निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
फोटो चांगला नाही आहे. पण
फोटो चांगला नाही आहे. पण व्हिडीओ बरे मिळालेत
भातावर मुनिआ.
आता नवरात्रीत, दसऱ्याला तोरणे आणली की त्यातल्या लोंब्या ठेवता येतील. ते भात एक दीड महिना वाळवून पेरता येईल.
मी एका टबात (भोके न पाडता) दोन इंच मातीचा थर तळाला दिला. मध्यभागी पुंजक्यात भात वरतीच टाकले. कडेने फुलझाडांच्या छोट्या पिशव्या ठेवल्या त्यांचे पाणी मिळून भात उगवले. चार पाच इंच उंच झाल्यावर पाणी आटणार नाही याकडे लक्ष दिले. त्याचबरोबर अधूनमधून सुकवले की डास होत नाहीत. वेगळी लावणी केली नाही. उगवलेल्या जागीच वाढू दिले. नोव्हे डिसेंबरचे पुढच्या पाडव्याला होईल.
दोन्ही गणेश वेल रानात दिसतात. नोव्हेँबरात त्यांचे तुकडे आणून लावले की शिवरात्रीपर्यँत फुले येतात.
जागु बापरे, कीत्ती दिवसांनी
जागु बापरे, कीत्ती दिवसांनी आलीस... फोटो नक्की टाक..
काश्मिरच्या नंदनवनात जो हाहाकार चालू आहे त्याबद्दल दु:ख वाटत आहे. तिथला निसर्ग लवकर पूर्ववत होवो.+ १०० अनुमोदन.
मुनिया गोडच..
पनामा मेव्या चा वर्चुअल स्वाद
पनामा मेव्या चा वर्चुअल स्वाद पोचतोय का इथपर्यन्त??
वर्षूदी - काही फळे/ फळभाजी
वर्षूदी - काही फळे/ फळभाजी ओळखता आली - पण बरीच्शी माहित नाहीयेत तेव्हा त्यांची नावे दे ना प्लीज ...
वर्षु दी सुपर्ब फोटोस, खरच
वर्षु दी सुपर्ब फोटोस, खरच काही काही फळे पहिल्यांदाच बघते आहे... डीटेल्स टाका ना!
ही माझ्या बागेतली आज उमलेली
ही माझ्या बागेतली आज उमलेली फुलं...
वर्षू... मिरचीला फळ म्हणते
वर्षू... मिरचीला फळ म्हणते
ते सोललेले पिवळे फळ नाही ओळखता आले !
सायली, डबल गोकर्ण ! मस्तच.
पहिला फोटो बोरांचा वाटला. पण
पहिला फोटो बोरांचा वाटला. पण नक्की बोरेच का माहित नाही. नंतरचा फोटो आपल्या सुपारीशी जवळीक दाखवतोय पण ती सुपारी नसावी. वर्षू तु हे मोबाईलवर दाखवलेलेस बहुतेक. सुपारीखाली आंबे. आंब्याखाली काय हाय ते खुपच सुंदर कापलेय. शेवटी मिरच्या आणि त्याच्यावर अवोकॅडो. बाकी आमास्नी कायबी ठावे नाय. पण वर्चुअली खाण्याचा आनंद मिळण्यासाठी त्यांची चव पण सांग गं.
वर्षुताई, मस्त कलरफुल फोटो.
वर्षुताई, मस्त कलरफुल फोटो. नावं?
सायली मस्त, एक शेवटचा फोटो दिसत नाहीये.
काय चाल्लय?
काय चाल्लय?
जिप्सी, कोकण आठवलं .
जिप्सी, कोकण आठवलं .
जिप्स्याने टाक्लेला फोटो दिसत
जिप्स्याने टाक्लेला फोटो दिसत नव्हता केव्हापासन.
याक... कसला खड्बडीत आहे!
आम्ही १२वीत असतान्ना डीसेक्शनसाठी खास तलावात पोसलेले हिरवे पिवळे ढब्बे बेडुक मो'ठ्या पत्रटी डब्यातुन (पारले जी चे)आणले जायचे. हाताला इतके बुळबुळीत लागायचे ना!
एकदा लॅबमधे मी एका बेडकाला ट्रे मधे उपडे करुन त्याचे ४ही पाय बान्धुन टाकले आणि पोटाकडची पातळ स्कीन कापली.तेवढ्यात त्याचा क्लोरोफॉर्मच असर सम्पला. आणि चारी पायान्चे चारी दोरे तोडुन तो पटकन सरळ होउन माझ्याकडे बघत बसला. मी घाबरुन पळाले... माझ्याबरोबर माझ्या आजुबाजुच्या ४ पळाल्या.
वाईट वाटते पण.. उगाच त्यान्चा जीव घ्यायचो ते. बर झाल आता ती पद्धत बन्द झाली.
मला कधी हे करावे लागले नाही.
मला कधी हे करावे लागले नाही. मी केलेच नसते.
फळे, फुले छान आहेत. आता
फळे, फुले छान आहेत. आता फुलपाखरांची वाट पाहत बेडूकराव बसलेत. बेडकाचा (टोड) पापा राजकन्येने घेतल्यावर त्याचा राजकुमार होतो ही खरी गोष्ट आहे का?
वर्षु, सायली आणि जिप्सी
वर्षु, सायली आणि जिप्सी फोटो मस्त.
वर्षु फळं कोणती आहेत ते पण सांग ना !!
सायली. डबल गोकर्ण छान दिसतेय ग.
जिप्सी, काय दिसतोय तो बेडूक !!!
जिप्सी फोटो/कॉमेंट मस्त.
जिप्सी फोटो/कॉमेंट मस्त.
ते पहिलं फ्रूट आहे..
ते पहिलं फ्रूट आहे.. माराकुइया (पॅशन फ्रूट)
२) ते सुपारी सारखं दिसणारं.. लोकल चेस्टनट (उकडून शिंगाड्या सारखच लागतं..डिट्टो)
३) पनामिनिअन आंबे.. घराच्या मागच्या टेकडीवर इतके खाली लागले होते कि आम्ही झाडाखाली सरपटत जाऊन काढले. चवीला खूप मस्त होते..सुवासिक ही होते
४) सुंदर कापलेलं फळ. = ZAPOTE
यात गरापेक्षा जास्त मोठ्या आकाराच्या बिया होत्या
५) अवाकाडो
झापोटा च्या जायंट बिया,
झापोटा च्या जायंट बिया, त्याही एकाच फळातल्या..
त्या हालापिनो( आलापिनो)
त्या हालापिनो( आलापिनो) ..जहाल ,अती जहाल मिर्च्या...
पहिल्यांदा मला वाटलं होत कि लहानश्या मिर्च्या म्हंजे आपल्या कॅप्सीकम आहेत.. छोटुश्या
म्हणून मी त्यात कीमा इ. भरून स्टफ केलेया.. खाताना सगळ्यांची वा>>ट लागली होती
हा आमचा रोजचा ब्रे फा
वर्षूताई फळांची मस्तच
वर्षूताई फळांची मस्तच ओळख.
जिप्स्या बेडूक नशिबवान आहे रे तो. का ते सांगायला नको.
आर्या
माझ्याकडे फुललेला झिनिया. आमच्याकडे गाजरा म्हणतात. ह्यात सुंदर रंग असतात. केशरी, लाल भडक, गर्द गुलाबी अगदी हटके रंग असतात. आणि फुलेही डबलची असतात. हे रोप आपोआप माझ्या कुंडीत आले कधी कधी बी पेरून पण निट रोपे येत नाहीत.
ही कळी
ही आमच्या वेलीवरची काकडी.
बापरे किती दिवसांनी हा धागा
बापरे किती दिवसांनी हा धागा पुर्वी सारखा धावतोय!
हेमाताई, आता पांढरा गोकर्ण पण लावला आहे, फुलं लागली की फोटो टाकीलच..
व्वा, वर्षु दि जवळ जवळ सगळीच फळं नविन.
घराच्या मागच्या टेकडीवर इतके खाली लागले होते कि आम्ही झाडाखाली सरपटत जाऊन काढले.+++ काय लकी आहात तुम्ही, फोटोत दिसतायत की लदबदलेले चक्क खाली लोंबणारे आंबे..:)
जागु, झिनीया, काकडी मस्तच.. लकी आहेस तु आपोआप लागलं तुझ्या कडे...
झिनिया बघुन नॉस्टॅलजिक
झिनिया बघुन नॉस्टॅलजिक व्हायला झाल. लहानपणी आमच्या बागेत वेगवेगळ्या रन्गाचे झिनियाची रोपे होती. बाबा पाणी घालायचे.. माझी लुडबुड मधे मधे.
सुप्रभात. आर्या माझीही आई
सुप्रभात.
आर्या माझीही आई ह्याचे बी आणून रोपांचे वाफे तयार करायची आणि मग आम्ही ती रोपे बांधावर लावायचो. आताही आईला आवड आहे पण ७५ च्या घरात गेल्याने आता होत नाही तिला. पण माझी वहिनी आता वेगवेगळी झाडे आणून लावते.
सायली माझ्या ऑफिसच्या रस्त्याला येताना असंख्य रानफेले फुललेली असतात. फार सुखद वाटतो माझा स्कूटीवरचा प्रवास. त्यातही डबलची गोकर्णे पांढरी आणि निळी दोन्ही फुललेली आहेत.
वर्षू, ते झापोटा नाव...
वर्षू, ते झापोटा नाव... सापोटा ( चिकू ) शी साम्य दाखवणारे आहे का ? नायजेरियात असेच एक फळ, उदारा
नावाने मिळते. वरून पिवळे आणि सालही पिवळी. कडवट+ आंबट + गोड असे लागते. त्यातही अश्याच बिया असतात. तिथले भारतीय सहसा खात नाहीत. पण मी अस्सल फळबाज ( लाईक दारूबाज ) ना ?
पॅशनफ्रुटला इथे अंगोलात ( पोर्तुगीज भाषेतही ) माराकूजा असा शब्द आहे. इथे बहुतेक घरांच्या भिंतीवर हा वेल असतोच. फुले पण छान दिसतात.
आणि त्या मिरच्याही नायजेरियात असतात. ते लोक त्याचे सूप करुन पितात.. मी तर त्या हाताळूही शकत नसे. बोटांची आग आग व्हायची.
जागू, आता एकदा झिनीया फुलला कि दरवर्षी रोपे येत राहतील. फुले तशीच झाडावर ठेवायची.
वर्षु, फळांची ओळख परेड छान
वर्षु, फळांची ओळख परेड छान वाटली वाचायला.
जागू , फुल मस्त. आणि काकडी तर आत्ता तोडून खावीशी वाटतेय.
दिनेशदा आम्ही फक्त जास्वंदी
दिनेशदा आम्ही फक्त जास्वंदी आणि तगर देवपुजेसाठी काढतो बाकी झाडावरच असतात सगळी फुले. मी ऑफिसमध्ये फक्त साईबाबांच्या फोटोला टेबलवर ठेवण्यासाठी एक गुलाबाच फुल आणते रोज.
कधीपासून तेरड्याचा फोटो काढून ठेवला होता. आत्ता मुहुर्त लागतोय.
घोसाळ्याचे फुल.
माझ्याकडे लहान निळ्या
माझ्याकडे लहान निळ्या गोकर्णीवर फुलचुकीची जोडी येत असे रोज दोनवेळा. मोठी मिळाल्यावर जुना वेल काढला आता ही फुलं पसंत नाहीत. जरा चोच लावतात एका फुलाला आणि जातात. आता जुनाच वेल लावणार. नवीन वाण तयार करताना काही गुण येतो तर गंध मधू सोडून जातो. जसे कलमी गुलाबाचे झालंय.
वर्षुताई thanx नावं
वर्षुताई thanx नावं सांगितल्यासाठी.
जागू फोटो मस्तच.
जागू, नेमका विरोधाभास बघ. तगर
जागू, नेमका विरोधाभास बघ. तगर आणि जास्वंदीतच बिया तयार होत नाहीत. सगळ्यांना आठवत असेल आपण
शाळेत जास्वंदीच्या फुलाचा, एक पूर्ण फूल म्हणून अभ्यास करत असू. फुलाचे सर्व अवयव त्यात स्पष्ट दिसतात.
नेमके फळच काय ते तयार होत नाही.. मॉरिशियसमधे मात्र फळे येणारी एक जास्वंद असते. त्या पुस्तकात फोटो पण आहे.
सायली माझ्या ऑफिसच्या
सायली माझ्या ऑफिसच्या रस्त्याला येताना असंख्य रानफेले फुललेली असतात. फार सुखद वाटतो माझा स्कूटीवरचा प्रवास. त्यातही डबलची गोकर्णे पांढरी आणि निळी दोन्ही फुललेली आहेत.+++ खुप छान...
तोरडा, घोसाळ्याची फुलं छानच
य्सआरडी, छान आहे तुमचे पक्षी निरिक्षण.
दिनेश दा त्या फळवाल्या जास्वंदीचा फोटो टाका प्लीज.
Pages