निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, माझ्या आठवणीप्रमाणे तू टोपली कारवीचा फोटो अजून टाकलेला नाहीस. ही पण अशीच ७ वर्षांनीच का ४ वर्षांनी फुलते. अंबोलीला बरीच आहेत. फुले नसताना हे झुडूप उपड्या टोपलीसारखे दिसते. मग त्यातून तुरे येतात आणि त्यावर निळी फुले येतात.

वरच्या फोटोतली कारवी, फुले येऊन गेल्यानंतर मरते. मग तिच्या काठ्या गरीबांच्या झोपडीचा आधार ठरतात. त्या काढायच्याच असतात. मग त्यातून नवी कारवी उगवते.

आमचाच उद्योग. यावर्षी झेंडू लावला नव्हता त्यामुळे तोरणासाठी फुले आणावी लागली. मे महिन्यातल्या आंब्याच्या कोयीने पाने दिली आणि भाताच्या लोंब्या ज्याकाही चिमण्या मुनिआंनी ठेवल्या त्यातली एक लावून तोरण झाले.

जिप्सी कारवी सुंदर. मला माहिती नव्हतं की सात वर्षांनी फुलते. जिप्सी तुम्ही भाताच्या लोंब्याबद्दल सुंदर सांगितले, आता लगेच दरवाज्याचे तोरण काढून बांधते ग्रीलला चिमण्यांसाठी. Thanx.

दिनेशदा ब्रोकोली मस्त.

हो दिनेशदा, टोपली कारवीच्या फुलाचा फोटो (बहुतेक) नाही आहे माझ्याकडे.
जो.एस. करांद्याची फुले मस्तच.
मे महिन्यातल्या आंब्याच्या कोयीने पाने दिली आणि भाताच्या लोंब्या ज्याकाही चिमण्या मुनिआंनी ठेवल्या त्यातली एक लावून तोरण झाले.>>>>>मस्तच Srd Happy

धन्यवाद अन्जू Happy

मे महिन्यातल्या आंब्याच्या कोयीने पाने दिली आणि भाताच्या लोंब्या ज्याकाही चिमण्या मुनिआंनी ठेवल्या त्यातली एक लावून तोरण झाले. >> छानच वाटलं. तोरण सगळ घरचं!!

जिपसी, तोरण चिमण्यांना घालण्याची आयडिया बेस्ट . कारवी ही सुंदर दिसतेय.

दिनेश दा फोटो मस्त आलाय ब्रोकोलीचा.

उत्तराखंड मध्ये मात्र सप्तपर्णी अशी दिसते >>>>> ते हे झाड आहे जिप्सीभौ - Indian or Himalayan Horse Chestnut - Aesculus indica>>>>धन्यवाद शशांक. बोटॅनिकल नाव सांगितल्याबद्दल. Happy

मी मोरिशियसहून, हॉग प्लम चे लोणचे आणले होते. काल बाटली उघडली. चव अप्रतिम. ओळखीची चव वाटत होती म्हणून गूगल केले तर ते आपले आंबाडे निघाले.

इथे फोटो पहा.

https://www.google.com/search?q=hog+plum&biw=1920&bih=979&tbm=isch&tbo=u...

आपल्याकडे मी नेहमी हिरवेच बघितले आहेत. फोटोत रंगीत पण दिसताहेत.

शनिवारी, मावळात "तेलबैला" ट्रेक करून आलो. तिथे हि फुले दिसली. दिसायला साधारण सोनटक्क्यासारखीचे, पण सोनटक्का नाही. सकाळी ११ च्या दरम्यान आम्ही तिथे होतो पण एकही फुल ताजेतवाने दिसले नाही, बहुतेक हि फुले संध्याकाळी/रात्री फुलत असणार. रस्त्याच्या कडेने फुलली होती.

निगवरील जाणकारांनी (मिळेल त्या उपकरणांनी) प्रकाश टाकावा. Proud

मराठी नावः चोहोळा
बोटॅनिकल नावः Kaempferia scaposa

हि फुले:

हि पाने आणि झाडः

कासच्या(२००९ दसरा) टोपली कारवीचे फोटो (प्रिँटस)आहेत. आता त्याचा फोटो एवढा चांगला नाही येणार बहुतेक.

यंदा सप्टेंबरच्या मध्यावर कासला गेलो होतो. सर्वत्र टोपली कारवीच होती. न फुललेली. कास ५० %सुद्धा फुलांनी भरलेले नव्हते. गुलाबी/जांभळा तेरडाच काय तो प्रामुख्याने होता. बाकी सोनकी वगैरे तुरळकतुरळक होते. आता वनखात्याने ट्रेल्स केले आहेत पण सगळेजण पिक्निकला आल्यासारखे बागडत होते. लहान मुले इतस्ततः धावत होती. यंदा पाऊस उशीरा पडला त्यामुळे आणि गेल्या वर्षी विक्रमी संख्येतल्या 'निसर्गप्रेमीं'नी झुडुपे तुडवल्यामुळे बी पडले नाही त्यामुळे झाडे उगवली आणि फुलली नाहीत असे वनखात्यातले कर्मचारी सांगत होते.
वाईट वाटले.

मस्त गप्पा, माहिती, प्र.ची

कारवी खुपच गोड आहे आणि तीच्या शंखाकृती कळ्या तर त्याहुन गोड! Happy

जिप्सी तुम्ही टाकलेली फुलांची प्र.ची. सोनटक्या कुळातलीच असावीत, कारण त्याची पाने साधारण सोनटक्या सारखीच दिसतायत, बाकी जाणकार खुलासा करतीलच...

माझ्याकडे पांढरा सोनटक्का आहे, मी फुलांच्या प्रतिक्षेत आहे... साधारणं सप्टेंबर ते डीसेंबर हाच बहरण्याचा
सिझन असतो ना! कोणी सांगेल का? अजुन कीती वाट बघावी लागेल?

साधना कुठे आहे? बरेच दिवसात फिरकली नाही इकडे...

हिरा छान अनुभव!

१)कोनफळ आणि तोंडल्याचे वेल
१

२)आजचा सूर्योदय आणि कोनफळीच्या वेलाचे तोरण
२

३)कोनफळीच्या वेलाच्या पानांच्या देठाजवळ आलेली छोटीशी गाठ
३

१)फिशटैंकमध्ये लावलेल्या झाडाला आलेली फुले
१

२)आंब्याचे रोपटे +भात +मुनिआ. फोटो दोन फुटांवरून काढला आहे.
२

वा सगळ्यांचे फोटो माहीती एकदम मस्तच.

काल मी जवळून हळद्याचा फोटो काढलाय. अपलोड नाही केला. आज रात्री मिशन फोटो अपलोड साठी बसते. आणि कॅमेर्‍यातले कैद फोटो बाहेर काढते. Happy

Srd.. जसा येईल तसा. मला बघायचा आहे टोपली कारवीच्या फुलांचा फोटो. फिशटँक मधली फुले गोडच. विषवल्ली ( नावाचीच ) वेल असते तिला अशी फुले झुपक्याने येतात.

हीरा.. गेली बरीच वर्षे कासची गर्दी वाढतेय. तिथल्या काही जाती तर इतरत्र कुठे दिसत नाहीत. काही भाग फिरण्यासाठी बंद केले पाहिजेत.

सायली, मुंबईत सोनटक्का पावसाळ्यात फुलतो. नंतर दिवाळीपर्यंत तुरळक फुलत राहतो.

जिप्स्या, फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री बघावे लागेल. ३ भाग आहेत त्याचे.

जिप्सी, तुम्ही पाठवलेले फोटो Kaempferia scaposa या आल्याच्या कुळातल्या वनस्पतीचे आहेत.
मराठी नाव चोहोळा.
flowers of india ची लिन्कः

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Scaped%20Ginger.html

मी याचे नाव efloraofindia वरून शोधले. ती लिंकही देते. त्यातला फोटो लोणावळ्याच्याच परिसरातला आहे आणि तुम्ही पाठवलेल्या फोटोशी मिळताजुळता अहे:

https://groups.google.com/forum/?fromgroups#!searchin/indiantreepix/Kaem...$20scaposa/indiantreepix/1EgQ8F2loJQ/nuVXU4nFD0IJ

-अश्विनी

युरेका युरेका Happy त्या फुलांचे नाव सापडले Happy

मराठी नावः चोहोळा
बोटॅनिकल नावः Kaempferia scaposa

दिनेश वाळके यांनी काढलेले फोटो पहा:
http://flickriver.com/photos/dinesh_valke/tags/chohola/

नाव शोधताना दिनेशदांनी फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीची आठवण करून दिल्यावर मी "फ्लॉवर्स ऑफ इंडिया" या साईटवर गेलो आणि या फुलाची फॅमिली शोधली. साधारण सोनटक्क्यासारख्या दिसणार्‍या या फुलांची फॅमिली "Zingiberaceae" (Ginger) असल्याने "sahyadri flowers Zingiberacea" हे शोधुन पाहिले असता या फुलाचे नाव सापडले. Happy

जिप्स्या तुला फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीची पुस्तके मिळाली का?>>>>>नाही जागू, मी अजुन शोधलंच नाही आहे. Sad

अश्विनी, सेम पिंच Happy खुप खुप धन्यवाद.
माझ्याकडुन ४ मिनिटांचा उशीर झाला प्रतिसाद देण्यात. Happy

अश्विनी, तो दुसर्‍या लिंकवरचा फोटोही तोच आहे. Happy लोणावळ्यापासुन, अ‍ॅम्बी व्हॅलीच्या पुढे सालतर खिंडीतुन एक रस्ता भांबर्डेला जातो. त्याच रस्त्यावर दुतर्फा हि फुले दिसली. मात्र पूर्ण फुललेलं फुल (ताजे फुल) दिसले नाही. पण आता फोटोत त्याच्या तलम रेशमी पाकळ्या पाहिल्यावर मात्र कळतंय कि हि फुले उन्हाचा मारा जास्त सहन करू शकत नसतील (असं मला वाटतंय Happy

रंग रंगुल्या सान सानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा
(शब्दः इंदिरा संत)

१.

२.

३.

४.

५.

६.

वा जिप्सी तुम्ही कवितेबरोबर फोटो पेश करताना ती एक मेजवानीच असते. क्या बात है.

ती तीन नंबरची गुलाबी फुले आहेत त्याच्या माळा असतात नवरात्रात आमच्याकडे देवीला.

Pages