निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
<<आर्या या स्कारलेट कॉर्डीया
<<आर्या या स्कारलेट कॉर्डीया ला पांढरी फळे पण लागतात. साधारण देवळाच्या कळसासारखा आकार असतो त्या फळांचा.<< ओक्के दिनेशदा....आता लक्ष ठेवेन या झाडावर.
तुम्ही सान्गितल्यावर गुगल केल तर ही माहीती मिळाली.
The Hindi speaking people call it as `Bhokar` and `Bohari` and in Telugu, it is known as `Virigi`. It is also called as the `Aloe Wood Tree` or `Ginger Tree`.
जिस्पी, पिकून पांढरी होतात
जिस्पी, पिकून पांढरी होतात ती... मस्तच दिसतात.
जागू.. आता मला एकदम पाचू / मरवा चा सुगंध जाणवला.
<<धन्स सगळ्यांचे. राधाच्या
<<धन्स सगळ्यांचे. राधाच्या हातून आता मला बिया लपवून ठेवाव्या लागतात. बिया दिसल्या की मी बी लावायला जाते सांगून बाहेर पडते<< धन्य आहात मायलेकी!चान्गलच बाळकडु देतेस तिला.
दिनेशदा, आर्या
दिनेशदा, आर्या
व्वा! मस्त गप्पा चालल्या
व्वा! मस्त गप्पा चालल्या आहेत..आर्या हे केशरी फुलं मी पुण्याला खुप पाहिली, नाव आजच कळले..
मला अस आठवत आहे की कोणी तरी बहुदा हेमा ताईंनीच मागे याचा फोटो पण टाकला होता...
जागु काय सही बाग आहे तुझी, त्या काकडीचे थापलेले (न लाटता) थालीपीठ मस्तच लागते...
तुझी राधा खुप गोड आहे ग!
इकडे वसंत पुन्हा अवतरला की
इकडे वसंत पुन्हा अवतरला की काय ?कुणाला कविता सुचताहेत. भाजी संपली तर आता कुठे जायचे ते माहित झाले .ती मोठ्या फुलांची झाडे पुण्यात फार आहेत आणि त्यावर एक काळा सूर्यपक्षी येतो पण ते इथे मुंबईच्या उकाड्यात फिरकत नाहीत .
पुन्हा कास पठार
११ ऑक्टोबर२००८ सालचे प्रिंटसचे पुन्हा फोटो घेतले आहेत.
१)टोपली कारवीच्या(दोन फुट उंचीचे ताटवे पठारावर विखुरलेले असतात) मागे सोनकी.
२)टोपली कारवीची झुडपे दसऱ्याच्या सुमारास उरतात. इतर लहान कासपठारछाप फुले बहुतेक संपलेली असतात.
३)ही एक जांभळाच्या पानांसारखी असणारी झाडे कास तलावाच्या(मागे दिसतोय) उताराकडे पसरलेली होती उंची ३ ते ८ फुट.
४)पुन्हा
हाय लोक्स!! नि ग मी खूप
हाय लोक्स!! नि ग मी खूप मिस करत होते.... बराच बॅकलॉग वाचायचा आहे.... जमेल तसा तो पूर्ण करेन.
शांकली, बरेच दिवसांनी आलीस.
शांकली, बरेच दिवसांनी आलीस. नि.ग. वर तुझे स्वागत आहे.
नमस्कार शांकली, वेलकम
नमस्कार शांकली, वेलकम बॅक!!
कशा आहात?
इकडे वसंत पुन्हा अवतरला की काय ?>>>>>Srd, या धाग्यावर (सर्वच भागात) बारा महिने चोवीस काळ वसंत फुललेला असतो.
शांकलीना, नि.ग. चा रिपोर्ट
शांकलीना, नि.ग. चा रिपोर्ट मिळत होता शशांककडून !
सुदुपार.... काल कोजागीरी
सुदुपार....
काल कोजागीरी (नवर्याने टिपलेला..)
Srd, मस्त फोटोज.. शांकली,
Srd, मस्त फोटोज..
शांकली, वेलकम बॉक!
Srd, सायली फोटो मस्त. सायली
Srd, सायली फोटो मस्त.
सायली चंद्राचा क्युट आहे. मला दिसलाच नाही काल.
धन्यवाद अन्जु ताई.. इकडे
धन्यवाद अन्जु ताई.. इकडे चांंगलाच ठळक होता चंद्र, काल दुध पण आटवले होते, बराच वेळ खिडकीत ठेवले होते, चंद्राची सावली पडावी म्हणुन...:)
चंद्राने ठकवलं काल
चंद्राने ठकवलं काल डोंबिवलीकरांना मग वाट पाहून दूध पिऊन टाकलं.
चंद्राने ठकवलं काल
चंद्राने ठकवलं काल डोंबिवलीकरांना मग वाट पाहून दूध पिऊन टाकलं.
>>>>>इथे आमच्या नगरातही......जबरदस्त पाऊस झाला काल आआणि परवा रात्री.
अजून पडतोय पाऊस ? माझ्या
अजून पडतोय पाऊस ? माझ्या आठवणीत फार कमी वेळा असा पाऊस लांबलाय.
दिवाळी तयारी म्हणून सिटाउट
दिवाळी तयारी म्हणून सिटाउट मधे उन्हाला ठेवलेले पोहे वेळीच आत आण्ले.....नाहीतर ( अवचित सवाष्ण असते तसा) पातळ पोह्यांची अवचित खीर हा पदार्थ झाला असता.
Srd , मनुषी ताई
Srd , मनुषी ताई
खिडकीतून येणारी उन्हं भराभर
खिडकीतून येणारी उन्हं भराभर तिरकी पडायला लागली .........
सूर्य झपाझप दक्षिणेकडे सरकायला लागलाय....
दिवाळीतली खास हवा पडायला लागली पहाटे ......
उटण्याचा,मोती साबणाचा, अत्तराचा, शेवंतीचा, फटाक्यांचा आणि फराळाचा असा संमिश्र वास आत्तापासूनच
यायला लागलाय मला !
हो गं अवनी....अगदी अगदी!
हो गं अवनी....अगदी अगदी!
अवनी, किती मस्त लिहीलयसं ग.
अवनी, किती मस्त लिहीलयसं ग. खूप आवडलं
वा अवनी मस्त.
वा अवनी मस्त.
जिप्सी,जागू,अवनी, खूप छान.
जिप्सी,जागू,अवनी,
खूप छान.
मानु.. अवचित खीर अवनी..
मानु.. अवचित खीर
अवनी.. खूप छान मनोगत
शांकली.. वेलकम बॅक..
अरे वा शांकली वेलकम
अरे वा शांकली वेलकम बॅक.
सायली
शांकलीताई वेलकम.
शांकलीताई वेलकम.
अवनी... सुगंध इथपर्यंत
अवनी... सुगंध इथपर्यंत पोहोचला.
आपली मेथीची भाजी कित्ती गुणी आहे बघा...
http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-organic-farminginstead-ch...
आम्हाला आलेल्या अनुभवानुसार नत्राची (नायट्रोजनची) मात्रा योग्य असेल तर पाने रसदार, हिरवी दिसतात. नत्र जास्त झाल्यास पाने जळल्यासारखी दिसतात. परंतु नत्राची मात्रा कमी पडल्यास वनस्पती खालपासून वपर्यंत पिवळी पडते. देठे, पाने मोठय़ा प्रमाणात पिवळी होतात. यासाठी उपाय म्हणून मेथी भाजीची पाने, देठे यांचा वापर करावा. मेथी भाजीची एक जुडी आणून बारीक चिरून ती वरच्या पृष्ठभागावर पसरून घालावी. एकदा असे करून नत्राची कमतरता कमी न झाल्यास पुन्हा एकदा मेथीची जुडी आणून कापून घालावी. असाच परिणाम गिरीपुष्प (ग्लिरीसिडिया) या मोठय़ा झाडाच्या पानांनीसुद्धा साध्य होतो. शेताच्या बांधावर त्याची लागवड केली तर असा फायदा घेता येतो. पाणी खूप जास्त झाल्यासही पाने पिवळी पडतात. त्या वेळी पाण्याचा निचरा होऊ देणे महत्त्वाचे असते. पिवळी पडलेली पाने, देठे पुन्हा त्याच वनस्पतीच्या भोवती तुकडे करून पसरून घालावी. नत्र नसले तरी उर्वरित घटक मातीद्वारा झाडाला उपयोगी पडू शकतात.
अशाच प्रकारे स्फुरदाची (फॉस्फरस) मात्रा जास्त झाल्यास पाने काळपट पडतात. या घटकाची गरज नवी वाढ होताना असते. स्फुरदाच्या अभावी पानांचा आकार बारीक होतो, देठे वेडीवाकडी होतात. पाने आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वाकतात. त्यांची गुंडाळी होऊ शकते. असे झाल्यास फ्लॉवर, कोबी, नवलकोल यांची पाने, देठे बारीक करून मातीच्या वरच्या पृष्ठभागावर पसरून घालावी. एकदा वापर करूनही योग्य परिणाम न आढळल्यास पुन्हा असेच करावे. सेंद्रिय उपाय असल्यामुळे कोणताही अपाय होत नाही. कळ्या न येणे, कळ्या येऊन गळून पडणे वगरे अडचणींवर मात करायलापण हाच मार्ग अवलंबल्याने हमखास फायदा होतो. जर अशा प्रकारच्या साध्या, सोप्या आणि स्वस्त उपायांनी नत्र आणि स्फुरद यांच्या कमतरतेवर मात करता येते, तर महाग उपायांकडे वळायचे कशाला?
त्याचबरोबर हे उपाय सेंद्रिय स्वरूपाचे असल्यामुळे रासायनिक उपायांनंतर होणारे दुष्परिणाम टाळता येतात, हापण महत्त्वाचा फायदा आहे, हे आपण कटाक्षाने लक्षात घ्यायला हवे, हीच आजची गरज आहे.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
Published: Thursday, October 9, 2014
दिनेशदा छान माहिती, असे
दिनेशदा छान माहिती, असे प्रॉब्लेम्स येत असतात, खास करून कुंडीतल्या मातीतले पोषक पदार्थ संपत जातात त्यामुळे हे उपाय करून पाहू,
अबु धाबीतल्या समुद्राचा रंग
अबु धाबीतल्या समुद्राचा रंग इतका सुंदर दिसतो, कि इथे पण पोस्ट केल्याशिवाय राहवले नाही...
Pages