निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना दिनेश............रात्री अंधारात( आज अमावस्या...................) पटकन खरंच आकाशात चांदण्या... न चमकणार्‍या... असाव्यातसं वाटतं. कारण अंधारत पटकन वेल न दिसता पांढरे ठिपकेच दिसतात.

माझ्या लेकीचा फोटो तुझ्याकडून काढून घ्यावा, तुझ्या कॅमेरातून ती आणखीन छान आणि वेगळी दिसेल असं पटकन मनात आलं.>>>>>कधीही सांगा. मी आणि माझा कॅमेरा तयार आहे. Happy

हि काळी निर्गुडी.

काळ्या निर्गुडीचा उपयोग एकाने सांगितला होता पण मी विसरलो. Sad

साध्या निर्गुडीचा उपयोग मुका मार लागल्यावर होणारी सूज उतरवण्यासाठी करतात आणि निखार्‍यावर याची पाने टाकल्याने (धुरामुळे) डासांचा त्रास कमी होतो. Happy

माझ्याकडे आपली हिरवी निर्गुडी आहे. पाय लचकला, मुरगळला किन्वा सूज आल्यावर हीच्या पानान्चा लेप करुन थोडासा कोमट करुन लावतात.
माझी आई तर गुडघेदुखीवर पण हा लेप लावते. आराम पडतो.

माझ्याकडे आपली हिरवी निर्गुडी आहे. पाय लचकला, मुरगळला किन्वा सूज आल्यावर हीच्या पानान्चा लेप करुन थोडासा कोमट करुन लावतात.>>>>>हा आर्या. तीच हिरवी निर्गुडी. हिची पाने निखार्‍यावर टाकायची डासांचा त्रास कमी होतो.

माझी आई तर गुडघेदुखीवर पण हा लेप लावते. आराम पडतो.>>>>अगदी अगदी. माझ्या काकांचा एकदा पाय मुरगळलेला तेंव्हा याच्या पानांचा कोमट लेप लावलेला. बराच आराम पडला होता.

निर्गुडी म्हणजेच निगडी का? तसं असेल तर त्याची पाने अंघोळीसाठी पाणी उकळवतो त्यातपण घालतात.

वरचे सर्व फोटो मस्त, मस्त.

मानु, झाडावरच राहू देत फुलं.. जास्त दिवस सुगंध पसरवत राहतील (बहुतेक!! )

निर्गुडी.. वॉव.. आता परत परत नाही सांगणार पहिल्यांदाच ऐकलं/ पाहिलं ते Proud

निर्गुडी वाताच्या विकारावर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदीक डॉ. ही निर्गुडीचा लेप वाताच्या विकारासाठी बनवतात. मुरगळल्यावरही ह्या पाल्याचा शेक देतात. बाळाच्या पाचवीला बाळाला निर्गुडीच्या पाल्यावर झोपवतात. त्यामागे काहीतरी औषधीच हेतू असावा. पाण्यात उकळवूनही ह्या पाण्याने अंघोळ करतात. पण जरा वेगळाच वास असतो ह्या पाल्याला. आमच्याइथे तर जुन्या बायका वाटेत हे झाड दिसले की त्याचा पाला डोक्यात माळतात. म्हणे निर्गुडीला राग येतो जर नाही डोक्यात माळले तर. ह्यामागेही काहीतरी औषधीच हेतू असावेत पूर्वीचे.

झाडावरच राहू देत फुलं.. जास्त दिवस सुगंध पसरवत राहतील (बहुतेक!! )>>>>>>>>
हो गं वर्षू........निदान देवाला एखादा हार करावा उद्यासाठी असं वाटत होतं पण स्टूल पायाखाली घेतल्याशिवाय नाहीच जमणार.

DSC_0657.JPG

डोंबीवलीला मध्यंतरी एक रोझ गार्डन बनवले गेलेय. हा तिथला पिवळा गुलाब आजच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी. आज पिवळा रंग ना Happy

दिनेशदा, आजच्या नैवेद्याला तुमच्या रेसिपीने केळ्याचे लाडु केले. रवा जास्त पडला मग जरा दुध घातले वर. हा फोटो.DSC_0705.JPG

सुप्रभात....
मी ऑफीस मधे पक्षांसाठी खीडकी च्या पाळी वर बाजरी आणि पाणी ठेवते... वार्‍यानी उडुन त्याचे खाली (पार्कीग मधे) चक्क झाड तयार झाले आहे आणि त्याला अश्या प्रकारचे कणसं लागली आहेत...:)
Photo1383.jpg

मोनालिप, छान झालेत लाडू.
सायली, बाजरीचं पिक मस्त घेतले आहेस. एका दगडात दोन पक्षी.

अरे व्वा, निर्गुडीचे बरेच उपयोग कळलेतः)
मोनालि अरे व्व!! केले सुद्धा ला़डु, काय सुरेख झालेत...
हेमा ताई Happy हे कणीस पुन्हा खिडकीतच ठेवते आहे.. पक्षांसाठी.... खाली पार्कींग मधे गाड्यांची आणि माणसांची वर्दळ असते त्यामुळे पाखर बिचकतात...

सायली कसले मस्त कणीस आलेय. वॉव.
मोनालि अरे व्व!! केले सुद्धा ला़डु, काय सुरेख झालेत...>>> धन्स. येस, आता ९ दिवस रोज काहितरी वेगवेगळे गोड. या सगळे Happy

अरे वा. मस्त पिवळा गुलाब ! मोनालि छान जमलेत लाडू.
बाजरीचे कणीस.. खुप दिवस झाले बाजरीचे कणीस बघून आणि बाजरी खाऊनही !

मोनालिप, छान झालेत लाडू.
सायली, बाजरीचं पिक मस्त घेतले आहेस. एका दगडात दोन पक्षी.>>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी!

तो निर्गुडीच्या पानाचा लेप कसा लावायचा कुणी सांगु शकेल का? किंवा निर्गुडीचे तेल कुठे मिळेल ते. (हल्ली निर्गुडीची झाड इथे शहरात दिसतंच नाहीत. पूर्वी आमच्या सोसायटीला निर्गुडी आणि मेंदीच्या झाडांचे कुंपण होते आणि आता औषधालाही हि दोन्ही झाडे सापडत नाहीत. Sad )

बाजरीचा लंगर! निर्गुडी मिळत नाही ?एक ट्रेक मारा विरारच्या जिवदानीला. नवरात्रीची गर्दी असेल पण निर्गुडी घरांभोवती भरपूर मिळेल. बाजारात फेरफटका हवाच. लाल पेरू, फाफडा -जलेबी, समोसा-पाव,एक तलाव, बोटिंग, धम्माल. जमल्यास केळवा माहिम बीचवर संध्याकाळी जाता येईल. गाड्या वाढल्या आहेत. रात्री पाय दुखल्यावर आणलेल्या निर्गुडीचा गुण येतो का पाहता येईल.

हो Srd, इथे जवळपास नाही पण शहराबाहेर गेल्यावर भरपूर प्रमाणात निर्गुडी बघावयास मिळते. ट्रेकिंगच्या वेळेस तर हमखास. Happy

Pages