चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ नोव्हेंबरला ठाण्यात "म म मराठीचा" या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. लवकरच इतर सोपस्कार होऊन हा कार्यक्रम मायबोली वाहीनीवर दिसेल. प्रक्षेपणाचा दिवस लवकरच कळवेन. विनंती आहे की तुमच्या ज्या काही सुचना असतील त्या नक्की कळवाव्या. Happy

शब्दांचे अर्थ देण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सार्‍यांचे धन्यवाद !!!

मराठीची भाषाशुद्धि म्हणजे परकीय शब्दांना मराठी शब्द तयार करणे हाच आहे का?

म्हणजे हा केवळ बौद्धिक उद्योग झाला. जे भाषा विषयात डॉक्टरेट करू पहातात किंवा त्यांच्यासाठी. मराठीत जरी डॉक्टरेट पदवी मिळाली तरी डॉक्टरेट च म्हणावे लागेल, कारण तो शब्द जास्त लोकांना समजतो

'...सोवळे ओवळे ही कन्सेप्टच जर एकाद्या संस्कृतीत नसेल, तर त्या भाषेत त्याबद्दलचे शब्द असणे अशक्य असते....'

तसेच ज्या गोष्टी पाश्चिमात्यांकडून आपल्याकडे आल्या, आधी कधी आपल्याकडे नव्हत्याच त्यांना उगीचच मराठी शब्द वापरण्याचा अट्टाहास का? जशी आपली नावे इंग्रजीत हि आनंद, अशोक अशीच रहातात, तसेच कॉम्प्युटर, बॅटरी इ. ना उगाचच मराठी शब्द कशाला?

झक्की, नमस्कार !
भाषासमृद्ध होण्याची संकल्पना आहे. भाषाशुद्धी नाही. इंग्रजी शब्दांना मराठी शब्द शोधण्याचा अट्टाहासदेखील नाही. हा फक्त प्रयत्न आहे. मराठी भाषा तशी कायम इतर भाषेतून येणार्‍या शब्दांना आश्रय देत राहीली आहे. पण त्या नादात मूळ मराठी शब्द हरवत चालले आहेत. त्यांची पुन्हा उजळणी करण्यात नक्कीच काही गैर नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर हा बौद्धीक उद्योग असेल तर मग त्यातही काही वाईट नाही. शिवाय पश्चिमेकडून आलेल्या अनेक गोष्टींसाठी सहजसुंदर मराठी शब्द उपलब्ध आहेत. ते वापरले तर काय हरकत आहे ?
माझ्या शोच्या पहिल्या दिवशीच 'मराठी बोलीभाषा घरात का बोलल्या जात नाही ?' यावर उत्तर मिळालं की 'लोकं हसतात म्हणून'. आपल्या मायबोलीत आपण बोलणं हे इतरांना कमीपणाचं वाटत असेल तर तो त्यांचा प्रोब्लेम. पण ते कमी लेखतात म्हणून आपण पण कमी लेखणं हा मात्र विचार करण्याजोगा भाग आहे. खानदेशी, मालवणी, अहिराणी लोकं मुंबईत आहेत, पण ते आपल्याला बोलीभाषा येते हे मान्य करायलाही धजावत नसतील तर मग अशाने या सर्व गोड भाषा एक दिवस नाहीशा होतील. आपली मायबोली आपण जपायलाच हवी हा एक साधा विचार आहे यात. Happy

स्टेथोस्कोपला स्पंदनमापक किंवा स्पंदनश्रावक असे काही नाव देता येईल.
विशेषनामांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद होत नाही म्हणून कंप्यूटर वगैरे शब्दांचाही होऊ नये हे पटत नाही. कंप्यूटर हे नाव ते यंत्र जे काम करते त्यावरून दिलेले आहे त्यामुळे ते विशेष नामासारखे अननुवादनीय नाही असे माझे मत. संगणक, गणकयंत्र असे शब्द सहज बनवता येतात.
मराठी प्रतिशब्द बनवले म्हणून ते लोक वापरतीलच असे नाही. त्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागतेच. मूळ इंग्रजी शब्द, अन्य पर्याय ह्यांच्याशी झगडत त्यांना आपले स्थान निर्माण करावे लागेल. महापौर, संपादक हे शब्द असेच तावून सुलाखून निघालेले आहेत. भाषेवरील प्रभुत्त्व आणि प्रतिभा हे वापरून नवे शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया प्रत्येक जिवंत भाषेत टिकून रहायलाच पाहिजे. अशाने च ती भाषा समृद्ध होईल.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर हा बौद्धीक उद्योग असेल तर मग त्यातही काही वाईट नाही.
वाईट काहीच नाही. उलट भाषा टिकवून ठेवायला उपयोगच होइल.

श्री. अजय गल्लेवाले यांनी मायबोली उपलब्ध करून मराठी भाषेवर उपकारच केले आहेत. इथे काही वेळा मराठीत अत्यंत सुंदर लिखाण केले आहे ते मी वाचले, म्हणून श्री. बेफिकीर, श्री. शिरोडकर, श्री. दक्षिणा यांचेकडूनहि अपेक्षा की आणखी लिहावे. या मायबोलीवर वरचेवर मराठी भाषेतील लिखाण, भाषण याचे कौतुक करून लोकांच्या निदर्शनाला आणून दिले पाहिजे की मराठी किती चांगली भाषा आहे.

विशेषनामांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद होत नाही म्हणून कंप्यूटर वगैरे शब्दांचाही होऊ नये हे पटत नाही. कंप्यूटर हे नाव ते यंत्र जे काम करते त्यावरून दिलेले आहे त्यामुळे ते विशेष नामासारखे अननुवादनीय नाही असे माझे मत. संगणक, गणकयंत्र असे शब्द सहज बनवता येतात.

मान्य. पण सध्या नुसते तेव्हढेच करून पुरणार नाही. त्या मुळे भाषा शुद्ध, अशुद्ध होत नाही. साध्या साध्या शब्दांसाठी इतर भाषेचे शब्द घुसडल्या जातात ते आधी थांबवले तर बरे. ती अशुद्धता.
मला स्वतःला फक्त ४५ वर्षांपूर्वीची मराठी लक्षात आहे. सुंदर होती ती भाषा - आज महाराष्ट्रात गेलो तर मुळात मराठी ऐकायलाच येत नाही, नि जिथे थोडीफार बोलतात तिथेहि मराठी शब्दांऐवजी इतरच भाषांमधले शब्द घुसडलेले दिसतात. वाईट वाटते. हे असेच चालायचे असे बहुतेक सर्वजण म्हणतात. त्याचे वाईट वाटते.

अननुवादनीय शब्दाबद्दल.
संस्कृतमधे एखाद्या नामापुढे अ लावला तर त्याचा अभाव असे सूचित होते. अभाव हे त्याचे उदाहरण. अज्ञान, अस्वच्छ ही अजून काही उदाहरणे. पण जर मूळ शब्द स्वराने सुरू होत असेल तर त्याचा अभाव दाखवायला अन वापरले जाते जसे आदर -> अनादर.
आहूत -> अनाहूत. हे इंग्रजीतल्या यू + एन उपसर्गाशी मिळतेजुळते वाटत असले तरी ते संस्कृतच्या नियमावर आधारित आहे.
अनुवादनीय चा अभाव अननुवादनीय असा मी केला तो ह्या नियमाच्या आधारे.

ok

अननुवादनीय असा मराठी शब्द आहे? हे इंग्रजीतल्या यू + एन उपसर्गाशी मिळतेजुळते वाटत असले तरी ते संस्कृतच्या नियमावर आधारित आहे.

अननुवादनीय हा शब्द संस्कृतच्या इतक्या जवळ जातो, की त्यामुळे मराठी समजायला संस्कृतचे व्याकरणहि समजायला पाहिजे की काय असे वाटते? त्यामुळेहि कदाचित लोक मराठी पासून परावृत्त होत असतील?!
त्यापेक्षा आपली हिंदी सिनेमातल्या सारखी टपोरी भाषाच बरी. कारण उसमे ना, व्याकरण वगैरेका झंझटच नही साला. अंग्रेजी, उर्दू कोणता पण शब्द बोलो, मराठीच होता है! Happy

कोकणातील एका माणसाकडून
इद्रट आणि घीनड हे शब्द ऐकले आहेत.
ही दोन्ही विशेषणे आहेत.

इद्रट म्हणजे विचित्र/चमत्कारिक किंवा येडपट असा माणूस अशा अर्थाने
आणि
घीनड म्हणजे अस्वछ, घाणेरडेपणे वागणारा माणूस अशा अर्थाने.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :

मायबोलीत विचित्र आय-डी घेणार्‍यांना वरील दोन्ही शब्द आयडी म्हणून आवडतील असे उगाच वाटून गेले Wink Proud

एकमात्र पालक चांगला आहे शब्द....
हिंदी मधे एकल अभिभावक म्हणतात...पण तो अभिभावक बहुदा Guardian साठी असावा...

एकमात्र पालक, Ekta palak >>> ह्म्प्प्प

I'm a single parent

what's your
super power?

या कोटचे मराठी भाषांतर काय होईल ?

इथे एकमात्र पालक योग्य वाटणार नाही बहुदा

मी एकल पालक आहे....

काय आहे तुमची क्षमता?

असे काही से होईल का ? जरा संदर्भ देउ शकाल का...अदरवाईज फार वर्ड टु वर्ड होईल हे

एकमात्र पालक ह्या केस मध्ये योग्य होणार नाही....
एकमात्र = Only
आपल्याला हवा आहे Single.

मी एकमात्र पालक आहे म्हण्टल्यावर असं वाटतय की मुलांच्या पालक-सभेला बाकीच्यांचे पालक गैरहजर आहेत...मीच एकमात्र पालक इथे आलो आहे....

माझे वै. मत..जरा संदर्भ देउ शकाल का वरच्या कोट चा

मी एकल पालक आहे....

काय आहे तुमची क्षमता?>>>>

हे त्यातल्या त्यात जवळ जात आहे.
उद्या 'Single parent day' आहे, त्यासाठी Office मध्ये एक poster बनवायचे आहे, त्यावर हा कोट लिहायचा आहे.

(This is not for or from me, हा कोट generally जे Single parent आहेत त्यांच्या साठी लिहायचा आहे.)

काल वॉट्सॅपवर एकाने 'लागणे' ह्या मराठी क्रियपदाचा विविध प्रकारे उपयोग केलेला एक परिच्छेद पाठवला.

त्यावर मराठी भाषा कशी सामर्थ्यशील आहे अशा आशयाची चर्चा सुरू झाली. तेव्हा माझे म्हणणे असे पडले की, जर एकच शब्द विविध अर्थाने वापरायला लागत असेल तर ते त्या भाषेचे शब्दसंपत्तीदारिद्र्य आहे. ते काही त्या मंडळींस पटले नाही.

तुम्हाला काय वाटते?

एक शब्द केवळ एकाच अर्थासाठी वापरला तर तो शब्द समृद्ध म्हणावा की गरीब? मला वाटते, समॄद्ध. म्हणून असे अनेक शब्द एखाद्या भाषेत असतील ती भाषाही समृद्ध म्हणावी लागेल.

शब्द आणि अर्थ यांचे वन-टू-वन संबंध असतील तिथे भाषा एकसुरी वाटू लागेल. त्यात काही वैविध्य येणार नाही. उदा. 'खाणे' या क्रियेचा अर्थ केवळ 'खाणे' या एकाच शब्दातून व्यक्त होणार असेल तर,
हाणणे
दाबणे
रिचवणे
हादडणे
गिळणे
मटकावणे

अशी विविध शब्दांची वाक्य न बनता केवळ 'खाणे'च आले असते.

<<एक शब्द केवळ एकाच अर्थासाठी वापरला तर तो शब्द समृद्ध म्हणावा की गरीब? मला वाटते, समॄद्ध>>

मराठीत प्राण्यांच्या समुहाला कळप ह्या एकाच शब्दाने संबोधले जाते. मग तो प्राणी कुत्रा असो की सिंह.

इंग्रजीत विविध प्राण्यांच्या समुहासाठी वेगवेगळे शब्द आहेत.

मग मराठी जास्त समृद्ध की इंग्रजी?

असे एखाद्या शब्दावरून भाषेची तुलना कशी करणार ना?
उदा. मराठीत मी काकू, मावशी, आत्या, मामी अशी भिन्न नाती नेमक्या शब्दांनी व्यक्त करू शकतो. इंग्रजीत यासाठी एकच शब्द - आँटी.

Pages