निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लावलेली बारीक मेथी परवा काढण्यायोग्य होईल. Happy

ह्याला मेथीची झोपडी म्हणूया का? रविवारी समुद्रकिनारच्या एका घरी बारश्यानिमित्ताने गेले होते तिथे अशाप्रकारे मेथी लावली होती.

दिनेश दा छान. झाडाच्या समस्येवर घरगुती सेंद्रिय खत ,खरच खुप उपयोगी माहिती...

बरेच दिवसापासुन एक प्रश्न विचारायचा होता... माझ्या एका जास्वंदाच्या कुंडीत खुप गांडुळ झाले आहेत, तसे झाडं म्हटल की हे सगळ आलच म्हणा.. पण हा प्रकार काही तरी वेगळा असावा असे वाटते, त्या झाडाला पाणी घातले की ते कुंडीतच राहात, डबकं साचाव तस, निथळत नाही... आणि दुसर अस की पहाटे जेव्हा मी झाडांना पाणी घालायला जाते तेव्हा त्या कुंडीतली माती वर आली असते, छोटया छोटया गुठळ्यांच्या स्वरुपात...आता असं अजुन एकाडीत व्हायला लागल आहे... काय असेल हा प्रकार? माती बदलायला हवी का?

दिनेश दा समुद्र खुपच मोहक.... जागु मेथीचा वाफा मस्तच..:) तुझ्याकडचे मेथीचे फोटो पण टाक..

जो, त्या रानटी वेलाची काय मस्त चांदणी तयार झाली आहे..:)

जो , वेलाला चांदणीचा आकार आलाय. छान दिसतोय.
जागू, मेथीच्या वाफ्यावर झावळी सावली हवी म्हणून घातलीय ग ?

जो, त्या रानटी वेलाची काय मस्त चांदणी तयार झाली आहे..>>>>
हो मला वाटत त्या वेलालाही दिवाळीची चाहूल लागल्ये

हो मला वाटत त्या वेलालाही दिवाळीची चाहूल लागल्ये+++ अगदी अगदी.
अरे हो मगाशी लिहायच राहुन गेलं, अवनी कीती छान मनातल, मनापासुन लिहिलयस!

जागु, ब्रम्हकमळासाठी सगळ्या नर्सर्‍या पालथ्या घातल्या ग, कुठेच मिळत नाही... शेवटी माझ्या गुरुघरी एका जणाने
भेट म्हणुन ब्रम्हकमळाचेच झाड दिले आहे :), त्या काकु म्हणाल्या, घेऊन जा यातलच थोडं.... मागे तु लिहिल होतस याची पानं पण लागतात म्हणुन , कशी लावायची, कीती प्रमाणात तोडुन लावायची, जरा डीटेल्स दे ना प्लीज...

सायली, गांडूळे फक्त मृत सेंद्रीय भागच खाऊन त्याचे विघटन करतात. जिवंत झाडाला त्याचा काही अपाय नाही.
त्यांना खाद्य म्हणून घरातील भाजीपाल्याचा टाकाऊ भाग टाकत चला. ती वर आलेली माती खरे तर फार सकस असते. ती बाकीच्या झाडांभोवती टाकत चला.

पाणी न निथळण्यावर मात्र उपाय करायला हवा. सगळी माती झाडासकट बाहेर काढून कुंडीत खाली खापराचे तूकडे, ( म्हणजे छिद्रे बुजणार नाहीत ) टाकून त्यावर पालापाचोळा टाकून मग झाड लावा. माती अधून मधून थोडी उकरत रहा म्हणजे हवा खेळती राहते मातीत.

जो, कमालीचा टिपलायत!, हायला, मला कधीच पक्षांचे फोटो काढता येत नाही, पक्षी दिसला की, फोन चार्जिंगला असतो, तो आणे स्तोवर, तो उडुन जातो, नाही तर फोटो हालतो तरी...

माझ्या नववीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकावर या फुलांचा फोटो होता.. तेव्हापासूनच याची माहिती आणि प्रसारही सुरु झाला... हि १९७५ सालची गोष्ट बरं Happy

जरा दुर्लक्ष झाले की बागेतली झाडे माजतात.समुद्र छान. इथे शंका निरसन आपण करतो परंतू नंतर से सर्व एका ठिकाणी अकारविल्हे नवीन साठवले तर शोधायला सोपे जाईल अशी युक्ति आहे का?

ओमान, यु.ए.ई. , सौदी यांच्या मधला जो भाग आहे तो अगदी वैराण असे वाळवंट आहे. ओमानमधे आणि त्याला लागून असलेल्या यु.ए.ई च्या भागात सगळीकडे असे वैराण खडकाळ भाग आहेत.

rux bhaag.jpg

पण त्या परीसरातही मानवी वस्ती शक्य झाली कारण हाच निसर्ग या भागात असे नितळ पाण्याचे प्रवाह देतो.
हेच फलाज. हे शतकानुशतके वाहते आहेत. आता त्यांना असे बांधून काढलेले आहे. पण हे पाणी अगदी ओंजळीने प्यावे इतके छान असते. चवीला तर असतेच असते पण थंडगारही असते.

Al Falaz_0.jpg

आणि कधी कधी तर असा जलाशयही असतो. हा आहे अल ऐन भागातला. हेच पाणी बाटलीत मिनरल वॉटर म्हणून भरतात.. हा निळा रंगही नैसर्गिकच..

Dam in Abu Al Ain.jpg

( हे सर्व फोटो मोबाईल कॅमेराने काढले आहेत म्हणून त्या मालिकेत दिले नव्हते. )

मस्त फोटो आणि माहिती Happy

मागे शशांकने सुचविल्याप्रमाणे "चोहोळा" आणि "मुरूडशेंग" यांची नावे त्या त्या फोटोसोबत अपडेट केली आहे.

Pages