निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा...

गौरीचे हात - "कळलावी" (अग्निशिखा/Flame Lily)च्या फुलांना गौरीचे हात का म्हणतात ते आज कळलं. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

<<आर्या, केनयात डोंगर उतारावर याची शेती करतात. फुले आल्यावर मस्तच दिसते ती शेती.<<
खरय दिनेशदा... डोन्गरउतारावरची शेती आण त्यात फुलान्ची असेल तर काय सुन्दर दिसत असेल ना!! Happy

अर्रेव्वा...आज छान छान प्रचि येत आहेत सकाळपासुन. माय-लेक सुन्दर आहेत जिप्सी!:)

कोळी लोकांची गौर पण खुप छान सजवतात.. कारवार्‍यांची फक्त फुलांची असते.. गौरी विसर्जनाला जाशीलच Happy
तेव्हा दिसतील नक्की.

जिप्सी, छानच फोटो आहेत.

बाल्कनीतल्या बागेत पक्षी हवेतच .एक ट्रे टांगून त्यात शेव, कुरमुरे ठेवतो. मुंग्या येऊ नयेत यासाठी वरती दोऱ्याला ग्रीस लावायचे. .येणारे पक्षी कावळा, कबुतर, मैना, बुलबुल, चिमणी आणि शिँपी. भातावर मुनिया आले होते. गोकर्णीच्या फुलांवर फुलचुकी(सनबर्ड).

१)
१

२)
२

३)
३

४)
४

आमच्याकडेही गौरी असतात. माझाही ओवसा असतो. गावाला एकच तेरड्याची गौर असते. गावी काकडीचे वडे बनवतात. मला वेळ मिळत नाही वडे बनवायला म्हणुन मी पाच प्रकारची फ़ळे घेते.IMGsup_0055.JPG

मी नेहमी गौरी साठी वेणी / गजरे विकत आणते. ह्या वेळी गजरे बनवायचे ठरवले. जास्त वेळ नव्हता म्हणुन पटपट दोन गजरे केले.IMG_0gjr048.JPG
गौरीई
IMG_guori00.JPG

वा, सगळ्यांचे फोटो मस्तचेत...

अदीजो - कसले फूल आहे हे ???

अत्रुप्त आत्मा - हे जट्रोपाचे फूल आहे - आमच्या बागेत दररोज फुललेले दिसते.. Happy

दीजो - कसले फूलदीजो - कसले फूल आहे हे ??? आहे हे ???

किति सुंदर आहे. कुंदनाचे कानातले म्हणुन शोभेल

हे असाण्याचे फूल आहे. पुण्याच्या आसपास असाण्याची झाडे मुबलक आहेत. ही त्याची फांदी:

asana1.jpg

याच्या पानांचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या पानातल्या उप-उपशिरा (tertiary veins) एकमेकांना समांतर असतात :

asanaleaf.jpg

कधीकधी याच्या खोडावर ६ ते ७ सेमी लांब शंक्वाकृती काटे दिसतात.प्रत्येक झाडाला असतीलच असे नाही:

asanaspines.jpg

-- अश्विनी

ओह सुंदर.. अदिजो, पुर्ण झाडाचा एक फोटो टाका ना म्हणजे कल्पना येईल झाड कसे दिसत असेल त्याची.

असाणा : Bridelia retusa

पूर्ण झाडाचा फोटो नाही. वरचा फोटो तम्हिणी घाटात घेतलाय.

छान सुरवात. उजु, खुप छान गं.. इशिकालाही शाबासकी>>>>> +१

सर्वांचे फोटो मस्त. मणिमोहर पहिल्यांदा पाहिला.

जागू नवीन धाग्या बद्दल अभिनंदन!!!शशांकजी मणीमोहोर मस्त नाव!!बाप्पा सुरेख...अन घरातला भात ...प्र सन्न वाटले...

Pages