निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलं'लेले मार्केटयार्ड
https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/v/t1.0-9/10494714_695827767170179_6932355923309485307_n.jpg?oh=c986093a69ec957f4094df8850c5cc46&oe=545D4D9F&__gda__=1415821607_c8158c411abc02e7fc2fac3f17d606a9

निसर्गप्रेमींन्नो,सध्या गणेशोत्सवामुळे (अजुनही २ दिवस आहेत.) पुणे माकेटयार्ड फुलबाजारात (अती पावसाचा तडाखा बसूनंही) फुलांची आणि सजावटीच्या वनस्पतींची रेलचेल सुरु आहे. (सकाळी १० ते १२ या वेळेत)सहज फेरफटका मारून जा.
दिल खुश हो जाएगा. Happy

ही फुले ग्रीन हाऊसमधली असतात, त्यांना तसाही पावसाचा तडाखा वै बसत नसावा. Happy
खुप छान वाटतं या धाग्यावर येऊन, पावसाळा सुरु झाल्यापासून तर खुपच छान छान माहीती मिळतेय. गणपती-गौरी आल्यापासून तर मस्त वाटतंय...

आहा अश्विनी हा कवठीचाफा काय? किती सुंदर फोटो आहे.

आशु, तुला फक्त राजा राणीच सापडतात रे... तुझी वाटच पाहात असतात बहुतेक. याच्या तर तोंडाला सुटलेले पाणीही दिसतेय फोटोत. अग्दी तोंपासु आणि लाळगाळू फोटो Happy

आज शिक्षक दिनाच्या निमित्याने ह्या धाग्याला वंदन करते. इथे खुप काही शिकायला मिळतं. इथे खुपजण माहीतगार आहेत आणि सतत उत्तम माहीती मिळते. त्यामुळे इथल्या सर्वांनाच वंदन.

वरचे सर्व फोटो सुंदर. साधना तू अगदी बरोबर बोलतेस, समाजात ह्या गोष्टी मला पण खटकतात. हळदी-कुंकू वगैरे मी फारसे करत नाही पण केले तर मी सर्वांनाच बोलावते आणि त्यांना पण लावते. काहीजणींना बरं वाटतं पण काहीजणांना स्वत:लाच खटकतं ह.कु. लावलेलं.

ह्म्म.. निदान ह.कु. ला आपण लोकांना आपल्या घरी बोलवतो आणि मग कोणाला लावायचे कोणाला नाही याचे स्वातंत्र्य घेउ शकतो. शिवाय एखादीला ह कु नको असेल तर ती दुस-या खोलीत जाऊन ते टाळू शकते.

पण या सणात मात्र घरातल्या सगळ्या विधवा स्त्रिया बाहेरच्या खोलीतच एका बाजुला बसतात आणि हौसे घेऊन आलेली प्रत्येक बाई त्यांचा स्पर्शही आपल्याला होणार नाही याची काळजी घेत घरात फिरते हे नाही बघवत मला. ही काळजी सगळ्यांसमोर घेतली जाते आणि त्यामुळे अशी एक स्त्री बाजुला बसलीय हे बाहेरच्या माणसाच्याही लक्षात येते (म्हणजे माझ्यासारख्या नवख्याच्या). अर्थात गावी या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जातात, संबंधित लोकांना त्यात खास असे काही वाटत नाही, (अरथात त्या विधवा स्त्रीला केवळ नवरा नसल्याने तिचा हौसा नहई याचे वाईट वाटत असणारच).

मी गावचे हौसे माझ्या लग्नानंतरच पहिल्यादा पाहिले आणि जेव्हा पाहिले तेव्हा हेच दृश्य मनात ठसले. त्यामुळे मनात एक अढीच बसलीय या सणाबाबत. अर्थात सगळीकडे हे असे नसेलही पण माझ्या गावी मात्र आजही आहे. Sad

हो ना साधना, खटकणारीच आणि मनाला खेद देणारी गोष्ट आहे ही. वोवसा(हौसा) हा प्रकार आमच्यात नसतोना म्हणून माहिती नाही, नक्की काय असतं ते. तू लिहिलंस म्हणून कळलं तरी.

वा, मस्त फोटो.
साधना, गावात राहून हे करणे तसे कठिण आहे पण मुंबईत आमच्या घरी असले काही अजिबात चालणार नाही.
माझी आईच याबाबतीत सुधारक विचारांची आहे. माझे वडील गेल्यानंतर ना तिने मंगळसूत्र काढले ना कुंकू लावायचे टाळले. हळू हळू काळाच्या ओघात मंगळसूत्र काढले पण अजूनही ती कुंकू लावतेच. याने तिचा स्वतःचा आत्मविश्वास छान टिकून राहिला. कधीतरी घरी ये नक्की !

कवठीचाफा व वाघोबा मस्त!
दिनेशदा तुमच्या आईची सुधारणावादी व्रुत्ती आवडली. त्याना माझा नमस्कार सांगाल.
एका लग्नाला गेलो होतो. लग्न लागल्यावर ह कुं पेढा अत्तर सुरु होते. ... माझ्या बाजूला माझी वि आत्या व बाजूला अजून एक वि... दोघींनी छोटी टिकली लावलेली. हकुं लावणार्यांना तरुण मुली... त्या कुं लावलेल्यांना लावत होत्या... वि. बाईने हाताने न लावण्याची खूण केली व आत्याने लावून घेतले ... मी तिला विचारले असता ती म्हणे अगं मी टिकली लावतेच अन तिला काय माहित मी वि आहे म्हणून अन एक दिवस लावून घेतले तर काय हरकत आहे....

दिनेश दा, मागे एक पांढरे फुलं मी इथे टाकले होते, तुम्ही अम्रुत वेल असल्याची शक्यता सांगीतली होती, पण फोटो नीट नव्हता. आणि पाने पण वेगळी आहेत म्हणाले होता... आज पुन्हा एका नर्सरीत ते पाहिले... ते मालतीचे फुल असल्याचे समजले...:)

सगळ्यात आधी इशिकाच्या बाप्पाला नमस्कार. खूप मस्त इशिका.
सगळ्यांचे फोटो आणि माहिती मस्त. आमच्या इथे सिंधूदुर्ग जिल्ह्यात 'ओसा' (वसा चे अपभ्रंश)असे म्हणतात. आज अनेक नविन शब्द कळले. वसा, ओवसा, वोवसा, हौसा. गावा प्रमाणे शब्द बदलतात.

धागा अक्षरशः पळतोय.

त्या महालक्ष्म्यांच्या पुढ्यातली बाळेही खरेतर एक मुलगा एक मुलगी अशी पाहिजेत
>>>
आमच्याकडे एक मुलगा एक मुलगीच असते Happy
त्यांना पण स्पेशल कपडे नी मुकुट Proud
गोंडस दिसतात ती बाळं Happy

साधना +११११११११११११११११११११११

मस्त पाऊस सूरू आहे आजकाल Happy
आय लव्ह पाऊस Happy

आमच्या इथे सिंधूदुर्ग जिल्ह्यात 'ओसा' (वसा चे अपभ्रंश)असे म्हणतात. आज अनेक नविन शब्द कळले. वसा, ओवसा, वोवसा, हौसा. गावा प्रमाणे शब्द बदलतात >>>>>
मूळ संस्कृत शब्द - वायन - त्याचे पुढे वाण - मग वाणवसा - मग सगळे ते ओवसा, वोवसा, हौसा. गावा प्रमाणे शब्द बदलले
वाण (p. 746) [ vāṇa ] n (वायन S) वाणक n S Fruits, sweetmeats, and light dishes, also articles of female dress and decoration, presented, on occasions, by persons under some religious observance to Bráhmans or to married women. - मोल्सवर्थ डिक्शनरी मधून ... Happy

साधना, आमच्या कडे ओवसा वेगळ्या प्रकारे असतो. लाह्या नसतात. काकडीची पाने घेतात. या दिवसात प्रत्तेकाच्या घरी काकडी लावलेल्या असतात. आमच्याकडे सगळ्यानाच वाण (काकडीच्या पानात एक फ़ळ आणि एक काकडीचा वडा) देतात. सासु, सासरे, दिर, जावु, ननंद, मुले, मुली, विधवा सगळ्यानाच वाण देतात. हळदी-कुंकू सभारंभ नसतो. फक्त वान दिल्यावर पाया पडावे लागते, लहान असतील तरीही. लग्नानंतर पहिल्यादा ओवसा असतो, तेव्हा दहा / पाच सुप असतात. एका सुपात ५ काकडीची पाने, २५ फळे, २५ मिठाई . एकत्र सुप घेवून गौरी पुढे ओवाळायचे. येवढे वजन कोण उचलणार म्हणुन मी पाच सुप घेतले होते. पहीला ओवसा गावाला केला. इकडे जिथे गौरी असतील तिथे जावुन पुजा करते. दोन काकडीची पाने (एका पानात ५ प्रकारची फळे) गौरी पुढे ठेवते आणि उरलेली फळे मंदिरात वाटते.

शशांक, इथे फक्त मॅरीड वूमन असा शब्द आहे.. म्हणजे दुर्दैवाने जिचा पति हयात नाही ती देखील येते कि या गटात.

या दोघी बहिणी आहेत, एक जेष्टा आणि दुसरी कनिष्टा आणि ती दोन त्यांची मुलं आहेत. ==सायली, आमच्या शेजारी असायच्या महालक्ष्म्या, खुप जण नवस बोलायचे काही नवस फेडायला यायचे.
तुमच्या कडेही असेच करतात का.

मी बाळ फोंडके यांचे मानसशास्त्रावरचे पुस्तक वाचतोय सध्या... वेळ मिळाला कि सविस्तर लिहीन.
पण कालच वाचलेल्या एका प्रकरणातली छोटीशी गोष्ट इथे लिहाविशी वाटतेय.

आपल्या मेंदूत विशेषनामे एका खास कप्प्यात साठवलेली असतात. इथल्या सगळ्यांची नावे आपण अशीच लक्षात ठेवतो. पण ब्रँड नेम मात्र खास वेगळ्या कप्प्यात साठवलेली असतात. त्या नावांबरोबर ते रंग, ती लिपी एवढेच नव्हे तर कधी कधी चव आणि काही सूरही साठवलेले असतात.
आणि त्यात जरा जरी बदल झाला तर ते शब्द आपल्याला ओळखू येत नाहीत.

उदा..

tata, GODREJ, नीर्मा .. हे शब्द उच्चाराने तसेच असले तरी आपल्याला अनोळखी वाटतात.

माझ्या मनात "मालती" हे नाव काही ओळखीतल्या मुलींसाठी आरक्षित आहे.. त्या नावासाठी ही फुलाची प्रतिमा साठवायला जरा प्रयास पडताहेत Happy

व्वा दिनेश दा, नविनच माहिती... अजुन त्या पुस्तकातली माहिती नक्की शेयर करा...

Pages