निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, जिप्स्या बहुतेक असणार.. पाऊस आहे ना अजून ! कॅशिया पण असतील.
कौशीच्या शेंगांचे छान फोटो मिळतील. उर्वशीला पण शेंगा आल्या असतील.

आमच्या कंपनीला खूप मोठमोठ्या टेरेसेस आहेत - काही कामानिमित्त आज तिथे गेलो असताना ही फुले तिथे एवढुश्या माती- कचर्‍यावर बहरलेली दिसली ...(बहुधा हे असावं - Wandering Dew-Grass
Botanical name: Cyanotis vaga Family: Commelinaceae (Dayflower family))

1_4.jpg2_3.jpg

वॉव मस्त फुलं, काकड्या..
शशांक, ही फुलं इतकी इवली असतात पण लक्ष खेचून घेतात अगदी.. Happy

दिनेश, फळबाज शब्द भारीच बहाल केलास Biggrin मस्तये

पनामा ची रंगीबेरंगी टवटवीत फुलं आणीकसोबतीला घनदाट रेन फॉरेस्ट.. कितीही चाला, व्याम करा.. कंटाळा येणार नाही.. Happy













१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

वर्षु, फुलं काय मस्त आहेत ग. आपल्या इकडच्या फुलांत आणि तिकडच्या साम्य वाटतं आहे ग. फोटोतली हिरवाई मन सुखावुन गेली.

वर्षूदीने जे फोटो टाकलेत त्यातील बरीच ओळखीची आहेत - प्रचिंवर क्रमांक टाकले तर नावे देता येतील.. Happy

सर्व फोटो मस्त आहेत .. Happy

सुप्रभात लोक्स!!! Happy सगळेच फोटो, माहिती छान. Happy

आमच्या कंपनीला खूप मोठमोठ्या टेरेसेस आहेत - काही कामानिमित्त आज तिथे गेलो असताना ही फुले तिथे एवढुश्या माती- कचर्‍यावर बहरलेली दिसली ...>>>>>शशांक त्याचे नाव "निलवंती" Happy बोटॅनिकल नावः Cyanotis fasciculata Happy

वर्षूदी - तू टाकलेल्या फुलांच्या प्र चि -- (पटकन टाकत असल्याने एखादी चूक असल्यास नंतर दुरुस्त करतो .. Happy )
४] टणटणी - लॅण्टाणा
८] मोरिंगा / शेवगा असावा
११] आणि १२] इक्झोरा
१४] अलामांडा
१५] अबोली
१६] आणि १७] पेंटास
२०] वॅक्स बेगोनिया (बिगोनिआ)
बोगनवेल तर सगळ्यांना माहित आहेच बाकीची जरा वेळाने किंवा इतरही कोणी सांगतीलच .. Happy

वर्षु दी, तुस्सी छा गये! Happy

काय सुरेख निसर्ग आहे तिकडचा! मस्तच आहे फोटोज..

शशांकजी जवळ जवळ सगळीच नावं सांगीतलीत...
१३ ताम्हणी आहे का? आणि ८ शेवग्याचे आहे का?

जिप्सी, निलवंती काय गोड नाव आहे... Happy

वा, वर्षूने मस्त बाग फुलवलीय इथे !

इंद्रधनुष्य.. तो पिवळा धोत्रा.. धान्याबरोबरच याच्या बियांचा प्रसार होतो, त्यामूळे शेतात हमखास दिसतो.

वाहवा.... काय सुन्दर फुले आहेत वर्षुदी! आणि त्या घनदाट वृक्षान्मधुन जाणारा रस्ताही.
खरय ग! अजिब्बात थकवा जाणवणार नाही अशा वातावरणात. Happy

काल नॅट जिओ चा सप्टँबर अंक हातात आला. त्यात एक लेख आहे प्राणीस्रूष्टी कशी वाहतुकीचे नियम पाळते त्यावर.

सहस्त्रावधी मुंग्या इथुन तिथे फिरत असतात पण चुकूनही टक्कर होत नाही. चला मुंग्यांची टक्कर झाली तरी फारसे नुकसान होत नसणार आणि म्हणुन आपल्याल कळत नसणार म्हटले तर आफ्रिकेतले बिस्ट हे मोठे प्राणी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करतात, त्यांच्यातही कधी अपघात होत नाही. जत्रेत एक माणुस जरी पडले तरी त्याच्या मागे हजार माणसे पडतात आणि मोठा अपघात होतो. मग बिस्टच्या बाबतीत तर या अपघातापेक्षाही मोठा अपघात होईल. पण असा अपघात झाल्याची नोंद आजवर नाही. आकाशात काही पक्षी एका वेळी हजारोंच्या संख्येने एकत्र उडतात. तिथेही अपघात झाल्याची नोंद नाही. मग फक्त मानवच का नेहमी अपघातात सापडतो?????? स्वतःला सगळ्यात हुशार, बुद्धीमान समजणारा मानव नेहमीच का अपघातग्रस्त होतो??

जागु मस्त टिपलायस पक्षी... करकोचा वाटतोय!
स्वतःला सगळ्यात हुशार, बुद्धीमान समजणारा मानव नेहमीच का अपघातग्रस्त होतो??++++ खरच विचार करण्यासारखे आहे..

जागू - तो फोटो बहुतेक ओपन बिल - स्टॉर्क चा आहे. याची चोच निसर्गतःच अशी असते - (कधीही संपूर्ण मिटू शकत नाही) Happy

साधना, मुंग्यांची टक्कर झाली, तर त्या एकमेकांची विचारपूस करतात. ( परक्याची असेल तर हल्ला करतात. )
मानव ( आणि घुबड ) सोडल्यास बहुतेक प्राण्यांना डावी उजवीकडे डोळे असतात, त्यामूळे त्यांना दोन्ही बाजूने दिसत असते.. माणूस बापडा नाकासमोर बघून सरळ चालणारा प्राणी Happy

पक्ष्यांच्या बाबतीत खास करून जे त्रिकोणात उडतात ते नेत्याच्या पंखातून तयार झालेल्या लहरींचा फायद घेतात. त्यांचा नेता सतत बदलत असतो. असे केल्याने मागच्या पक्ष्यांना उडण्याचे फारसे श्रम होत नाहीत. पण छोटे पक्षी असे उडताना, शिकारी पक्षी नेमके उलट्या दिशेने हल्ला करतात आणि त्यांना सहज शिकार मिळते.

तू छोट्या माश्यांचे मोठे गट कसे एकसंध पोहत असतात ते बघितलेस का ? ते फक्त आपल्या शेजारच्या माश्यावर डोळा ठेवून असतात. तो जसा वळेल तसे वळतात.

माणूस बापडा नाकासमोर बघून सरळ चालणारा प्राणी

तो गाडी चालवत असतो तेव्हा फक्त नाकासमोर बघुन चालवणे अपेक्शित नसते ना... पण मानवी अप्घात हे नाकासमोर बघुन चालण्यामुळॅ होत नाहीत तर आपण सगळ्यात पुढेच असले पाहिजे ह्या हव्यासापोटी होतात. प्राणी जसे इतरांचा विचार करतात (??) तसा माणुस कुठे करतो??

मानवी अप्घात हे नाकासमोर बघुन चालण्यामुळॅ होत नाहीत तर आपण सगळ्यात पुढेच असले पाहिजे ह्या हव्यासापोटी होतात. प्राणी जसे इतरांचा विचार करतात (??) तसा माणुस कुठे करतो?? ==+१००

नाही साधना, प्राण्यांच्या दुनियेतही सगळे आलबेल नाहीच. फक्त त्यांना उद्याची चिंता फारशी नसते. आजच्यापुरते पोट भरले तर ते उगाचच इतरांचा जीव घेणार नाहीत.. म्हणून ते स्थूल वगैरे होत नाहीत आणि त्यांना जिम वगैरे जॉईन करावे लागत नाही.
००००

नॅशनल जिओग्राफीवर वाईल्ड नामीबिया ही सिरीज ३० सप्टेंबर पासून सुरु होतेय. आमचा सख्खा शेजारी देश आहे तो. गेबॉन या देशावरही सिरीज सुरू होणार आहे.

ह्म्म.... ओके. पण मला कधीकधी वाटते की आपण जसे त्यांना समजतो तसे ते नसावेत. अर्थात आजवरचे संशोधन हेच सांगते की त्यांच्या ब-याचश्या क्रिया किंवा प्रतिक्रिया ह्या विचारातुन आल्या नसुन तसेच प्रोग्रॅमिंङ किंवा जेनेटिक डेफिनिशन तशी अस्लयामुळे आहे. बघु पुढे काय संशोधन होतेय ते.

Pages