Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं झालं नवीन धागा आला.
बरं झालं नवीन धागा आला.
या आता आणि विचारा प्रश्न
या आता आणि विचारा प्रश्न
सोलकढीला नारळाचे दुध काढुन
सोलकढीला नारळाचे दुध काढुन झाल्यावर बराच चव उरला आहे. काही करता येइल का?
गव्हाच्या पीठाची बर्फी कशी
गव्हाच्या पीठाची बर्फी कशी करतात? काहीवर्षांपूर्वी एके ठिकाणी खाल्ली होती. सुगडी म्हणतात आणि गव्हाच्या पीठाची+गुळ आहे एवढंच समजलं. चव मात्र खूपच छान होती. कुणाला कृती माहित आहे का?
शुकु, त्यात मिल्क पावडर,
शुकु, त्यात मिल्क पावडर, गुलकंद आणि ड्रायफ्रुट्स वै घालुन बर्फी करून टाक. हाकानाका!
नैतर कोकोनट पुडिंग कर गं!
डिम्पल अग गुळपापडी म्हणजेच
डिम्पल अग गुळपापडी म्हणजेच सुखडी/ सुगडी. गुज्जु रेसेपी आहे.
http://www.tarladalal.com/Golpapdi-(-Gujarati-Recipe)-636r
http://www.chitrasfoodbook.com/2014/03/sukhdigud-papdirecipe-easy-gujara...
http://kajaldreams.blogspot.in/2007/06/sukhadi-gud-papdi.html
सॉरी, तरला दलालच्या साईटला
सॉरी, तरला दलालच्या साईटला प्रॉब्लेम आहे. पण इथे गायु/ गायत्री असेल तर तिला डिटेल्स विचार.
ओके..थॅंक्स रश्मी.
ओके..थॅंक्स रश्मी.
गव्हापासुन साधा रवा आणि दलिया
गव्हापासुन साधा रवा आणि दलिया ( फाडा किंवा लापशी रवा ) कसा तयार करतात? काही स्पेशल प्रोसेस असते का?
मी नुकतीच घरघन्टी ( पिठाची छोटी चक्की ) घेतली आहे. त्यात वेगवेगळ्या जाळ्या आहेत त्यावर लिहीले आहे कोणती कशासाठी वापरायची. पण गहु प्रिप्रोसेस करुन वापरावा लागेल असं वाटतयं. गुगल करुन काही हाती आले नाहिये. कृपया मदत करा.
धन्स हर्षा
धन्स हर्षा
सोलकढीला नारळाचे दुध काढुन
सोलकढीला नारळाचे दुध काढुन झाल्यावर बराच चव उरला आहे. काही करता येइल का? >> चटणीत किंवा वाटणात, उसळीत ढकलता येईल.
आमच्याकडे जेवढ्या गव्हाचा रवा
आमच्याकडे जेवढ्या गव्हाचा रवा काढायचा तेवढ्या गव्हाला पाणी लावून ठेवतात म्हणजे गहू ओले करून त्यात मिठाचे खडे टाकून तास-दोन तास कापडात बांधून (झाकून) ठेवतात. हे गहू सावलीतच सुकवून मग रवा काढण्यासाठी गिरणीत रवाना होतात.
मुग्धा दलीया करायला गहू
मुग्धा दलीया करायला गहू प्रीप्रोसेस करायची गरज नाही. ज्या मापाचा दलीया/रवा हवा त्याप्रमाणे जाळी वापर. पूर्वी आमच्याकडे जात्यावर गहू दळून शिर्यासाठी रवा काढत. लहान मुलांना आणि वृद्धांना शिर्यासाठी मुद्दाम हा रवा वापरत.
मला पुणे-मुंबई हायवे वर काकवी
मला पुणे-मुंबई हायवे वर काकवी मिळाली आहे.
एक लिटरची बाटली आहे तर ही काकवी कशात व कश्याप्रकारे वापरु शकतो?
बाटली उघडल्यावर किती दिवस टिकेल?
आजकाल गल्लोगल्ली पिसाळलेल्या
आजकाल गल्लोगल्ली पिसाळलेल्या कोबी मंचुरीयन ची रेसीपी आहे का कुणाकडे?
अकु, अग अगदीच बेचव्/सपक आहे
अकु, अग अगदीच बेचव्/सपक आहे तो दुध काढुन टाकल्याने. असो मी पोह्यांच्या कटलेट मधे आणि थोडा लाडुत ढकलला.
काकवी आम्ही पोळीवर तुपासह
काकवी आम्ही पोळीवर तुपासह जॅमसारखी पसरुन खायचो लहानपणी.
काकवीची बाटली उघडली की
काकवीची बाटली उघडली की टिकायची चिंताच नसते.
चार दिवसात संपते.
जोक्स अपार्ट पण लोणच्यासारखीच काळजी घ्यायची. ओले हात लागू द्यायचे नाहीत वगैरे. मुंबईसारख्या दमट हवेत सगळं बाय डिफॉल्ट फ्रिजात टाकायचं.
अर्धी वाटी काकवी, त्यात दोन तीन चमचे तूप आणि गरमगरम लुसलुशीत पोळी... अहाहा अहाहा... माझ्या स्वर्गाच्या व्याख्येत हे नक्की आहे.
धन्यवाद स्वाती आणि नलिनी... @
धन्यवाद स्वाती आणि नलिनी...
@ नलीनी रव्यासाठी नंतर गहु पुन्हा धूवुन घेता का? मीठाच्या खड्यांचा खारटपणा उतरत असेल ना?
@ स्वाती आज कणीकेसाठी घरघंट्टी लावणार आहे तेव्हा दलिया पण करुन बघते.
काकवी मी कणिकेत घालून गोड
काकवी मी कणिकेत घालून गोड धिरडं आणि गोडाचे आप्पे यासाठीही वापरली आहे.
शुभांगी,नीधप्,रावी धन्यवाद.
शुभांगी,नीधप्,रावी धन्यवाद.
मुग्धा केदार, गहू धुवून असे
मुग्धा केदार, गहू धुवून असे नाही पाण्यात टाकून लगेच बाहेर काढायचे किंवा हाताने पाण्याचा शिपका मारत गहू ओले करून घ्यायचे. साधारण १० कि. गव्हाला मुठभर मिठ वापरतात. काही मिठ कोंड्यात निघुन जाते तऱ काही पिठीत शिल्लक राहते.
आजकाल गल्लोगल्ली पिसाळलेल्या
आजकाल गल्लोगल्ली पिसाळलेल्या कोबी मंचुरीयन ची रेसीपी आहे का कुणाकडे? >>
सस्मित,
कोबी बारीक चिरुन घ्या. मी फुपो किंवा स्लायसर वापरते. त्यात मावेल एव्हढा मैदा, मीठ आल-लसुन-हि.मिरची पेस्ट, हवा असल्यास खाण्याचा लाल रंग घालुन सैलसर भिजवुन घ्या. तेल चांगल तापल्यावर नंतर मध्यम आचेवर भजीसारखे गोळे तेलात सोडुन तळुन घ्या. शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा. हि झाली झटपट कृती.
जर अजुन लाड करायचे असल्यास वरील मिश्रणात कॉर्नफ्लोवर, कांद्याची पात, सिमला मिरची, सोया सॉस, चिली सॉस वैगरे वापरु शकता.
धन्य्वाद निलसन.
धन्य्वाद निलसन.
इडली, डोसे या सोबत पण काकवी
इडली, डोसे या सोबत पण काकवी भारी लागते. तूप + काकवी + मऊ डोसे = स्वर्ग !
तिखट (सेव्हरी) मफिन्स हमखास
तिखट (सेव्हरी) मफिन्स हमखास यशस्वी कृती माहिती आहे का? (अंडे चालेल पण बेकन इ प्रकार नको. नेटवर मांसाहारी कृती अनेक आहेत.)
आजकाल गल्लोगल्ली पिसाळलेल्या
आजकाल गल्लोगल्ली पिसाळलेल्या कोबी मंचुरीयन ची रेसीपी >>> पिसाळलेल्या????
बोकाळलेल्या म्हणायचं असेल
बोकाळलेल्या म्हणायचं असेल त्यांना
http://www.foodnetwork.com/re
http://www.foodnetwork.com/recipes/articles/50-muffin-recipes.page-5.html
इथल्या शेवटच्या काही रेसिपीज्
http://www.centercutcook.com/broccoli-and-quinoa-egg-muffins/
इकडे सुलेखाताईंनी मेथीचा तिखट
इकडे सुलेखाताईंनी मेथीचा तिखट केक लिहिलाय बघ सी... त्याचे मफिन्स होतील.
Pages