Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी मायबोलीबद्दल बोलत नाहीये
मी मायबोलीबद्दल बोलत नाहीये केश्विनी. मी इन जनरल बोलतेय. इथे माबोवर अर्थातच बाकी पक्षाचा तितकासा संबंध येणार नाही.
शेलक्या विशेषणांबद्दल म्हटलं तर ते मलाही पटत नाही. कोणत्याच पक्षाच्या लोकांनी विरोध करताना वापरलेली वाईट भाषा पटत नाही.
मिर्ची ताई <<. गुन्हेगारी
मिर्ची ताई
<<. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना दिलेलं तिकीट रद्द करणे>>
उत्तर देण्या पुर्वि म्हणजे काय ते थोड स्पष्ट करा.
किती उमेदवार?
कोणत्या क्षेत्रातुन (मतदार संघातुन) आलेले उमेदवार??
यादी नको पण एखाद उदा. दिलत तरी पुरे. तुमच्या १ अणि ३ या प्रश्नाचे उत्तर कनेक्टेड आहे असे वाटते.
आआप ने आरोप लावलेले पण सिध्द न झालेले उमेदवार कृपया देवु नका.
राजकिय पक्षाना देणग्या देणे कॉरपोरट हाउसेस नी हे लिगल केले तर तुम्चा दुसरा प्र्श्न निकालात निघेल.
अत्ता तरी आआप सत्तेत नाही त्यामुळे हे अटिट्युड दाखवु शकतो आहे.
प्रत्येक जण ट्विटर वापरत नसेल किंवा आपच्या वेबसाइटला भेट देत नसेल. अशांसाठी ह्या धाग्यावर लिहितेय. आणि त्याचा फायदा होतोय.
नाही. मिर्ची ताई मला अजुन काहिच पटलेले नाही.
३१% मते ही एकुण भारतातिल
३१% मते ही एकुण भारतातिल मतदारां पैकी आहेत की एकुण झालेल्या मतदानाच्या ३१%?
Ashvini k 100% sahmat. Te kay
Ashvini k 100% sahmat. Te kay aahe na mirchi aani kejriwal cha swabhav same aahe. Aaplch khar.kejriwal tv ver boltat aani he maayboli ver....ashkya gyanbhandar.
<<इतर पक्षांच्या बद्दलही
<<इतर पक्षांच्या बद्दलही लोकांच्या मनात मिडियामुळेच प्रचंड गैरसमज पसरवले जाण्याची शक्यता आहेच. कारण विरोधी आणि समर्थन करणार्या अश्या दोन्ही प्रकारच्या लिंक्स भाजप, काँग्रेस आणि आप अश्या तीनही पक्षांच्या बाबतीत आहेत. मग जे आप विरोधी असेल ते खोटं/गैरसमज पसरवणारं आणि काँग्रेस/भाजप विरोधी असेल तेच सत्य... हे कसं काय मान्य करावं? >>
विवेकबुद्धी वापरायची. शक्य तिथे व्हिडिओ किंवा ट्वीटस पहायचे. अधिकृत रिपोर्टस पहायचे.
उदाहरणं देते -
१. शांति भूषण बोलले तो व्हिडिओ ऐकलात ना. त्यात काय म्हणत होते ते? रिपोर्टर अक्षरशः बळजबरीने वदवून घेत होती "तो आप को लगता है के केजरीवाल ने इस्तिफा देना चाहिये?" आणि ते म्हणत आहेत "नो,आय अॅम नॉट सेइंग दॅट"
सगळ्या पेप्रांनी शांति भूषणचा केजरीवालांवर शार्प अटॅक वगैरे मथळे झळकवले. अरे काय चाल्लंय?
मी पेप्रांमध्ये लिहिलेल्यापेक्षा स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या आणि डोळ्यांनी बघितलेल्या वक्तव्यांवर विश्वास ठेवीन.
२. मोदींचा फोटो दाखवत 'बंदे में है दम, वंदे मातरम' अशी काव्यात्मक वाक्ये लिहून टीव्हीवर दाखवत होते. खाली बातमी होती - 'बीएसएफ के सात जवान आतंकी हमलें में घायल' !
https://pbs.twimg.com/media/Bu1Ysh3CYAEH0KS.jpg:large
असो.
<<महेश नी लिंक दिली होती त्यात पुर्वाश्रमीच्या आप नेत्याची मुलाखत होती. त्या मुलाखतीतल्या कंटेंटला खिजगणतीतही धरलं गेलं नाही.>>
नाही अश्विनी. मी ३-४ मुद्द्यांना तिथेच उत्तर दिलंय. महेशना म्हटलं, मी पुन्हा तो व्हिडिओ पाहणार नाही. तुम्ही बाकीचे मुद्दे लिहा. मी प्रतिवाद करते. २-३ वेळा आठवणही करून दिली.
चर्चा करायची तर विरोधकांनी एवढे कष्ट तरी घ्यायला नकोत का? विरोधातील व्हिडिओ पण मीच पाहून त्यातील मुद्दे शोधून मीच प्रतिवाद करायचा हे हास्यास्पद आहे.
अजूनही कुणीही लिहा त्या व्हिडिओतील मुद्दे. खरं काय आहे ते शोधून काढू.
<<हेच जर आप जिंकली असती तर तुम्ही ३१% जनता हुशार निघाली असं म्हटलं असतं. >>
हो नक्कीच. दिल्लीपेक्षाही पंजाबच्या जनतेला मी नक्कीच मानते. मिडियाच्या कारवायांना भीक न घालता चार स्वच्छ प्रतिमेची माणसे संसदेत पाठवलीत.
रच्याकने, तुम्ही जे जमिनीवरची लोकप्रियता म्हणत आहात ती पंजाबची आजची चित्रे पाहून लक्षात येईल.
केजरीवालांचा आजचा रोडशो - https://pbs.twimg.com/media/BvZA5ofCIAApOcf.jpg
तिथल्या बाय-पोल्ससाठीच्या उमेदवार प्रोफेसर बलजिंदर कौर ह्यांची जनसभा - https://pbs.twimg.com/media/BvYv77nCcAAo6cX.jpg
हेडरमध्ये माहिती टाकली तर हेडर फारच लोंबकळेल. पण जिथे चर्चा झाली आहे त्या पानांचे क्रमांक टाकते. सूचनेसाठी धन्यवाद
अल्पना, तिन्ही पोस्टसना अनुमोदन.
<<राजकारणात आल्यावर /सार्वजनिक जीवनात आरोप/प्रत्यारोप (खरे आणि खोटे दोन्ही) होणारच.>>
अगदी. आणि ह्याला तयारी असायलाच पाहिजे.
फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे की आरोप आणि गुन्हे ह्यात फरक आहे.
येडियुरप्पांवर ढीगभर केसेस दाखल झाल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात तपशील बघता येतील. अशी व्यक्ती सत्तेत असलेल्या पक्षाच्या उपाध्यक्षपदी असणं हे खरंच कोणाला खटकत नाहीये का?
('न खाऊंगा, न खाने दूंगा' हे ऐकायला गोड वाटतं. पण एकीकडे असं बोलायचं आणि पक्षाचे उपाध्यक्ष कोण तर येडियुरप्पा ! कसा विश्वास ठेवणार?)
अंजली दमानियांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. पण मग कुणीच केस का दाखल करत नाहीये?
<<वरवर फक्त ! व्यक्तिश मला यांच्यात आणि congress / भाजप मध्ये काहीही फरक वाटत नाही.मुखवटा वेगळा फक्त>>
जाई +१०००
<<किती उमेदवार? कोणत्या
<<किती उमेदवार?
कोणत्या क्षेत्रातुन (मतदार संघातुन) आलेले उमेदवार??
यादी नको पण एखाद उदा. दिलत तरी पुरे. तुमच्या १ अणि ३ या प्रश्नाचे उत्तर कनेक्टेड आहे असे वाटते.
आआप ने आरोप लावलेले पण सिध्द न झालेले उमेदवार कृपया देवु नका. >>
हे घ्या उदाहरण. लिंका फेकतेय म्हणू नका
१. सुरेन्द्र शर्मा - शहादरा - दिल्ली Aam Aadmi Party replaces Shahdara Candidate
In his application for his selection as candidate of “Aam Aadmi Party” from Shahdra, he had not disclosed that there were criminal cases lodged & FIR’s pending against him. We have also come to know that he had a large number of property disputes going against him.
"The party has made it clear in the past that it will only approve such persons as candidate who has impeccable integrity. Even if on the last day of the nomination we receive any credible information against any of our candidate with regard to his criminal record, we will cancel the candidature of that candidate and keep the seat vacant."
बाकीच्या पक्षांनी एवढं म्हणण्याची हिंमत दाखवली तरी डोक्यावरून पाणी.
(ते उलटं म्हणतात - स्वच्छ उमेदवारांना तिकीट दिलं तर आम्हाला एकही जागा जिंकता येणार नाही"
असं कोण म्हणालं ते माहीत असेलच.)
आपच्या संस्थळावरची लिंक नको असेल तर पेप्रातली घ्या -AAP removes candidate with ‘criminal background’
२. प्रितपाल सिंग सलुजा - राजौरी गार्डन - दिल्ली Criminal netas: AAP dumps candidate; dares Cong, BJP to do so
<<राजकिय पक्षाना देणग्या देणे कॉरपोरट हाउसेस नी हे लिगल केले तर तुम्चा दुसरा प्र्श्न निकालात निघेल.>>
माझा प्रश्न निकालात निघेल पण त्यांचे काळ्याचे पांढरे कसे होतील? त्यामुळे असलं काही सध्याच्या सरकारकडून होणे नाही.
<<नाही. मिर्ची ताई मला अजुन काहिच पटलेले नाही.>>
यूरो,
मी वर्च्युअल वाचकांबद्दल नाही म्हणत. मी ह्या धाग्याची लिंक काही दोस्त आणि नातलगांना दिली आहे. ते वाचत आहेत. मूळात सूज्ञ आहेत सगळे. सविस्तर लिहिलेलं वाचून खरं-खोटं त्यांचं ते ठरवत आहेत. आधी आपबद्दल आणि केजरीवालांबद्दल फारच वाईट मतं झाली होती त्यांची. आता निदान शांतपणे चर्चा तरी करत आहेत. काहींनी पश्चात्ताप व्यक्त करून झालाय.
(त्यांना माहीत नाहीये की हा धागा मी लिहीत आहे. थर्ड पर्सन म्हणून लिंक दिली आहे. उगीच इगो प्रॉब्लेम मध्ये यायला नको :फिदी:)
<<३१% मते ही एकुण भारतातिल मतदारां पैकी आहेत की एकुण झालेल्या मतदानाच्या ३१%?>>
एकूण मतदानाच्या.
मनोज माने,
हे बोलताना तुम्हीसुद्धा 'आपलंच खरं' करत आहात
'न खाऊंगा न खाने दूंगा' चे
'न खाऊंगा न खाने दूंगा' चे प्रताप दिसायला लागले
मागच्या पानांवर बातमी दिली होती की मोदीसरकारने दिल्लीतील अँटिकरप्शन सेलचे अधिकार कमी करण्याचा आदेश काढला आहे. हे चूक आहे हे तेव्हाच वाटलं होतं. पण हे इतक्या तडकाफडकी का केलं जात असावं ह्याबद्दल अंबानीला वाचवण्याचा डाव असेल हा विचारही डोक्यात आला नव्हता. मोठ्ठं बुद्धिबळ चालू आहे....
इथे वाचा - मोदी सरकार के नोटिफिकेशन से केजरीवाल का फैसला पलटा
"दिल्ली सरकार के वकील ने मंगलवार को हाई कोर्ट को बताया कि 23 जुलाई को केंद्र सरकार द्वारा जारी एक नोटिफिकेशन के जरिए दिल्ली सरकार की एसीबी से इस मामले की जांच का अधिकार वापस ले लिया गया था। इस नोटिफिकेशन के मुताबिक एसीबी केंद्र सरकार के तहत आने वाले लोगों के खिलाफ भ्रष्टाचार के मामलों की जांच नहीं कर सकती, बल्कि सिर्फ दिल्ली सरकार के तहत आने वाले लोगों के खिलाफ जांच कर सकती है।"
आधी आदेश काढायचा आणि मग ह्या आदेशानुसार एसीबीला अधिकार नसल्याने केस दाखल होऊ शकत नाही म्हणायचं ह्याला काय अर्थ आहे?
काँग्रेसपेक्षाही जड जाणार आहे हे प्रकरण.
>>येडियुरप्पांवर ढीगभर केसेस
>>येडियुरप्पांवर ढीगभर केसेस दाखल झाल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात तपशील बघता येतील. अशी व्यक्ती सत्तेत असलेल्या पक्षाच्या उपाध्यक्षपदी असणं हे खरंच कोणाला खटकत नाहीये का?
('न खाऊंगा, न खाने दूंगा' हे ऐकायला गोड वाटतं. पण एकीकडे असं बोलायचं आणि पक्षाचे उपाध्यक्ष कोण तर येडियुरप्पा ! कसा विश्वास ठेवणार?) <<
मिर्चीताई, सिर्फ इस बात पे हम आपसे सहमत है...
भले आरोप सिद्ध झाले नसतील; तरीहि एखादा स्वच्छ माणुस त्या पदाकरता मिळु नये? छी छी छी...
मिर्ची ताई, सलग वेळ मिळाला की
मिर्ची ताई,
सलग वेळ मिळाला की उत्तर लिहीतो.
<<मिर्चीताई, सिर्फ इस बात पे
<<मिर्चीताई, सिर्फ इस बात पे हम आपसे सहमत है... >>
राज,
हेही नसे थोडके
युरो, लिहा सावकाश. काही घाई नाही आपल्याला.
इरोम शर्मिलाची बीबीसीवरची मुलाखत - आज़ाद भारत में नेतागीरी, समाजसेवा और आंदोलन करने वाले तो बहुत हैं. पर सरकार के ख़िलाफ़ विरोध जताने के ‘जुर्म’ में इतना वक़्त क़ैद में किसी ने भी नहीं काटा है, जितना इरोम शर्मिला ने.
"इरोम ने कहा कि वह अरविंद केजरीवाल के नेतृत्व में 49 दिन चली दिल्ली सरकार के काम से बहुत प्रभावित हुई हैं, ''वो सचमुच भ्रष्टाचार से लड़ना चाहते हैं. उनके शासन में लोगों ने एक बदलाव महसूस किया. मैं चाहती हूं वह लोकसभा में भी आएं.''
भारत में हिरासत में रखे गए लोगों को वोट डालने का अधिकार नहीं है. इरोम ने भी पिछले 13 साल से मतदान नहीं किया है.
मैंने पूछा कि वोट डालने की इच्छा कभी मन में उठती है? तो बोलीं, ''पिछले समय में चुनाव से कोई उम्मीद नहीं होती थी, पर आम आदमी पार्टी का काम देखने के बाद मुझे अपने एक वोट की अहमियत भी समझ आने लगी है.''
मिर्चीताईंसाठी म्.टा. मधली
मिर्चीताईंसाठी म्.टा. मधली बातमी.
-------------------------------------------------------------------
* फाइल परत करा!
एका ज्येष्ठ मंत्र्याच्या पुत्राने कुणा उद्योगपतीकडून कामाची फाइल घेतली. फाइल घेताच पुत्राला पंतप्रधानांकडून बोलावणे आले. पुत्र खुशीत बुके वगैरे घेऊन पोहोचले पण, पंतप्रधानांनी बुके स्वीकारण्याऐवजी 'आधी फाइल परत करा व भविष्यात असे उपद्व्याप करू नका', असे खडसावले.
* उद्योपतींना बोलवा!
एका मंत्र्याने बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे भोजन घेतले. रात्री ११ वाजता पंतप्रधानांचा मंत्र्यांना फोन गेला, 'उद्योगपतींसोबत भोजन करण्याचा इतकाच शौक असेल तर त्यांना घरी किंवा कार्यालयात बोलवा', असे सांगितले गेले.
* जीन्स, टी शर्ट
एक मंत्री सायंकाळी एका पार्टीत जीन्स आणि टी शर्ट घालून पोहोचले. पंतप्रधानांनी त्यांना लगेच फोन केला. 'प्रत्येकाला खासगी आयुष्य असते याची कल्पना आहे पण, आपण आता मंत्री आहात. त्यामुळे असे परिधान योग्य नाही, यापुढे खबरदारी घ्या', अशी सूचना केली गेली.
* राजीनामा द्या!
एका गर्भश्रीमंत मंत्र्यांच्या कन्येचा अमेरिकेतील विद्यापीठात दीक्षांत सोहळा होता. मंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेला जाण्याची परवानगी मागितली. मात्र, 'आधी राजीनामा द्या आणि नंतर अमेरिकेला जा', अशी सूचना करण्यात आली.
टोचाभौ, वरील वाक्ये कोण कुणास
टोचाभौ,
वरील वाक्ये कोण कुणास कुठे म्हणाले ? लिन्का द्या. शेंडा-बुडखा नसलेल्या भलावणीवर विश्वास ठेवायला (दुर्दैवाने) मी भोळीभाबडी नाही
अस्ले खूप मेसेज फिरतात ओ व्हॉटसॅपवर, फेबुवर.
खेदाची गोष्ट म्हणजे आज-तकच्या अन्जना कश्यपसारखे पत्रकार(!) सुद्धा हातभार लावतात असल्या खोट्या भाटगिरीत.
"@anjanaomkashyap 7:42 AM - 19 Aug 2014
Empire State Building,New York,aftr endorsing 'Apka saath apka Vikas ' slogan,'trilight' welcome note fr Modi Sarkar "
सत्यपरिस्थिती - किमान ५ वर्षांपासून दरवर्षी एम्पायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई केली जाते. आधीही केली जात असेल तर तिथले माबोकर सांगू शकतील.
मटाची बातमी उघडून पाहिली.
मटाची बातमी उघडून पाहिली. मथळ्यात 'दंतकथा' लिहिलंय ह्यातच सगळं आलं...
--
--
मिर्चीताई - "दुसर्याचे ते
मिर्चीताई -
"दुसर्याचे ते कार्ट आणि आपला तो बाब्या" - हे ब्रिदवाक्य सोडा, मग मी आप बरोबर च आहे.
ह्या कहाण्या खोट्या आहेत हे तुम्हाला नक्की माहीती आहे का?
बादवे
मोदींनी महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांना बरोबर घेतले पाहीजे, चांगला माणुस आहे. सर्व च चांगल्या माणसांनी एकत्र यायला पाहीजे.
आपला बाब्या आहे की नाही हे
आपला बाब्या आहे की नाही हे काळ ठरवेल, पण दुसर्याचं कार्टं आहे ह्याबद्दल मला शंका नाही.
<<ह्या कहाण्या खोट्या आहेत हे तुम्हाला नक्की माहीती आहे का?>>
वर अंजना कश्यपचा दाखला दिलाय. आपले पंप्रच खोटं बोलतात हे दाखवणारी कित्तीतरी उदाहरणे आहेत. पण असो. इथे गल्ली का चुकवलीत तुम्ही?
पंप्र वर लिहिलेलं सगळं करत असतील तर चांगलंच. पण त्यात जगावेगळं काय आहे??? हे अपेक्षित आहे. ही त्यांची ड्युटी आहे. असल्या गोष्टींचं क्रेडिट देऊन त्यांच्या आक्षेपार्ह निर्णयांकडे दुर्लक्ष का करायचं?
रिलायन्सला वाचवायला दिल्ली-एसीबीचे पंख का कापले? येडियुरप्पांची नेमणूक कशी होऊ दिली? कोडनानी, बजरंगी, राजा, कनिमोझी बाहेर कसे आले? अगदी ताजं उदाहरण - संजीव चतुर्वेदींना का काढून टाकलं?
रच्याकने, अशोक खेमका तरी झाले का केंद्रात भरती? तीसुद्धा अशीच एक अफवा होती म्हणे.
<<मोदींनी महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांना बरोबर घेतले पाहीजे, चांगला माणुस आहे. सर्व च चांगल्या माणसांनी एकत्र यायला पाहीजे>>
मोदी चांगले आहेत हे तरी पटू द्या आधी
स्टिंग से कैसे बचा जाए, लिखी
स्टिंग से कैसे बचा जाए, लिखी जाए चिट्ठी: आरएसएस की क्लास में सीखेंगे बीजेपी सांसदों के स्टाफ?
प्रामाणिक लोकांना स्टिंगपासून भिती का वाटावी? मोदींनी पत्रकारांवर बंधने घातली तेव्हाही हे खटकलं होतं.
AAP's helpline to expose corruption in Mumbai
"Now the AAP's Mumbai unit has launched an anti corruption helpline in Mumbai and its metropolitan region to help and guide the citizens who face corruption on a daily basis, who are forced to pay bribes, offer gifts to get their work done.."
दोन पक्ष, दोन कृती....
मोदी चांगले आहेत हे तरी पटू
मोदी चांगले आहेत हे तरी पटू द्या आधी >>>>>>>> चला तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण चांगले आहेत हे तर पटले.
केजरीवाल सोडुन दुसरे पण चांगले असु शकतात हे पटायला सुरुवात झाली म्हणायची.
कोण त्या अंजना कष्यप? कोणी काहीही ट्वीट करावे आणि मोदींनी उत्तर द्यावे ह्याला काय अर्थ आहे?
कशावरुन तुमच्या चौकडी पैकी कोणी मुद्दाम असले खोटे ट्वीट करत नसेल?
अंजना कश्यप एक टेलीविजन
अंजना कश्यप एक टेलीविजन पत्रकार हैं. टेलीविजन पत्रकारिता में वो पिछले एक दशक से सक्रिय हैं. उन्होंने आंखों देखी से अपने करियर की शुरुआत की और फिर ज़ी न्यूज़, न्यूज़ 24 और स्टार न्यूज़ जैसे प्रतिष्ठित न्यूज़ चैनलों में काम किया है.
मोदींचं उत्तर कुणी मागितलं?
दंतकथा कशा पसरतात ह्याचं उदाहरण दिलं होतं.
मिर्ची ताई - अजुन पण काहीतरी
मिर्ची ताई - अजुन पण काहीतरी लिहीले होते मी -
--------
मोदी चांगले आहेत हे तरी पटू द्या आधी >>>>>>>> चला तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण चांगले आहेत हे तर पटले.
केजरीवाल सोडुन दुसरे पण चांगले असु शकतात हे पटायला सुरुवात झाली म्हणायची.
---------
तुम्हाला आप मधे Selective Reading शिकवले जाते का? Selective आणि सोयीचे Thinking शिकवतात हे दिसतेच आहे.
मिर्ची ही लिंक पाहिली का?
मिर्ची ही लिंक पाहिली का?
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aam-aadmi-p...
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवरून सर्वोच्च न्यायालयाने पाच आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश सरकारला दिले होते त्याचे काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
<<चला तुम्हाला पृथ्वीराज
<<चला तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण चांगले आहेत हे तर पटले.
केजरीवाल सोडुन दुसरे पण चांगले असु शकतात हे पटायला सुरुवात झाली म्हणायची.>>
पृथ्वीराज चव्हाणांबद्दल मला जास्त काही माहीत नाही. वाक्याचा पहिलाच भाग पटला नाही म्हटल्यावर दुसर्या भागावर काय बोलायचं?
केजरीवाल सोडून असंख्य, अगणित चांगले लोक आत्ता ह्या क्षणी भारतात आहेत, ह्यात मलातरी कसलीही शंका नाही.
<<तुम्हाला आप मधे Selective Reading शिकवले जाते का? Selective आणि सोयीचे Thinking शिकवतात हे दिसतेच आहे.>>
मी आपमध्ये ट्रेनिंगला वगैरे जाते असा समज आहे की काय तुमचा?
नरेश माने,
बातमी वाचली होती आधी. पण त्याचं पुढे काय होणार हे ओळखणं अवघड नाही. इराणीतैंचं काय झालं? खुद्द पंप्रंचं काय झालं? मेरा भारत महान....
<तुम्हाला आप मधे Selective
<तुम्हाला आप मधे Selective Reading शिकवले जाते का? Selective आणि सोयीचे Thinking शिकवतात हे दिसतेच आहे.>
टोचा, तुम्ही आताच मटातल्या मजकुराची लिंक दिली आहे .त्यातला "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली, काम करण्याची पद्धत, सहकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अवलंबलेले तंत्र आदिंशी संबंधित विविध किस्से आता चर्चेत येऊ लागले आहेत. यातील काही किस्स्यांवर तर दंतकथा म्हणून चर्वितचर्वण सुरू झाले आहे. प्रत्यक्षात घडलेल्या या घटना आहेत की कपोलकल्पित, यावर मात्र दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. कधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तर कधी वरिष्ठ अधिकारी वा सुरक्षा यंत्रणांकडून हे किस्से चर्चेत येत आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालय किंवा भाजपकडून कुठलेही खंडन झालेले नाही व तसे अपेक्षितदेखील नाही. यातील काही किस्से..." परिच्छेद नेमका वगळलात. याला काय म्हणायचं?
एका गर्भश्रीमंत मंत्र्यांच्या
एका गर्भश्रीमंत मंत्र्यांच्या कन्येचा अमेरिकेतील विद्यापीठात दीक्षांत सोहळा होता. मंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेला जाण्याची परवानगी मागितली. मात्र, 'आधी राजीनामा द्या आणि नंतर अमेरिकेला जा', अशी सूचना करण्यात आली. >>>>>>>>>>>>
या गोष्टीचे कौतुक करावी की किव करावी.. हा प्रश्न आहे.. त्या मंत्र्याने रितसर परवाणगी मागितली .. पळुन गेला नाही अथवा अरेरावी मी जाणारच असे काही केलेले नाही..... मुलीने शैक्षणिक जीवनाचा मोठा टप्पा गाठला त्यावेळी वडीलांची सोबत असावी अशी अपेक्षा प्रत्येक पाल्याची असते ..
यात चुकिचे काय..? राजिनामा द्या मग अमेरिकेला जा.. ? असे बोलणे योग्य आहे ? मोगलाई आहे काय ही ? खरच आता यात कुणाला कौतुक दिसत असेल तर त्या कौतुक करणार्याच्या अकलेची कीव करणेच योग्य आहे..
मी हा धागा सुरवातीपासून
मी हा धागा सुरवातीपासून वाचला. यात लक्षात आलेले काही ठळक मुद्दे :-
१. अरविंद केजरीवाल हे राजा हरिश्चंद्राचा अवतार आहेत.
२. आम आदमी पार्टीची अंतर्गत लोकपाल ही देशातील सर्वोच्च तपासयंत्रणा आहे. परंतु इतर राजकीय पक्षांकडून मात्रं केवळ सफाई दिली जाते.
३. आम आदमी पार्टीचे समर्थक नसलेले सर्वजण आणि इतर सर्व राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत.
४. आम आदमी पार्टीबद्दल कोणतीही बातमी व्हिडीओ पुरावा नसल्यास ग्राह्य धरली जाणार नाही. परंतु इतरांबद्दलच्या कोणत्याही लिंक्स मात्र काळ्या दगडावरील रेघ मानल्या जातील!
५. केजरीवाल यांनी केलेला कोणताही आरोप हाच अंतिम निर्णय मानला जाईल. आरोप सिध्द करण्यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही.
६. आम आदमी पार्टी विरोधी विचारण्यात आलेल्या आणि सोईस्कर नसलेल्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिले जाणार नाही.
७. आम आदमी पार्टी विरोधी ठणकावून मुद्दे मांडणार्यांना इग्नोर केले जाईल. इग्नोर करणं शक्य नसल्यास डुप्लीकेट आयडीचा आरोप केला जाईल. (धागा काढणारा आयडी डुप्लीकेट असला तरी!).
८. पंजाबमधील ४ मतदारसंघ सोडले तर देशातील उरलेल्या सर्व मतदारसंघांतील जनतेला कोणाला निवडून द्यायचं हे कळत नाही. विशेषतः २८२ मतदारसंघातील लोक हे तर पेड आर्मीचे सदस्य आहेत!
९. जंतर मंतरवर केजरीवाल यांनाच उपोषण करायचं असावं, पण अण्णांनी हट्ट केल्यामुळे त्यांना बसवण्यात आलं!
१०. सर्व राजकीय नेते हे केजरीवाल यांना प्रचंड घाबरतात!
११. केजरीवाल करत असलेली कोणतीही गोष्ट घटनाबाह्य असली तरीही ती योग्यच आहे.
१२. आम आदमी पार्टीतून दुसर्या पक्षात गेलेल्या लोकांना विरोध आहे, कारण ते दुसर्या पक्षात गेले.
१३. मिडीया विकला गेला आहे. २४ तास आम आदमी पार्टीला कव्हरेज आणि समर्थन दिले जात नाही.
१४. मुद्द्याचा प्रतिवाद करता न आल्यास अखेर या धाग्याचा केजरीवाल यांच्याशी काही संबंध नाही हे ठरलेले आहेच!
या पोस्टनंतर बहुधा माझ्यावर इग्नोर करण्याचा प्रयोग करण्यात येईल.
Aaho mirchi kejriwal
Aaho mirchi kejriwal rajkarnat yeun fakt 2 varsh zalet aani tumhi aevdhe likhan kele . Jas kay tyancha itihas 200 varsha cha aahe. Kejriwal varti kadambari lihayla harkat nahi. Aaso ."manjil mil hi jayegi bhatkate hi sahi gumrah to woh hai jo ghar se nikle hi nahi " **
तुमच्या
तुमच्या प्रतिक्रियांमधून
विवेकबुद्धी वापरायची. शक्य तिथे व्हिडिओ किंवा ट्वीटस पहायचे. अधिकृत रिपोर्टस पहायचे.
मी पेप्रांमध्ये लिहिलेल्यापेक्षा स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या आणि डोळ्यांनी बघितलेल्या वक्तव्यांवर विश्वास ठेवीन.
>>>
आणि हे सुद्धा तुमच्या प्रतिक्रियांमधून तुम्हीच दिलेल्या लिन्क्स
इथे वाचा - मोदी सरकार के नोटिफिकेशन से केजरीवाल का फैसला पलटा
>>
इरोम शर्मिलाची बीबीसीवरची मुलाखत - आज़ाद भारत में नेतागीरी, समाजसेवा और आंदोलन करने वाले तो बहुत हैं. पर सरकार के ख़िलाफ़ विरोध जताने के ‘जुर्म’ में इतना वक़्त क़ैद में किसी ने भी नहीं काटा है, जितना इरोम शर्मिला ने.
>>
स्टिंग से कैसे बचा जाए, लिखी जाए चिट्ठी: आरएसएस की क्लास में सीखेंगे बीजेपी सांसदों के स्टाफ?
>> म्हणजे तुम्ही जे रेफ्रेन्स देता ते वर्तमानपत्राच्या लिन्क्सवर इतरांनी विश्वास ठेवायचा, पण तुम्ही मात्र स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या व डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार.
असो, चालू द्या.
प्रितिका, खूप कष्टाने तुम्ही
प्रितिका,
खूप कष्टाने तुम्ही लिस्ट बनवली आहे. पण मी त्यातील मुद्द्यांशी असहमत आहे. तेवढा अधिकार तरी असतोच ना प्रत्येकाला ?
तुम्हाला वेळ मिळाला तर, मी विरोधकांना विचारलेले किती प्रश्न अनुत्तरित आहेत ह्याची लिस्ट बनवायला मला मदत कराल का?
<Kejriwal varti kadambari lihayla harkat nahi. Aaso ."manjil mil hi jayegi bhatkate hi sahi gumrah to woh hai jo ghar se nikle hi nahi " **>>
कादंबरी लिहायला मी लेखिका थोडीच आहे? काळजी नको करायला. कोणीतरी करतंय ते काम...केजरीवाल के संघर्ष की कहानी पर अब लिखी जाएगी किताब
<<म्हणजे तुम्ही जे रेफ्रेन्स
<<म्हणजे तुम्ही जे रेफ्रेन्स देता ते वर्तमानपत्राच्या लिन्क्सवर इतरांनी विश्वास ठेवायचा, पण तुम्ही मात्र स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या व डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार.>>
नकाच ठेवू विश्वास. तुम्ही विडिओज लिन्क्स द्या आणि बातम्या खोट्या आहेत हे पटवून द्या. सिंपल
चिखल्याभौ,
निवडणूका संपल्या. तुमचे आवडते लोक निवडून आले. आता त्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वागण्यावर लक्ष ठेवा. जे पटत नाही त्याचा खुलेपणाने निषेध करा की. हेच मी आपचे लोक निवडून आल्यावरही करीन. हे आधीही लिहिलंय. पगार देतो ना आपण त्यांना. त्या योग्यतेचं काम करत आहेत की नाही हे बघायची जबाबदारी नागरिकांची आहे. वैम.
जेटलीसाहेबांची ताजी मुक्ताफळे ऐकलीत का?
"One small incident of rape in Delhi advertised world over is enough to cost us billions of dollars in terms of global tourism," Mr Jaitley said at a tourism ministers' conference on Thursday."
व्हिडिओ पाहून घ्या.
निर्भयावर ज्या अमानुष पद्धतीने बलात्कार झाला त्याला 'वन स्मॉल इन्सिडण्ट' म्हणत असतील तर मग 'बिग इन्सिडण्ट' कुठला? रेडिओ जॉकींनी खासदारांची केलेली नक्कल??
केजरीवालांच्या सरकारी नोकरीत
केजरीवालांच्या सरकारी नोकरीत असताना घेतलेल्या सुट्टीबद्दल हे वाचण्यात आलं -
Mr. Arvind Kejriwal’s study leave case- A legal analysis
Pages