निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शशांक, सर्व नावं सांगितलीस.. नावांच्या नावाने माझा शंखच असतो.. Uhoh

असो.. आता पक्ष्यांची नावं सांगणे..

हा प्राणी अजिबातच ओळखू आला नाही


माझा फेव शॉट



१०

जास्वंदाचे फुल मस्तच दिसतेय.
५ मध्ये कावळा नसुन कावळ्यासारखा दिसणारा आहे. नाव विसरले. काळा चॉकलेटी रंग असतो.

साधना + अनुमोदन...
वर्षु दी, मस्त फुलं पक्षी... तो पिवळा चिमुकला वारब्लर आणि ती झाडावरची को़कीळा वाटते आहे..

Happy माऊस डिअर च्या साम्या बरोबर जोडीला या प्राण्याचा तोंडावळा काहीसा ,'हेअर' शी पण मिळताजुळता होता..

सश्यांप्रमाणेच बागडत होते..एका सरकारी ऑफिस च्या आवारात ,कारण भोवताली दाट फॉरेस्ट होतंच..ल्पळून

जाऊन लपायला.. सातो पनामिनो कावळाच आहे.. पण आकाराने बराच लहान आणी रोड, शिवाय तोंडात ही कावकाव नव्हती..
त्या ,उगाचच हळद इकडे तिकडे लावून आलेल्या चिमण्या मात्र भरपूर किलकिलाट करत..

प्र चि १ - बहुतेक Wilson's Warbler

प्र चि २ - बहुतेक Shiny Cowbird

प्र चि ३ मधील प्राणी -
The red-rumped agouti (Dasyprocta leporina), म्हणजेच golden-rumped agouti, orange-rumped agouti किंवा कॅपेबारा असावा. जास्त क्लिअर फोटो असता तर नक्की कोण ते कळले असते .. Happy

सुप्रभात....

हे सुखद च्या ट्युशन मॉडमच्या घरचे..... काल त्यांनी आईला दोन कळ्या दिल्या होत्या...

lr.jpglr1.jpg

सयाली फारच सुंदर रंग आहे फुलाचा.. मस्त ब्राईट रेड..

शशांक , थँक्स अगेन.. बरोबरे त्या प्राण्याचं नाव.. तू दिलेल्या साईट वर जाऊन पाहिलं.. Happy

सायली, हे फुल वेगळेच आहे. मी बघितलेल्या फुलाला आणखी बारीक पाकळ्यांची रांग होती. हे पण मस्तच आहे.

वर्षू, परत कधी येणार ? अजून भरपूर फोटो हवेत.

दिनेश.. आय अ‍ॅम नुकतीच बॅक.. Happy एक्दम जेटलेगात बुडलेय सध्या.. Sad
नो टायमिंग्स, उठणे, झोपणे.. कशात ताळमेळ नाहीये सध्या..

येस वर्षु दी, या फुलाचा रंग खुपच लोभस आहे...

दिनेश दा, मी जे लाल क्रुष्ण कमळ घरी लावले आहे, ते अगदी आपल्या निळ्या कृ. कमळा सारखेच आहे
हे अस मोठया दहा पाकळ्यांचे मी पहिल्यांदाच बघते आहे...

जागू, शेतीतले भात तयार झाले का ? दसर्‍याला भाताच्या ओंब्या असतील का ?
यावर्षी वेळापत्रक बदलले आहे ना सगळे !

दिनेशदा, हो हो मिळतील तोपर्यंत Happy ह्या रविवारी काकांच्या शेतावर जाऊन फोटो काढून येते.

भाताच्या ओंब्या.. वॉव.. जागु टाक गं फोटो .. Happy

नवरात्रीचे ढोलताशे .. ओह बाप्रे.. हा प्रकार विसरलेच होते.. Uhoh

यावेळी गणपतीत इथे डॉल्बी च्या दणदणाटामुळे ध्वनि प्रदूषण झालं होतं असं ऐकलं.. Sad

Pages