पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६० जणांसाठी भाजी, पुर्‍या, गाजरहलवा, पुलाव इत्यादी पदार्थ तुम्ही घरी करणार त्यासाठी आधी __/\__
प्रमाणाचा अंदाज एखादा कॅटररच देऊ शकेल.

लेटेस्ट कोकण ट्रीपमधे, ब्रेफास्ट मधे 'आंबोळी' प्रकार खाल्ला. आम्हाला सगळ्यांना खुपच आवडला. शिवाय fermented नव्हता. झटपट भिजवायचं काही mixed grains चं पीठ होतं. मात्र भाजणी सारखी चव नाही. त्यापेक्षा वेगळं पीठ असणार. झटपट आणि न्युट्रीशियस म्हणुन बनवुन घ्यायचं आहे. यात कोणती धान्यं वापरायची, त्याचं प्रमाण आणि पीठ बनवण्याची कृती सांगणार का, प्लीज?

नवीन प्रकरचा मसाला पार्टी साठी वापरणार असाल तर आधी थोड्या प्रमाणात करून घरच्यांना टेस्टिंगला द्या .

६० जणांसाठी भाजी, पुर्‍या, गाजरहलवा, पुलाव इत्यादी पदार्थ तुम्ही घरी करणार त्यासाठी आधी __/\__ >>>>
माझ्याही मनात हाच विचार आला . साष्टांग नमस्कर !!!!

मेथि, धने, चन्याचि दाल
मिक्षेर मधुन काधने

ताद्लाचे पिथ
मिथ

कादा किसुन

घ्यावा

हे पिथ आम्हि

सकालि
भिज्वतो

सन्ध्याकालि

आम्ब्बोअल्या करायच्या

रश्मी, थँक्यु सो मच. Happy अगदी अशीच होती ती आंबोळी. हेच्च पाहिजे होतं. मावशींना या विकेंडला करुन ठेवायला सांगणार पीठ.

शब्दाली, थँक्स Happy

Ic, तुझ्या रेसिप मधला कांदा किसुन टाकण्याचा पॉइंट नोट केला आहे. त्याने बहुदा जास्त क्रिस्प होतील आंबोळ्या. Happy

हे प्र९ च्या धाग्यावर पण विचारलं आहे.. इथे पण विचारते. उत्तर देणं या धाग्याच्या विषयाशी सुसंगत नसल्यास विपुत सांगितलं तरी चालेल Happy

पित्ताने पचनक्रियेवर सारखा ताण येत असेल तर पचायला हलके आणखी पर्याय सुचवा. मुडाखी आणि मुग एके मुग विथ दुधी,दोडका इ. खाऊन बोअर झालं आहे. टॉमेटो, लिंबु,मिरची हे काही महिने तरी झेपणार नाही.

पित्तावर हमखास उपाय - उत्तम प्रतीचा बासमती तांदूळ मऊ शिजवून दूध घालून पहाटे पहाटे चार दिवस खायचा. दुसरा उपाय कोबीचे सूप (बाकी काही न घालता) पिणे.

पित्ताने ताण येऊ नये म्हणून खाऊ शकणाऱ्या पदार्थांत गोडाचा शिरा, जिरे - हिंगाची सौम्य फोडणी करून त्यात भाजलेला जाडा रवा - पाणी - मीठ - साखर घालून बनवलेला मिठाचा उपमा, दह्यांतली रायती (काकडी, दुधी, लाल भोपळा, पालक, चंदनबटवा, दोडका, पडवळ वगैरे) हे खाण्यासाठी. कढी, लिंबाचे सरबत, आवळा सरबत, आमसुलाचे वा कोकमाचे सार - सरबत, ताकात किंचित हिंग व चिमूटभर साखर घालून पिणे, हे पेयप्रकार.
रसगुल्ले ट्राय करायला हरकत नाहीत, पण पचायला हलके नाहीत ते. आठपट किंवा बारापट पाण्यातला, तांदूळ भाजून व तूप जि.ऱ्याची फोडणी दिलेला भात. नाचणी सत्त्व पाण्यात शिजवून त्यात चवीनुसार मीठ, ताक, कोथिंबिर घालून. नुसते मीठ घालूनही शिजवलेली ही गंजी खातात लोक. चवीला आमसूलही घालता येते. भेंडीचे दह्यातले रायते. ताकातला पालक / चाकवत भाजी. ताकभात. श्रावण घेवडा चिरून, उकडून त्यांत मीठ, साखर, लिंबाचा रस व वरून किंचित फोडणी गार करून घालून कोशिंबिरीप्रमाणे.

आभार्स सर्वांचेच.

सर्वांनी मिळून भरपुर पर्याय दिलेत. गोडाचा शळून्,खिरी वगैरे गोड पदार्थ इतर काही कारणाने हद्दपार आहेत आणि लिंबु फक्त सध्या रिअ‍ॅक्शन येतेय म्हणून सोडलंय. जनरली पित्तशामक असू शकेल. जाडा रवा, पडवळ वगैरे इंग्रो मध्ये शोधते बाकी चंदनबटवा, चाकवत वगैरे इकडे मिळते का ते माहीत नाही. असंही मला त्या भाज्या स्वतः खरेदी न केल्यामुळे ओळखीच्या पण नाहीत Happy उकड वगैरे आधी केल्या नाहीत आता शिकेन. नशीबाने कोकम आगळ आहे घरी त्यामुळे त्याचा वापर सुरु आहेच. कोबी गेशियस असावा असं बाळंतपणाच्या अनुभवावरून वाटतं. मी दुधीचं सूप करून पिते. बासमती तांदूळ आणि ते आठपट पाण्यात शिजवणे वगैरे पण पाहाते कसं जमतंय ते. आजकाल मी फक्त खायचाच विचार करते असं झालंय (आणि इतकं करून सगळे बोअरिंग ऑपश्नस..असो...होपफुली इट्स जस्ट फॉर सम टाइम)

इकडच्या विकतच्या दह्याला घरी घुसळून केल्यास ताक म्हणावे का? हा एक जुनाच प्रश्न आहे किंवा मग ते केफिर म्हणून एक ताकसदृश्य पेय आहे ते ताक मानून पितेय सध्या Happy

धन्यवाद Happy

दुधी +मूगडाळ सूप, दुधी + पालक सूप, दुधी + श्रावण घेवडा + गाजर सूप, बीट + गाजर सूप, ब्रोकोली सूप, बार्ली सूप, लाल भोपळा + बीट + गाजर सूप, अशी वेगवेगळी काँबोज् करून बघा.
कुसकुस सलाद. शहाळ्याची मलई. फळे.
दुधी शिजवून व्हाईट सॉसमधे घालून त्यात चवीपुरते मीठ मिरपूड (कदाचित पोटाला बरा वाटेल. पण पित्तास योग्य वा नाही ते माहीत नाही)
कलिंगड, खरबूज.
साळीच्या लाह्या किंचित तुपात भाजून नुसत्या / मीठ लावून. साळीच्या लाह्यांचे सूप (उकळून त्यात तूप, मीठ घालून) - नुसत्या लाहीचे बोकाणे भरायचे नाहीत. एकेक करून खायची (इति अनुभवी ज्येना)
ओटमील. मनुका, सुकं अंजीर पाण्यात भिजवून / शिजवून.

साळीच्या लाह्या किंचित तुपात भाजून नुसत्या / मीठ लावून. साळीच्या लाह्यांचे सूप (उकळून त्यात तूप, मीठ घालून) - नुसत्या लाहीचे बोकाणे भरायचे नाहीत. एकेक करून खायची (इति अनुभवी ज्येना)>>>>>>>>कृपया प्रकाश टाका. मी पित्तासाठी म्हणुन रोज नुसत्या खाते आहे.

स्वाती, थँक्स ! मी नेटवर शोधली नाही, कारण चाकवताला English मधे नाव माहित नव्हतं. इथे तर अगदी 'चाकवताची भाजी' असं म्हणुनच रेसिप दिली आहे थोडा बदल करुन आताच करायला घेतली आहे. डिनर मधे पालेभाजी आणि पोळी. Happy

मनीमाऊ, चाकवत दोन प्रकारे करता येतो. ताकातला / दह्यातला चाकवत व पळीवाढी चाकवताची भाजी.

१) ताकातला चाकवत - चाकवताची पाने निवडून, स्वच्छ धुवून पातेल्यात पाण्यात नरम होऊन शिजेपर्यंत उकळणे. फार उकडायची गरज नाही. मऊ शिजलेली पाने, घुसळलेले दही व १-२ मोठे चमचे बेसन मिक्सरमधून काढून घेणे. या मिश्रणाला धीम्या आंचेवर शिजवणे, भाजी जेवढी सरसरीत हवी असेल त्या अंदाजाने पाणी घालणे. त्यात मीठ, थोडी साखर, रंग येण्यापुरती हळद व तिखट घालणे. हिरवी मिरचीही वापरतात. भाजी खूप उकळायची नसते. वरून तूप, जिरे, हिंगाची फोडणी. काहीजण फोडणीत मेथीदाणाही घालतात. चाकवत जर कुकरला उकडून घेतला तर त्याचबरोबर भिजवलेली हरभराडाळ व शेंगदाणे उकडून तेही या भाजीत घालता येतात. माझी आजी ताकातला चाकवत करायची. त्यासाठी आंबट ताक असायला हवे. उकडलेल्या चाकवताला कुस्करून, नीट हाटून कढईत घालून गॅसवर एक चटका द्यायचा. त्यात बेसन घालून एकजीव करून परत एक चटका. मग शिजलेल्या मिश्रणात आंबट ताक घालून थोडे परत गरम करायचे. चवीनुसार मीठ, साखर, चिमटीभर हळद. जास्त उकळायचे नाही. वरून तूप, जिरे, हिंग, हिरवी मिरची यांची फोडणी. आजी चाकवत शिजवताना जोडीलाच ह.डाळ व शेंगदाणे उकडून घ्यायची.

२) पळीवाढी चाकवत - चाकवत मऊ शिजवून कुस्करून घ्यायचा. त्यात बेसन घालून व गरजेनुसार पाणी घालून शिजवायचा. थोडी लसूण पेस्ट / लसूण ठेचून व हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा. चवीनुसार मीठ. भाजी शिजली की वरून तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी.

अरुंधती, सहीच ! एवढ्या डिटेल मधे दोन रेसिप्स दिल्यास. थँक्यु सो मच ! आज पहिली ताकातली करुन पहाते.

आमच्या हसिपिटलातील सिस्टर बोलली .... पित्त असेल तर भरपूर चिरमुरे खाउन थोडं पाणी प्यायचे... चिरमुर्‍याचा लगदा अ‍ॅसिड शोषुन घेतो.

मला लॉजिक पटले.

....

आज मॉलमध्ये केर सांगरी रेडी टु कुक चे पार्सल दिसले.. १०० रु ३०० ग्रॅम होते... अआज नाही घेतले. कधीतरी करीन.

दाल बाटी चेही रेडी टु कुक पार्सल दिसले... पण ते फारच चपटे होते... आत बाट्या होत्या की गोट्या ?

योजाटा = योग्य जागी टाका. म्हण्जेच पाकृ नवीन लिहून इथे लिंक देणे. नवीन पाकृ सर्च मध्ये येते. इथे अशी प्रतिसादात लिहिली की नाही येत. तसं केल्याने पाकृ शोधायला सोपं पडतं.

ओके nasir पाहाते. मला कुरमुर्‍६यांनी गॅस होईल असे वाटते. पण तिचं लॉजिक कदाचीत बरोबर असेल.

बरं साळीच्या लाह्या म्हणजे नक्की काय? इंडियन ग्रोसरीमध्ये मिळतात का? मला गुलकंद पण माझ्या गावात मिळाला नाही त्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागेल पण कोकम सरबताने मदत होतेय. कुपथ्य टाळलं आणि एक खायचं रूटीन फॉलो केलं तर तसं बरं वाटतं पण ओव्हरऑल शक्ती (स्टॅमिना) कमी झाला आहे त्यामुळे संध्याकाळी विकेट डाऊन. असो.

आभार्स पुन्हा एकदा. Happy

Pages