पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Puffed_Rice_BNC.jpg

वेका, साळीच्या लाह्या म्हणजे ज्या आपण दिवाळीत लक्ष्मीपुजनाला वापरतो ना त्या. त्या पाकिटात बत्तासे पण असतात बघ. त्या पचायला अतीशय हलक्या असतात. भारतात आलीस की भरपूर घेऊन जा, नाहीतर इन्ग्रो मध्ये बघ मिळतात का. त्या पाण्यात भिजवुन त्याचे पाणी सुद्धा पितात. या उन्हाळ्यात एक करुन बघ. चमचाभर धणे+जीरे रात्री ग्लास भर पाण्यात भिजवुन सकाळी ते पाण्यातच कुस्करुन ते पाणी गाळुन पी. पण हे उन्हाळ्यातच करावे, नाहीतर सर्दी होऊन वैताग येईल.

अकु लाह्यांचं सूप कसा करायचं त्याची सविस्तर कृती द्या ना... मला पण डॉक्टरांनी सध्या लाह्या खायला सांगितल्या आहेत आणि नुसत्या लाह्या खाऊन अगदी कंटाळा आला आहे.... लाह्यांचे इतर पदार्थही सुचवले तर बरं होईल.

रोचीन, ह्या साळीच्या लाह्या कढईत तेल न घालता कुरकुरीत होईपर्यन्त भाजायच्या.( जळु द्यायच्या नाही) मग ताटात वा मोठ्या बाऊल मध्ये काढुन त्यात चमचाभर कच्चे तेल, तिखट, मीठ घालुन कालवुन हाणायच्या. खरे तर कच्चे तेल पित्ताला चालत नाही असे मला आयु वैद्यानी सान्गीतलय. पण माझ्या लहान मुलीला हे भयानक आवडते म्हणून मी तिला हे देते.

बाकी सुपाबद्दल अकु सान्गेल.

अरुंधती, तुझी ताकातली चाकवताची भाजी हीट्ट एकदम. खुपच छान झाली होती. पोळीबरोबर आणि गरम राइस बरोबर एकच भाजी चालुन गेली त्यामुळे मी पण खुष. परत एकदा आभार Happy

मनिमाऊ Happy

स्वाती२, कृती टाकते योग्य जागी. सध्या फक्त एकाच प्रकारच्या चाकवत भाजीचा फोटू आहे मोबाईलमध्ये. दोन तीन दिवसांत परत चाकवत केला तर दुसरा फोटूही घेता येईल.

साळीच्या लाह्यांचे सूप - काही विशेष कृती नाही. मूठभर साळीच्या लाह्या निवडून, तुसे काढून दीडेक कप पाण्यात उकळायच्या. ते पाणी गाळून घेऊन त्यात चवीनुसार सैंधव / मीठ व थोडे तूप घालून हे गरमागरम पाणी प्यायचे.
आजकाल लाह्यांचे पीठही पॅकबंद विकत मिळते. लाह्या सहजपणे उपलब्ध नसतील तर हे पीठ पाण्यात कालवून शिजवायचे, हवे तितके सरसरीत करायचे. त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड, तूप, स्वादासाठी कोथिंबीर घालून घ्यायचे. त्यात तूप न घालता थोडे ताकही घालता येते. फक्त ताक घातल्यावर मग जास्त उकळायचे नाही.

Khaadyapadaarthaat soda vaaparalelaa vaait kaa samajtat? I couldn't find apt answer on Google Sad

http://www.livestrong.com/article/254063-what-are-the-dangers-of-sodium-...

http://doudyeissa.blogspot.com/2011/06/benefits-and-risks-of-drinking-ba...

http://drsircus.com/medicine/sodium-bicarbonate-baking-soda/side-effects...

खाद्यपदार्थ बनवताना अगदी कमी प्रमाणात बेकिंग सोडा घालतात. त्यातही सोडा असणारे पदार्थ रोज उठून कुणी बनवत नाही. त्यामुळे तब्येतीवर इतके वाईट परिणाम होण्याइतका सोडा पोटात जात नाही असं माझं एकुणात मत झालं आहे.

लिन्क्ससाठी धन्यवाद. आत्ता वरवर चाळल्या आहेत. लवकरच पूर्ण वाचीन. मी आजवर कधीही Instant mixes वापरलेले नाहीत कारण माझ्या आईला मी कधी गिट्स चे कोण्तेही उत्पादन वापरताना बघितले नाहीत, सोडा असतो म्हणायची. मी इतरांकडे वेळोवेळी गिट्स ढोकळा इ. खाल्लेले - आवडलेले आहे. मला प्रश्न पडला कारण माझ्या एका नातेवाईकानी मला इथून MTR रागी दोसा, मल्टीग्रेन दोसा अशी ची मिक्ष्स आणायला सांगितले. तिच्या लहान दोन वर्षाखालील मुलाला रागी इ. हेल्दी म्हणून. असे किति खाल्ले तर चालतात? मला एखाद्या सोयिस्कर वस्तू वापरायचे नाही असे करायचे नाही. साबांना विचारले तर त्यांनी तेच सोडा असतो असे उत्तर दिले. पण का खावे अथवा खाऊ नये? कितीदा खाव? याच उत्तर दिलेले नाही, म्हणून हा उतारा.

अवांतर : नातेवाइकांकडे सर्रास धिरडि, थालिपीठ अश्या गोष्टी खुशखुशीत झाल्या असल्या की टिप विचारावं तर चिमूटभर सोडा घातलेला असतो.

तांदूळाची भाकरी उकड काढून नीट स्टेप बाय स्टेप सांगेल का कुणी? फार कठीण काम आहे असं ऐकून आहे. इथे पाककृती मिळाली तर करून बघायची इच्छा आहे. बिघडली तर माकाचु विचारता येतं ना. काही घाई नाही आहे. फक्त स्टेप बाय स्टेप कृती लिहा.

तांदूळाची भाकरी उकड काढून नीट स्टेप बाय स्टेप सांगेल का कुणी?>>> अमृता या आयडीची रेसिपी आहे. त्यावर बरीच चर्चादेखील झाल्याचे आठवतंय.

खालील प्रतिसाद वाचू नये. वरील प्रतिसाद येण्यापूर्वी तो लिहिला आहे. आता यावर धागा आहे हे समजले. त्यामुळे पुन्हा धागा काढण्याचा प्रश्नच नाही. इतकं लिहिलेलं खोडणार नाही. कोणीही वाचू नका की झालं. कृपया धन्यवाद. Happy

उकड काढून भाकरी अगदी सोपी आहे.
१. कढई मध्ये १ वाटी पाणी घ्या. त्यात चमचा भर तेल आणि चवी प्रमाणे मीठ घालून gas चालू करा.
२. पाणी चांगलं उकळलं की, गॅस बंद करा. लगेच २ वाट्या तांदुळाचं पीठ एकीकडे ढवळत ढवळत घाला. (या स्टेपला लोक आणखी एक वाफ काढायला सांगतात, आमच्या इंस्त्रक्षण बुकात ते नाही. वाफ काढली की उकड भांड्याला चिकटते, गुठळ्या बनतात असं इंस्त्रक्षण बुक रायटर म्हणतो)
३. ढवळत रहा. साधारण एकत्र झालं असं वाटलं की तेलाचा (किंवा पाण्याचा) किंवा पाण्याचा हात घेऊन उकड मळा.
४. पोळीच्या कणकेपेक्षा मउ झाली पाहिजे.
५. आता पोळपाटावर तांदुळाची पिठी शिंपडा. जरा जास्तच शिंपडा.पिठाचा गोळा त्याच्यावर ठेवा. वरून परत थोडं पीठ लावा. गॅस चालू करून तवा तापत ठेवा.
६. ही भाकरी थापण्याची गरज नाही. लाटण्याने लाटा. जराही चिकटत आहे वाटलं की लगेच पीठ लावा. लाटताना भाकरी उलटू नका.
७. आता पोळपाट हलवत भाकरी त्याच्या कडेला आणा. पोळपाट वर उचला, आणि हळूच हातावर भाकरी च्या. आणि चांगल्या तापलेल्या तव्यावर टाका.
८. भाकरी टाकताना जो भाग पोळपाटाला चिकटलेला तो तव्यावर वरच्या बाजूला दिसला पाहिजे.
९. आता वाटीत पाणी घेऊन ते वरच्या भागावर हलक्या हाताने पसारा.
१०. अर्ध्या मिनिटाने भाकरी उलटा. परत अर्ध्या मिनिटाने शक्य असेल तर गॅस च्या ज्योतीवर टाका.
११. थिकनेस इ. व्यवस्थित असेल तर टम्म फुगेल. नाही फुगली तरी तुम्ही फुगू नका. चवीत फरक पडत नाही. कठोर परिश्रम करा. फुगली की फोटो काढून ब्रॅग करा. फेसबुक, ट्विटर, मायबोली ह्या ब्रॅग करायच्या जागा विसरू नका.
बिनधास करा, सोपी आहे. नक्की जमेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

अमितव, माझी पण हीच पद्धत आहे तांदुळाच्या भाकरीची. अशीच गॅस बंद करुन पीठ घालून कालथ्या/झार्‍याच्या टोकाने भरपूर ढवळून झाकून ठेवते थोडावेळ. फक्त तांदुळाचं पीठ २ वाट्यांऐवजी दीड वाटी. मोदकांसाठी एक वाटी पीठ घेते. पाण्याचा हात न लावता तेलाचाच लावते आणि तुकतुकीत टकलू दिसेपर्यंत उकडीचा गोळा मळून घेते. मग लाटायची भाकरी आपल्या औकातीप्रमाणे :डोमा:. जास्त मोठी करत नाही. लाटताना उलटत नाही. बाकी ज्वारी किंवा तांदुळाची भाकरी फुगणे/न फुगणे तिच्या मर्जीवर :-P. पण दोन्ही भाकर्‍या कढत पाण्यातल्या असल्याने मऊ मात्र होतात. ज्वारीची भाकरी गरम पाण्यात ज्वारीचं पीठ भिजवून आणि थापून. तांदुळाची भाकरी उकड काढून आणि लाटून.

आता आमी वाचलं. आणि त्यावर कमेंट करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आता आम्ही बजावत आहोत.

१. आधी पाणी मोजून मग त्याच वाटीने पीठ मोजलंत तर ओल्या वाटीला पीठ चिकटल्याने वाफवायच्या आधीच गुठळ्या होतील, तेव्हा सावधान!
२. आता विश्राम. उकड मळण्यासाठी सावधान पोझिशन उपयोगाची नाही. ती उकड किंचीत निवल्यावरच त्यात हात घाला, नाहीतर हात भाजतील. उकड गरम असतानाच मळावी वगैरे मिथ आहे. आधी हाताला चटके बसले तर बरनॉल किंवा कैलास जीवनयुक्त भाकर मिळेल. उकड गरमच मळण्याची हौसच असेलचतर पावभाजी मॅशरने मळून घ्या. माँ भी खुश और बच्चा भी खुश!
३. भाकरी ही थापायचीच असते. तुम्ही लाटलीत तर त्याला भाकरी म्हणू नका, उकडीची पोळी म्हणा.
४. उकडापोळी लाटताना तुम्ही तांपि टाकताय ना? मग पोळपाट का हलवावा लागतोय? तुम्हाला अधिकाधिक सराव करून अधिक कौशल्य मिळवण्याची गरज आहे.
५. पोळपाट वर उचलून हातावर भाकरी घ्या?????? अरे देवा! उठा ले रे बाबा!! लोकांचे पोळपाट ग्रॅनाईट अथवा संगमरवरीही असू शकतात हो... त्यांचा विचार करा!
६. गॅसच्या ज्योतीचं लहान-बारीक-मोठा-भसाडा इत्यादी तंत्र तुम्ही लिहिली नाहीत. पाककृती लिखाणाची कौशल्य हस्तगत करण्याची तुम्हाला गरज आहे.

कृपया. धन्यवाद!

Lol
भाकरी थापायची असेल तर उकड काढायची गरज नाही. नुसतं गरम पाणी टाकून भिजवून होते. (हे सांगायच्या उद्देश गृकृद, इ. इ. आहे) एव्हढी उकड काढली तर झटपट भाकरी लाटूनच केली पाहिजे. आणि तांदुळाची पोळी म्हणत नाहीत. फ्लॅट ब्रेड अगदीच हे वाटतं त्यामुळे नवा वर्ड शोधेपर्यंत भाकरी म्हणायची परवानगी द्या. नाही, तुमचा प्रतिसाद परत वाचला तर भाकरी लाटणे ही मिथ आहे. असं नवं मिथ शोधलंय मी, नव्या नावापेक्षा मिथ शोधणं सोप्पे.
अहो, पोळपाट हलवला नाही तर ती भाकरी टूणकन उडी मारून हातात नाही येत. आणि पोळपाट जड असेल तर! बापरे!!! बट नोटेड. हे प्रश्न लवकरच वेळ आली की (म्हणजे मौकेपे चौका साधून) योग्य व्यक्तीच्या अंगावर सोडणारे मी.
आणि अवो अमेरिकन टायमाला इलेक्ट्रिक पासून प्रोपेन पर्यंत हिटिंग करायचं असेल लोकांना, पळा. आता परिश्रम गेले भाकरीत, खरंच प्रतिसाद उडवायला हवावता. Wink

भाकरी थापायची असेल तर उकड काढायची गरज नाही. नुसतं गरम पाणी टाकून भिजवून होते >>> म्या अक्षी असीच करते.. वर्ची कुर्ती वाचून घाबरले की जरा... Happy आमी गरम पानी वापरून विरी गेलेले ज्वारी पीठ, बाजरीपीठ, आणि चोखा आटाची भाकर करतो. Happy

८. भाकरी टाकताना जो भाग पोळपाटाला चिकटलेला तो तव्यावर वरच्या बाजूला दिसला पाहिजे. >>>> हि स्टेप चुकीची आहे का? माझ्यामते भाकरीचा वरचा भाग तव्यावर वरच्या बाजूला दिसला पाहिजे कारण आपण जेव्हा भाकरी लाटतो वा थापतो तेव्हा भाकरीच्या वरच्या बाजुला कोरडे पीठ जास्त असते त्यामुळे ते जास्तीचे पीठ काढुन टाकण्यासाठी भाकरीला थोडे पाणी लावतो.

नाही निल्सन. भाकरीचा जो भाग पोळपाटाला चिकटलेला असतो तो वर आला पाहिजे. अर्थात भाकरी थापुन उचलल्यावर तोच भाग वर येतो. त्या भागालाच पाणी लावयचे.

या स्टेपला लोक आणखी एक वाफ काढायला सांगतात,
<<

एक वाफ काढणे, अजून एक वाफ काढणे, म्हणजे नक्की काय करणे?

एक वाफ काढणे, अजून एक वाफ काढणे, म्हणजे नक्की काय करणे?>>> झाकण ठेवून साधारण २ मिनिटे मंद आचेवर पदार्थ ठेवणे.

माझ्याकडे ४ Avocados आहेत. नेहमी भाजीवाला वेगवेगळ्या दिवशी तयार होतील असे देतो. यावेळेस चुकुन चारही एकाच वेळेस तयार झाले आहेत. नेटवर पाहुन एक स्मुदी करायला शिकले होते. नेहमी तेवढीच करुन करुन आणि खावुन खावुन वीट आला आहे. जरा यम्मी आणि वेगळं काही सुचवा ना. नेटवर शोधु शकते, पण इथे सगळे जण वेगवेगळे प्रयोग करणारे आहेत आणि शिवाय इथे भारतीय जीभेला आवडणार्‍या रेसिप्स मिळतात, म्हणुन इथे रिक्वेस्ट.

There is an Avocado thepla by Lalu or just make guacamole. Any recipe from net would work it's similar to our bhel (sort of I mean)

Enjoy Happy

ढवळत रहा. साधारण एकत्र झालं असं वाटलं की तेलाचा (किंवा पाण्याचा) किंवा पाण्याचा हात घेऊन उकड मळा. >>>> ही स्टेप फोड प्रोसेसरला आउटसोर्स करावी. खूप सुंदर मऊ उकड मळून मिळते. मोदकांसाठी करायची उकड पण फुड प्रोसेसरला दिली तर तो छान मळून देतो.

अमित, मंजू, Rofl

माझ्याकडे ४ Avocados >> ग्वाकमोले करायचे. डीप म्हणून खाण्याऐवजी तसेच खायचे.

Pages