खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग

Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 00:20

खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

चवथा विषय :
निसर्ग

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज

Group content visibility: 
Use group defaults

बरोबर Happy

तुम्ही द्या पुढचा शब्द.

कॉरल

चीटिंग कसं करायचं?
उत्तर बरोबर असेल तरी पुढचा क्लू तुच दे. >> Lol तुझ्या चीटिंगची र्म्दला का शिक्षा ?

>> चीटिंग कसं करायचं?
गुगल करून

शिक्षा काय? मी डिसक्वालीफाय झाले ना? केवळ खेळ पुढे सुरू रहावा हा उदात्त हेतू होता बरं का. Lol

Proud

स, उत्तर ऑलमोस्ट बरोबर आहे. 'समुद्रफेन' शब्द आहे तो Happy
तरीही आपण उत्तर बरोबर आहे असंच धरूया.

आणि पुढचा क्लू तू दे की! Happy नाहीतर अमितव ला सांग Proud

ओह... वापरिंग गुगल इज स्किल. समुद्र फेणा हे सर्च मध्ये यायला काय सर्च वर्ड टाईप करायचे हेही मला झेपत नाहीये.
आणि आलंच असतं समुद्रफेणा तरी हे उत्तर आहे हेही समजलं नसतं. त्यामुळे हे चीटिंग म्हणजे टोटल विनय आहे. कन्विन्स झाली असलीस तर पुढचा क्लू गुगल न बघता दे. नसलीस तर बघून दे.
पण दे Proud

मला काही सुचत नाहीये तेव्हा काहितरी प्रचंड सोपं

xx

मी एक शेंग आहे. पिकलेली, कच्ची दोन्ही रूपात पॉप्युलर. माझ्या नावाच्या शब्दाचा एका दागिन्याच्या नावात वापर आहे. इतकंच नव्हे तर भारतातल्या एका मोठ्या शहराच्या एका भागाच्या नावात मी आहे. अनुप्रास अलंकार शिकताना हमखास वापरल्या जाणार्‍या उदाहरणात मी आहे.

Pages