पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांडग्यांची भाजी :लसूण, जिरा, मोहरी, हिंगा ची फोड्णी केली की त्यात उभा चिरलेला कांदा परतवून घ्यायचा. जराश्या पाण्यात हळद, लाल तिखट, किचनकिंग मसाला एकत्र करून टाकायचा. तेल सुटू लागले की तेलावर भाजलेले सांडगे टाकायचे. गरजेनुसार मीठ घालायचे. (सांडग्यात पण मीठ असते) चांगले परतले की हवे तेवढे पाणी घालून एक उकळी आली की १०-१५ मिनिट मंद गॅसवर शिजू द्यायचे.

कुकरला लावुच नका, नुसते तळलेले पण छान कुडकुडीत लागतात. वाटणात लसुण जास्त असला तरी चालतो. रस्सा नको असेल तरी अन्गाबेताशी पाणी असु द्या म्हणजे कोरडे लागणार नाहीत.

नुसते तळलेले पण छान कुडकुडीत लागतात.>> हौ बेगम लेकिन मेरीच उमर नै ना पूरे दातां गिर जाएंगे. उबालके सब्जी बनाको खातुं. बोले तो गनीमत. अम्मा बावाकी याद आती.

बी हे तुमच्यासाठी -

मेतकुटाचे डांगर - मेतकूट, कच्चा कांदा बारीक चिरून, दही, तिखट, चवीनुसार मीठ. मिसळायचे. वरून फोडणी. तोंडीलावणे म्हणून छान.

(मी थोडंसं दाण्याचं कूटही घातलं होतं).

अमा! हर्शिज किसेस सारखे सान्गगे असतिल, तर तेलावर शॅलोफ्राय करा,थोडे गार करुन भरडुन घ्या, मग कान्दा,खोबर वाटण करुन त्यात परतायचे आणी भाजी कराय्ची, अस केल्याने जरा भाजि मिळुन येते,
मी वाटण वैगरे न करता कान्दा-लसुन परतुन त्याव्र भरडा परतते मग तिखट्,मसाला, हळद सरजाम घालुन पाणी घालुन शिजवाय्च ...शिजत आल की दाण्याचा कुट लावाय्चा वरुन कोथिबिर,, गरम फुलका

(झारलेले वडे असतिल तर भरडाय्ची गरज नाही)

सेहा, हे पाहा: विपुतल्या रेसिप्या ७ पाटवडी रस्सा
आणि वड्यांचं सांबारं (झिलमिल)

सर्च बॉक्स मध्ये 'पाटवडी'' असा सर्च दिला की रिझल्ट्स लगेचच मिळतात Wink Light 1

झुकिनी किसून फोडणीत जरा परतून बेसन पीठ लावून केलेला कोरोडाही खमंग लागतो. झुकिनी फार परतायची नाही. कुरकुरीतच ठेवायची.

तिळाचे पाक न करता लाडू बनवतात ते कसे बनवायचे?
मला अर्धवट माहिती आहे की तीळ भाजून त्याची जाडसर पावडर करुन त्यात किसलेला गूळ मिसळून बनवतात. डीटेल मध्ये सांगा प्लिज

तीळकूट, दाण्याचं कूट, थोडं तूप आणि गूळ सगळं मिक्सरमध्ये घालायचं. मऊ होतं. बाहेर काढून लाडू वळायचे.
दाण्याचे लाडू करतो तीच पद्धत, फक्त तीळकूटाची अ‍ॅडिशन.

भाजलेले तीळ, दाण्याचे कूट,भाजलेले सुकेखोबरे, मिक्समधून काढायचे.१ छोटा चमचा तूप भांड्यात घालून गूळ वितळेपर्यंत गॅसवर ठेवावे.नंतर गॅस बंद करून वरील मिश्रण त्यात ओतून ताटावर थापावे आणि वड्या पाडाव्या.

वरील मिश्रण त्यात ओतून ताटावर थापावे आणि वड्या पाडाव्या.>>>>> आणी त्या वड्यान्वर पण सुके खोबरे किस पेरावा आणी चापाव्यात. अहाहा!

राजगिरा लाही + फेटलेले दही किंवा ताक + मीठ + हिरवी मिरची बारीक चिरून / ठेचा + कोथिंबीर + साखर (आवडत असल्यास)
लाही पाण्यात शिजवूनही घेता येते किंवा तशीही लगेच भिजते व मऊ होते.

माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी बेत करायचा आहे. ६० जण

मिक्स व्हेज
पुलाव
गाजरहलवा
पुरी
रायता

भाजी किती लागेल यांचा अंदाज देऊ शकाल का?
मिक्स व्हेज ची सोपी क्रुती सांगा.

मराठा दरबारचा कोल्हापुरी व्हेज मसाला मिळतो तो वापरून मिक्स व्हेज बनवू शकता. कृती पाकिटावर दिली आहे तशीच.

हो.

Pages