निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप काही मिस केलयं तीन चार दिवसात.
वर्षु , सायली मस्त फोटो आणि शशांक माहीती नेहमीप्रमाणे उत्तमच.
साधना, धन्यवाद.
शोभा, इकडे फुले आणि तिकडे मोदक देऊन केलेले अभिनंदन खूप आवडले.. धन्यवाद.

घराच्या मागच्या टेकडीवर
झिनिया फुललेली;
खिडकिच्या पत्र्यावर
गणेशवेल पसरलेली!!!!

घराभोवती गुलबक्षीचे
निळे जांभळे राज्य
हिवाळ्याची वाट बघत
शेवंती दडून बसलेली

चंद्रशाळेत ऊंचावर
मधुमालती नटलेली
खाली भुईवर लाल फुलांची
बुटी डवरलेली !!!!

बी

जागू, मनीमोहर, अभिनंदन!

सायली, वर्षू, फोटो मस्तच!

आमच्याकडच्या खारूताई पण भारीच धिटूकल्या असतात. आपल्या हातावरचा खाऊ खायला येतात.

kharutai1.jpg

हो दिनेशदा खरच फार प्रसन्न वाटत ती कणसदार शेते पाहताना.

आता उन पडू लागल्यामुळे रस्त्यावरून जाताना गवताचा सुंदर वास येत असतो. फुल दुतर्फा आपल्या स्वागतासाठीच उभी आहेत अस वाटत.

जागू, आपले अनुभव म्हणजे, रंग, गंध, स्पर्श, चव... या सगळ्याचे मिश्रण असते नाही ? यातला एखादाही घटक कमी पडला तर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटते. इथेही हे सगळे आहे.. पण काहीतरी कमी जाणवतेच.

नले, जपून गं. खारी चावतात पण !

बी, अप्रतिम कविता....

देवकी, नलिनी मस्त लिंक्स...

नलिनी तुमच्या कडच्या खारु ताईंनी सेतु बांधायला मदत केलेली दिसत नाहीये म्हणुनच रामाची तीन बोटं
पाठीवर दिसत नाहीये Happy

आज पावसाने पुन्हा काळोख केला आहे.

सायली तू दिलेल्या तेरड्याच्या बियांच्या रोपाला आज पहिले लाल फुल आले आहे. फोटो काढायला वेळ नाही मिळाला. संध्याकाळी काढते.

इंदीरा संतांची अवेळी पावसावरची कविता आठवली.. या कल्पनेवरून पुढे अनेक गाणी आली..
रिमझिम झरती ( सुमन कल्याणपूर ) बरखा रानी जरा जमके बरसो ( मुकेश ) हि उदाहरणे.

अर्निका, नागपूर पासुन ७० की.मी. जामसावली म्हणुन एक ठिकाण आहे, तीथे पिंपळाच्या झाडातुन
स्वयंभु निद्रस्त मारोती आहे, खुपच भव्य, जवळ जवऴ ५० फुट लांबी असलेली मुर्ति आहे.. खुप जागृत देवस्थान आहे.
मंदीरा पासुन १ कीमी.अंतरावर हा धबधबा आहे... खुपच रोचक अनुभव होता, छोटया मोठ्या खडकांवरुन उतरुन बरच खाली जाव लागलं, त्यातही काही खडक पाण्यात असल्याने, निसरडं होत, आणि प्रवाह पण खुप होता... Happy

Pages