निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Srd मस्त कीस्सा.. वर्षा छान फोटो, दुध मोगर्‍याच्या झाडावर बसले आहे ना फुलपाखरु?
स्निग्धा मस्त निरीक्षण! Happy

रात्री बहरलेली मधुमालती विलक्षण सुरेख दिसते.... :)MM_0.jpg

निसर्गप्रेमीनो नमस्कार.

फुलपाखरू मस्त आणि वेगळ्या नजरेतून पाहिल्यावर अजूनही मस्तच.

सायली जास्वंदीची फुलं बघून मला नालासोपारा आठवलं. आमच्या एका शेजाऱ्यांनी अशीच खूप प्रकारची जास्वंदीची झाडे लावली होती आणि खूप छान बहरायची. मला पण त्या बऱ्याचदा फुले द्यायच्या वेगवेगळ्या प्रकारची.

रांगोळीची हौस भागवून घेतो झालं... सईने मेजवानीची आठवण काढली होती. आगामी मेजवानीतली ही एक एंट्री !

केवळ हौस रे. करणारही मीच, बघणारही मीच आणि खाणारही मीच.. पण असे प्रयोग करत राहिले कि रोजचेच जेवण स्पेशल होऊन जाते. ( चूक झाली.. बघणार तूम्ही सगळे Wink )

असं बघण्यापेक्षा डिशमधून उचलून तोंडात घालता आलं असतं तर, किती बहार आली असती, दिनेशदा थकले असते करून करून, सगळेच उचलत बसले असते.

दिनेश दा , सॅलड काय भारी दिसतय ! ते लाल काय आहे आणि कस कापलं ते सांगा ना . मला भारी रस आहे यात म्हणून विचारतेय.

वा! सर्व फोटो सुरेख! आत्ताच १८० पोस्ट वाचल्या, त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे प्रतिसाद देण्याऐवजी एकच प्रतिसाद ! (एकतर बरेच दिवसानी यायचे आणि शॉर्टकट पण मारायचा ):डोमा:

वर्षा फोटो अप्रतिम.

दिनेशदा सलाद ची डिझाईन एकदम मस्त.

बेडूक मामा डराव डराव.
सध्या सापाचे भक्ष आहेत हे.

आता सगळेच विचारताय म्हणून सलाडची कृती इथेच देतोय.
एक सरळ काकडी घ्यायची. तिच्या देठाकडची आणि शेंड्याकडची चकती कापायची. मग ती उभी कापून तिचे दोन तुकडे करायचे. गोल चमच्याने बिया काढून टाकायच्या. मग काकडीचे अर्ध्या पाईपसारखे दोन तूकडे होतात. पोटॅटो पीलरने मग त्याचे लांब तास काढायचे. ते असे आकारात रचत जायचे.
लाल सिमला मिर्ची आहे ती. व्ही स्लाईसरने कापलीय. मधे हिरवी सिमला मिरची आहे. वर फेटा चीज आहे. हे बकरीच्या दूधाचे बनवतात.

०००००००

सरिवा.. कोकिळ मस्तच. काकउंबरावर आहे का ?

जागू, बेडूक परवडले, नागोबाला उंदीर खायला सांग ( तूझे नक्की ऐकेल ) उंदराला शत्रू अनेक पण त्याच्या बिळात शिरून शिकार करू शकेल असा एकमेव शत्रू म्हणजे साप.

दा, सलाद डेकोरेशन अप्रतिम!! जिप्सीला अनुमोदन!

जिप्स्या... नेचे म्हणजे वनस्पतींमधले पाचू!! फारच अप्रतिम फोटो आलाय!..

खरंच अगदी चुळबुळ्या आहे हा कोकीळ! तसे सगळेच पक्षी असेच चुलबुले/चुळबुळे/चळवळे.... वगैरे असतात!!

२-३ दिवसांपूर्वी आमच्या मागच्या अंगणात जे तगरीचं रोप आहे त्यावर ३ जोड्या चष्मेवाल्यांच्या, २ जोड्या ग्रे टीट च्या, ३ जोड्या शिंजीराच्या आणि १ जोडी बुलबुल अशी खूप मोठी फौजच्या फौज आली होती. आणि कारण होतं....
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळा संपला की; तगरीवर कीड पडते. आणि त्या आळ्या तगरीची पानं गुंडाळी करून स्वतःभोवती लपेटून घेतात. तर ही सर्व फौज ह्या आळ्या खायला.....सॉरी, मेजवानीसाठी!!.... तगरीवर आली होती.मग माना वाकड्या करकरून पानं तोडणे, मग चोचीत नीट धरून ती मागच्या वहिनींच्या पसरलेल्या गच्ची सारख्या छतावर आपटणे आणि आळी बाहेर काढणे, हे नाही जमले तर मग चोचीने त्या गुंडाळीतून आळी उपसून काढणे.... हे सर्व करत असताना मधे मधे सवधपणे इकडे तिकडे बघून कुणी येत नाहीये ना याची खतरजमा करणे आणि आळी गट्टम केल्यावर आनंदाने चिवचिवाट करणे हा सगळा आनंद-सोहळा पार पडला!!

त्यात मधेच एकदा एका चष्मेवाल्याच्या चोचीतून एक पान - म्हणजे गुंडाळी खाली पडली. तर त्याने अगदी एकेक फांदी खाली खाली उतरत शेवटी जमिनीवर उतरून मग ती गुंडाळी घेऊन परत वर आला! किती सावध असतात हे पक्षी! पण बुलबुलाची जोडी (ते सुद्धा लाल गाल्या - म्हणजे जरा जास्त आक्रमक असतात ते) आल्यावर मात्र इतरांची खूप पळापळ झाली! कारण या जोडीने त्यांना जवळ जवळ हुसकूनच लावले! पण बुलबुल येई पर्यंत इतरांची बर्‍यापैकी मेजवानी उरकत आली होती हे नशीब!!

पण हा १५-२० मिनिटांचा काळ मी अगदी देहभान विसरून बघत होते... आणि हा आनंद आपण दुसर्‍या कुणाला देतोय ह्याची त्या पाखरांना कल्पनाही नव्हती...नेहमी प्रमाणेच!! कारण ते त्यांच्याच आनंदात मग्न होते....

वा शांकली, मस्त वर्णन.. बहाव्याची पाने किडे लोकांची जास्त लाडकी, त्यामूळे पक्ष्यांची पण. तूमच्याकडे एक रोप होते ना ?
कौशीची झाडे पुण्यात दिसत नाहीत. त्या झाडावर तर एक पान धड ठेवत नाहीत किडे.

Pages