महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.
चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.
उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?
आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?
इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.
असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?
कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.
चला तर मग करायची का सुरुवात ?
वरदा.... मलाही अशीच माहिती
वरदा.... मलाही अशीच माहिती होती. 'केसांचा पेड'.... पण वरती को़कण्या म्हणतो ती 'तिपेडी' मी कधी पाहिली/ऐकली नव्हती.. ज्ञानात भर..
तिपेडी म्हणून तशी एखादी
तिपेडी म्हणून तशी एखादी केसांची अॅक्सेसरी असेलही, मीही पहिल्यांदाच ऐकली आहे. पण पेड याचा मूळ अर्थ वेणी करण्यासाठी केलेले केसांचे भाग असाच आहे.
जनरली तीनपेडी वेणी म्हणतात
जनरली तीनपेडी वेणी म्हणतात आपण नेहेमी घालतो तीन भाग करून त्याला आणि पाच भाग केले कि पाचपेडी वेणी. वरदा म्हणाली त्याप्रमाणे.
तिपेडी हा प्रकार मीपण पहिल्यांदाच ऐकतेय. खरंच छान आहे धागा किती माहिती मिळते.
शब्दसंपदा वाढवत आहोत
शब्दसंपदा वाढवत आहोत म्हणून....
'वाडवण' - मालवणीत हिराची झाडू.. ही नवीन असते तेव्हा तिला लांबलचक 'हीर' असतात. मग वापरून वापरून पुढे हीर तुटतात आणि उरतो तो 'खुटावरो' (खराटा).. जो अंगण झाडायला वगैरे वापरतात.
हीर : माडाच्या पानाच्या मधला कणखर देठ.. पाने हिरवी असतात पण हा देठ पिवळा असतो..
माडः नारळाचे झाड.
त्या हीरवरून हिरमोड येतो हा
त्या हीरवरून हिरमोड येतो
हा हीर केरसुणीच्या पानातल्या मधल्या शिरेचा असतो. हीर मोडला तर केरसुणी नीट काम करत नाही.
@वेबमास्टर तुम्ही म्हणताय ते
@वेबमास्टर
तुम्ही म्हणताय ते शब्दश: पटले आहे पण त्यावर अंमलबजावणी करणे अवघड आहे. लेखक म्हणून मीही इथे फार श्रेय घेऊ शकणार नाही. जास्तीत जास्त संकलक म्हणून माझा उल्लेख होईल कारण यात माझं योगदान तितकचं असणार आहे.
मराठी भाषेची समृद्धी आणि संस्कृती या दोन गोष्टीची नव्याने ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात मायबोलीकरांचं सहाय्य अपेक्षित असल्याने मी हा विषय इथे मांडला आहे. आंतरजालावरून माहीती मिळवणे फार अवघड नाही, पण माबोकरांमुळेच मी आज या पदावर पोहोचलो आहे आणि पुढची वाटचाल पण त्यांच्या सहकार्यानेच व्हावी ही माझी मनस्वी अपेक्षा आहे. एक व्यक्ती म्हणून मी सतत माझ्या यशात "मायबोली"ला वाटेकरी बनवू शकतो, पण चॅनेल श्रेय देईल अशी शाश्वती देऊ शकत नाही. माहीतीचा स्त्रोत म्हणून मी ह्या संकेतस्थळाकडे आणि माझ्या इथल्या तमाम मित्रमंडळीकडे पहात आहे. त्यांच्या मदतीचं ऋण मी जाहीररित्या नेहमी व्यक्त करत आलोय आणि करत राहीन.
आपलं मत नक्की कळवा.
खूप मस्त वाटतं हा धागा
खूप मस्त वाटतं हा धागा वाचताना.. किती गमतीशीर शब्द आहेत.. मज्जा !!
श्याम ची आई वाचताना ही खूपसे कोकणात वापरले जाणारे शब्द वाचून गंम्मत वाटायची..
बोळवणे = तोंडी लावणं ( आज भाताबरोबर काय बोळवलंय.. इ.इ.)
सर्स करणें - आता कशाला वेणी
सर्स करणें - आता कशाला वेणी घालत बसते सर्स कर! केसांवरुन कंगवा फिरवणे.
बोळक्यात बनवले जाते म्हणून
बोळक्यात बनवले जाते म्हणून बोळवणे.
अहिराणीमधे: वडगण- वरती आलाय
अहिराणीमधे:
वडगण- वरती आलाय तोच अर्थ.
बोघन- पातेल
झब- नरसाळ
गोण्ट- गोणपाट
अस्तुरी- बायको
आन्डेर- मुलगी
आन्डोर- मुलगा
धडला/ धल्ला- म्हातारा
धडली/ धल्ली- म्हातारी
व्हउ- सून
फुई- आत्या
देवपळ्हः देवकपाशी
उखल्ला- उकीरडा
कान्जील- विहीर
कबाडी- भन्गारवाला
अजुन आठवेल तस सान्गेन.
भगुनं म्हणजे पातेलं आणि
भगुनं म्हणजे पातेलं आणि अस्तुरी म्हणजे बायको हे शब्द माहित आहेत, बाकीचे एकदम नवे आहेत माझ्यासाठी
@कौतुक शिरोडकर तुमची अडचण मी
@कौतुक शिरोडकर
तुमची अडचण मी समजू शकतो. तुम्ही तुमच्या चॅनेल निर्मात्याला सांगून पहा पटलं तर चांगलंच. नाहितर राहिलं. जर एखादा दूरदूष्टी असलेला निर्माता असेल तर त्याला हे कळू शकेल.
मी हे फक्त मायबोलीबद्दलंच सांगत नाहीये तर जिथून जिथून तुम्हाला ही माहिती मिळेल त्या त्या ठिकाणाचा उल्लेख करा. आपल्या नावाचा उल्लेख होतोय म्हटल्या वर ती व्यक्ती आणखी त्यांच्या १० मित्रांना सांगेल आणि तुमच्या टीआरपी ला मदत होईल.
आर्या.... "अस्तुरी"....खूप
आर्या....
"अस्तुरी"....खूप वर्षांनी वाचायला मिळाला हा पत्नीविषयीचा उल्लेख. व्यंकटेश माडगुळकरांच्या "माणदेशी माणसं" मध्ये वाचला होता "अस्तुरी" चा उल्लेख (गावाकडच्या गोष्टीमध्येही "आरं, गप रं...अस्तुरी पोटुशी हाया, बसू दे तिला वाईच.." या धाटणीचं एक वाक्य आता स्मरते}.....त्यावेळी वाचनावरून सहज समजले की ती व्यक्ती आपल्या बायकोविषयी बोलत आहे....तरीही खानदेशातील एका मित्राकडून त्याचा उगम जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
अहिराणीचा तू उल्लेख केला आहेसच.....तर त्या भाषेतील एक म्हण "...चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि..." वाचनात आली होती....रुपावरून "चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला" हा अर्थ उमगतोच. तरीही "पेवाणी" व "दखाडानि" याचा अर्थ सांग जरा.
बायको, बायकू, अस्तुरी,
बायको, बायकू, अस्तुरी, कारभारीण, गृहमंत्री, बाईल, अर्धांगी...
हो मामा, 'अस्तुरी' बद्दल मी
हो मामा, 'अस्तुरी' बद्दल मी ही वाचल होत कुठेतरी.
तुम्ही म्हणता ती म्हण 'पिणार्या' लोकान्शी सम्बन्धीत असावी.
म्हणजे 'चार आण्याची पेवानी(प्यायची), आणि बारा आण्याची दखाडनी (दाखवायची)!!
ग्रेट आर्या.... पेवाणी आणि
ग्रेट आर्या....
पेवाणी आणि दखाडणि.....दोन्हीच्या अर्थामुळे होणारी अवस्था थेट नजरेसमोर आली....मस्तच.
वशेळ्या मह्णजे मंगळागौर
वशेळ्या मह्णजे मंगळागौर पूजणर्या मुली ना? काय आहे हा शब्द? व्युत्पत्ती?
मामा, तुम्ही म्हणता ती म्हण
मामा, तुम्ही म्हणता ती म्हण माझ्या ह्या धाग्यावर आली आहे बघा....शेवटी!
http://www.maayboli.com/node/10184?page=3
अजुन काही अहिराणी शब्दः
याही/ याहीण- व्याही/ विहीण
जवाई- जावई
आठे- इथे
इबाक- इकडे
तिबाक- तिकडे
तठे- तिथे
बठ्ठाजण- सगळेजण
उना- आला
जोयजे- पाहिजे
जुवान- तरणाताठा
परनाले- लग्नाला जाणे
कव्हळमव्हळ- कधी मधी
माती ग्या का?- मातला का?
हाड्या- कावळा. पितृपक्षाला 'हाडपक्ष' म्हणुनच म्हणत असावेत.
वडान्ग- कुम्पण
दान्गडो- दन्गा
घरोटा/ घट्या- जाते
चावळने- उगीच काहीतरी बोलणे. उदा. "काय चावळी राह्यनात रामभाऊ! आम्ही दखेल शे ना ते खेत! "
येरोनेरले- एकमेकान्ना
बाट्टोड- वात्रट
उप्पाद- कटकट
कुटाणा- त्रास/ कटकट
बोखल- कोनाडा
वाळन्यानी पन्गत- नवरदेवकडच्या लोकान्नी लग्नानन्तर आपल्या गावाला देण्याच जेवण
महावस्त्र- नवरीचा शालु
तेलन चिडली- नवरीच्या बस्त्यातली एक प्र्कारची साडी.
पोटझाकण- नवरदेव/ नवरीचा बस्ता होतो तेव्हाच नवरदेव, नवरीच्या आईला, फुईला लग्नासाठी साड्या घेण्यात येतात. त्याचा खर्च हुन्ड्याच्या पैशातुनच होतो.
मान्डवाची साडी- ही पण नवरीची साडीच.
एकन्दरीत नवरीच्या बस्त्यात, हळदीची साडी, महावस्त्र, तेलन चिडली, मान्डवाची साडी या ४ साड्या येतातच.
बेळमाथनी- लग्न जवळ आल्यावर नवरदेवच्या/ नवरीच्या घरी 'कळस भरल्यासारख, एका कोपर्यात मातीचा माठ आणि त्यावर मातीचच छोट भान्ड अस पाण्याने भरुन त्याला हळद माखलेला दोरा बान्धतात. त्याची आधी पुजा करुन मगच हळद फोडणे वै. कार्यक्र्म होतात.
आर्या... ह्या धाग्यावरील तुझा
आर्या...
ह्या धाग्यावरील तुझा हा वरील प्रतिसाद छानच आणि अभ्यासासाठी उपयुक्त आहेच....पुन्हा वाचतोय.
पण तू ज्या धाग्याची लिंक दिली आहेस तिला माऊसने क्लिक केल्यावर "हे पान पहायची परवानगी नाही...." अशी सूचना येत आहे.
तेलन चिडली >>> 'तेलन चिडी'
तेलन चिडली >>> 'तेलन चिडी' असावं ते. पण हा उत्तर आणि दक्षिण खानदेशातल्या अहिराणीतलाही फरक असू शकतो.
असा फरक अनेक शब्दांत आहे.
उदा.- म्हातारा, उकिरडा.
उत्तर खानदेशः धडला, उखल्ला.
दक्षिण खानदेशः धयडा, उखडा.
नाही रे साजिरा...तेलन चिल्डी,
नाही रे साजिरा...तेलन चिल्डी, तेलनचिड्ली असाच उच्चार आहे त्याचा.
मामा, बहुतेक 'खान्देश' ग्रुप जॉईन करावा लागेल तुम्हाला. वर उजव्या कोपर्यात त्याची लिन्क असेल. किन्वा माझ्या लिखाणात जाउन दिसतय का बघा.
साजिरा, खानदेशचे पूर्वापार
साजिरा, खानदेशचे पूर्वापार दोन भाग. पूर्व आणि पश्चिम. पूखा व पखा चे अनुक्रमे जळगाव व धुळे जिल्हे झाले होते.
ड, ळ व य कधीकधी इंटरचेंजेबली वापरले जातात. जसे कवयमवय = कवळमवळ.
तो साजर्या दखन्या शे ...
तो साजर्या दखन्या शे ... नावाले खानदेशी::फिदी:
रॉहु...तुसुद्धा!
रॉहु...तुसुद्धा!
बरोबर आहे इब्लिस. खानदेश
बरोबर आहे इब्लिस. खानदेश नाशिकच्या या ३-४ तालुक्यांना आपल्यात मानत नाही. तो वगळला तर तुम्ही म्हणता तसं पूर्व आणि पश्चिम हे सरळसरळ दोन भाग. उत्तर नाशिक जिल्हा हाही स्वतःला खानदेशचा भाग मानत नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आलं तेव्हा नाशिकने अंग काढून घेतलं- अशी अनेक उदाहरणं. प्रशासन, महसुलाच्या आणि इतर काही सोयींच्या दृष्टीने नाशिक केंद्र राहिलं असेल, इतकंच काय ते.
पश्चिम खानदेश आणि उत्तर नाशिक जिल्ह्याच्या भाषेत मात्र जबरदस्त साम्य आहे. 'एकच भाषा' (अहिराणी) म्हणायला हवं खरं तर. लग्नव्यवहार सुद्धा दक्षिण नाशिक जिल्ह्यापेक्षा धुळे जिल्ह्याशीच जास्त असावेत. पण त्यात विशेष काही नाही. असे व्यवहार सर्वच सीमारेषांवर असतात.
हुडा, हे म्हणजे आपली ती ह्यातली गत- साऊथ इंडियन्स महाराष्ट्राला नॉर्थ इंण्डियात गणतात तर नॉर्थ इंडियन्स साऊथात. कुठे नेऊन ठेवलाय महा....
आर्या , मी आपला नगर्या शे:
आर्या , मी आपला नगर्या शे::फिदी:
बरोबर @ साजिरा. नाशीकचा उत्तर
बरोबर @ साजिरा.
नाशीकचा उत्तर भाग म्हणताहात तो बागलाण. साक्री-पिंपळनेरच्या पुढे - नामपूर-सटाणा-मालेगांव इकडूनचा. मागेही मी लिहिलं होतं की साधारणतः गिरणेच्या वरचा (उत्तरेचा) नाशिक जिल्ह्याचा भाग खानदेशात येतो. बोली अहिराणीच, बाज थोडा वेगळा. जसे तो तापीच्या वर गेला की गुजरी /लेवा बोलीचा प्रभाव वाढतो, सातपुड्यात हिंदी/गुजराती. नाशिक जिल्ह्याचा हा एरिया धुळ्याच्या खासदारकीच्या मतदारसंघात मात्र येतोच येतो.
भाषासमृद्धीबरोबर भूगोल
भाषासमृद्धीबरोबर भूगोल समृद्धीही होतेय.
@वेबमास्टर, माझ्याकडून पुर्ण
@वेबमास्टर,
माझ्याकडून पुर्ण प्रयत्न केला जाईल याची हमी देतो. सध्या तरी मुंबईत राहणार्या ज्या माबोकरांना यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी मला कळवावे. मराठी माणसांचा टक्का जास्त असलेल्या मुंबईच्या प्रत्येक भागात जाण्याचा प्रयत्न असणार आहे. यात माबोकर सहभागी झाले तर आनंदच होईल.
या प्रयत्नात सहभागी होणार्या सर्वांचे आभार !!!
only mumbai ka shirodkar?
only mumbai ka shirodkar? :ao:
Pages