निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
दिनेशदा मस्त फोटो. माझे दुबई
दिनेशदा मस्त फोटो. माझे दुबई वारी हल्लीचे भाग वाचायचे राहिलेत.
धागा आज पहिल्या पानावर बघून बरं वाटलं.
शोध खिडकी चांगलीच उघडतेय.काम
शोध खिडकी चांगलीच उघडतेय.काम होतंय.मला वाटलं की प्रतिसादांत शब्दखुणा टैगझ असतील तरच सापडेल.मजकुरांतला शब्दपण 'गावतोय' /भेटतोय /सापडतोय.
ओमान वगैरेचे फोटो आवडले. वैराण भागात आद्रता कमी असते त्यामुळे रोगराई पसरवणारे जंतू आटोक्यात राहतात.आजच टिव्हीवर मोरोक़को पाहिले तिथेही असे स्वच्छ पाण्याचे झरे आणि शहरांत आणले आहेत.आपली गंगा स्वच्छ झाली की बोलवुया सर्वांना इकडे
ट्रेकला दिसतात मुरुडशेंगा कधीकधी पण घेत नाही.
सुप्रभात.... मागे मी लिहिल
सुप्रभात....
मागे मी लिहिल होत आमच्या खिडकीत पारव्यानी अंडी घातलीत म्हणुन... काल त्यातुन दोन पील्लं बाहेर आली आहेत,,,
Srd.. गंगा माझ्या हयातीत
Srd.. गंगा माझ्या हयातीत शुद्ध होवो !
आपल्याकडे जिथे स्वच्छतेचे भान आहे तिथल्या नद्या आजही स्वच्छ आहेतच. गोव्यातल्या नद्या मला स्वच्छ दिसत.
कोकणात काही ठिकाणी असे वहाळ आहेत. ( हातखंबा, राजापूर वगैरे ) तेही स्वच्छ आहेत. मी नगरमधल्या शनिशिंगणापूरमधल्या वस्तीतून पाट वाहताना बघितला तोही स्वच्छ होता.
सायली, जरा जपून.. पुढे या पारव्यांचा त्रास व्हायची शक्यता आहे.
दिनेशदा श्रीरामपूरला पण
दिनेशदा श्रीरामपूरला पण पाटाचे पाणी होतं आणि काही ठिकाणी टाकायची लोकं कचरा पण बऱ्यापैकी स्वच्छ बऱ्याच ठिकाणी.
कोकणात गावागावात असणारे वहाळ, बऱ्यापैकी स्वच्छ असतात.
कोकणात ढोकमळे (नेवरे) गाव आहे रत्नागिरीजवळ तिथे पाटाचे पाणी खूप छान, नितळ बघितलं. रुंदीला छोटा आहे तो पाट, पण पाणी अगदी ओंजळीत उचलून प्यायले जसं कोकणात झऱ्याचे प्यावे तसं अगदी होतं.
सायली फोटो छान. तुझा फोटो
सायली फोटो छान.
तुझा फोटो बघून जुनी आठवण झाली. माझ्या कुंडीत अशीच कबुतराने अंडी घातली, खरं म्हणजे मला अजिबात आवडलं नव्हतं. कुंडी लहान होती त्यातले एक पिल्लू मेलं, तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटलं.
अच्छा दा... अन्जु ताई धागा
अच्छा दा... अन्जु ताई
धागा पुन्हा संथ झाला आहे,सगळे गेलेत कुठे?
आपली नि.ग. मैत्रीण पलक हिला
आपली नि.ग. मैत्रीण पलक हिला पुत्रलाभ झाला संकष्टीच्या दिवशी. तिचे हार्दिक अभिनंदन.
हाय निसर्गप्रेमींनो, हे
हाय निसर्गप्रेमींनो,
हे Clerodendrum प्रकारातले फूल आहे. Bleeding Heart Vine:
पलकचे अभिनंदन.
पलकचे अभिनंदन.
अरे व्वा! पलक चे मनापासुन
अरे व्वा! पलक चे मनापासुन अभिनंदन!
वर्षा, फुलं पहिल्यांदाच बघते आहे खुपच गोड आहेत, , नाव माहिती नाही ...
आजच सगळा बॅकलॉग भरुन
आजच सगळा बॅकलॉग भरुन काढला.
तर ईथे गोड बातमी पलकचे अभिनंदन.
वर्षा, हे Clerodendrum
वर्षा,
हे Clerodendrum प्रकारातले फूल आहे. Bleeding Heart Vine.
मुळचे इथले नाही.
आदिजो, धन्यवाद... काय पटकन
आदिजो, धन्यवाद... काय पटकन नाव सांगीतलत.. ग्रेट.
I see. Thank you adijo!
I see. Thank you adijo!
अभिनंदन पलक !
अभिनंदन पलक !
किती पटकन ओळखलं अश्विनीने.
किती पटकन ओळखलं अश्विनीने.
अभिनंदन पलक !
अभिनंदन पलक !
पलक अभिनंदन !
पलक अभिनंदन !
वाचतोय. माझा नावडता पक्षी
वाचतोय.
माझा नावडता पक्षी (निबंध)=कबुतर. ते बाल्कनीत येऊन केवळ हैदोस घालतात. फिशटैंकमध्ये उतरून आंघोळ. दोन कुंड्यांमध्ये बसून बैंग बैंग घुटुरघु सतत. आणि दुसऱ्या जोडीला तीच जागा हवी असते त्यांची भांडणे. कितीही हाकलले तरी अथक प्रयत्न स्वत:चे हक्काचे घर हवे म्हणून चालूच ठेवतात.पहिली जोडी ठाम दुसरी जोडी बिचारी आतमध्ये कोचाखाली शिरते खराटा चुकून राहिल्यास काड्या /हीर उसकटतात. दोन अंडी घरंगळत जाऊ नये याकरिता स्पीडब्रेकर.कबुतर एक शांततेचं प्रतिक. तुम्ही शांत राहू शकता का हे पाहणारा जगव्यापी पक्षी.
अभिनंदन पलक वर्षा, फोटो
अभिनंदन पलक
वर्षा, फोटो मस्तच.
हे Clerodendrum प्रकारातले फूल आहे. Bleeding Heart Vine.
मुळचे इथले नाही.>>>>>क्या बात है, अश्विनी!!
वर्षा, त्या फोटोच्यावरती हे नाव अपडेट करा.
तुम्ही शांत राहू शकता का हे पाहणारा जगव्यापी पक्षी.>>>>>srd
दुसरे एक पांढरे कबुतर
दुसरे एक पांढरे कबुतर किचनच्या खिडकित चार वर्षांपूर्वी काही खायला आले होते. हे खरेच पांढरे होते. गुलाबी पाय आणि चोच. कधीच आवाज करायचे नाही. त्याच्या जवळही इतर पारवे जायचे नाहीत. दुसरे दिवशीही आठ वाजता येऊन गुपचुप बसले. तिथे थोडी चणाडाळ ठेवली ती खाल्ली. रोज येऊ लागले. हळहळू हातातून खाऊ लागले. आम्ही पकडून पुन्हा सोडायचो. पाचसहा महिने झाले. एक दिवशी दुर्बुध्दी झाली. त्याला पकडून वस ईला पाहुण्यांबरोबर पाठवले. त्यांनी दोन दिवसांनी सोडले पण ते परत आलेच नाही. हे पांढरे कबुतर खरेच शांत आणि गोंडस होते. निरोप नेणारी कबुतरे ही पारवे असतात पांढरी बहुतेक नसतात.
सुदुपार, हे common baron
सुदुपार,
हे common baron जातीचे फुलपाखरु.
जवळूनः
वर्षा. खुप मस्त फोटो.
वर्षा. खुप मस्त फोटो.
Varsha, tumhi var takalelya
Varsha, tumhi var takalelya fulachya photo madhe, davya hatache varchya phulacha akar ekadhya pranyane chasma lavava tasa disto aahe, khalchi green pakali mhanje choch vatate aahe thodi ughadaleli ani varchi lal pakali mhaje bhubhucha kaan
वर्षा, मस्त फोटो दोन्हीही
वर्षा, मस्त फोटो दोन्हीही
स्निग्धा, लई हसले. खरंच तसं
स्निग्धा, लई हसले. खरंच तसं दिसतंय खरं
धन्यवाद दिनेश, जिप्सी
स्निग्धा, आता परत पाहिला तो
स्निग्धा, आता परत पाहिला तो फोटो. अगदी अगदी तसंच दिसतय.
अरे, मी तो फोटो पाहिला आणि
अरे, मी तो फोटो पाहिला आणि एकदम तोच आकार दिसला
वर्षा , दोन्ही फोटो मस्त. हो
वर्षा , दोन्ही फोटो मस्त. हो खरचं दिसतयं तसं
Pages