निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वजण चांगले चांगले फोटो देताहेत. ले०जास्वंद कमाल आहे. लडाखमधल्या खळ्याच्या फोटोसाठी आणि त्यावर वॉटरमार्क न टाकल्याबद्दल जिप्सीला शाबासकी.

जाताजाता :
सूर्यासाठी कामचलाऊ फिल्टर

गिफ्ट रैपिंगसाठी दुकानात चकचकीत कागद मिळतात त्याची तिहेरी घडी करून ६ बाइ ८ ची फ्रेम करून ठेवायची. यातून सूर्य बराच सुसह्य होतो चंदेरी गोळा दिसतो. हा फिल्टर अगदी सायंटिफिक अल्ट्रावॉइलट एवढा सुरक्षित नाही परंतू पाच दहा सेकंद पाहण्यास ठीक आहे.

जिप्सी सॉलिड फोटो सनरिंगचा.

मानुषीताई, सायली मस्त फोटो. जास्वंद गोड.

Srd छान माहिती.

मानुषी, सायली मस्त फोटो.
ले०जास्वंद लाल रंगाची गावी पाहीली आहे.
जिप्सी सनरिंगचा फोटो मस्त .

ण्याच्या घरातल्या बाल्कनीतल्या झाडावरच्या घरट्यातलं बुलबुल पिलू..>>>> हे वाचुन लहानपणीचे म्हातारा, म्हातर्‍याची बायको, बायकोची म्हैस, शेपटी, माशी..... ते गाणे आठवले. बघ हे वाचुन ->>>>
मोनालीप दे टाळी............ जसं लिहीत गेले तसं हेच गाणं आठवत होतं मला!
आणि हो दिनेश आणि सायली ठांकू शतावरीमाहितीसाठी.

खास जागुली करता..
ही कोर्वीना एक काट्याची फिश महा पॉप्युलर आहे इथे..

स्वच्छ फिश मार्केट.. अगदी कुठे ही फिशी वास बीस कुछ नही..

एस आर डी, अन्जु ताई, कामिनी देवकी, वर्षु दी धन्यवाद....
वर्षु दी मोस्ट वेलकम... मी पुण्याला नाही नागपूर ला असते... तुम्ही नागपूर ला जरुर या... Happy

मगे तुम्ही किंवा मनुषी ताईंनी लिहले होते... की आम्ही बिना आंगण / बालकनी वाले मुंबई कर,
आम्हाला कुठे मोगर्‍याच्या झाडाचे सुख... (असच काहीस लिहिल होत...) म्हणुन आम्ही रात्री खीडकीच्या
ग्रीलला मोगर्‍याचे गजरे बांधुन ठेवतो.. वार्‍याची झु़ळुक आली की मंद सुवास घऊन येते..... ती कल्पना आमच्या
कडे इतकी हीट झाली.. माझे बहिण भाऊ सगळे तसेच करु लागले.... Happy

मा. बो मुळे आयुष्यात खुप सुख आहे... नविन नविन माहिती, ध्न्यान, छान छान लोकांशी ओऴखी, लेख, पा.कृ.. (एकुण काय तर व्यक्तीमत्वाचा एकप्रकारे विकासच म्हणा न! )सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण आपल्यासाठी आपल्या आवडीचे काही तरी करतो आहे.... त्यामुळे दिवस भर वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो.:)... त्यामुळे मायबोलीचे आणि तुम्हा सगळ्यांचे आभार....

एक गटग नागपूर ला पण होऊ दया, तुम्हा सगळ्यांनाच भेटायची खुप इच्छा आहे...
बाकी मासे पाहुन जागुचे हात सळसळत असतील..... आणि त्या मण्यांसारख्या बिया खुपच गोड आहे...

ग्रीलला मोगर्‍याचे गजरे बांधुन ठेवतो.. वार्‍याची झु़ळुक आली की मंद सुवास घऊन येते....ती कल्पना आमच्या
कडे इतकी हीट झाली.. माझे बहिण भाऊ सगळे तसेच करु लागले.... === खुप छान . मी करुन पाहीन.

सायली, खूप छान आणि मनातले लिहिलेस, सध्या मला माबो वर जास्त वेळ यायला मिळत नाही आहे, आज खूप पोस्ट्स वाचल्या. मस्तच.

जिप्सी तुला वोट केले रे.

सगळ्यांचेच फोटो मस्त.

शनिवारी राणीची बाग आणि भाऊ दाजी लाड संग्रहालय बघून आलो, तुमची सगळ्यांची आठवण आलीच. Happy

वर्षू... भरपूर फोटो हवेत. मोठे मोठे लेख लिहित जा.. नाहीतर लेकीला वाटेल चायनाच आवडते, पनामा नाही आवडत मम्मीला.

सायली.. त्या फुलासारख्या दिसणार्‍या वनस्पतीत एक प्रकारचा औषधी क्षार सापडतो. मी मागे एक लेख लिहिला होता त्यावर. ( आता नाव पण विसरलो. )
पाने बांबूची का ?

या लाल बियांचे झाड (फोटोतले )गुंजांचे असावे ते एक राणीच्या बागेत आहे. आणखी एक गुंजांचा प्रकार असतो मुगाएवढ्या पण अर्ध्या लाल अर्ध्या काळ्या. याचा वेल असतो आणि गोड पाने विड्यात घालतात.

वर्षू मस्त फोटो...लाल्लाल चुटुक्क बीया मस्तच.
सायली छान लिहिलंस मनातलं.
की आम्ही बिना आंगण / बालकनी वाले मुंबई कर,
आम्हाला कुठे मोगर्‍याच्या झाडाचे सुख... (>>>>>>> हे मी लिहिल्याचं आठवत नाही. :स्मितः

मनुषी ताई. हो ना! मग वर्षु दी नी लिहिल असाव!

एस आर डी.. अगदी बरोबर, तांबुल करतांना आम्ही पण घालतो, आवळ्याच्या पाना सारखी असतात ना गुंजीची पानं?
त्याचे खोड म्हणजे, जेष्ठमध ना?

नाही तो जेष्ठ्मध नाही.. खरं तर पानात वापरतात तोही त्या गुंजेचा पाला का, याची मला खात्री नाही. अश्या लालभडक दिसणार्‍या बर्‍याच बिया माणसासाठी विखारी असतात. त्या खाऊ नयेत.
गुंजांचा ( झाडावरच्या, उडत्या तबकडीसारख्या दिसणार्‍या ) पूर्वापार सोन्याचे वजन करण्यासाठी वापर होत आला आहे.

कामिनी अग मी आधीच लिहिल होत, मनुषी ताई किंवा वर्षु दी दोघींपैकी कोणी तरी लिहीलं होत....

दिनेश दा, आमचे एक स्नेही आहेत, त्यांच्या कडे आहे हे गुंजीचे झाड, ती लोकं पण तांबुल करतांना याची पाने घालतात...त्या काकांनीच मला सांगीतल होतं की याच खोड म्हणजे जेष्ठमध, फळ विषारी पण पान आणि खोड उपयोगी आहे..त्यामुळे आता गोंधळलेय... कोणाला अजुन माहिती आहे का?

Pages