पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिटुकल्या ढोबळी मिरच्या आणल्या आहेत. भरल्या मिरच्या करायच्या आहेत उद्या संध्याकाळी. जरा पाककृती सांगा ना. बेसन घालून करतात ना?

सिंडरेला Lol

योकु इथे बघ

http://www.food.com/recipe/very-easy-hash-brown-366754

मला कुणी भाताबरोबर खायला छोले करतात तेव्हा रस्सा(ग्रेव्ही) राहावा अशी काही युक्ती सांगेल का? माझे नेहमी फायनली कोरडेपणाकडे झुकतात. गरम राहायला यावेळी झाल्यावर वाढायच्या आधी स्लो कुकरमध्ये कीप वॉर्म सेटिंगवर ठेवायचं सजेशन आलंय घरातून तर तेव्हा अजून कोरडे व्हायला नको. (प्ली फ्रोजन नान्/चपाती आणा हा सल्ला नकोय. उर्वरीत मेन्यु प्लान्ड आहे आणि त्यात हा पर्याय नाही :P)

स्लो कुकरमधे वॉर्म सेटिंगवर ठेवल्यास पाणी आटत नाही! स्वानुभव.

मी न्यु ईयरच्या पार्टीला रगडा करुन नेलेला. मस्त तयार असलेल्या रगड्यात कपभर पाणी ओतलं स्लो कुकर मधे घालताना कारण ३-४ तासात कोरडा होईल असं वाटलं. पण एक थेंबभरही पाणी आटलं नाही आणि उपस्ठितांना पाणीदार रगडा खायला मिळाला. तिथे उपस्थित एकीने स्लो कुकरमधे राजमा शिजवताना रेग्युलर कुकरसारखे पाणी घातले तर राजमा सुप कसे प्यावे लागले याची स्टोरी सांगितली.

धन्यवाद वेका.

ग्रेव्ही करतांनाच थोडी जास्त करायची. नंतर पाणी वाढवल्यास त्याची चव जाते.

>>ग्रेव्ही करतांनाच थोडी जास्त करायची

हे लक्षात ठेवेन मोस्टली माझं घोडं तिथे पेंड खात असावं. आणि स्लो कुकर टीप पण मस्त Happy

बाकी आमच्यात अस्सच करतात हे कुणाला सांगू? सगळीच दोस्त मंडळी आणि मिक्स ग्रुप. इथे भात नीट खपल्याशी कारण Wink नैतर ते लेफ्टओव्हर नकोय. असो. ठ्यांक्स.

ग्रेव्ही थोडी जास्त करून त्यातली थोडी ग्रेव्ही बाजूला काढून ठेवायची. छोले कोरडे होत आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेली ग्रेव्ही छोल्यांत घालायची. जर तशी गरज वाटली नाही तर ती ग्रेव्ही नंतर भाजी / आमटी / उसळीत घालून संपवून टाकायची.

Lol

एक विचारायचे होते इथे. पुर्वी कदाचित विचारले असेल.

डोश्याचे बॅटर करताना ते खूप बारीक करावे लागते तरच डोसा तव्यावर नीट पातळ पसरतो. तर तुम्ही मिक्सर खूपदा फिरवता का? आणि बॅटर ईडलीच्या बॅटरपेक्षा पातळ करता का?

मी गुगलवर डोसा बॅटरच्या अनेक रिती पाहिल्यात पण त्यांनी जरा जास्तच घटक वापरले. मला फक्त तांदूळ आणि डाळ हे दोनच घटक वापरायचे आहेत. फार फार तर मेथी.

साळीच्या लाह्या कशा करतात? गावाहून येताना भाताच्या २-३ लोंब्या आणलेत, त्यांचे मूठभर दाणे निघाले. त्याच्या लाह्या कशा करतात? आम्ही गावाला कधी करत नाही.

साळी जर ओल्या असतील तर लाह्या होणार नाहीत. पण, कर सुकलेल्या असतील तर जाड बुडाच्या कढईत वा तव्यावर लोखंड तापल्यावर त्यावर साळ्या टाकायच्या. काहीजण कढईत रेतीचे खडे पण ठेवतात. बहुतेक साळ्या कुरकुरीत होण्यासाठी. आम्ही हीच पद्धत वापरतो. रेती वापरत नाही. पण भडभुंजाकडे कढईत रेती पाहिली आहे.

तर तुम्ही मिक्सर खूपदा फिरवता का? आणि बॅटर ईडलीच्या बॅटरपेक्षा पातळ करता का? <<<< बी, मिक्सरवर एकदम बारीक होईपर्यंत वाटा. आणि बॅटर पातळ नसत ईडलीच्या पिठासारख घट्ट असत. डावाने पिठ तव्यावर ओतून डोसा पसरवायचा असतो. http://www.maayboli.com/node/53541 इथे वाचा अजून. Happy

सांडग्यांची भाजी कशी करतात. वाळवलेले पाकीट आणले आहे. ते तेलावर परतून फोडणी घालून पाणी घालून कुकरला लावायचे का? फारच लहान पणी खाल्ली आहे आईच्या हातची.

अमा, आधी सान्डगे चमचाभर तेलात खमन्ग परतुन घ्या. मग सुके/ ओले खोबरे भाजुन त्यात कोथिम्बीर, लसुण, आले ( नसले तरी चालेल) घालुन बारीक वाटुन, ते वाटण नेहेमीच्या फोडणीत घालुन परतुन, मग सान्डगे घालुन परता मग मसाला, तिखट, मीठ घालुन परतुन मग पाणी घाला. रस्सा उकळा. तयार!

काही ठिकाणी खोबर्‍या ऐवजी दाण्याचे कुट घालतात्.

धन्यवाद रश्मी. ती चव फार रेंगाळते आहे मनात. वाफेवर होईलच म्हणजे. कुकरला लावायला नको.

Pages