निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु तेरड्याचे फोटो टाकच.. मी कित्येक वर्षांत नाही पाहिलंय फूल..

लहानपणी समोरच्या ओसाड पडलेल्या माळावर पावसाळ्यात तेरड्या चं रंगीत रान माजायचं.. त्यांच्या टप्पोर्‍या कळ्या हाताने दाबल्या कि कशा मस्त कर्ल होऊन सुर्रकन उघडायच्या.. आणी मोठी वेलची च्या दाण्यासारख्या दिसणार्‍या बिया खाली पडायच्या..
झाडांच्या प्रसारात आमचाही थोडाफार हात होता तर!! Happy

सायली, मस्त आहे स्पॉट.
वर्षू.. आता पनामा ते भारत असा पण वृक्ष प्रसार करणार ना ?

सायली, खूप सुंदर ठिकाण आहे.
वर्षू नील, हे तुमच्यासाठी:
काही वर्षापूर्वी काढलेले कास पठारावरच्या तेरड्याचे फोटो.

kas2.jpgkas4.jpgkas1.jpgkas.jpg

नमस्कार लोक्स,
सध्या खुपच धावपळीत, गडबडीत आणि कामात व्यस्त असल्याने इथला वावर कमी झाला आहे. Sad सावकाश सगळं वाचेन. Happy

In the meantime जर तुम्हाला हा फोटो आवडला तर माझ्यासाठी नक्की Vote करा. Happy Wink

http://privilegemoments.com/myimage.aspx?image=bka9sDb+KQtnZkHwbVnHCA%3D...

जिप्सी, मी नाही केलं वोट तुला. Proud
जागु तेरड्याचा मोठ्ठा फोटो डकव ग इथे. ते मुलायम फुल, आणि ती गदेसारखी फळं, खूप वर्षात पहायला मिळाली नाहीत. जीव अगदी जळतोय माझा. Sad
आणि त्याचं बी पण जपून ठेव आणि मला दे. (कधी? कुठे? कसं? ते नंतर पाहू. ) Happy

तुमने पुकारा और हम चले आए.....

ताज्या ताज्या तेरड्याच्या फुलांचा फोटो (कालच्या रविवारीच काढलाय). Happy

दा! Happy

a_0.jpga1.jpg

सायली, ये हुई ना बात ! आता कुणालाच ती फुले चोरता येणार नाहीत Happy ( हि युक्ती कळेपर्यंत !!! )
अदीजो.. मायबोलीवरून अपलोड केले तर हा प्रॉब्लेम येतोच. आम्ही सगळे पिकासावरून अपलोड करतो.

शोभा.. उगाच ताणू नये ! ( संतवचन !! )

अदिजो.. थांकु थांकु... Happy

जिप्स्या केलं रे वोट तुला.. आणी तेरड्या बद्दल पण थांकु..
इतक्या वर्षात मी नक्कीच तेरड्या चा चेहरा मोहरा च विसरून गेलेय Uhoh

दिनेश.. आजकाल फ्लाईट वर ( ते ही अमेरिका क्रॉस करताना) बिया, झाडं आणायचं टेंशनच्चे..

तरी एकदा मी माझ्या चायनाच्या भाजी मळा वाल्या मैत्रीणीला इकडून लहान कार्ल्याच्या, भेंडीच्या, शेवग्याच्या आणी लहान वांग्या च्या बिया नेल्या होत्या इकडून..

दिनेश दा, मी दुसर्‍या मजल्यावर राहाते, आणि सगळ्या कुंड्या बालकनीला ग्रील बसवुन घेतली आहे त्यावर ठेवल्या आहेत... पण मला दुसर्‍या दिवशी कळी भोवतीचे पान सोडल्यावर ते फुलं आपल्या समोर उमलतांना पहाताना खरच खुप मज्जा आली...(अगदी तुमच्या सारखीच Happy

हो वर्षू, अनेक देश या बाबतीत खुप जागरूक आहेत. भारतात अरायव्हल डिक्लेअर फॉर्म मधे आहे, पण कुणी बघत नाही.
ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, मॉरिशियससारखे देश अगदीच अलग पडल्याने या बाबतीत फारच काळजी घेतात.

जिप्स्या वोट ला लॉगिन कराव लागत का? मी असच केलय. कराव लागत असेल तर सांग परत करेन.

सायली तू दिलेल्या बियांची फुले झाली. Happy

Pages