महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.
चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.
उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?
आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?
इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.
असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?
कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.
चला तर मग करायची का सुरुवात ?
नवरात्र आली कि मला लताच्या या
नवरात्र आली कि मला लताच्या या गाण्याची हमखास आठवण येते.
पावनेर गं मायेला करू,
ओटी मायेची मोत्यानं भरू..
गदीमा, शांता शेळके, सावळाराम ते एकनाथ महाराज यांनी असे अनेक शब्द त्यांच्या रचनेत गुंफून अमर करून
ठेवलेत.. काही आठवताहेत ते लिहितो.
१) जरा जपून शिपणं खेळा,
२) खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
३) शालू हिरवा, पाचू नी मरवा, वेणी तिपेडी घाला
००
अंगावरच्या शेलारीला बांधून त्याचा शेला
४) तूझ्या गळा, माझा गळा...
तूज पगडी, मज चिरडी, आणखी शेला कोणाला
५) गत करू काई, कळं ना ग बाई~
सजण शिपाई परदेशी
नीट सांडताती, आसवांचे मोती,
डोळीयाच्या शिंपी, तूझ्या पायी
६) सख्यासजणा नका तूम्ही जाऊ,
तूम्हाविणा एकली कशी राहू मी ?
००
शूरवीर शिपाई शिवबाचं, डोईमंदी शिरपेच मानाचं
येशवंत होऊन या घरला, भवानीला जोडीनं जाऊ
७) दादला नको गं बाई, मला नवरा नको गं बाई
काळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच नाही
८) कळा ज्या लागल्या जीवा.... हमामा गर्जती सारे
९) चंद्रकळेचा गं शेव, ओलाचिंब होतो.. घाल घाल पिंगा वार्या..
१०) फड संभाळ तूर्याला गं आला, तूझ्या उसाला लागल कोल्हा
११) डोळ्यात रेखिले काजळ मी झोंबते
कानात घातले, लोलक मी लोंबते~
फिरफिरूनी माझी, ऐन्याशी थांबते
केसामधुनी लहर उठविते फिरवून हळू कंगवा
..
आई मला नेसव शालू नवा.
१२) काजळरातीनं ओढून नेला.. सये साजण माझा
१३) माडीवरी चल गं गडे, जाऊ झडकरी
पाहू सदय दानशूर मूर्ती ती बरी
१४) ये झणि. ये रे ये रे, माघारी...
अजून आठवतील मला.. हे शब्द लहानपणीच आईकडून समजाऊन घेतले होते. आता वापरात नाहीत तरी
आवडतातच.
झणी म्हणजे झटपट, त्वरेनं
झणी म्हणजे झटपट, त्वरेनं का?
पावनेर तर सुरेखच शब्द आहे.
झणी म्हणजे झटपट, त्वरेनं
झणी म्हणजे झटपट, त्वरेनं का?
>>
हो
जरा जपून शिपणं खेळा & हमामा
जरा जपून शिपणं खेळा & हमामा गर्जती सारे - म्हणजे काय ?
वटकन लावणे: ताटात एखादा पातळ
वटकन लावणे: ताटात एखादा पातळ पदार्थ असेल तर तो इकडे तिकडे जावू नये म्हणून ताट तिरके राहण्यासाठी एखादा Support लावणे <<< मृणाल आणि त्या सपोर्टाला 'सोगणी' म्हणतात.
शिपणं हा रंगपंचमीसारखा एक खेळ
शिपणं हा रंगपंचमीसारखा एक खेळ आहे. आशोक त्याबद्दल सविस्तर सांगू शकतील.
हमामा... म्हणजे आरडाओरडा असावा. अशा नावाचा एक खेळ पण आहे. साधारण हुतूतू सारखा. कृष्ण हा खेळ
खेळत असे, असे उल्लेख काही गाण्यात आलेत ( गड्यांनो राजा कि रे झाला.. या गाण्यात )
सई.. ते ज्योत्स्ना भोळे यांचे
सई.. ते ज्योत्स्ना भोळे यांचे गाणे आहे.
ये झणिं ये रे ये रे माघारी,
कुठवर एकली वाट पाहू ?... असे शब्द आहे सुरवातीचे.
पावनेर हा शब्द माझ्या लहानपणी
पावनेर हा शब्द माझ्या लहानपणी वापरात होता. मलकापूरला आजीला शेजारणी विचारायच्या. म्हमईस्न ल्येक आलिया जनू, पावनेर काय करतीस ?
पावनेराला आमच्याकडे असा अर्थ
पावनेराला आमच्याकडे असा अर्थ आहे.
पण हे सगळेच आता बोलीभाषेतले
पण हे सगळेच आता बोलीभाषेतले शब्द कुठेयत? आणि असे शब्द काढायचे म्हणलं तर त्याला अंतच रहणार नाही..
मस्त धागा. वटकन लावणे: ताटात
मस्त धागा.
वटकन लावणे: ताटात एखादा पातळ पदार्थ असेल तर तो इकडे तिकडे जावू नये म्हणून ताट तिरके राहण्यासाठी एखादा Support लावणे <<< मृणाल आणि त्या सपोर्टाला 'सोगणी' म्हणतात.>>> आमच्याकडे त्याला टेकण म्हणतात.
दिनेश....आपल्य कोल्हापुरात
दिनेश....आपल्य कोल्हापुरात "रस्सामंडळ" नामक जो मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असा शब्द प्रचलित झाला आहे, त्याचे मूळ या पावनेरातच आहे. मी असले निमंत्रण स्वीकारले होते....जास्तीतजास्त खेडेगावातून हे नाम आजही वापरले जाते....अर्थात जेवण शेतात शिजविले जाते....आणि त्याच मातीत मस्तपैकी घोंगडे टाकून चांदण्याखाली वारुणीसोबत गप्पा रंगतात....पावनेरासाठी आणलेल्या शिजणार्या मटणाचा रश्श्याचा वास वार्यामुळे अगदी आसमंतात पसरतो...इतका की आजुबाजूला असलेले चिंचेचे वडाचे झाडही मस्तपैकी डोलू लागते.
"शिपणं खेळा...." जगदिश खेबूडकरांची ही रचना...खूप लोकप्रिय झाली होती....होय, रंगपंचमीचाच एक प्रकार. उत्तर भारतात....विशेषतः राजस्थानात रंगपंचमी म्हणजे कोरडा रंग फेकणे तर आपल्या महाराष्ट्रात रंग पाण्यात मिसळून ते पाणे शिपतात एकमेकीच्या अंगावर....त्यावरूनही शिपणं नाम अस्तित्वात आले.
हमामा = गाईम्हशी माळावर चरायला सोडल्या म्हणजे ती गुराख्यांची पोरं वेळ घालविण्यासाठी साईसुट्यो, आबाधोबी, गलोरी आदी खेळ खेळत वेळ काढतात....हमामा हा हुतूतू सारखाच एक पकडीचा प्रकार...फक्त याला मोजमापाचे कुंपण नसते....रानभर आटापाट्यासारखा दंगा करत प्रतिस्पर्ध्याला खेचायचे आणि आदळायचे. हल्ली मात्र (गेल्या काही वर्षापासून) हे सारे पारंपारिक खेळ नष्ट होत चालल्याचे चित्र दिसते....त्याची जागा आता क्रिकेटने घेतली आहे.....व्हॉलीबॉलदेखील दिसतो.
पावनेर बद्दल साप्ताहिक
पावनेर बद्दल साप्ताहिक सकाळमधे वाचले होते. बराच मोठा लेख होता. बहुदा राजन गवस यांचा. नक्की आठवत नाही.
चहा - ज्यात दूध, साखर, चहा
चहा - ज्यात दूध, साखर, चहा पावडर अत्यंत कमी असेल अशा चहाला 'फळकवणी' म्हणतात.
>> ढकळवणी असंही म्हणयाची आमची आजी. कुठल्याही आमटी, वरण, चहा इ पदार्थात पाणी जास्त आणि जिन्नस कमी असेल तर हा शब्द यायचाच!
नताशा.... "पावनेर" नावाचीच एक
नताशा....
"पावनेर" नावाचीच एक कथा होती "स्वामी" कार रणजित देसाई यांची. इस्लामपूर वा वडगांवच्या शेतकर्याची कथा. शेंगा उपटायला मजूर मिळत नसतात....खूप अडचणी सामोर्या येतात. शेतकर्याच्या वाडीतील दोनचार माणसे त्याला म्हणतात..."किस्न्या, बाजाराला जा बोकड घेऊन ये चांगला आणि बोलाव आठदहा जणांना....भारीपैकी पावनेर करून टाकू....शेंगा दोन दिवसात निघतील....". अशा स्वरूपाची ती कथा होती.
वरदा, दक्षिणा- धन्यवाद. पण
वरदा, दक्षिणा- धन्यवाद. पण मला "नारळ वाढवणे" हा शब्द फार पटत नाही.
हीराचे म्हणणे पटले. शब्दाचा मूळ अर्थ बाजूलाच राहतो. वाढवणे म्हणून पण नारळ फोडतोच ना शेवटी..
मूळ शब्द आणि त्यानंतर वेगळ्या संदर्भाने बदलत जाणारे शब्द यावर अजून चर्चा होऊ शकते.
मामा असेल मी कथा वाचलेली
मामा असेल मी कथा वाचलेली नाही.
राजन गवस "सध्या फारशा प्रचलीत नसलेल्या शब्दांबद्दल" साप्ताहिक सकाळ मधे लिहितात. त्यात बहुदा तो लेख होता.
दक्षिणाने म्हंटलेय तसे..
दक्षिणाने म्हंटलेय तसे.. गाणीच आता मारुनमुटकून साहित्यिक भाषेत लिहिली जातात. असे त्या त्या परीसरातले शब्द वापरणे कमीपणाचे वाटते का गीतकारांना आता ?
उसाला लागल कोल्हा, मधले दोन्ही अर्थ अगदी कुणाही शेतकर्याला सहज कळतील..
मला महानोरांची गाणी आवडतात.. पण मी रात टाकली, मी कात टाकली.. असे शब्द त्या त्या पात्राच्या तोंडातले वाटत नाहीत.
शांता शेळके तर मी लेखनकामाठी करते असे म्हणत असत. ( त्या गाईड लिहित असत ) पण गीतांच्या बाबतीत त्यांनी कधी अश्या पाट्या टाकल्या नाहीत.
नमस्कार ! माझ्या नव्या शो
नमस्कार ! माझ्या नव्या शो साठी इथली माहीती मी उचलत आहे. आपली कोणाची हरकत नसेल अशी आशा आहे. शोबद्दल लवकरच कळवेन. फक्त एक विनंती आहे. शब्द आणि अर्थ देणार्यांनी जर त्यांच्या भागाचा उल्लेख केला तर माझ्यासाठी फार उत्तम. उदाहरणार्थ. अशोक पाटील यांनी लिहीलं आहे की नारळाला तिकडे परटे म्हणतात. तिकडे म्हणजे धारवाड, उनकल, बिदर भाग का ? किंवा आशू२९ ने सांगितलेले शब्द कोणत्या भागाशी निगडीत आहे ते कळलं तर माहीती पुर्ण होईल.
मराठीशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला शो मधे प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. मराठी बोलीभाषातील गंमतीदार शब्द व त्यांचे अर्थ, वाक्यप्रचार, म्हणी, मराठी सणांबद्दलची इंत्यभूत माहीती, खाद्यसंस्कृतीतील नेहमीच्या माहीतीत नसलेले पदार्थ, इंग्रजी शंब्दांचे मराठी अर्थ, मराठीत सहज भाषांतर करता येणार नाही अशी इंग्रजी वाक्ये, निरनिराळ्या क्षेत्रातली पहिली मराठी व्यक्तीमत्वे... मराठीच्या गुहेतला हा खजिना "म म मराठीचा" म्हणत सर्वांसाठी हसतखेळत खुला करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते सहज शक्य आहे. तुमच्याकडेही काही कल्पना असल्यास नक्की कळवा.
मी लवकरच माझी टीम घेऊन मुंबईतली मराठी चाळी, सोसायट्यांना भेट देणार आहे. यात मॉल, कॉलेजेस, नाट्यगृहांचे कट्टेसुद्धा असतील. ज्यांना आमच्या टीमला भेटायचं असेल ते मला कळवू शकतात. सध्या मुंबईहा एकच विभाग ठरला आहे. पुढे मिळणार्या प्रतिसादावर इतर गोष्टी अवलंबून असतील.
आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत !
www.marathidictionary.org/mea
www.marathidictionary.org/meaning.php?id=31386&lang=Marathi
धेडगुजरी - dhedagujari - [dhēḍagujarī]. f ( धेड & गुजरी ) A lingua franca, a barbarous mixture of languages. f ( dheda & gujari ) A lingua franca, a barbarous mixture of languages.
परटं हा शब्द
परटं हा शब्द कोल्हापुरकडचा.
त्याला तीन भोकं असतात
काय डोळे हैत का परटाची भोकं ? असा शब्दप्र्योगही आहे.
( याच्यावर एक अश्लील कोटीही प्रचलित होती.
डोळे हैत का परटिणीची भोकं ? इथे परीट - परटीण हा संदर्भ )
कौतुक, तुम्हाला एक विनंती
कौतुक,
तुम्हाला एक विनंती आहे. तुमच्या शो मधे जर तुम्ही इथला काही मजकूर घेतला तर मायबोलीचा आणि ज्या मायबोलीकरांनी माहिती पुरवली त्यांचा आवर्जून उल्लेख करावा.
उदा "मायबोलीकर अशोक पाटील यांनी सांगितलं नारळाला तिकडे परटे म्हणतात"
तुमचा त्यात फार वेळ जाणार नाही किंवा कष्ट पडणार नाही. पण त्या व्यक्तीला आणि तिच्या मित्रमंडळींना हुरुप येऊन ते इथे आणखी माहिती पुरवतील. ज्या गोष्टींचा तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी वापर करता येईल. तुमच्या कार्यक्रमाबद्दल कानोकानी चांगले मत होईल.
या उलट तुम्ही हा उल्लेख केला नाही किंवा मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे नाव कुठेतरी शेवटी श्रेयनामावलीत झरझर गुंडाळले तर इतरांना इथे उत्तर द्यायचा उत्साह राहणार नाही. ज्या व्यक्तीने माहीती दिली होती, तिला कुठे तरी राग येऊन ती आणखी निगेटीव्ह अभिप्राय मित्रांना सांगेल आणि तुमच्या कार्यक्रमाबद्दल चांगले मत होणे अवघड होऊ शकेल.
बघा पटतंय का?
इथे एखाद्या शब्दाचा अर्थ अथवा
इथे एखाद्या शब्दाचा अर्थ अथवा वेगळा शब्द नमूद केल्यास ते तिसरीकडे उद्धृत करणे त्या लिहिणार्याचे श्रेय कसे होऊ शकते? तो शबद त्याचा प्रताधिकार कसा होऊ शकतो. ? फार तर ह्या शोच्या निर्मीतीत मायबोली संकेतस्थाळाचेही योगदान आहेअसे म्हणणे उचित ठरेल...
ये बात कुछ हजम नही हुई ....
मायबोली संकेतस्थळाचा उल्लेख
मायबोली संकेतस्थळाचा उल्लेख ठिक आहे पण इथे लिहिलेल्यांपैकी कुणीही त्या शब्दाचा "मालक" नाही. बहुतेकांची माहिती कानोकानी ( कोल्हापुरी भाषेत उडतउडत ) ऐकलेली आहे...
नवरात्रीच्या संदर्भात "माळ" या शब्दाला पण वेगळाच अर्थ आहे. घटावर रोज एक नवी झेंडूची माळ चढवली जाते.
आणि या दरम्यान जर हस्त नक्षत्राचा पाऊस लागला.. तर हत्ती माळेत अडकला असे म्हणतात.
बॉक्स ...> खोका/ खोके स्टँड
बॉक्स ...> खोका/ खोके
स्टँड ...> घडवंची (खास मालवणी शब्द)
मग - (MUG) ...> टमरेल ... पण हा शब्द देखिल (कदाचीत) Tumbler चा अपभ्रंश होऊन बनलेला असावा (एक अंदाज). चु-भु देणे घेणे...
टाईल्स ...> कौल (घराच्या छपरावर लावतात ती...)
कप ... फुलपात्र
मिक्सर, ज्युसर, ओव्हन, फ्रिज, होम थिएटर ... हे सगळे शब्द हल्लिच्या - म्हणजे ७०च्या दशकाच्या नंतरचे आहेत, त्यामुळे हे सगळे शब्द आहेत तसेच स्विकारले गेले असावेत. मराठी अथवा मराठीच्या बोली-भाषां मधे या शब्दांना 'प्रतीशब्द' मिळणे कठीण वाटते...
ADIDAS ऑल डे आय ड्रिम अबाउट
ADIDAS
ऑल डे आय ड्रिम अबाउट स्पोर्ट्स .. यावरुन हे नाव बनलेले आहे. बहुदा मराठी मधे देखील असे काही असेल का ?
सगळेच शब्द मराठी भाषेतले
सगळेच शब्द मराठी भाषेतले असल्याने कुठल्याच शब्दांवर कुणाचाच प्रताधिकार नाही किंवा परवानगी घ्यायची गरज नाही. त्याबद्दलचे वाक्य लिहण्यात माझी चूक झाली होती आणि ते मी वर काढून टाकले आहे.
कुठलाही शो जास्तीत जास्त लोकांना आपलासा वाटावा म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करावा (केला पाहिजे असे कुठलेही बंधन नाही) असे मी सुचवेन.
पावनेरः हा शब्द आमच्या
पावनेरः हा शब्द आमच्या मालवणीत पन सर्रास वापरला जातो.. कोणिही दुसर्याच्या घरी पाहुना/कामासाठी म्हणुन गेला आणि तिथ जेवनासाठी राहिला. की त्या जेवाणाला पावनेर अस म्हणतात.
वेणी तिपेडी घाला: तीपेडी ही बहुतेक हलक्या लाकडाची बनवतात. आणि गजरा घालताना तो व्यवस्तित त्रिकोनी आकारात बसावा म्हणुन गजरा त्यात अडकवतात.. आणि ति तीपेडी केसांना बांधतात.
'पावनेर' हा मालवणीत
'पावनेर' हा मालवणीत 'पाहूणचार' चा अपभ्रंश असावा....
तिपेडी... मी इतकी वर्षे 'तिपेडी' म्हणजे तीन-पेढ म्हणजे तीन जाड्या बटा असे काहीतरी समजत होतो.
वेणी करताना केसांचे जे समान
वेणी करताना केसांचे जे समान भाग करतात त्याला पेड असं म्हणतात. सहसा तीन भाग करून ते एकमेकांत गुंफतात. त्याला तिपेडी वेणी म्हणतात. पाचपेडी वेणी पण असते.
Pages