातं सांगणारा हा शो कोणत्याही भाषेला कमी लेखणार नाही किंवा मराठीचा र्‍हास होतोय सारख्या कल्पनाही मांडणार नाही. मराठी माती, मराठी माणसं आणि मराठी मनांच्या गंमतीजंमती मांडण्याचा एक साधा प्रयत्न असणार आहे. तुमच्या सुचनाचं स्वागत आहेच. माझा मेल आयडी आहे skautuk@gmail.com.

आपल्याकडे विधवा स्त्रिला श्रीमती म्हणतात तसे विधुर पुरुषाला श्रीयुत म्हणतात का? की श्रीयुत कुणाही पुरुषाला म्हणू शकतो.?

मराठी प्रतिशब्द ??

स्टेथोस्कोप
हार्ड डिस्क
मदर बोर्ड
मेमरी कार्ड
क्रेडीट कार्ड
बँक
क्लियरींग
लॉकर
डिसहॉनर
एटीएम

चुलीशेजारच्या छोट्या धूर निधणाऱ्या चुलीला भानुस किंवा आवलंही म्हणतात.
निफाड, दिंडोरी तालुक्यात मुलीला ‘कार’ असेही म्हटले जाते. उदा. माझी कार त्या गावाला दिली हाये.
पश्चिम बाजूला ‘वरल्यांगं’ तर पूर्व बाजूला ‘खाल्ल्यांगं’ असे संबोधले जाते.
वरल्यांगं म्हणजे वरच्या अंगाला आणि खाल्ल्यांगं म्हणजे खालच्या अंगाला.
‘डोंबलं तुझं’ असा शब्दप्रयोग नेहमीच नकारात्मक अर्थाने केला जातो. तिथं काय डोंबलं गाडून ठेवलंय का, असंही म्हटलं जातं. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय माहिती नाही.
आणखीही काही शब्द आहेत, आठवले तसे लिहीन...

डिसहॉनर चेक च्या संदर्भात असले तर = चेक ची स्विकृती न होणे/चेक, हुंडी नाकारणे असे म्हणु शकतो.

बँक = पेढी होउ शकेल बहुदा

एटीएम = स्वयंचलित मुद्रा वितरण यंत्र

चेक क्लिअरिंग साठी = चेक वटणे / वटविणे होउ शकेल

स्टेथस्कोप = हृदय गति निदान यन्त्र / ह्रदयाचे ठोके इ. तपासण्यासाठी डॉक्टर वापरतात ते साधन

लॉकर = मौल्यवान वस्तू, इ.ठेवण्यासाठी चा वित्तीय पेढी मधिल कक्ष

धन्स सामी,

लॉकर - तिजोरी च्यायला हे लक्षातच आले नाही, मी आपला क्रेडीट कार्ड, बँक, क्लियरींग, डिसहॉनर, एटीएम च्या अनुषंगाने लॉकर ला लॉकर रुम समजलो बहुदा !!

स्टेथोस्कोप = सोपा पर्यायी शब्द नाही.
हार्ड डिस्क = कडक चकती Wink
मदर बोर्ड = मुख्य पाट
मेमरी कार्ड = स्मृतीपट्टीका
क्रेडीट कार्ड = उधारपट्टिका
बँक = पेढी / पतपेढी
क्लियरींग = हिशोबजुळणी
लॉकर = तिजोरी
डिसहॉनर = अपमान
एटीएम = असतील तर मिळतील.

डॉक्टर....

छान प्रतिशब्द तुम्ही दिले आहेत.....स्टेथॉस्कोपसाठी मी तर शासकीय व्यवहार कोश पाहिला. तिथे अर्थ दिला आहे ~ Stethoscope = स्टेथोस्कोप. .... गप्पच बसलो.

डिसऑनर = अनादर....असा अर्थ दिसला मला व्यवहार कोशात. तो अपमानापेक्षा योग्य वाटतो मला.
क्रेडिट कार्डला उधारपट्टिका ऐवजी पतपट्टिका म्हटले तर ?

पाटील सर,
अनादर हा शब्द जास्त बरोबर वाटतोय. मुख्यत्वे चेक डिसऑनर होणे, या अर्थी तो शब्दार्थ त्यांना हवा आहे असे दिसते.
रच्याकने : चेक = हुंडी बरोबर होईल का? कि हुंडी = डिमांड ड्राफ्ट? (धनादेश हा प्रचलित शब्द आहेच.)

डॉक्टर...

हुंडीचा प्रामुख्याने वापर केला जात असे तो "पोचपावती" च्या अर्थाने. म्हणजे पूर्वीच्या काळात तुम्ही माझ्या गावात धान्यविक्रीसाठी आला आहात. लोकांनी आवश्यक तितके धान्य तुमच्याकडून खरेदी केले आणि जमा झालेली रक्कम घेऊन तुम्ही तुमच्या गावी परतायला निघता. त्यावेळी तुमच्याकडे समजा पाच पोती धान्य शिल्लक राहिले आहे ते परत न नेता तुम्ही माझ्या घरी हंडीत ते तात्पुरते म्हणून ठेवले आणि त्याबदल्यात तुम्ही मला योग्य तो रक्षण मोबदला दिला म्हणजे दोघांचीही गरज भागते. अशावेळी मी तुम्हाला ते धान्य पोचल्याबद्दलाची जी पावती देतो तीच हुंडी. हा अर्थ आणि रीत समजून घेतल्यानंतर कळून येईल की चेकला हुंडी शब्द अचूक असा होत नाही. (मात्र कित्येक कोशात चेक = हुंडी असे उल्लेख मी वाचले आहेत)

चेक म्हणजे चलनातील पैशाची दिलेली वा घेतलेली हमी....तिथे मालाचा संदर्भ निघत नाही. चेकला धनादेश असे जे म्हटले जाते ते योग्य आहे. डीमांड ड्राफ्टला "धनाकर्ष" असे नाम बॅन्किंग क्षेत्रानेच दिले आहे.

बी, श्रीमती म्हणजे विधवा स्त्री मुळीच नाही.
ते कुमारी/विधवा/लग्नं झालेल्या अश्या सगळ्या स्त्रियांकरिता वापरतात.
इथे कर्नाटकात किंवा इन जनरल हिंदीतही 'ये हमारी श्रीमतीजी' असे स्वतःच्या बायकोविषयी बोलताना म्हणतात.
श्रीमान-श्रीमती अशी एक मालिकाही होती नवराबायको या विषयावर.
मराठीत आमच्या लहानपणी पत्रलेखनात वगैरे विधवा स्त्री विषयी 'गं.भा.' म्हणजे गंगाभागिरथीसम पवित्र हा शब्दं वापरला जात असे.
माझ्या शेजारणीचे नाव चक्क श्रीमती आहे. त्यांना आम्ही मजेने श्रीमती श्रीमती म्हणतो.

'Visiting card' & 'letterhead' यांसाठी मराठी शब्द ?

व्हिजिटिंग कार्ड = नामपत्र
लेटर हेड = नाममुद्रित पत्र

ही दोन्ही मराठी रुपे शासनमान्य आहेत.

Pages