निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढे गेलो तर वाटेवर नुकत्या उमललेल्या बकुळीचा सडा पडलेला आणि वार्‍याच्या झुळुकेसरशी बकुळीची फुलं टपटप आमच्या अंगावर पडत होती! आम्हाला तर वेड लागायचंच बाकी राहिलं होतं>>>>>> अगदी! सावंतवाडीच्या ट्रीपमधे हा अनुभव घेतला.तलावाशेजारच्या शाळेच्या (बहुतेक राणी पार्वतीबाई हायस्कूल) आवारात सकाळी आम्ही गेलो होतो.फुले वेचता वेचता हात भरून आले.पण मधेच गिरकी घेऊन काही फुले पडायची आणि हावरटासारखी अजून फुले पडतील म्हणून थांबत असू.

कोकणात बकुळीची फुले गोळा करायची एक वेगळी पद्धत बघितली होती. एक हिराची काडी उभी खोचून ठेवायची.
आणि पडलेली फुले अलगद त्यात ओवायची.. म्हणजे फारशी हाताळली जात नाहीत. मग हिराच्या काडीच्या कडेला
दोरा बांधून, काडी उलटी केली कि फुले दोर्‍यात. अलगद गजरा तयार.

वा दिनेश दा, बकुळीचा हार करायची आयडिया मस्त आणि तुमच्या नॉलेजला सलाम. ग्रेट आहत तुम्ही. नेहमीच वाटत असतं असं पण लिहीते कधी मधीच.

वा, सायली.
आता भरपूर फुले लागतील याला. मग फळेही लागतील. त्यातल्या बिया ओळखीच्या लोकांना वाटून टाका. सहज रुजतात.

गणेश वेल- Cypress Vine, Star Glory, Hummingbird Vine • Hindi: कामलता Kamlata •
Botanical name: Ipomoea quamoclit Family: Convolvulaceae (morning glory family)

दा, अगदी माझ्या मनातले बोललात... मी ठरवलेच होत बिया वाटायच्या म्हणुन... कारण काही काही झाडं ही नर्सरीत
मिळतच नाही, जसे गुलबाक्षी, शेंदरी, दुपार शेंदरी, गोकर्ण, गणेश वेल.... ती अशी ओळखीच्या लोकांकडुनच घरी येतात Happy

शशांकजी केवढी नावे आहेत गणेश वेलाची... स्टार ग्लोरी वगैरे अगदी साजेशी ह!...

देवकी धन्यवाद..

अदिजो, बकुळीची फुलं टपटप पडत होती--नवीन भुंगा मागे लागला ट्रेकचा.
सध्या बाल्कनीतल्या भाताच्या लोंब्यांवर चिमण्या आणि मुनिआ येताहेत.

srd, बकुळीची फुलं टपटप पडत होती--नवीन भुंगा मागे लागला ट्रेकचा >>>
व्वा! पण पाऊस संपल्यावर जा हं Happy

सध्या बाल्कनीतल्या भाताच्या लोंब्यांवर चिमण्या आणि मुनिआ येताहेत.>>
मस्तच.
मी कुंड्या भरताना त्यात थोडी माती, शेणखत, कडुलिंबाची पेंड आणि भरपूर भाताचे तूस वापरते. भाताच्या तुसात राहिलेले थोडे थोडे भात नेहमी उगवून येतात. आताही आलेले आहेत. आता तुम्ही केलेला बाल्कनीतल्या भातशेतीचा प्रयोग करून बघेन.

गणेशवेल, गुलाब्, कागदी गुलाब फारच छान!

वर्षू Happy

आमच्या शाळेत आम्ही मातीविना शेती असा प्रयोग करत असू. त्यात भाताचे तूस, बांधकामाच्या रेतीतला वाया गेलेला भाग ( खडे ) आणि शेणखत वापरत असू. या मिश्रणात छान वाढतात झाडे.

मी दहा वर्षआंपुर्वी गणेशवेल विकत आणलेला. तो तेव्हापासुन अमर झालाय. कितीही काढुन टाकला तरी येतोच. आमच्या शेजा-यांच्या कुंडीतही तो जाऊन बसलाय माझ्याकडुन. सध्या खालच्या गेटवर पसरलाय. एकदा खालच्या शेजा-यांच्या खिडकीवरच्या पत्र्यावर पसरलेला. खुप छान दिसत होता तेव्हा.

आणखी एका वेलाला पण गणेशवेल म्हणतात बहुतेक. बदामाकृती पाने आणि भडक केशरी किंवा पिवळी फुले येतात. तीपण भरपूर येतात. फुले गोलाकार पण पाकळ्या सुट्या नसतात. ही वेल निसर्गतः वाढते.
या कातरलेली पाने आणि स्टार सारख्या दिसणार्‍या फुलांना आई चित्तरंजन म्हणते.

साधना खरच खिडकीच्या पत्र्यावर पसरलेला वेल छानच दिसत असेल... याच्या पानांची रचना पण कीती गोड असते ना?

दा, चित्तरंजन व्वा!

साधना, कडुनिंबाची पेंड 'इनोरा' मधे मिळते. एखाद्या नर्सरीतही मिळू शकेल.
इनोराचा पत्त आणि संपर्कः
INORA – Institute Of Natural Organic Agriculture
१, अलिशा होम्स, आमची कोलनी,
बावधन, पुणे - २१
०२०-२२९५१७५३/५८
इनोराची वेबसाईटही आहे.

हुश्श. आज किती दिवसांनी येऊन मागची पान चाळली. फार बरे वाटले. अगदी टुरवर ८-१० दिवस जाऊन घरी आल्यावर वाटते तसे वाटले.

चातकाची हजेरी लावण्यात आली आहे.

शोभा माझे हात गुलछडीची वेणी करण्याकरीता शिवशिवत आहेत पण एवढी फुले नाहीत माझ्याकडे.

दिनेशदा आमच्याइथे मुंबईसारखाच पाऊस आहे. सध्या कमी झाला आहे.

जिप्स्याचे कशाबद्दल अभिनंदन चालू आहे?

सायली तू दिलेल्या तेरड्याच्या बियांची एका कुंडीत मोठी रोपे होऊन आता कळ्या लागल्या आहेत. फुले आली की फोटो टाकेनच.

काश्मिरच्या नंदनवनात जो हाहाकार चालू आहे त्याबद्दल दु:ख वाटत आहे. तिथला निसर्ग लवकर पूर्ववत होवो.

हाय जागू.

काश्मीरमधील परिस्थिती बघून खूप वाईट वाटतंय. डोंबिवली, बोरिवली, अंधेरी येथील काही कुटुंबे अडकली आहेत. टीव्हीवर दाखवत होते. देवा सर्वच अडकलेल्या लोकांना सुखरूप ठेव.

चित्तरंजन नाव मस्त आहे दिनेशदा, तुमच्या आईने दिलेले.

हो जागू,
पेपरमधले काश्मिरचे फोटो बघून वाईट वाटते. त्यातही राजकारण आडवे आहेच.
पाऊस, आता नवरात्रीपर्यंत थांबेल असे वाटतेय. हस्त नक्षत्र लागणार असेल ना आता ?

Pages