Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किसलेली गाजरे + फेटलेले दही +
किसलेली गाजरे + फेटलेले दही + थोडी मोहरी पूड + मीठ + किंचित साखर (आवडत असल्यास) + जिरेपूड (चव आवडत असल्यास) आणि वरून कोथिंबीर अशी कोशिंबीरही भ न्ना ट लागते. मोहरी पूड लाल मोहरीची असावी शक्यतो.
किसलेली गाजरे + आवळ्याचा कीस
किसलेली गाजरे + आवळ्याचा कीस + मीठ हा प्रकारही छान लागतो.
http://nishamadhulika.com/sab
http://nishamadhulika.com/sabzi/sabzi_stuffed/stuffed-tomato-recipe.html
गायु, वरच्या लिन्कमध्ये बघ. माबोवर पण दिसली नाही, असेलही कदाचीत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=DYB7LX4lq14
यात पण आहे.
ज्वारीच्या रव्याचा उपमा मी
ज्वारीच्या रव्याचा उपमा मी प्रेशरपॅनला करते. १ वाटी रव्याला ४ वाटी पाणी लागते कुकरात.
नुसता करायचा झाला तर ६ वाट्या असे मैत्रिणीने प्रमाण सांगितले आहे.
बार्ली किंवा कुठल्याही दलियाचे उपम्याप्रमाणे प्रकरण करते मी. फोडणी व इतर चववाल्या वस्तू आयत्यावेळेला जे प्रयोग सुचतील तश्या पण कोरडे भाजून घेणे, फोडणीत कांदा परतून मग आधणाचे पाणी आणि नंतर भाजलेला रवा शिजवून घेणे ही कृती बदलत नाही.
दलिया वगैरे नुसते करायला जायचा माझ्यात पेशन्सच नाही त्यामुळे अर्थातच प्रेशरपॅन झिंदाबाद.
डाळ तांदूळ खिचडीला ज्या प्रमाणात पाणी घालायचे त्याच्या किमान दीडपट तरी पाणी दलियाला घालते मी.
नटसमधे तीळ येत नसले तर थोडे तीळ भाजून, भरड करून घे मिक्सरातून. आणि दाण्याच्या कुटाऐवजी वापर.
किंवा मग जवस, भोपळा, सूर्यफूल यापैकी कश्याच्याही बिया असल्या तर त्या भाजून मिक्सरातून भरड काढून दा कु ऐवजी.
पण या बियांना नटसमधे मोजतात का नाही हा आता मला प्रश्न पडलाय(मोजत नसावेत असं वाटतंय खरं!). ती खात्री करून घे.
योकु, ठाण्यात बेसिल ५० रुपये
योकु, ठाण्यात बेसिल ५० रुपये जुडी
स्टफ्ड टोमॅटो = भरले टोमॅटो = इथे आहेत = http://www.maayboli.com/node/23195
धन्यवाद.
धन्यवाद.
अरे कोणाला नाचणीच्य लाडु ची
अरे कोणाला नाचणीच्य लाडु ची रेसिपी माहित आहे का ?????
अरे कोणाला नाचणीच्य लाडु ची
अरे कोणाला नाचणीच्य लाडु ची रेसिपी माहित आहे का ??>>>> हो.
नाचणी लाडू... ४ वाट्या नाचणी
नाचणी लाडू...
४ वाट्या नाचणी पीठ.
२ वाट्या कणिक किवा तांदुळ पीठ.
५ वाट्या पीठी साखर.
अर्धी वाटी तुप.
कढईत तुप घालुन त्यात दोन्ही पीठं घालून चांगलं भाजुन घ्या.
भाजलेले पीठ चांगले गार होउ दया.
मग त्यात साखर मिसळा. साखर चवी प्रमाणे कमी जास्त करा.
वेलची पावडर सुकमेवा टाका न लाडू वळा....
धन्यवाद रश्मी मंजूडी. रश्मी
धन्यवाद रश्मी मंजूडी. रश्मी मी निशा मधुलिका च्या रेसिपी मध्ये जरा व्हेरिअशन करून नवीन प्रकार केला.
मंजूडी मी उशिरा पाहिला प्रतिसाद. पण हि रेसिपी भारीये. ठाण्यात आल्यावर आता दाबेली मसाला घ्यालच हवा! जांभळी नाका म्हणजे तलावपाळीजवळचा न का तो टेंभी? माझा नेहमीचा घोळ आहे,
धन्यवाद रोचीन
धन्यवाद रोचीन
घरात मालवणी वड्याचं पीठ आहे १
घरात मालवणी वड्याचं पीठ आहे १ किलो, वडे सोडुन दुसरं काय करता येईल? धिरडी होतील का? किंवा आदल्या दिवशी पीठ भिजवुन दुसर्या दिवशी आंबोळ्या. असं काही केल तर चांगल लागेल का? अजुन काय करता येईल?
मला आवळा सुपारी कशी करायची
मला आवळा सुपारी कशी करायची कोणी सांगेल का प्लिज.
माझ्या कडे अडिच किलो आवळे आहेत मध्यम व छोट्या आकाराचे त्याचे काय करावे?
मोराआवळा व कॅडी नको आहे दुसरे टीकावु काय करता येईल?
मुग्धा धिरडी होतील.
मुग्धा धिरडी होतील. वेगवेगळ्या भाज्या, कांदा घालून थालीपीठ पण होईल. ते टिकेल ना. अगदी लवकर संपवायची गरज आहे का. धिरडी चांगली लागतात. तासभर भिजवून करायचे मी पूर्वी. हल्ली नाहीच पीठ करत ते. पाव किलो विकत आणते कधीतरी, नवऱ्याला वडे आवडतात म्हणून.
सकुरा, मोठे आवळे आहेत ना ? ते
सकुरा,
मोठे आवळे आहेत ना ? ते किसायचे, त्यासोबत थोडे आले आणि मिळाल्यास ओली हळदही किसायची. मग त्यात मीठ, जिरे पुड व थोडा हिंग घालून तो किस पसरून वाळवायचा. झाली आवळा सुपारी. शक्य असल्यास यात काळे मीठ ( संधव ) पिंपळी पूडही घालायची. सर्व प्रमाण चवीनुसार.
आवळ्याचे लोणचेही छान होते.
आवळ्याचे लोणचेही छान होते. मायबोलीवर कृती आहे.
सकुरा, मायबोलीच्या शोधपट्टीत
सकुरा, मायबोलीच्या शोधपट्टीत 'आवळा सुपारी' टाका. सुलेखाने लिहिलेली पाकृ आहे, अजूनही प्रकार सापडतील.
जेवायला येणारे पाहुणे बटाटा,
जेवायला येणारे पाहुणे बटाटा, कांदा, आल, लसुन न खाणारे आहेत. प्लीज ह्या अटीत बसणारा जेवणाचा मेनू सुचवा!!
तो किस पसरून वाळवायचा>>>>>
तो किस पसरून वाळवायचा>>>>> उन्हात ना?
दिविजा, स्वीट कॉर्न सूप /
दिविजा,
स्वीट कॉर्न सूप / मिक्स व्हेज सूप
सिमला मिरची पीठ पेरून / घोसाळी पीठ पेरून / भेंडी परतून / तोंडली काचऱ्या परतून भाजी
मटकीची जिरे खोबरे मिरची वाटण लावून उसळ किंवा अख्ख्या मसुराची संजीव कपूर कृतीने उसळ
वांग्याचे बेसन लावून काप किंवा नुसते काप
पापड, पापड्या, कुरडया
काकडीची कोशिंबीर / गाजर टोमॅटो कोशिंबीर / किसलेल्या कोबीची दाणे कूट मीठ साखर लिंबूरस व फोडणी घालून पचडी
बुंदी रायता
शेवयांची खीर / दुधी हलवा / गुजा
पोळी / पुरी
मसालेभात / पुलाव / बिशीबेळी भात
मुखवास (विडा वगैरे)
दिनेश, माझ्याकडे अद्र्क भरपुर
दिनेश,
माझ्याकडे अद्र्क भरपुर आहे ओली हळद थोडी आणायला लागेल ती आरामात मिळुन जाईल.
पाककृती बद्दल धन्यवाद.
मंजुडी, तुला पण धन्यवाद.
भोपळी मिरच्यांची पीठ पेरुन
भोपळी मिरच्यांची पीठ पेरुन भाजी, सांडगी मिरच्यांची फोडणी घालून पालक - मुगाचं वरण, फ्लावर वटाणा गाजर सुकी भाजी , काकडीची कोशींबिर , पोळ्या, गोड काही तुमच्या आवडीचं .
इडली सांबार ( फ्लावर, गाजर, वांगी , शेवगा ) वडा सांबार, अप्पे, - दोन प्रकारच्या च्टण्या, टॅमरिंड राइस/ लेमन राइस / दही भात
तुमच्या प्रोफाइलमधे टेक्सास लिहिलंय. मस्त पैकी टाको बार करा ना
कॉर्न टॉर्तिया , थोड्या तेलावर परतलेले भोपळी मिरच्यांचे तुकडे, ग्रीन बीन्स, अस्पॅरॅगस, चालत असल्यास मश्रूम्स, रीफ्राईड बीन्स, श्रेडेड लेट्यूस, किसलेले केसो फ्रेस्को. ज्याला हवे तसे बनवून खाता येईल.
कोथींबीर, लिंबू , मिरची , अव्होकाडो मॅश करुन( पूअर मॅन्स ) ग्वाक पण करता येईल .
सातूचे पीठ कसे करतात कुणाला
सातूचे पीठ कसे करतात कुणाला माहित आहे का? गव्हाचं आणि डाळीचं प्रमाण काय असतं?
जेवायला येणारे पाहुणे बटाटा,
जेवायला येणारे पाहुणे बटाटा, कांदा, आल, लसुन न खाणारे आहेत>>> आमच्याकडचा बहुतांश स्वयंपाक याच मेनूमध्ये बसतो.
भेंडीचं पंचामृत, भिजवलेल्या मुगाची पचडी, पीठ पेरून केलेल्या कुठल्याही भाज्या, नैवेद्याचा फ्ळॉवर मटार रस्सा किंवा पालक पनीर, मेथी मलई मटर, जीरा राईस दाल तडका (दाल पाच डाळींची मिळून केली तर छान होते), टोमॅटो राईस, पालक राईस, छोले राईस, पोळी-पुरी, गोडामध्ये जे आवडेल तस>
सातूचे पीठ कसे करतात कुणाला
सातूचे पीठ कसे करतात कुणाला माहित आहे का? गव्हाचं आणि डाळीचं प्रमाण काय असतं?
http://rohinivinayak.blogspot
http://rohinivinayak.blogspot.in/2009/07/blog-post.html : सातूचे पीठ
धन्यवाद. करुन बघते.
धन्यवाद. करुन बघते.
कणकेच्या केक ची हामखास पाक्रु
कणकेच्या केक ची हामखास पाक्रु कोणाला माहिती असल्यास प्लिज.
मी केलेला आधी मस्त फुगतो, पण नंतर मात्र पुन्हा बसतो.
कणकेच्या केक ची हामखास पाक्रु
कणकेच्या केक ची हामखास पाक्रु कोणाला माहिती असल्यास प्लिज.
मी केलेला आधी मस्त फुगतो, पण नंतर मात्र पुन्हा बसतो.
Pages