Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/taxon
http://www.maayboli.com/taxonomy/term/9984
इथे दोन रेसिपीज आहेत, एक व्हेज, दुसरी नॉन व्हेज. व्हेज रेसिपीमधल्या मिरच्या वेगळ्या आहेत, त्याऐवजी तुम्ही सिमला मिरची वापरू शकता. सारणात बटाटा घालू शकता.
मिरच्या भारतात मिळतात तशा
मिरच्या भारतात मिळतात तशा गावरान्/छोट्या असतील तर हा मसाला पण चालेल http://www.maayboli.com/node/55343
बटाटेवड्याचं सारण करतो साधारण तसं सारण भरून पण छान होतात ढबु मिरच्या.
मी सुद्धा डाळीचे पीठ आणि
मी सुद्धा डाळीचे पीठ आणि सिंडीने सांगितलेला मसाला (दाणे कूट सोडून) वापरून केल्या आहेत मिरच्या. मस्त खरपूस होतात.
Dhanyavad! karun baghate.
Dhanyavad! karun baghate.
ओले खोबरे थोडेसे भाजून घेऊन
ओले खोबरे थोडेसे भाजून घेऊन त्यात थोडे आले बारीक चिरून घालावे.मीठ ,कोथिंबीर ,तिखट एकत्र करून मिरच्यात भरावे आणि शॅलो फ्राय करावे.
मसाल्याचे घरचे तिखट ,
मसाल्याचे घरचे तिखट , शेंगदाण्याचा कुट , असेल तर जवस किंवा कारळ्याचा २ चमचे कुट, वाळ्ळ खोबर् कुट,गुळ,कोथिंबीर,जीर्या,धन्याची पावडर इत्यादी भरून आम्ही भरली ढब्बु मिरची करतो. वाफेवर शिजवायची . आणि तेल थोड जास्त. अप्रतिम होतात.
कोंबडी वडे ची कोणी पाक्क्रुती
कोंबडी वडे ची कोणी पाक्क्रुती सांगु शकेल काय?
नमस्कार sukadi
नमस्कार
sukadi recipe
http://www.maayboli.com/node/56005
उत्तम जमलि
धन्यवाद
अगदी लहान शिमला मिर्चित मी
अगदी लहान शिमला मिर्चित मी सोललेले वाल आणि बाकी नेहमीच्या मसाला भरून थोड्या जास्त तेलात भरली मिरची करते. खुप सुन्दर लागते ही भाजी.
http://chakali.blogspot.in/20
http://chakali.blogspot.in/2007/08/bharali-mirachi.html मी या रेसिपीने करते. सोप्पी आणि करायला सुट्सुटीत आहे
नाचणी सत्त्वाची मला माहिती
नाचणी सत्त्वाची मला माहिती असलेली कृती:
नाचणी स्वच्छ करून रात्री भिजत घालणे. सकाळी उपसून फडक्यात बांधणे, मोड येऊ देणे (आपापल्या गावच्या हवामानानुसार वेळ लागतो) मग न करपवता मोडासकट भाजून घेणे. त्याचे बारीक पीठ करणे, हे पीठ म्हणजे नाचणी सत्त्व.
आम्ही असं गव्हाचं केलं होतं घरी.
ढोबळी मिरचीची बटाटा भरुन
ढोबळी मिरचीची बटाटा भरुन रस्सा भाजी खाल्ली होती एका राजस्थानी मैत्रीणीकडे. ती कशी करतात माहिती आहे का?
साधना, रीतसर पाककृती टाक ना.
साधना, रीतसर पाककृती टाक ना. मस्त वाटतेय ढो मि आणि वाल काँबो.
ज्वारीच्या ताकातल्या कण्या
ज्वारीच्या ताकातल्या कण्या कश्या करतात कुणाला माहिती आहे का?
लाल टोमॅटो चा पास्ता, पिझ्झा
लाल टोमॅटो चा पास्ता, पिझ्झा साॅस किंवा प्युरी करुन फ्रिझ (कसे) करता येईल (का) ? कधीकधी छान, स्वस्त टोमॅटो मिळतात पण खुप आणले तर मग खराब होतात म्हणुन यु सु़़.
प्युरे करून फ्रीझ करून
प्युरे करून फ्रीझ करून (क्यूब्स नंतर झिपलॉकमध्ये ठेवणे) हे करता येईल. पास्ता सॉस असा ठेवता येईल का, हे मात्र जरा पाहायला लागेल. टेक्निकली करता यायला हवं. कारण सॉस तर शिजलेला असेल + त्यात तेलही असेल सो, अडचण यायला नको.
आभा, मी करते फ्रीज. मोठी बॅच
आभा,
मी करते फ्रीज. मोठी बॅच करते आणि एका वेळच्या जेवणासाठी लागेल तेवढे सॉस फ्रीजर सेफ डब्यात्/बॅगेत काढून गार करुन फ्रीजरला टाकते.
आभा, विकतचा पास्ता सॉस तरी
आभा, विकतचा पास्ता सॉस तरी अतिशय छान फ्रीझ होतो.
तसच टोमॅटो अख्खे व्यवस्थित फ्रीझ होतात. बर्याच मैत्रिणी करतात ज्यांच्याकडे टोमॅटोच पीक भरपूर येत.
खालची लिंक बघा.
http://recipes.howstuffworks.com/fresh-ideas/dinner-food-facts/how-to-fr...
http://cooking.nytimes.com/re
http://cooking.nytimes.com/recipes/1017650-quick-fresh-tomato-sauce या रेस्पीने मी जवळपास १२-१५ पाउंड सान मार्झानो टॉमेटो चा सॉस फ्रीझ केला आहे छोट्या डब्यांमधे भरुन. घरचे टॉमेटो आणि बेसिल . एका बॅच मधे घरचा होता म्हणून लसूण पण घातलाय.
योकु, स्वाती २, सीमआ, मेधा
योकु, स्वाती २, सीमआ, मेधा थॅंक्स! लिंक्स बघते. काल खुप टोमॅटो आणलेत सो आज ट्राय करीन. स्वाती२ तुमची रेसीपी पण प्लीज द्याल का?
पुढच्या वेळेस केली की नक्कीच
पुढच्या वेळेस केली की नक्कीच टाकते.
नाचणीच्या लाडवांची पाकृ द्या
नाचणीच्या लाडवांची पाकृ द्या ना. धन्यवाद.
>>स्वाती२ तुमची रेसीपी पण
>>स्वाती२ तुमची रेसीपी पण प्लीज द्याल का?>>
मी पास्ता सॉससाठी http://allrecipes.com/recipe/21126/homemade-tomato-sauce-i/?internalSour...
बेस रेसीपी म्हणून वापरते. मात्र बटर आणि वाईन वापरत नाही. एक गाजर आणि एक बेल पेपर टाकते. इटालियन सिझनिंग ऐवजी ओरॅगानो घालते. तसेच मी ताजी मिर्याची पावडर घालते.
सीमंतिनी. मफिन्स ट्रे मधे
सीमंतिनी. मफिन्स ट्रे मधे सेव्हरी मेथी केक तसेच हांडवा करता येईल.इत्यासाठी २/३ पिठं,बेसन/ लाडु बेसन ( रवाळ बेसन) /रवा वापरावा त्यात/,दुधी/झुकिनी ,मेथी,घालावी. तीळ, ओवा, हिंग, बडीशोप, शेंगदाणे,-अक्रोड-काजु-बदाम , तेलाचे मोहन , आले-हि मि पे स्ट , दही , घालुन भिजवावे. ३-४ तासानी इनो घालुन मिश्रण कालवावे. व मफिन्स ट्रे मधे ओतुन त्यावर तीळ कढीपत्ता हिंग हळद फोडणी घालुन ३० मिनिटे बेक करावे.
सुलेखा काकू मस्त रेसिपी आहे.
सुलेखा काकू मस्त रेसिपी आहे.
Can someone please suggest
Can someone please suggest jwari Rava recipes ? Tried doing normal upma, it tasted like broken wheat upma. Any other idea. I bought it because I thought it might be healthy option.
थँक्यू सुलेखा. दुधी घातला तर
थँक्यू सुलेखा. दुधी घातला तर पाणी सुटेल का मिश्रणाला?
मेथी घालून जमेल असं वाटतंय मला.
ज्वारीचा रवा, हे मी
ज्वारीचा रवा, हे मी पहिल्यांदाच ऐकलं. कृपया फोटो देऊ शकाल का?
बारीक रवा असेल तर उकडपेंडीच्या कृतीनी केल्यास बरी डिश होईल असं वाटतंय. पाणी नेहेमीच्या प्रमाणापेक्षा जास्त लागेल एखादवेळेला.
धीरडी/ आंबील हे अजून काही पर्याय. आंबील तिखट-मिठाची केल्यास जास्त चांगली लागते गोडापेक्षा.
टॉमेटो, गाजर आणि इतर मोसमी
टॉमेटो, गाजर आणि इतर मोसमी भाज्या वापरून पास्ता सॉस करते मी. छोट्या डब्यांमधे फ्रीज करून ठेवला की आयत्यावेळी १० मिनिटात पास्ता करता येतो.
मध्यंतरी बेसिलचे भरमसाट पीक आले असल्याने शेतकरी सारखी खूप बेसिल पाठवत होता. तेव्हा बेसिल पेस्टो करून ठेवला. त्यावर लोणच्याच्या लॉजिक ने तेलाचा तवंग शिल्लक ठेवला होता. पण २ आठवड्यांनंतर रंग बदलून बहुतेक खराब झाला. टाकून द्यावा लागला. तर बेसिल किंवा इतर हर्ब्ज फ्रीज करण्याची / टिकवण्याची काही युक्ती/ रेसिपी?
मृदुला, मी बेसीलचे सॉल्ट
मृदुला,
मी बेसीलचे सॉल्ट करते.-अॅग एजुकेटरने शिकवले. रेसीपी हवी असल्यास विपूत टाकेन. तसेच बेसील नुसती सुकवूनही ठेवते. पेस्टो करुन फ्रीजरला टाकते. चांगला रहातो.
Pages