निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! सुन्दर प्रचि.

अ‍ॅम्बी व्हॅलीच्या पुढे सालतर खिंडीतुन एक रस्ता भांबर्डेला जातो >>>>>>>>

दाट झाडीचा मस्तच रस्ता आहे तो. रस्ता चुकून भरकटायचीही शक्यता खूपच आहे.

५ नंबर, सफेद मुसळी ना ? शक्तीवर्धक कंद असतो तो.
१/२ नंबरवर आणखी झूम केलेस तर पांढरी फुले दिसतील.

अन्जू.. ती कुर्डू ( कोंबडा ) ची फुले.

दाट झाडीचा मस्तच रस्ता आहे तो. >>>>>हो अश्विनी, मस्त रस्ता आहे. अगदी दाट झाडीचा. मी बर्‍याचदा गेलोय (निवे-ताम्हीणी, तेलबैला, घनगड भटकंती दरम्यान). याच रस्त्यावर चोहोळा, कारवी, सोनकीची फुले दिसली. कारवीच्या फुलांचा फोटो काढत असताना अजुन हे एक दिसलं. आधी पळसच वाटला पण पळस नाहीए. झाड जरा दूरवर होते त्यामुळे क्लियर फोटो काढता आला नाही.

नाव शोधतोय, पण जर तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा. Happy

मुरुडशेंगः
वनस्पतीशास्त्रीय नावः Helicteres isora

५ नंबर, सफेद मुसळी ना ? शक्तीवर्धक कंद असतो तो.>>>>हो दिनेशदा, सफेद मुसळीच आहे. Happy

आत्ता पाठवलेला- लाल फुलांचा. जो पळस वाटलेला तो.
वनस्पतीशास्त्रीय नावः Helicteres isora
>>>>>येस्स्स. सह्ही जवाब अश्विनी. Happy सर्च करून पाहिला. तीच फुले आहेत. Happy :आनंदाने इकडुन तिकडे उड्या मारत पळणारा बाहुला:

हे झाड फार लांब होते शिवाय आजुबाजुला कारवीचे गच्च रान माजलं होतं. सो क्लोज अप फोटो घेता आला नाही. जर हाच सीझन असेल फुलं येण्याचा तर ठाण्यात एके ठिकाणी याचे झाड आहे, जाऊन यायला पाहिजे. Happy

पुन्हा एकदा धन्यवाद, अश्विनी Happy

मुरुडशेंगेचीच फुले आहेत. ती आधी लाल मग निळसर होतात.
क्लोजप मधे मान उंचावलेल्या हंसासारखी दिसतात. >>>>>..

मान उंचावलेल्या हंसासारखी... आहा!

मुरुडशेंगेचीच फुले आहेत.>>>धन्यवाद दिनेशदा Happy
म्हणजे या भागात दुर्मिळ, औषधी वनस्पती भरपूर आहेत तर. पुढच्या वर्षी पावसाळा गेल्या गेल्या फक्त याच भागात फिरायला पाहिजे. Happy

नॅशनल पार्कातही बरीच झाडे आहेत याची. मुरुडशेंग बाळाच्या पोटात मुरडा झाला असेल तर उगाळून देतात. घुटीत असते ती.

जिप्सी सुंदर प्र.ची आणि ओळी सुद्धा...
मुरुडशेंग बाळाच्या पोटात मुरडा झाला असेल तर उगाळून देतात. घुटीत असते ती.++ १००

माझ्या ऑफीसच्या आवारात हे सुन्दर केशरी फुलान्च झाड आहे.

IMG_20140917_180506

फुले थोडी जवळुन (मोबाईलमधुन फोटो काढल्याने क्लॅरीटी नाही)
IMG_20140923_180901

कुणी सान्गु शकेल का याच मराठी नाव काय?

काही दिवसांपूर्वी नवर्‍याने ही शेवंतीची कुंडी कळ्या असलेली आणली होती. आता मस्त फुलांनी बहरलेय.

ही माझ्याकडची बिनरासायनिक खत आणि औषधाची भाजी. खाली पुर्ण शेणखत आणि कंपोस्ट खताचे थर वरून माती. एकदा किड लागली होती तेंव्हा आल, लसुण, मिरची, हिंग, हळद ह्यांची पेस्ट करुन भरपूर पाणी घालून ते गाळून पंपच्या सहाय्याने फवारले होते.

छोटासा वाफा करून त्यावर मांडव घातला आणि त्यात दुधी, काकडी, चवळीच्या शेंगा, घोसाळ, शिराळ ह्यांचे बी लावले. बी खड्यात टाकण्याचे काम राधाने केले हो. Happy

दूधी

तवस जातीची काकडी

अजुन शिराळी, घोसाळी पण येतात. त्यांचे फोटो नंतर टाकते. त्यातच एक दिवाळीसाठी लागणार्‍या चिरांटूचाही वेल आलाय. लागलेही चिरांटू.

माझ्या ऑफीसच्या आवारात हे सुन्दर केशरी फुलान्च झाड आहे.>>>>आर्या याचे मराठी नाव माहित नाही पण बॉटॅनिकल नाव Cordia sebestena आहे. हेच आहे का जरा गुगलुन बघ.

जागू, सह्हिच Happy

ऑफीसच्या आवारात हे सुन्दर केशरी फुलान्च झाड>>>>>

मरठी नाव माहिती नाही. स्कारलेट कॉर्डिया म्हणतात त्याला.

जागू, परसबाग छानच.

एक्जॅक्टली हेच जिप्सी!:) झुबक्याने फुले येतात. लाम्बुन केशरी रन्गाची झुबक्याने येणारी फुले खुप सुन्दर दिसतात.

व्वाह जागु! शेवन्तीच रोप फुलान्नी कसले बहरलय ना!
बहुतेक शेवन्ती याच दिवसात फुलत असावी. माझ्याकडच्या पण कुन्डीतल्या शेवन्तीला इतक्या दिवस सुप्त असणार्‍या कळ्या बहरु लागल्यात. Happy

राधाच खुप खुप कौतुक आणि तुझही! Happy छान घडवतेय्स तिला.

मला शेवंतीच्या पानांचा वास खुप आवडतो. अश्या पिवळ्या आणि पांढर्‍या शेवंतीच्या गजर्‍याला आम्ही लहानपणी वरणभाताचा गजरा म्हणत असू. आता शेवंतीमधे खुप रंग आलेत.

दिनेशदा वासावरून पुन्हा आठवल. पावसाळ्यात आई मातीचे वाफे करायची. बटण शेवंती ची वरचे बोखे काढून ते आम्ही त्यात रुजवायचो ते काढताना खुप सुंदर सुगंध यायचा.

धन्स सगळ्यांचे. राधाच्या हातून आता मला बिया लपवून ठेवाव्या लागतात. बिया दिसल्या की मी बी लावायला जाते सांगून बाहेर पडते Lol

Pages