निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
निसर्गाची कलाकुसर !
निसर्गाची कलाकुसर !
खरंच कलाकुसर. फ्लॉवर की
खरंच कलाकुसर. फ्लॉवर की ब्रोकोली?
ब्रोकोली.. चवीला पण छान आहे.
ब्रोकोली.. चवीला पण छान आहे.
हि चिनी भाजी, पाक चोई.. मी
हि चिनी भाजी, पाक चोई.. मी विठाई मालिकेत लिहिले होते. मुंबईत एक दोन ठिकाणीच विकायला असलेली बघितली. म्हणजे भारतात सहज शेती होईल. भारतीयांत लोकप्रिय व्हायला हवी. चवीला साधारण मूळ्यासारखीच लागते. आणि या भाजीत काहीही टाकण्यासारखे नसते.
मुळा मला नै बै आवडत
मुळा मला नै बै आवडत
दिनेशदा वर्खा बद्दल
दिनेशदा वर्खा बद्दल धन्यवाद.. उपयुक्त माहिती
हे घरटं कोणाच ते ओळखा...
निसर्गाची कलाकुसर>>> कसल भारी
निसर्गाची कलाकुसर>>>
कसल भारी दिसतय. मला ते समुद्रातलं काहितरी आहे अस वाटलं.
चांदीच्या वर्खाबाबत छान माहिती
कोरफडीचा पुर्ण फोटो ऍड केलाय.
मस्त आहे घरटं. कोणत्या
मस्त आहे घरटं. कोणत्या पक्षाचं आहे?
शिंपी पक्ष्याचे घरटे का ?
शिंपी पक्ष्याचे घरटे का ?
इंद्रधनुष्य, शिंपी पक्षाचे
इंद्रधनुष्य, शिंपी पक्षाचे घरटे आहे का?
ते समुद्र फुल कसले मस्त दिसतेय :). नक्की काय आहे ते दिनेशदा?
दा, मोनाली... अगदी बरोबर.
दा, मोनाली... अगदी बरोबर.
गणपतीच्या दिवसात एक जोडप आमच्या घरा समोरील त्या केवडा?च्या झाडा वर दिसलं.. म्हटंल वटवट्या असेल... नंतर सतत दोन तीन दिवस दिसत राहिलं.. मग लक्ष देऊन बघिलतल्या वर कळलं की हे शिंपीच जोडपं आहे आणि त्यांचा मनसुबाही लगेच ध्यानात आला... मी खुपच आनंदी झालो...
पण गणपती नंतर शेजारच्याने त्या झाडावर पाणी फवारणी सुरु केली आणि बिच्चारे ते अर्धवट बांधलेलं घरटं सोडून निघुन गेले...
कोरफडीचा मोहर, ब्रोकोली, शिपी
कोरफडीचा मोहर, ब्रोकोली, शिपी पक्षाचे घरटे, सारेच काही छान...
मागे आमच्याकडे देखिल औदुंबराच्या झाडावर (कुंडीतल्याच) शिंपी पक्षांनी घरटे केले होत,,, काय मस्त दोन पान एक मेकांना टाचुन वगैरे...,आत कापुसाचा मऊ मऊ बिछाना देखिल असतो... कमाल आहे नाही?
दिनेशदा ब्रोकोली सॉलिड मस्त
दिनेशदा ब्रोकोली सॉलिड मस्त आहे, इथे मिळतच नाही ही भाजी, मॉलमध्ये असेल कदाचित पण बाजारात नाही दिसत. पाक चोई पण मस्त.
मोनाली, ती ब्रोकोली ( हिरवा
मोनाली, ती ब्रोकोली ( हिरवा फ्लॉवर म्हणतात आपल्याकडे ) आहे.
आमच्या घराजवळ एका देशी बदामाच्या पानात शिंपी पक्ष्याने घरटे केले होते. त्यांचे अंदाज कसे अचूक असतात बघा. त्या घरटातले पिल्लू बाहेर पडल्यानंतरच ते पान पिकले व गळून पडले.
या घरटातले पिल्लू बाहेर
या घरटातले पिल्लू बाहेर पडल्यानंतरच ते पान पिकले व गळून पडले.
>>
ब्रोकोलीच्या तुर्यात पण अनेक
ब्रोकोलीच्या तुर्यात पण अनेक कळ्या असतात !
खरच काय अचुक अंदाज असतात नाही
खरच काय अचुक अंदाज असतात नाही पक्षांचे... आणि दा तुमचे निरिक्षण देखिल...
ब्रोकोली वरुन एक आठवले, आमच्या बॉस चे ३ तारका होटेल पण आहे नागपुरात... तर रिसेप्शनीस्ट चा हेयर कट असाच होता, कुरळे केस आणि स्टेप बॉय कट, तर बॉस आले की तीला ब्रोकोली म्हणुन मोठ्याने हाक मारतात आणि ती
देखिल येस सर म्हणत आत जात... ( सोरी अवांतर)
फोटो अंतरजालाहुन....
फोटो अंतरजालाहुन....
हो दा ब्रोकोली माहिती आहे.
हो दा ब्रोकोली माहिती आहे.
शिंपी पक्षांनी घरटे केले होत,,, काय मस्त दोन पान एक मेकांना टाचुन वगैरे...,आत कापुसाचा मऊ मऊ बिछाना देखिल असतो... कमाल आहे नाही?>> अगदी हेच वर्णन. आमच्या ऑफिसच्या बाजुच्या झाडावर केलेले घरटे. माळी काकांनी काढले (पक्षी गेल्यावर) तेव्हा दाखवलेले आम्हाला. अ प्र ति म कलाकुसर होती ती. (म्हणुन कळाले हो, नाहितर आम्हाला कुठली एवढी माहिती )
म्हणून तर त्याला शिंपी
म्हणून तर त्याला शिंपी म्हणतात.. सूर्यपक्ष्याचेही असेच असते. पण तो पाने शिवत नाही. अधांतरी लटकत असते ते घरटे.
ब्रोकोली,पाक चोई, शिंपी
ब्रोकोली,पाक चोई, शिंपी पक्ष्याचे घरटे छान.
शिंपी पक्षाची शीळही काय सुरेल व नाजूक असते!
शिंपी पक्षी:
दिनेश, कसली आर्टिस्टिक आहे
दिनेश, कसली आर्टिस्टिक आहे ब्रोकली... माय फेवरेट..........
पाक छॉय पण मला भारीच आवडते,,,,,,,,,, पण स्टर फ्राईड विथ चायनीज टिपिकल मसाला ओन्ली...
सरिवा.. कसला फोटो आहे??
शिंपी पक्षी शोध.शीर्षक दिले
शिंपी पक्षी शोध.शीर्षक दिले आहे.
हाहा.. दिसला
हाहा.. दिसला दिसला!!!!!!!!!!!!!
आता पाऊस पडतोय काय मुंबईत ?
आता पाऊस पडतोय काय मुंबईत ?
आता पाऊस पडतोय काय मुंबईत
आता पाऊस पडतोय काय मुंबईत ?>>>>इथे ऐरोलीला तर अजुन पाऊस नाही सुरू झालाय पण विजा चमकत आहेत आणि ढगांचा गडगडाट सुरु झालाय. मघाशी चहा प्यायला खाली गेलो तेंव्हा जोरात वादळासारखा वारा सुटलेला, चक्रीवादळासारखी माती गोल गोल फिरत होती. चहा न पिताच वर आलो.
आत्ता नाहिये. मी घरी येताना
आत्ता नाहिये. मी घरी येताना जोराचा गोल गोल वारा सुटला होता. टेंभी नाक्यावरच्या जत्रेतली एक कमान वार्याच्या जोरामुळे थोडी कलली. खाली बसलेले फेरीवाले आपापलं सामान घेऊन दुकानांच्या आडोश्याला जात होते.
सरिवा काय मस्त टिपलायत शिंपी
सरिवा काय मस्त टिपलायत शिंपी पक्षी!...
पारिजातकाच्या फुलांचा ती
पारिजातकाच्या फुलांचा ती झाडावर असताना फोटो काढणे कठीण असते. कारण फुले फुलतात रात्री आणि उजाडताना ती झाडावरुन खाली पडलेली असतात. तसेच झाड मोठे असेल तर इतक्या वरचा फोटो रात्री नीट येत नाही. पण मागच्या आठवड्यात मी अष्टविनायक यात्रेला गेले होते. लेण्याद्री चढायला अगदी लवकर म्हणजे सकाळी सहाला सुरवात केली. वातावरण अप्रतिम होते. तिथे हे प्राजक्ताचे झाड होते. हवा थोडी थंड असल्यामुळे फुले अजुन झाडावरच होती. सुंदर दिसत होती सकाळच्या प्रकाशात. भुतलावरच्या चांदण्याच जणु. म्हणून फोटो काढला. तो हा फोटो तुमच्यासाठी
From mayboli
सप्तपर्णी फुलण्याचा सीझन सुरू
सप्तपर्णी फुलण्याचा सीझन सुरू झालाय का? रात्री ऑफिसहुन घरी जाताना हा ओळखीचा सुगंध दरवळतो. पवईला असताना रस्त्याच्या दुतर्फा सप्तपर्णी होती पण इथे ऐरोलीला दिसत नाही मात्र रात्री घरी जाताना सुगंध येतो.
Pages