Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिर्ची ताई, मी कोणत्याही
मिर्ची ताई,
मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. १९९२ पासुन भारताने उदारीकरणाचे धोरण अवलंबले आहे आणि आपली अर्थ व्यवस्था खुली केली आहे. असे करताना आज केले आणि उद्या लगेच त्याचा फ़ायदा झाला असे होत नाही. ही एक प्रक्रिया आहे आणि २० वर्ष ती चालु आहे.
१२१ कोटी लोकसंख्येच्या देशात रोजगार निर्माण करायचे असतिल आणि आर्थिक विषमता नष्ट करायची असेल तर ते खुल्या आर्थिक धोरणाने जास्त वेगाने होईल. हे जो कोणताही पक्ष करेल त्याला माझा पाठींबा आहे.
हे करताना म्हणजेच खाजगीकरण करताना त्यात पारदर्षकता असली पाहिजे. तेव्हाच त्या प्रक्रियेचा फ़ायदा सर्व लोकांपर्यंत पोचेल. अपारदर्शकपणे केलेले खाजगीकरण यालाच राजन कॉर्नि कॅपिटलिझम म्हणतात
दिल्ली विज वादात कोणत्याही कंपन्या तिथे असतिल तरी परीणाम बदलला नसता आलेख फ़क्त वर खाली. चुकीच्या पद्धतीने केलेल्या खाजकीकरणाचा दोष हा फ़कत त्या कंपनीचा कसा?
२ ग़ घोटाळा झाला म्हणजे मोबाईल फ़ोन कंपन्या वाईट झाल्या का? समजा एखाद्या कंपनिने त्या प्रक्रियेत भाग घेतल नसता तर त्या कंपनीचे नुकसान झाले असते त्यांनी केलेली गुंतवणुक फ़ुकट गेली असती. प्राप्त परिस्थितीत त्याना ज्या प्रक्रियेने लायसंस मिळाले ती स्विकारवीच लागली.
आयला, हेच तर आम्ही
आयला, हेच तर आम्ही सुरुवातीपासुन सांगतोय...
Mirchi tumcha aevdha hatt ka?
Mirchi tumcha aevdha hatt ka? kiva ego madhe yetoy ka ? Tumhala kejriwal patat tar to tumcha drushtikon. Pan tumhi tumche vichar dusrrya var ka ladta?
राज, भाजपने आआप फोडायला
राज, भाजपने आआप फोडायला घेतलाय असं तुम्ही दिलेल्या बातमीतून सूचित होतंय बहुतेक.
आ.न.,
-गा.पै.
भाजपने आआप फोडायला घेतलाय असं
भाजपने आआप फोडायला घेतलाय असं तुम्ही दिलेल्या बातमीतून सूचित होतंय बहुतेक.>>>> कसं काय? शांती भूषण विकले गेलेत असं म्हणायचंय का तुम्हाला? की जे आआप सोडतील किंवा आआप मध्येच राहून विरोधी बोलतील ते वाईट किंवा विकले गेले आहेत असं मानूनच चालायचं?
<<आयला, हेच तर आम्ही
<<आयला, हेच तर आम्ही सुरुवातीपासुन सांगतोय...>>
राजभौ,
संबंधित बातमीचा व्हिडिओ पाहिलात का? पाहून घ्या एकदा...म्हणजे शांति भूषण नेमकं काय आणि अजून काय बोलले आहेत ते कळेल !
इथे व्हिडिओ आहे. No internal democracy in AAP: Bhushan
बाकी, तुम्ही दिलेल्या लिंकमधल्या वाचकांच्या प्रतिक्रियांचा बॅक-अप घेऊन ठेवायला पाहिजे. लोकांनी कशी-कशी मुक्ताफळे उधळली होती, हे १०-२० वर्षांनी वाचताना मजा येईल.
आता अचानक वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर ही बातमी का छापली असावी?? आणि अर्णब गोस्वामीने #AAPBreaksUp चा हॅशटॅग वापरायला का सुरूवात केली असावी??
माझं विश्लेषण -
१. दिल्लीत निवडणूकांचे वेध लागायला सुरूवात झाली आहे. निवडणूका अटळ दिसतायेत.
२. कालपासून आपचं 'सिग्नेचर कँपेन' सुरू झालंय.लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय.
३. टाइम्सनाऊ च्या कर्मचार्यांनी अर्णबच्या हिटलरशाहीविरुद्ध लिहिलेलं पत्र अरविंद केजरीवालांनी रीट्वीट केलं.
४. परंजय गुहांचं 'गॅस वॉर्स' वाचल्यावर केजरीवालांनी खालील ट्वीटस केल्यात -
"Just finished reading "Gas Wars" by Paranjoy Guha Thakurta. V well researched, eye opener. Must read."
"@paranjoygt Paranjoy da, just finished reading ur book "Gas Wars". Congrats for showing courage to bring all those facts in public domain"
'कोणाला' तरी ह्या ट्वीट्स खटकणं साहजिक आहे...
असो. एकूणात काय तर अफवांना, ट्विस्टेड विधानांना पेव फुटायला सुरूवात झाली आहे. अपेक्षित होतं हे.
अर्णबच्या सुस्वभावाबद्दल आणि सुशासनाबद्दलचं त्याच्या कलीग्जने लिहिलेलं पत्र - अरनब गोस्वामी से नाराज 'टाइम्स नाऊ' वालों ने मालिकों को भेजा लंबा-चौड़ा मेल, आप भी पढ़ें
अतिच मोठं आहे. पूर्ण नाही वाचलं.
अर्णबने #AAPBreaksUp पेक्षा #TimesNowBreaksUp वर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. नेशन वॉण्टस तु नो व्हाय ही इज नॉट डुइंग सो.....
<<मिर्ची ताई - तुमच्या एकुण
<<मिर्ची ताई - तुमच्या एकुण विचारावरुन तुम्ही हळुहळु डावीकडे सरकत चालला आहात. मला केजरीवाल आणि आप ची हीच भिती वाटते.>>
हे डावं-उजवं मला काही कळत नाही. सुवर्णमध्य नाहीच का साधता येणार?
<<पोलिस सरकारी कर्मचारी आहे. त्याने दंड घेउन सरकार जमा करणे अपेक्षीत आहे. म्हणुन ट्रॅफिक-पोलिसाने पैसे घेणे हा भ्रष्टाचार आहे. शाळेत डोनेशन घेणे हे पूर्ण पणे वेगळे आहे.>>
म्हणजे फक्त सरकारी विभागात चालतो तोच भ्रष्टाचार का? इतर क्षेत्रांमध्ये पारदर्शकता असण्याची गरज नाही असं नाही ना म्हणायचं तुम्हाला?
<<असे असेल तर पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा का चालत नाहीत RET साठी. पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा पण लोकांनी भरलेल्या टॅकस मधुन चालतात >>
अवस्था माहीत आहे का जिप शाळांची??? खूप लिहिता येईल ह्या गोष्टीवर. शिक्षणातील अनास्था हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण एक आख्खी पिढी ध्वस्त होतेय त्यातील गैरप्रकाराने.
<<दिल्ली विज वादात कोणत्याही कंपन्या तिथे असतिल तरी परीणाम बदलला नसता आलेख फ़क्त वर खाली. चुकीच्या पद्धतीने केलेल्या खाजकीकरणाचा दोष हा फ़कत त्या कंपनीचा कसा?
२ ग़ घोटाळा झाला म्हणजे मोबाईल फ़ोन कंपन्या वाईट झाल्या का? समजा एखाद्या कंपनिने त्या प्रक्रियेत भाग घेतल नसता तर त्या कंपनीचे नुकसान झाले असते त्यांनी केलेली गुंतवणुक फ़ुकट गेली असती. प्राप्त परिस्थितीत त्याना ज्या प्रक्रियेने लायसंस मिळाले ती स्विकारवीच लागली. >>
यूरो,
ठळक केलेल्या मुद्द्यांशी सहमत. दोष फक्त कंपन्यांचा नाहीच. हा गैरप्रकार घडू देणारे मंत्री-संत्री ह्यांना आधी अकाऊंटेबल बनवायला पाहिजे.
मागच्या पानावर अंजली दमानियांची मोठ्ठी इंग्रजी पोस्ट टाकली होती. सगळे नियम धाब्यावर बसवून कसे एकाच कंपनीला अधिकांश प्रकल्प दिले गेले आहेत ह्याचा उल्लेख आहे. का घडतं असं ? दोष जितका कंपनीचा आहे त्याहून कित्येक पटीने जास्त हे घडू देणार्या संबंधित अधिकार्यांचा आहे.
पण सध्याचं केंद्रसरकार अशा मंत्र्यांना अँटिकरप्शन सेलच्या तावडीतून वाचवण्यासाठी कटिबद्ध असल्यासारखं वागतंय.
<> स्वागत
<>
स्वागत मनोजमाने९७९.
कप्पाळ....माझा कसला हट्ट आणि इगो? मला मिर्ची ह्या नावाने कोणीही ओळखत नाही इथे. माझ्या दुसर्या आयडीने मला भरपूर माबोकर दोस्तमंडळी आहेत. पुन्हा एस्टॅब्लिश वगैरे व्हायची किंवा स्वतःला सिद्ध करायची काहीच गरज नाही.
अचानक आले तशीच गायब झाले तरी कोणाला काही फरक पडणार नाही (उलट हुश्श करतील बरेच :हाहा:)
विचार लादायचं म्हणाल तर मी काय प्रत्येक धाग्यावर रिक्शा फिरवतेय का की या रे या, माझा धागा वाचा. माझे विचार मांडतेय. ज्याला पटत असतील ते वाचत असतील, ज्याला पतत नसलेले विचारही वाचायचं वावडं नसेल तेही वाचत असतील. तुम्ही कशाला लोड घेताय? चिल...
<<राज, भाजपने आआप फोडायला
<<राज, भाजपने आआप फोडायला घेतलाय असं तुम्ही दिलेल्या बातमीतून सूचित होतंय बहुतेक.>>
गापै +१
भाजपा एकटा नाही. साथी हाथ बढाना चालू आहे भाजपा आणि काँग्रेसचं. काहीही करून त्यांना केजरीवालांना मुमंच्या खुर्चीपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. कारण आता केजरीवालांना तत्वासाठी का होईना खुर्ची सोडल्याचा धडा मिळालाय. आता ते पुन्हा चूक करणार नाहीत.
<<कसं काय? शांती भूषण विकले गेलेत असं म्हणायचंय का तुम्हाला? की जे आआप सोडतील किंवा आआप मध्येच राहून विरोधी बोलतील ते वाईट किंवा विकले गेले आहेत असं मानूनच चालायचं?>>
अश्विनी, राजला दिलेल्या उत्तरातील व्हिडिओ पहा सवड मिळाल्यास.
वस्था माहीत आहे का जिप
वस्था माहीत आहे का जिप शाळांची??? खूप लिहिता येईल ह्या गोष्टीवर. शिक्षणातील अनास्था हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण एक आख्खी पिढी ध्वस्त होतेय त्यातील गैरप्रकाराने.>>>>>>>
मिर्चीताई - तुम्ही एका गोष्टीवरुन दुसर्यावर उड्या मारु नका. तुम्ही आधी डोनेशन चा विषय काढलात. नंतर RET चा काढलात. नंतर घरच्या कामवालीला मर्सिडीज नाही तर साधी गाडी नको का असे म्हणालात. म्हणुन मी लिहीले की तुम्हाला जर मर्सिडीज परवडत असेल ( डोनेशन देवुन प्रवेश ) तर तुमच्या कामवाली साठी जिल्हा परिषद शाळा ( साधी गाडी ) आहेतच.
मला जिल्हा परिषद शाळाची अवस्था चांगली माहीती आहे. सध्या भारतात नसलो तरी सर्व गोष्टींची जवळुन माहीती आहे. भारतात फक्त शिक्षणाचीच नाही तर प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल अनास्था आहे.
म्हणजे फक्त सरकारी विभागात
म्हणजे फक्त सरकारी विभागात चालतो तोच भ्रष्टाचार का? इतर क्षेत्रांमध्ये पारदर्शकता असण्याची गरज नाही असं नाही ना म्हणायचं तुम्हाला? >>>>>> येस. खाजगी क्षेत्रातला कोणी जर पैसे खात असतील त्याचा मालक बघुन घेइल. नको तिथे नाक घालू नये ( कोणीच ).
सरकार म्हणजे Common Wealth आहे, आणि जनता हीच मालक आहे. त्यामुळे जनतेने सरकारी विभागात चालणार्या भ्रष्टाचाराबद्दल काळजी करावी.
माझ्या दुसर्या आयडीने मला
माझ्या दुसर्या आयडीने मला भरपूर माबोकर दोस्तमंडळी आहेत. पुन्हा एस्टॅब्लिश वगैरे व्हायची किंवा स्वतःला सिद्ध करायची काहीच गरज नाही.>>>>>>>>> मिर्चीताई - तुम्हाला आपचा समर्थक असणे हे लज्जास्पद वाटते का? तुमच्या दुसर्या आयडी ने तुमचे हेच विचार लिहण्यात काय प्रॉब्लेम आहे. जे बरोबर आहे ते बरोबर आहे. खरे ना.
अचानक आले तशीच गायब झाले तरी कोणाला काही फरक पडणार नाही (उलट हुश्श करतील बरेच )>>>>> हे मात्र खरे आहे. तुमचे काही विचार, कोलांट्याउड्या, विषयाला फाटे फोडलेले बघितले की कधी कधी एकदम डोके आउट होते.
<<मिर्ची ताई - तुमच्या एकुण
<<मिर्ची ताई - तुमच्या एकुण विचारावरुन तुम्ही हळुहळु डावीकडे सरकत चालला आहात. मला केजरीवाल आणि आप ची हीच भिती वाटते.>>
हे डावं-उजवं मला काही कळत नाही. सुवर्णमध्य नाहीच का साधता येणार?
>>>>>>>>> हा कल्पनारम्य विचार आहे. सुवर्ण मध्य हा Right of Center च असेल ( जर असला तर ).
लोड होत नाहिये तो व्हिडिओ
लोड होत नाहिये तो व्हिडिओ
अश्विनी, होतोय की लोड. पुन्हा
अश्विनी,
होतोय की लोड. पुन्हा उघडून पाहिला आत्ता. टाइम्सनाऊच्या साइटवरचा आहे - http://www.timesnow.tv/videoshow/4461772.cms
टोचा,
तुम्हाला कोलांट्याउड्या कुठे दिसल्या ते काही कळलं नाही. असो.
<<म्हणुन मी लिहीले की तुम्हाला जर मर्सिडीज परवडत असेल ( डोनेशन देवुन प्रवेश ) तर तुमच्या कामवाली साठी जिल्हा परिषद शाळा ( साधी गाडी ) आहेतच.>>
म्हणूनच तर विचारतेय की जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या आहेत का??? तर तुम्हाला ते अन-रिलेटेड वाटतंय.
<<येस. खाजगी क्षेत्रातला कोणी जर पैसे खात असतील त्याचा मालक बघुन घेइल. नको तिथे नाक घालू नये ( कोणीच ).सरकार म्हणजे Common Wealth आहे, आणि जनता हीच मालक आहे. त्यामुळे जनतेने सरकारी विभागात चालणार्या भ्रष्टाचाराबद्दल काळजी करावी.>>
१००% असहमत. तुम्हाला सत्यम घोटाळ्यावर आक्षेप नाही तर ?
<<मिर्चीताई - तुम्हाला आपचा समर्थक असणे हे लज्जास्पद वाटते का? तुमच्या दुसर्या आयडी ने तुमचे हेच विचार लिहण्यात काय प्रॉब्लेम आहे. जे बरोबर आहे ते बरोबर आहे. खरे ना.>>
अज्जिबात लज्जास्पद वाटत नाही. मी ज्यांना समर्थन करतेय त्यांचा मला (अजूनतरी) अभिमान आहे. भले प्रवाहाविरुद्ध असतील ते, पण योग्य आहेत (असं मला वाटतं. तुम्हाला पटायलाच हवं असा कुठलाच आग्रह नाही)
दुसर्या आयडीने का लिहितेय त्यासाठी धागा आधीपासून वाचून काढा.
<<तुमचे काही विचार, कोलांट्याउड्या, विषयाला फाटे फोडलेले बघितले की कधी कधी एकदम डोके आउट होते.>>
टेक अ ब्रेक. थोडे दिवस फिरकूच नका इकडे. शांत वाटेल. मीपण अधनंमधनं ब्रेक घेते. आपण केजरीवाल नाही ब्वॉ, अथक तेच तेच करायला.
टेक अ ब्रेक. थोडे दिवस फिरकूच
टेक अ ब्रेक. थोडे दिवस फिरकूच नका इकडे. शांत वाटेल. मीपण अधनंमधनं ब्रेक घेते. आपण केजरीवाल नाही ब्वॉ, अथक तेच तेच करायला. >>>>>> केजरीवाल तेच तेच करतोय त्यात त्याचा स्वार्थ आहे. त्यामुळे त्यात काही कौतुकास्पद नाही.
मला ही माझा स्वार्थ बघायला पाहीजे.
परतची लिंक पण क्लिक केली.
परतची लिंक पण क्लिक केली. माझ्याकडे नाही होत आहे. लोड होतानाचं चक्र नुसतं फिरत राहतंय. कदाचित मोठा असेल. आणि मोठा असेल तर इकडून एवढा वेळ बघता येणार नाही. रविवारी जरा निवांत आहे, तेव्हा लक्षात राहिलं तर घरून बघेन. पण राजकारण हे असं आहे ना, की तोपर्यंत अजून काहीतरी वेगळीच बातमी असेल
टोचांना दिलेल्या सत्यम
टोचांना दिलेल्या सत्यम घोटाळ्याच्या लिंकमध्ये PricewaterhouseCoopers चं नाव वाचून दुसरं एक कनेक्शन लक्षात आलंय...टॅडँ...न्युरॉन्स कनेक्टिंग. लिहिते ह्या आठवड्यात जमलं तर.
केजरीवाल यांच्या संघटन
केजरीवाल यांच्या संघटन कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे ताजमहालच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे. केजरीवाल यांनी अण्णांची चळवळ आणि आम आदमी पक्षाची उभारणी केली. या चळवळीला अवघ्या जगाने वाखाणले. एवढं असूनही जर केजरीवाल यांच्या नेतृत्वावर शंका घेतली जात असेल तर ती खेदाची बाब आह', असे आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हा सरळ्सरळ श्रेय लाटण्याचा प्रकार नाही का ?
केजरीवाल यांनी अण्णांची चळवळ उभी केली? अण्णांच्या चळवळीमुळे संघटीत झालेलं जनमत केजरीवाल यांनी आपच्या निमित्ताने एन्कॅश केलं असताना अण्णांच्या चळवळीचं श्रेय केजरीवालना?
आणि हो, हे ट्वीट आहे. ट्वीटरचा व्हीडीओ नसतो. खाली फोटो आहे.
११०० पोहचले एकदाचे
११००
पोहचले एकदाचे
<<पोहचले एकदाचे>> ११०० पोस्टी
<<पोहचले एकदाचे>>
११०० पोस्टी दक्षिणेचा संकल्प केला असल्यासारखं बोलताय
<<हा सरळ्सरळ श्रेय लाटण्याचा प्रकार नाही का ?
केजरीवाल यांनी अण्णांची चळवळ उभी केली? अण्णांच्या चळवळीमुळे संघटीत झालेलं जनमत केजरीवाल यांनी आपच्या निमित्ताने एन्कॅश केलं असताना अण्णांच्या चळवळीचं श्रेय केजरीवालना?>>
वाचलं होतं ते ट्वीट. मी आपच्या जवळजवळ सर्व नेत्यांना ट्वीटरवर फॉलो करते. मोदींनाही करते (मनाविरूद्ध).
ऋता,
ह्यावर चर्चा झाली होती. आप विरोधकांना ही गोष्ट कितीही हास्यास्पद वाटली किंवा पचायला जड गेली तरी वस्तुस्थिती तशी आहे असं दिसतं. अण्णा आंदोलनाचा चेहरा अण्णांचा होता, पण मास्टरमाइंड केजरीवालांचं होतं. ह्यावर सुरूवातीच्या पानांवर चर्चा झाली आहे. वाचून बघा.कदाचित पटणार नाही,पण वाचायला हरकत नाही.
“This little tiny ant has
“This little tiny ant has gotten inside the trunk of an elephant,” said Yogendra Yadav, a prominent political scientist who is serving as an adviser to the new party, “and the elephant is hopping mad.” काण्ट अॅग्री मोअर...
>>राज, भाजपने आआप फोडायला
>>राज, भाजपने आआप फोडायला घेतलाय असं तुम्ही दिलेल्या बातमीतून सूचित होतंय बहुतेक. आ.न., -गा.पै. <<
च्यायला, आनगापैंना मिर्चीताईंनी हिप्नोटायज तर नाहि ना केलं?
मिर्चीताई, ऑर्गायनाझेशन स्किल्स असल्याशिवाय राजकारणात नेता होता येतं? प्लीज, एन्लायटन...
इथे आपच्या नेतेमंडळीतच मोठ्ठा डिस्कनेक्ट आहे [एक (शांभु) म्हणतो - नो ऑर्ग स्किल्स, दुसरा (आशुतोष) म्हणतो - अण्णांची चळवळ त्यानेच तर वाढवली, तिसरी (शानिया) म्हणते - पक्षात हुकुमशाहि...]; तर लोकांना असं कनेक्ट करणार?
राज, >> च्यायला, आनगापैंना
राज,
>> च्यायला, आनगापैंना मिर्चीताईंनी हिप्नोटायज तर नाहि ना केलं?
छे हो! मला तर केजरीवालांनी हिप्नोटाईझ केलंय बघा! त्याचं काय झालं की, मिर्चीताई माबोवर वाचकांना ढाप्नोटाईझ करतात. मी ढापणं दूर सारायला गेलो तोच केजरीवालांशी नजरानजर झाली.
आ.न.,
-गा.पै.
मिर्ची, आत्ता घरुन वेळ
मिर्ची, आत्ता घरुन वेळ मिळाल्यावर पाहिला व्हिडिओ.
केजरीवाल आणि कंपू म्हणजे
केजरीवाल आणि कंपू म्हणजे 'हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे' असा प्रकार आहे.
राजनीती के लिये आये ही नाही म्हणणारे एकहाती सत्तेसाठी आता किती व्याकूळ झाले आहेत ते दिसत आहे.
Ji gosht sahaj prapt hote ti
Ji gosht sahaj prapt hote ti jast kaal tikat nahi. Lokanni aaple bhavishya kejriwal chya hatat dile mukhymantri banvle aani kejriwal ne kay kele nuste bolebachhan kele.kejriwal eka mata che mol janto ka ? Kejriwal che sakali tond jari pahile ki divas kharab jato.. Uesless...
सर्व माबोकरांना
सर्व माबोकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी माझा जन्मही झाला नव्हता. क्रांती म्हणजे काय आणि क्रांतिकारी व्यक्तींना कोण-कोणत्या अग्निदिव्यातून जायला लागतं हे याचि देही याचि डोळा अनुभवायची संधी दिल्याबद्दल, स्वराज आणि भ्रष्टाचारनिर्मूलन ह्या संकल्पनेशी प्रामाणिक राहून कार्यरत असणार्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांचे आभार आणि शुभेच्छा !
(Who all smirked? :फिदी:)
आज मनोज मानेंचा दिवस खूपच खराब जाणार
<मिर्चीताई, ऑर्गायनाझेशन
<मिर्चीताई, ऑर्गायनाझेशन स्किल्स असल्याशिवाय राजकारणात नेता होता येतं? प्लीज, एन्लायटन...
इथे आपच्या नेतेमंडळीतच मोठ्ठा डिस्कनेक्ट आहे [एक (शांभु) म्हणतो - नो ऑर्ग स्किल्स, दुसरा (आशुतोष) म्हणतो - अण्णांची चळवळ त्यानेच तर वाढवली, तिसरी (शानिया) म्हणते - पक्षात हुकुमशाहि...]; तर लोकांना असं कनेक्ट करणार?>>
शांभु अजूनही बरंच काही बोलले. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ते न बोललेली वाक्ये त्यांच्या तोंडात बळजबरीने घुसवणार्या प्रसारमाध्यमांना सल्ला - अजून चालू द्या असे प्रकार. काल आपला मिळालेल्या देणग्यांमध्ये एक्पोनेन्शिअल वाढ झाली असं वाचण्यात आलं.
शाझियातैंना दिल्लीतून तिकीट हवं होतं. पक्षाने त्यांचं ऐकलं नाही. ह्यामुळे त्या नाराज आहेत. केजरीवालांना मान्य नसतानाही बहुमताचा निर्णय म्हणून आपने देशभरात उमेदवार उभे केले, ह्यापेक्षा पक्षांतर्गत लोकशाहीचं मोठं उदाहरण काय असणार?
"मुझे करेले,दीदी को आलू,पापा को दाल,भाई को कढ़ी पसंद है।मम्मी ने आलू और दाल बनाये।घर में लोकतंत्र नही है। मुझे दूसरी मम्मी चाहिए। - चंचल शर्मा, देहलीज पे दिल च्या सहलेखिका"
प्रितिका आणि मनोज माने,
विरोधात लिहायला हरकत नाही. पण बिनामुद्द्यांचं नुसतंच ट्रोलिंग करायचं असेल तर मायबोलीचा गैरवापर करण्यापेक्षा फेबु, ट्विटरवर करावं ही विनंती. तिथे तुम्हाला समविचारी ट्रोल्स ढीगाने भेटतील. आणखी बळ मिळेल तुम्हाला.
Mirchi tumhala aani sarv
Mirchi tumhala aani sarv maaybolikar yanna swatntra divsachya hardik subhecha. Aaso tumcha stamina jabardast aahe....best of luck. Are re he kay lagli panvati
Pages