अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिर्ची ताई,

तुमच्या स्टॅमिनाला सलाम, तुमची कळकळ देशासाठी आहे हे सुद्धा कळते आणि पटते,

तुम्ही आआप च्या सर्व नेत्यांना फॉलो करता ही सुद्धा चांगली गोष्ट आहे,

पण मना विरुद्ध मोदींना फॉलो करण्याच कारण नाही !! नाही का ? मना विरुद्ध गोष्टी का करता जर
पटत नसेल तर सोडवे म्हणतो मी ?

मोदीनी आता पर्यंत सर्वच केलेल्या गोष्टी चुकीच्याच असतील आणी जनतेने तर सर्वात मोठी चुक केलेली आहे त्यांना निवडून, पण त्या चुकीची मर्यादा जास्तीत जास्त पाच वर्ष आहे,

त्या मुळे ट्वीटर वर फेबू वर काही लिहिल्याने काही बदलणार नाहीय. आता देश फक्त आ आ वाचवू शकतो.

सलामासाठी धन्यवाद Happy
गेल्या वर्षीपर्यंत वाटलंही नव्हतं की मी देशभक्त वगैरे होईन आणि एवढं लक्ष घालीन.
"भारताचं कधीच काहीच होऊ शकत नाही, केवळ तिथे जन्माला आलो म्हणून 'मेरा भारत महान' म्हणण्यात काही अर्थ नाही" हे बोलणार्‍यांपैकी मी एक होते. असो.

<<पण मना विरुद्ध मोदींना फॉलो करण्याच कारण नाही !! नाही का ? मना विरुद्ध गोष्टी का करता जर
पटत नसेल तर सोडवे म्हणतो मी ?>>

असं कसं ? पंप्र आहेत ते. काय काय करतायेत बघायला नको? गुजरातचं चांगभलं केलं तसं भारताचंही केलं तर?
(शिवाय हनुमान जिथे संजीवनी आणायला गेला होता (म्हणे) तो द्रोणागिरी नेपाळला आंदण देऊन टाकणं, जीतबहादुर सरमगरच्या फॅमिली रियुनियनचा इमोशनल ड्रामा, असल्या गोष्टी वाचण्यात थकल्याभागल्या मनाची तेवढीच करमणूक होते :डोमा:)

<<त्या मुळे ट्वीटर वर फेबू वर काही लिहिल्याने काही बदलणार नाहीय>>

यु नेव्हर नो Happy

Blacklisted contractors bag Rs 4,000 cr BMC road projects year after year

"Some of the works done since 2013 have been washed away in the rains leading to potholes and bad patches, infact some of the contractors who were awarded contracts again in 2014 have been fined for poor quality of work in 2013."
पावसाळ्यात हाल होतात तेव्हा मुंबईकरांनी वरील बातमी नक्की लक्षात ठेवायला हवी.
https://scontent-a-sin.xx.fbcdn.net/hphotos-xfa1/t1.0-9/10556252_6990368...

काल हिंदूमध्ये आप च्या फंडिंगसंदर्भात मस्त लेख होता. माझ्याकडे हार्ड कॉपी असल्यानं ऑनलाईन बघितला नाही. जर कुणी पाहिला असेल तर इथं लिंक द्याल का प्लीज??

(मिर्चीताईंनी अद्याप ती लिंक दिली नाही हे पाहून धक्काच बसला!!!)

एसएफओ मधल्या प्रसिद्ध भारतीय रेस्तराँच्या मालकाशी गप्पा मारताना तो म्हणाला की आपच्या काहि उत्साहि कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे ७ मिली़न्स डाॅलर्सची मागणी केली होती... Happy

नंदिनी, नाव द्या लेखाचं. मी शोधून काढते. (पण तुम्हाला लिंक नाहीच्च देणार :डोमा:)

राज, त्या मालकाला सांगा - देणार असशील तर खात्री करून दे. आपची टोपी, चिन्ह वापरून काही बाँग्रेसी देणग्या गोळा करत फिरत आहेत. उदा. - AVAM

आपच्या देणग्या http://www.aaptrends.com/ इथेसुद्धा बघता येतील. आपने देणग्यांसाठी आवाहन केलेलं नसतानाही लोकांनी (रादर खुळ्या लोकांनी) स्वातंत्र्यदिन आणि पाठोपाठ आलेला केजरीवालांचा जन्मदिन ह्या निमित्ताने उस्फूर्तपणे देणग्या दिल्या हे नसेलच लिहिलं ना कुठल्याच पेपरवाल्यांनी ?

मिर्चीबै, मी लेख वाचलाय, त्यामुळे मला लिंक नकोय. वर सुबोध दळवी यांनी दिलेलि लिंक पहा! पण बहुत~ओनलाइइन लेख एडिटेड व्हर्जन आहे. मी हार्ड कॉपी आणी ऑनलाईन लिंम एकदा तपासून पाहते.

ओक्के.

दळवींनी दिलेल्या लेखात लिहिलंय -
<On August 1, the party received all of Rs. 10,043 through online donation. >>

लेख लिहिलाय/छापलाय १७ ऑगस्टला. मग १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्टमध्ये जमा झालेली लाखांच्या आकड्यातील रक्कम सोडून लेखकमहाशयांना दहा हजारांची रक्कमच का लिहावीशी वाटली ??
Aug 16, 2014-- Rs 2,50,381
Aug 15, 2014-- Rs 2,27,515
Aug 14, 2014-- Rs 1,51,143
Aug 13, 2014-- Rs 3,59,340
Aug 12, 2014-- Rs 1,46,078

आपला देणग्या कितीही मिळोत, त्यांनी त्याच रकमेत निवडणूका लढवणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. राजकीय पक्षांचा भ्रष्टाचार ही भ्रष्टाचाराची गटार-गंगोत्री आहे. निवडून यायला करोडो रूपये मोजायचे आणि नंतर ते लोकांकडून उकळायचे.
समझो भाईलोग समझो...समझने में ही हमारी भलाई है !

मोअरओव्हर, लेखात लिहिलंय -
"As far as the AAP is concerned, funds are need based, as the party had asked supporters to stop donating after its target of collecting Rs. 20 crore was met in the Delhi election, he said."

ह्यँ :अओ:...राजकीय पक्ष म्हणतोय, देणग्या पाठवू नका, आमची गरज भागली.
बस करो भाई, अब रूलाओगे क्या ! Wink

त्या लिंकमध्ये आप ला मिळणारें फंडींग कमी होतंय आणि त्यांना फंडींगची गरज आहे /पैसे कमी पडत आहेत असं लिहिलंय. पण त्यात नविन काहीच नाही. आपला निवडणूकांच्या काळातही निधीची कमतरता भासत होती हे फॅक्ट आहे. अगदी त्यांनी हे डिनाय केलं असेल तरीही.

आप सपोर्टर्स आणि विरिधक दोघेही आप हा एक खूप नवा पक्ष आहे हे नेहेमी विसरतात. जर हा पक्ष टिकलाच (टिकेलच याचि मला तरी शाश्वती देता येत नाहीये अजून ) तर अंदाजे ५-७ वर्षांनी त्यांची काय स्थिती आहे यावर या पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल. जर सत्तेशिवाय ५-७ वर्ष पक्ष टिकला /काम करत राहिला (यात निवडणूका लढवणं पण येईल... कारण सामान्यापर्यंत पोचायचा आणि अस्तित्व दाखवायचा एक मार्ग आहे निवडणूका लढ्वणे मग त्या हरल्या तरी हरकत नाही. इन फॅक्ट त्यातूनच पक्ष बांधणी होत असते) तरच आपला सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही पक्षाशी कंपेअर करता येईल.

(हे वरचं लिहिलेलं सपोर्टर्स आणि विरोधक दोघांनाही उद्देशून आहे.)

अल्पना +१

लोकसभा निवडणूकीत पैशाची कमतरता फार आल्याचं वाचलं होतं. पण तो पसाराच फार मोठा घातला होता.

मिर्ची ताई, अल्पना ताई
आआप हरला म्हणुन तो पक्ष वाईट किंवा कमी महत्वाचा होत नाही. कोणत्याही पक्षा सर्व काळ वरती रहात नाही. कायम कोणत्याही पक्षाला प्रचंड जनमताचा पाठींबा मिळत नाही. राज्यातल्या निवडणुका जिंकल्या म्हणुन केंद्रात विजय मिळेल असे होत नाही आणि उलट ही तितकेच खरे आहे.
राजकारणात यशश्वी व्हायचे असेल तर होलियर दॅन दाउ हे अटीट्युड सोडल्या शिवाय हे जमवता येणार नाही.

आआप हरला म्हणुन तो पक्ष वाईट किंवा कमी महत्वाचा होत नाही. कोणत्याही पक्षा सर्व काळ वरती रहात नाही. कायम कोणत्याही पक्षाला प्रचंड जनमताचा पाठींबा मिळत नाही. राज्यातल्या निवडणुका जिंकल्या म्हणुन केंद्रात विजय मिळेल असे होत नाही आणि उलट ही तितकेच खरे आहे.
राजकारणात यशश्वी व्हायचे असेल तर होलियर दॅन दाउ हे अटीट्युड सोडल्या शिवाय हे जमवता येणार नाही.>>

हेच मी पण म्हणतेय. हल्ली काँग्रेस /भाजपाला पर्याय म्हणजे आपच असं जे आपवाले म्हणताहेत ते किंवा भाजपा-काँग्रेस ज्या प्रमाणात आपवर आणि केजरीवालांवर आरोप्/प्रत्यारोप, आरोपांचं खंडण इ करत आहेत ते बघून अवास्तव महत्व दिलंय आप ला असं मला वाटतं. इतकं महत्व सध्याचे मुख्य दोन पक्ष (काँग्रेस, भाजपा) सोडल्यास बाकी कोणत्याच पक्षास दिलं जात नाहीये. हे खूप विचित्र वाटतंय.

अल्पना, पुन्हा एकदा बॅलन्स्ड पोस्टला +१

प्रत्यक्ष पक्ष बांधणी किंवा कामं ह्यापेक्षा सोशल मिडियाचा वापर आप कडून जास्त होतोय असं वाटतंय. कदाचित मिडियाच्या द्वारे लोकांसमोर येत राहण्याची स्ट्रॅटेजी असावी. त्याचा त्यांना फायदा होतही असेल, परंतु निगेटिव्ह पब्लिसिटीवर जास्त भर दिला जातोय ही तद्दन राजकिय खेळी वाटतेय. विरोधी लिंकांचा अनुल्लेख किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून सातत्याने गिन्या चुन्या बातम्या लोकांसमोर आणणे हे देखिल त्यात येतंच. आणि हे काही लोकांच्या लक्षात येतं तर काहींच्या नाही येत.

साधं सरळ बघ ना, एखादा माणूस सातत्याने दुसर्‍याला दुष्ट, वाईट म्हणत त्याबरोबर स्वतःला स्वच्छ, सद्गुणी म्हणत असेल तर त्याचं हे वागणं हे त्याला जी स्वत्:ची प्रतिमा प्रोजेक्ट करायची आहे त्याच्या विरोधी नाही का? खर्‍या सद्गुणी माणसाला स्वतःचे गुण सिद्ध करण्यासाठी दुसर्‍याची निंदा करायची गरज पडते का? समोरचा वाईट असेल तर तो आणि त्याचं कर्मं असं म्हणून आपण आपल्या मार्गाने चालावं ना? आपोआपच लोकांना सरळ मार्गाची नोंद घ्यावी लागेलच ना? आणि राजकारणात असंच चालतं अशी सारवासारव केली तर हा पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आणि चांगला कसा? असा प्रश्न पडतोच ना? काही हॅमरिंगला बळी पडतात तर काही ह्या सगळ्याकडे अलिप्तपणे पहायचा प्रयास करतात. म्हणूनच जालावर असलेल्या आणि इथे वेगवेगळ्या धाग्यांवर झब्बूसारख्या दिल्या जाणार्‍या शेकडोंनी लिंकांवर आधारित मी माझं मत बनवत नाहिये. जिथे फालतू फालतू अफवा सोशल मिडियातून विचार न करता पसरवल्या जातात तिथे राजकारणासाठी हॅमरिंग केलं जाणारच. एका क्लिकने काहीही फॉरवर्ड करुन हवा निर्माण केली जाऊ शकते उगाचच.

जी इमेज लोकांपुढे आणायचा प्रयास चालला आहे त्या इमेजला खरंतर सशक्त पक्ष बांधणीचे प्रयास आणि पॉझिटिव्ह पब्लिसिटी शोभून दिसेल. हे माझं मध्यमवर्गीय आणि वैयक्तिक मत आहे.

मी ह्या सगळ्याकडे एक सामान्य व्यक्ती म्हणून बघतेय, राजकारणातले डावपेच मला दूरान्वयानेही माहित नाहीत. आणि शेवटी वोट देताना हे सगळं सामान्य व्यक्तीच्या नजरेतूनच मी पाहणार. मॅक्झिमम वोटर्स हे असेच असणार. ५ वर्षांतला वैताग अथवा आनंद, एखाद्या पक्षाबद्दलचं बरं वाईट किंवा बदललेलं मत हे वोटर्सच्या निर्णयावर परिणाम करणारच. आणि वोटर्स असे जिकडे तिकडे सोशल मिडियामध्ये बोलूनच दाखवतील असं नाही, ते डायरेक्ट करुनच दाखवतील.

प्रत्येक वेळी सरकार आणि corporate वाईट असतात असे न्हवे. बर्याच वेळा चांगली कामे पण होतात. ( ह्या दुव्यावर तरी corporate ला फक्त वाईटच समजले गेलेले आहे).

http://timesofindia.indiatimes.com/india/Modis-Swachh-Bharat-call-gets-R...

साहील,
या धाग्यावर केजरीवाल आणि आप सोडून इतर राजकारण्यांना आणि केजरीवालना प्रश्न विचारणार्‍या सर्वांनाच वाईट समजले गेले अथवा इग्नोर केले गेलेले आहे.

आश्विनी ताई,

आआप सतत डिनायल मोड मधे आहे

निवडुन आल्या नंतर एक बाजुला म्हणायचे जनता शहाणी आहे तीला सर्व समजते ती योग्य काय अयोग्य काय हे बरोबर ठरवेल आणि निवडणुका हरल्या नंतर सांगायचे जानतेला माहित नाही कोणाला निवडुन दिले आहे. जनतेची मिडीयाने फ़सवणुक केली आहे. निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्यामुळे कोणी निवडुन आले आहे.

<<राजकारणात यशश्वी व्हायचे असेल तर होलियर दॅन दाउ हे अटीट्युड सोडल्या शिवाय हे जमवता येणार नाही.>>
यूरो,
राजकारणातील यश म्हणजे आत्ता भाजपाने म्हणजे मोदींनी मिळवलेलं यश असं समीकरण असेल तर आप अज्जिबात यशस्वी होऊ नये. नाहीतर माझ्यासारखे नक्की पाठ फिरवतील. स्वच्छ चारित्र्याचे नेते संसदेत पाठवायचं स्वप्न पुन्हा लांबणीवर पडेल.

होलियर दॅन दाउचं म्हणाल तर परिस्थितीच सध्या तशी आहे.
१. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना दिलेलं तिकीट रद्द करणे
२. पक्षाला मिळालेल्या देणग्या पब्लिक डोमेनमध्ये टाकणे
३. तात्विक मतभेद असलेल्यांशी यशस्वी होण्यासाठी हातमिळवणी न करणे
भारतातील दुसरा कुठलाही पक्ष ह्या तीन गोष्टी तरी करताना दाखवा. मीसुद्धा म्हणेन की आपने होलियर दॅन दाउ चा अटिट्युड सोडावा.
चांगले लोक चांगुलपणा दाखवायला/सांगायला बिचकतात म्हणून वाईटांचं घोडं पुढे जातं !

<<इतकं महत्व सध्याचे मुख्य दोन पक्ष (काँग्रेस, भाजपा) सोडल्यास बाकी कोणत्याच पक्षास दिलं जात नाहीये. हे खूप विचित्र वाटतंय.>>

देअर यु आर अल्पना. बाकी कुठल्याच पक्षाच्या मागे इतर पक्ष हात धुवून लागत नाहीयेत. आप ऑड मॅन आउट असल्याचा पुरावा आहे हा. वैम.

<<प्रत्यक्ष पक्ष बांधणी किंवा कामं ह्यापेक्षा सोशल मिडियाचा वापर आप कडून जास्त होतोय असं वाटतंय>>

अश्विनीतै,
तुम्ही-आम्ही सोशल मिडियावर आहोत म्हणून आपल्याला एवढंच दिसतंय. पक्षबांधणी जोमाने चालू आहे असं दिसतंय. मिशन विस्तार चालू आहे. लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय. देशभरात नाही म्हणत. महाराष्ट्रात तर अजिबात नाही.

<<विरोधी लिंकांचा अनुल्लेख किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून सातत्याने गिन्या चुन्या बातम्या लोकांसमोर आणणे हे देखिल त्यात येतंच. >>

अनुल्लेख ह्या धाग्यावर झालंय का? प्लीज उदाहरणे द्या.
काही ठराविक आयडींचा अनुल्लेख केलाय. नाइलाज आहे. पण खरंच प्रश्न विचारणार्‍यांना उत्तरे दिली आहेत.

<<जी इमेज लोकांपुढे आणायचा प्रयास चालला आहे त्या इमेजला खरंतर सशक्त पक्ष बांधणीचे प्रयास आणि पॉझिटिव्ह पब्लिसिटी शोभून दिसेल. हे माझं मध्यमवर्गीय आणि वैयक्तिक मत आहे.>>

ह्याबद्दल थोडं. पुन्हा एकदा लिहिते की हा धागा आणि आप ह्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. ह्या धाग्यावर जे लिहिलं जातंय त्यात कसलीही इमेज लोकांपुढे आणायचा प्रयास नाही. आपच्या अधिकृत लोकांना हा धागा माहीतही असण्याचं काहीच कारण नाही.
हा माझा वैयक्तिक सहभाग आहे. मिडियाच्या %^&^#$^ मुळे जी खोटी माहिती आपल्यापुढे येतेय त्यामुळे आपबद्दल लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज आहेत. प्रत्येक जण ट्विटर वापरत नसेल किंवा आपच्या वेबसाइटला भेट देत नसेल. अशांसाठी ह्या धाग्यावर लिहितेय. आणि त्याचा फायदा होतोय.
मला कुठलंही मत लादायचं नाहीये. गापै म्हटल्याप्रमाने ढाप्नोटाइझ करायचाही उद्देश नाही. मुळात विवेकबुद्धी जागी ठेवली तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ढाप्नोटाइझ नाही होत.
(६९% कुठे झाले? Wink अनावश्यक अवांतर वाक्य.)

<<प्रत्येक वेळी सरकार आणि corporate वाईट असतात असे न्हवे. बर्याच वेळा चांगली कामे पण होतात. ( ह्या दुव्यावर तरी corporate ला फक्त वाईटच समजले गेलेले आहे).
http://timesofindia.indiatimes.com/india/Modis-Swachh-Bharat-call-gets-R...>>

कॉर्पोरेट वाईट नाहीत. क्रोनी कॅपिटलिस्ट वाईट आहेत, रादर त्यांचं क्रोनी कॅपिटलिझ्म वाईट आहे. आणि हे आता रघुराम राजनही म्हणत आहेत. केजरीवालांना सोडून त्यांच्यावर तुटून पडा आता Wink

रच्याकने, टॉयलेटसचा विषय काढलाच आहे तर त्या कॉर्मोरेटसना हेही वाचायला द्या. म्हणजे विकासराज्यातील शहरांवरही त्यांची कृपा होऊ शकेल.
Ahmedabad's open toilet shame: 70,000 people in Gujarat's business capital still defecate in the open
लालकिल्ल्यावरून शौचालयांबद्दल मारलेल्या मोठ्यामोठ्या गप्पांवर अजूनही विश्वास ठेवण्याइतकं भोळंभाबडं पब्लिक भारतात आहे, ह्याचंच आश्चर्य वाटतं !

प्रितिका, असहमत.
यूरो,
दुर्दैवाने दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. मिडियाच्या फसवणूकीला ३१% जनता फसली, ६९% जनता नाही फसली, तिने योग्य-अयोग्य ठरवलं. पण गंमत म्हणजे ६९% हरले आणि ३१% जिंकले. आता ह्याला कोण काय करणार?

मिडियाच्या %^&^#$^ मुळे जी खोटी माहिती आपल्यापुढे येतेय त्यामुळे आपबद्दल लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज आहेत.>>>> मला तेच म्हणायचंय. हेच दुसर्‍या बाजूनेही असू शकतं. इतर पक्षांच्या बद्दलही लोकांच्या मनात मिडियामुळेच प्रचंड गैरसमज पसरवले जाण्याची शक्यता आहेच. कारण विरोधी आणि समर्थन करणार्‍या अश्या दोन्ही प्रकारच्या लिंक्स भाजप, काँग्रेस आणि आप अश्या तीनही पक्षांच्या बाबतीत आहेत. मग जे आप विरोधी असेल ते खोटं/गैरसमज पसरवणारं आणि काँग्रेस/भाजप विरोधी असेल तेच सत्य... हे कसं काय मान्य करावं? केजरीवालांवर तुटून पडण्याचा प्रश्नच येत नाही. ते त्यांच्या परीने चांगले असतीलच (तरीही १००% चांगले असू शकत नाहीत) पण त्यासाठी इतर वाईट असल्याचं दाखवल्याचं शेपूट लावलं जातंय ते पटत नाही. त्यांच्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणून थांबलं तर चालणार नाही का? मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे दुसर्‍याला वाईट म्हणायची गरज पडतेय हे खूप खटकतंय. किंवा राजकारणात हे असं करणं आवश्यकच असावं.

अनुल्लेख ह्या धाग्यावर झालंय का? प्लीज उदाहरणे द्या.>>> आता नक्की कुठला धागा ते आठवत नाही. महेश नी लिंक दिली होती त्यात पुर्वाश्रमीच्या आप नेत्याची मुलाखत होती. त्या मुलाखतीतल्या कंटेंटला खिजगणतीतही धरलं गेलं नाही. महेश नी पुन्हा पुन्हा आठवण करुन दिली तेव्हा ते खोटं आहे असं म्हटलं गेलं. तुम्ही विचारलं म्हणून हे सांगितलं. मी तेच धरुन न बसता पुढे जाऊन मोहल्ला सभा वगैरेही चर्चेत आणल्या कारण जसं इतरपक्षविरोधी मटेरियलला मी मिडियाचा खेळ समजते तसाच आप विरोधी लिंकलाही मिडियाचा खेळ समजते.

मिडियाच्या फसवणूकीला ३१% जनता फसली, ६९% जनता नाही फसली, तिने योग्य-अयोग्य ठरवलं.>>>> हेच जर आप जिंकली असती तर तुम्ही ३१% जनता हुशार निघाली असं म्हटलं असतं. काय बोलावं आता? Uhoh जाऊदे.

सगळ्याच पक्षांमध्ये चांगले/वाईट लोक असणार त्यामुळे आप मध्येही असले तरी त्यात मला आश्चर्य वाटणार नाही कारण आप देखिल अश्याच व्यक्ती तितक्या प्रकृती ल्यायलेला पक्ष असणार. आप म्हणजे कुणी एक व्यक्ती नाही. जरा जरी विचारांमध्ये तफावत आली तरी त्यांच्यातही अंतर्गत हालचाली होतातच आहेत. आणि राजकारणात हे होणारच हे मी समजून आहे.
------
एक सुचलं ते सांगू का? पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. तुमच्या बाफच्या वरच्या मॅटरमध्ये तुम्ही प्रतिसादात दिलेली "मोहल्ला सभा" वगैरे माहिती लिहून ठेवा. अजून लोकपाल्/जनलोकपाल बद्दलही बुलेट स्वरुपात माहिती वर चिकटवून ठेवा. तुमच्या प्रचारकामात ते वरंच असलेलं चांगलं पडेल.

केश्विनी, सॉरी पण प्रतिसाद पटला नाही. सरकारमधल्या किंवा आपल्या विरोधातल्या पक्षांमधल्या तृटी /त्यांच्या चुका दाखवून द्यायलाच हव्यात. केजरीवाल किंवा इतरही कोणताही पक्ष जर भाजपा किंवा काँग्रेस (बेसिकली सत्ताधारी) च्या विरोधात काही म्हणत असेल तर त्यात काय चूक अहे? युपीसंदर्भात मुलायम आणि मायावतीच्या विरोधात लिहिलं जाईल्/जातं, बंगालात ममता, बिहारात लालू, पासवान, नितिश....डॅट्स जस्ट फाइन.

मला आश्चर्य केजरीवालांच्या विरोधात किंवा आपच्या विरोधात इतकं लिहिलं जाण्याचं वाटतंय. सध्या असं वातावरणं उभं करायचा प्रयत्न होतोय की भाजपा, काँग्रेस आणि त्यानंतर आपच. दुसरे पक्षही अस्तित्वात नाहीयेत. लालू,नितिश, ममता, जयललिता,मायावती, मुलायम, नविन पटनाईक हे सगळे पण नॉन भाजपा आणि नॉन काँग्रेस आहेत ना? हे सगळे नेते आणि यांचे पक्ष पण काँ आणि भाजपा विरोधात बोलतात्/लिहितात ना? मग काँ आणि भाजपा कडून फक्त आणि फक्त आपवर टिका होणं म्हणजे आपला जास्तीचं महत्व देणं नाही का?

आणि हो, आपच्या विरोधात कोणी काही लिहू/बोलू नये असं काही मला म्हणायचं नाहीये. त्यांच्यावर आरोप होत असतिल तर होईनाका. राजकारणात आल्यावर /सार्वजनिक जीवनात आरोप/प्रत्यारोप (खरे आणि खोटे दोन्ही) होणारच.

अल्पना, सगळ्याच अश्या बाफ वरचे प्रतिसाद बघितलेस तर मला काय म्हणायचंय ते कदाचित कळेल तुला. चुका दाखवून देणे वेगळे असते. आणि जितक्या प्रमाणात आप कडून चिडीला आल्यासारखी टिका होतेय, आम्हीच चांगले आणि बाकीचे अगदी नालायक अश्याप्रकारे प्रोजेक्ट केलं जातंय, तसं इतर पक्षांकडून होत नाहिये त्यामुळे प्रत्युत्तरादाखल रोख तिकडे जात असेल. इथे देखिल तेच होते आहे. मी देखिल आप विरोधात लिहित नाहिये तर अश्याप्रकारे प्रोजेक्ट करण्याच्या विरोधात लिहितेय हे समजून घ्यावं. ते सुद्धा न राहवून लिहितेय अधुन मधुन. मी केजरीवाल किंवा कुणाही आप कार्यकर्त्यांबद्दल काहीच वाईट बोलले नाहिये किंवा काँग्रेसच्या लोकांबद्दलही वाईट साईट बोलले नाहिये. मी कुणालाच शेलकी विशेषणंही वापरली नाहियेत जे इथले भाजपा, काँग्रेस आणि आप वाले सातत्याने करतायत.

राजकारणात आल्यावर /सार्वजनिक जीवनात आरोप/प्रत्यारोप (खरे आणि खोटे दोन्ही) होणारच.>>>> हे तुला समजतंय कारण तू हे कायम बघत आली आहेस.

असो, की फर्क पेंदा? नाही लिहिणार ह्यापुढे Happy

लालू,नितिश, ममता,
जयललिता,मायावती, मुलायम,
नविन पटनाईक हे सगळे पण नॉन
भाजपा आणि नॉन काँग्रेस
आहेत ना? >>>>>> वरवर फक्त ! व्यक्तिश मला यांच्यात आणि congress / भाजप मध्ये काहीही फरक वाटत नाही.मुखवटा वेगळा फक्त

Pages