Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला विचारलेल्या
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर न देता इतरांना प्रतिप्रश्न केलेत तर त्यांनी उत्तर देण्याची अपेक्षा तुम्ही कशी ठेवता?
त्यांनी उत्तर दिलं नाही म्हणून मी देणार नाही हा शुध्द पलायनवाद आहे.
मिर्ची, केजरीवाल संबंधित एका
मिर्ची,
केजरीवाल संबंधित एका ब्लॉगच्या लिंकवर आम्ही विश्वास ठेवावा?
अमिताभ ठाकूर यांची व्हिडिओ लिंक द्या.
मिर्ची ताई, होलियर दॅन दाऊ
मिर्ची ताई,
होलियर दॅन दाऊ आहेत असे तुम्ही म्हणता कारण
होलियर दॅन दाउचं म्हणाल तर परिस्थितीच सध्या तशी आहे.
१. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना दिलेलं तिकीट रद्द करणे
२. पक्षाला मिळालेल्या देणग्या पब्लिक डोमेनमध्ये टाकणे
३. तात्विक मतभेद असलेल्यांशी यशस्वी होण्यासाठी हातमिळवणी न करणे
हे तुमचे क्रायटेरीया आहेत. वास्तवात ही आयडीयॉलॉजी चालत नाही.
आपणे ३१% पासुन सुरुवात करुया.
भाजप ३१% आणि कॉंग्रेस १९% मते मिळाली आणि इतर सगळ्या स्थानिक पक्षाना ५०% मते मिळाली. मतांचे विभाजन बघा.
राष्ट्रीय स्तरावर अस्लेल्या पक्षाना मते न मिळता स्थनिक पक्षाना ५०% मते मिळत आहेत.
बंगाल , तामिळ्नाडु ओरीसा सारख्या रज्यात तर ९०% पेक्षा जास्त जागा या स्थनिक पक्षानी मिळ्वल्या आहेत. (बकी रज्ये अस्तिल तुम्हीच लिक शोधुन एनलाइज करा)
या राज्यात जे पक्ष निवडुन आले आहेत त्यांचे कोणतेही निवडणुक पुर्व राष्ट्रिय पक्षाशी गटबंधन नव्हते. म्हणजेच त्यांना मिळालेली मते ही स्थानिक पक्षाला मिळालेलीच मते आहेत. जर जयललिता किंवा ममता यांनी निवडणुकी नंतर कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी पाठींबा दिला असता तरी त्या मतदारांना काहीही फ़रक पड्णार नव्हता. तो सर्व अधीकार त्यांनी त्या पक्षाच्या प्रमुखा ला दिलेले होते. समजा पोस्ट पोल कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नसते तर या सर्व पक्षांचे किंवा यातल्या काही पक्षाचे पाठ्बळ सरकार स्थापने साठी घ्यावे लागले असते.
इथे केंद्रात कोणताही पक्ष असता कॉंग्रेस, भाजपा, तुमचा आआप तरी या मतदारांना कही फ़रक पडणार नव्हता.
व्यापक राष्ट्रिय हित लक्षात घेवुन मतदान झालेले नाही. तुम्हाला असे म्हणायचे असेल की इथल्या लोकांना भ्र्ष्टाचार होतो आहे हे महितच नाही त्यांना फ़सवले आहे तर मग काय बोलणार?
इथले मतदान सतत्याने राष्ट्रिय पक्षाला न होता स्थनिक पक्षाला का होते. १९८५ नंतर स्थनिक पक्ष एवढे जास्त प्रमाणावर डॉमिनेट का करतात? कारण भ्रष्टाचार हा एकमेव मुद्दा त्यांच्या निर्णय घेण्यास कारणीभुत नाही तर पाणी , रोजगार, मुलभुत सुविधा या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. खरे तर स्थनिक पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरचढ होणे हे अस्थिर सरकार असण्याचे मोठे कारण आहे. तेव्हा तुम्हाला आवडो की न आवडो सरकार स्थापन करण्या साठी मदत घ्यवी लागते आयडीयोलॉजीकल डिफ़रन्सेस असले तरी.
असे गटबंधन करताना त्या पक्षाने कोणता उमेदवार उभा करणार किंवा केला यावर राष्ट्रिय पक्ष अंकुश ठेवु शकत नाही.
तुम्ही मदत घेतली नाही तर कोणी तरी दुसरा मदत घेवुन सरकार स्थापन करतो.
येडीयुरप्पांची निवड जरी वादग्रस्त असली तरी सुधा अशा उमेदवारांना पठिंबा देणारा एक मोठा मतदारांचा वर्ग असतो त्यांना इग्नोर करुन राजकारण करता येत नाही. त्यांनी काय केले हे जरी त्या लोकांना ठावुक असले तरी तो मतदर वर्ग त्यांच्या बाजुने उभा असतोच या वर तुम्ही काय करु शकता? आदर्श घोटाळ्याचा एवढा गजावजा झाला तरी अशोक चव्हाण मोठ्या मतधिक्याने निवडुन आलेच हे तुम्ही कसे नजरे आड करता?इथे लोकांना फ़सवले आहे असे म्हणता येत नाही
आधिच नियम ठरवुन दर वेळी राजकारण करता येत नाही. समाजकारण आणि राजकारण यात फ़रक आहे.
अजुन बरच आहे पण ते नंतर.
यूरो, खुप चांगली पोष्ट.
यूरो, खुप चांगली पोष्ट.
<<तुम्हाला विचारलेल्या
<<तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर न देता इतरांना प्रतिप्रश्न केलेत तर त्यांनी उत्तर देण्याची अपेक्षा तुम्ही कशी ठेवता?>>
धन्य ! मग हजारांच्या वर पोस्टींमध्ये काय रांगोळी घातली आहे?
<<मिर्ची,
केजरीवाल संबंधित एका ब्लॉगच्या लिंकवर आम्ही विश्वास ठेवावा?
अमिताभ ठाकूर यांची व्हिडिओ लिंक द्या>>
विश्वास कुणी कशावर ठेवायचा हा अगदीच वैयक्तिक प्रश्न आहे. तुमचं तुम्ही ठरवा.
अमिताभ ठाकूर असं म्हटले असते की "केजरीवाल हेच जगातील एकमेव प्रामाणिक नेते आहेत" आणि मी ते वाक्य कोट केलं असतं तर कदाचित व्हिडिओ लिंक मागणं उचित असलं असतं
त्यांनी काय मुद्दे मांडले आहेत ते वाचा. सरकारी नोकरीतील अॅग्रीमेंटमध्ये त्यांनी लिहिलंय तसं काही नसेल तर त्याचा प्रतिवाद करा.
तुम्ही विरोधक ना? मग माझी मते खोडण्यासाठी व्हिडिओज तुम्ही शोधायचे. मी का पुरवू ?
यूरो,
पोस्ट अगदीच गडबडीत वाचली आहे. नंतर नीट वाचते.
<<तुम्हाला असे म्हणायचे असेल
<<तुम्हाला असे म्हणायचे असेल की इथल्या लोकांना भ्र्ष्टाचार होतो आहे हे महितच नाही त्यांना फ़सवले आहे तर मग काय बोलणार?>>
यूरो,
भ्रष्टाचार होतो आहे हे मतदारांना नक्कीच माहीत आहे. त्याविरोधातच निवडणूक लढवली गेली. पण गुजरातच्या खोट्या विकासाचं मृगजळ दाखवून मतदारांची दिशाभूल केली गेली. आणि ह्याला मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमे जबाबदार आहेत.
हे वाचा. ताजी बातमी - CLIMB SUCCESS LADDER BY HOLDING UP BLADDER
"However, no alternative provision has been made for the students, some of whom are already suffering from bladder dysfunction and incontinence."
ही विकासराज्यातली परिस्थिती आहे, जिथे विकासपुरूष १२ वर्षांपासून गादी सांभाळत होते. एका राज्यात नीट सुविधा पुरवता येत नाहीत आणि लालकिल्ल्यावरून आख्ख्या देशातल्या शौचालयांबद्दल लंबी लंबी बातें ? आणि 'लाटे'तही न वाहून गेलेल्या ६९% वाल्यांनी त्यावर विश्वास ठेवायचा म्हणता ?
मुद्दा असा की ह्या बातम्या निवडणूकपूर्व काळात कुठे होत्या? काही वर्तमानपत्रे तेव्हाही हे सांगायचा प्रयत्न करत होती पण दुर्दैवाने त्यांचा आवाज क्षीण पडला.
<<येडीयुरप्पांची निवड जरी वादग्रस्त असली तरी सुधा अशा उमेदवारांना पठिंबा देणारा एक मोठा मतदारांचा वर्ग असतो त्यांना इग्नोर करुन राजकारण करता येत नाही. त्यांनी काय केले हे जरी त्या लोकांना ठावुक असले तरी तो मतदर वर्ग त्यांच्या बाजुने उभा असतोच या वर तुम्ही काय करु शकता? आदर्श घोटाळ्याचा एवढा गजावजा झाला तरी अशोक चव्हाण मोठ्या मतधिक्याने निवडुन आलेच हे तुम्ही कसे नजरे आड करता?इथे लोकांना फ़सवले आहे असे म्हणता येत नाही>>
राजकारण करायचं म्हणजे नेमकं काय इथेच आपले मतभेद आहेत. नंदिनीतैंचं आणि माझं सुद्धा ह्या बेसिकमध्येच एकदम विरोधी मत आहे.
राजकारण काय कुठली करिअरची शाखा आहे का??? उत्तम राजकारणपटू बनण्यासाठी वाट्टेल ते लोक सोबत घ्यायचे, वाट्टेल त्या तडजोडी करायच्या ह्याला काय अर्थ आहे? असं केल्याने तुम्ही म्हणता तसं सरकार स्थापन करता येईल. पण सरकार स्थापन का करायचंय? लोकांचं प्रतिनिधित्व करायला ना? त्यांची कामे करायला ना? मूळ उद्देश बाजूला राहत असेल तर सरकार स्थापन केलं तरी काय मोठी बाजी मारली?
येडियुरप्पा, अशोक चव्हाण हे निवडून येतात, तेव्हा लोक त्यांना का मतं देतात मला माहीत नाही. (खरंच इतकी मतं देतात का हा वेगळाच वादग्रस्त मुद्दा, ज्यात मला पडायचं नाही)
पण असे लोक निवडून येऊ नयेत ह्यासाठी एकच उपाय...त्यांना तिकीट न देणं !
<<आधिच नियम ठरवुन दर वेळी राजकारण करता येत नाही. समाजकारण आणि राजकारण यात फ़रक आहे.>>
गुन्हेगारी आणि राजकारण ह्यातही फरक आहे ! आणि तो तसा राहिला तरच आपलं कल्याण आहे.
गुन्हेगारीशी राजकारणाशी सांगड आपल्याला मान्य आहे पण समाजकारणाशी नाही, ह्यातलं लॉजिक माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचं आहे.
उदाहरण द्यायचं तर मुलायमसिंग काय आणि जेटली काय. बलात्काराबद्दल असली असंवेदनशील मतं असलेल्यांकडून स्त्रियांची सुरक्षितता सांभाळण्यासाठी काहीही ठोस घडणं अवघड आहे. 'येडा मुख्यमंत्री'च हवा त्यासाठी
AAP anti-graft helpline a
AAP anti-graft helpline a call centre for cops
"Barely a week old, the helpline is already popular and tasted its first success on Thursday. A CBI anti-corruption unit arrested two Railway Protection Force (RPF) officials and booked two others for demanding a bribe from a contract sweeper."
थ्री चिअर्स !
Call 96999-49331 - मुंबईकर माबोकरांनी कॉल करून माहिती घ्यायला हरकत नाही. कुणाला हेल्पलाइनचे काही बरे-वाईट अनुभव आले असतील तर तेही नोंदवल्यास आणखी माहिती मिळेल.
Jnanpith awardee UR
Jnanpith awardee UR Ananthamurthy on Thursday said he would have joined the Aam Aadmi Party (AAP) if age had been on his side.
At an interaction of Ananthamurthy with students and members of the public by Tumkur University, the writer said: "My age doesn't permit me to enter politics. An AAP-like political party is a necessity in today's politics. Arvind Kejriwal is doing good work."
दरम्यान, अनंतमूर्तींच्या निधनाचा प्रसंग कर्नाटकात विशिष्ट दलाच्या लोकांनी फटाके उडवून साजरा केला अशी बातमी वाचण्यात आली.
शांत गदाधारी भीम शांत!
शांत गदाधारी भीम शांत! (लाईट्ली घ्या)
मिर्ची ताई मुद्दा गडबडतो आहे. मी लिहीलेले नीट बघा. ५०% वोट ही स्थानिक पक्षांना गेलेली आहेत. यात ३१% आणि १९% मिळालेले पक्ष नाहीत. ही जी वोट अशी राज्यवार विभागली गेली आहेत म्हणुन ३१% मिळवुन बहुमत मिळवण्यात यशश्वि झाले आहेत. ही जर आणखी विभागली गेली तर उद्या १९% मिळवणारे पण जोडतोड ख़रुन सत्तेत येवु शकतात. ५०% वोटरना कोणालाही सपोर्ट दिला तरी काहीच फ़रक पडत नाही आहे.
व्यापक राष्ट्रिय हित बघुन मतदान होत नाही आहे. जेवढे स्थानिक पक्ष मतंचे विभाजन करतिल तितके हे जास्तिजास्त कठीण होत जाणार आहे. आआप ने राजकारण करणे म्हणजे यातिल चागल्या पक्षाना एकत्र आणुन राष्ट्रिय स्तरावर एक मजबुत संघटन उभे करणे होय. त्यासाठी नुसते एकाच गोष्टीचा पाठ्पुरावा ख़रुन भागणार नाही. एकाच गोष्टीचा पाठ्पुरावा केला तर ती फ़क्त एक चळवळ उरते. लोक त्याकडे फ़क्त एक आंदोलन म्हनुनच बघणार आहेत.
तुम्ही म्हणता प्रगतिचा खोटा प्रचार ख़रुन निवडणुक जिकली. यात तुम्ही म्हत्वाचा मुद्दा सोडुन देत आहात. लोकांना प्रगति हवी आहे म्हणुन ते तिकडे आकृष्ट झाले आहेत सगळे बाजुला ठेवुन. प्रचार कसाही असला तरी तो लोकांना काय हवे आहे याची नाडी ओळखुन केलेला आहे.तुम्ही तोच मुद्दा बाजुला ठेवुन तो कसा खोटा आहे हे सांगण्यात आपली सगळी एनर्जी व्यतीत करत आहात.
सध्या खरच वेळ नाही तेव्हा इथेच थांबतो. परत वेळ मिळाल्यावर आणखिन सविस्तर लिहीन.
<<शांत गदाधारी भीम शांत! >>
<<शांत गदाधारी भीम शांत! >>
हिडिंबा म्हणा हवं तर, भीम कशी होणार मी?
<<आआप ने राजकारण करणे म्हणजे यातिल चागल्या पक्षाना एकत्र आणुन राष्ट्रिय स्तरावर एक मजबुत संघटन उभे करणे होय. त्यासाठी नुसते एकाच गोष्टीचा पाठ्पुरावा ख़रुन भागणार नाही. एकाच गोष्टीचा पाठ्पुरावा केला तर ती फ़क्त एक चळवळ उरते. लोक त्याकडे फ़क्त एक आंदोलन म्हनुनच बघणार आहेत.>>
मला नाही वाटत आपसोबत दुसरे पक्ष एकत्र येतील. आपच्या आयडियॉलॉजीसोबत सहमत असणारे कुठले पक्ष आहेत? आणि आपने सत्तेसाठी किंवा राजकारणात यशस्वी होण्यासाठी आयडियॉलॉजीशी मुळीच तडजोड करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. नाहीतर देशातील ढीगभर पक्षांमध्ये आणखी एकाची भर पडेल.
मजबूत संघटन करायला हवंय ह्यात शंका नाही. ते करत आहेत, अजून करतील.
एकाच गोष्टीचा पाठपुरावा म्हणाल तर त्याशिवाय पर्यायच नाही. भ्रष्टाचाराला आळा घातल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात काहीही भरीव घडण्याची आशा दिसत नाहीये.
<<तुम्ही म्हणता प्रगतिचा खोटा प्रचार ख़रुन निवडणुक जिकली. यात तुम्ही म्हत्वाचा मुद्दा सोडुन देत आहात. लोकांना प्रगति हवी आहे म्हणुन ते तिकडे आकृष्ट झाले आहेत सगळे बाजुला ठेवुन. प्रचार कसाही असला तरी तो लोकांना काय हवे आहे याची नाडी ओळखुन केलेला आहे.तुम्ही तोच मुद्दा बाजुला ठेवुन तो कसा खोटा आहे हे सांगण्यात आपली सगळी एनर्जी व्यतीत करत आहात.>>
लोकांना प्रगती हवी आहे. पण ती होतेय का? दोन महिन्यांत का नाही झाली असं नाही विचारत मी. ज्या मॉडेलकडे पाहून लोकांनी आशा लावल्या तिथेच प्रगती झाली नाही तर इतरत्र कशी होईल?
एनर्जी व्यतीत करण्याचं म्हणाल तर कुणाला तरी हे करावंच लागेल. मी ह्या सगळ्याकडे एक सामाजिक योगदान म्हणून पाहतेय. (कोणा-कोणाला हसू आलं? :डोमा:)
२ % भारतीय मतदार 'लाट' असूनही आपसोबत आहेत. वाढतील अजून.
एक स्टिंग ऑपरेशन न्यूज२४ने
एक स्टिंग ऑपरेशन न्यूज२४ने प्रसिद्ध केलंय. उद्या किराडीमध्ये केजरीवालांची सभा होणार आहे. तिथे त्यांच्यावर हल्ला करण्याचं भाजपाचं कारस्थान चालू आहे असं स्टिंगमध्ये भाजपा आमदाराचा निकटवर्ती माणूस सांगतोय.
Sting : Revels that how Arvind Kejriwal will hit again on 24th Aug 14 (Hindi)
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान लाली नावाचा रिक्शाड्रायव्हर केजरीवालांना थप्पड मारणार होता तेसुद्धा ह्या लोकेश नावाच्या व्यक्तीला आणि भाजपा आमदार अनिल झा ह्यांना आधीच माहीत होतं.
Sting : How Auto Driver was Involved in the Slap incident (Hindi)
न्यूज २४ च्या चॅनेलवर मनिष सिसोदिया, अनिल झा ह्यांच्याशी स्टिंगविषयक चर्चा -
Sting Operation: Kejriwal may be attacked again during August 24 rally
"केजरीवाल इस मिट्टी के नहीं बने है के डर जायें" - मनिष सिसोदिया
काण्ट अॅग्री मोअर
राजकारणाची साफसफाई अतिशय निकडीची गोष्ट बनली असल्याचं पुन्हा एकदा जाणवतंय.
<<एकाच गोष्टीचा पाठपुरावा
<<एकाच गोष्टीचा पाठपुरावा म्हणाल तर त्याशिवाय पर्यायच नाही. भ्रष्टाचाराला आळा घातल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात काहीही भरीव घडण्याची आशा दिसत नाहीये...>>
<<राजकारणाची साफसफाई अतिशय निकडीची गोष्ट बनली असल्याचं पुन्हा एकदा जाणवतंय.>>
मला या धाग्यावर चकवा लगल्या सारख वाटत आहे.
मी सगळे वेगवेळे विषय लिहीतो तरी परत तिथेच कसा पोहोचतो हे कळत नाही म्हणुन म्हणतो आहे.
भ्रष्टाचार निघायला हवाच हो, ते अमान्य नाहीच आहे पण बाकी सग़ळ थांबवुन फ़क्त एवढेच एक काम करत राहाता येणार नाही.
Delhi Police files
Delhi Police files molestation case against AAP MLA Dharmendra Koli
AAP MLA booked for misbehaving with Congress leader's wife
http://www.indiatvnews.com/news/india/delhi-police-files-molestation-cas...
EXPOSED: Delhi Law Minister
EXPOSED: Delhi Law Minister Somnath Bharti was involved in selling pornographic domain names
In a major embarrassment to the Aam Aadmi Party (AAP), it has come to light that Delhi Law Minister Somnath Bharti was involved in selling pornographic domain names, English news channel Headlines Today reported on Friday.
Before entering into politics, Bharti was allegedly among top three Indian spammers who accounted for world's 80 percent spam, said another report published in The Times of India.
http://daily.bhaskar.com/news/DEL-aap-leader-somnath-bharti-was-involved...
I’m now 100 per cent sure
I’m now 100 per cent sure that Somnath Bharti ran Madgen and 2topsites.com
I was not willing to give too much credence to the spam reports against Somnath but now things have changed.
Regardless of whatever Somnath Bharti now claims, he can't change RECORDED history. From a tip in the following video (at the bottom) I searched waybackmachine.com for old records of somnathbharti.com and confirmed UNAMBIGUOUSLY that Somnath ran 2topsites.com, a company deeply implicated in illegal spam.
Here are screen shots to substantiate this. These are ALWAYS going to be available since waybackmachine is an automatic robot, and can never be manipulated.
http://www.sabhlokcity.com/2014/02/im-now-100-per-cent-sure-that-somnath...
Poster row: AAP leader Dilip
Poster row: AAP leader Dilip Pandey sent to 14 days judicial custody
New Delhi: AAP leader Dilip Pandey and two other party members were Saturday sent to 14 days' judicial custody by a court here on charges of promoting enmity between different communities.
Metropolitan Magistrate Sheetal Chaudhary rejected the bail application of the three Aam Aadmi Party leaders - Pandey, Ram Kumar Jha and Javed Khan - and sent them to judicial custody.
The court said there was enough material to show that the three leaders were involved in promoting enmity between different communities.
http://www.indiatvnews.com/politics/national/poster-row-aap-leader-dilip...
<<मला या धाग्यावर चकवा लगल्या
<<मला या धाग्यावर चकवा लगल्या सारख वाटत आहे.
मी सगळे वेगवेळे विषय लिहीतो तरी परत तिथेच कसा पोहोचतो हे कळत नाही म्हणुन म्हणतो आहे.
भ्रष्टाचार निघायला हवाच हो, ते अमान्य नाहीच आहे पण बाकी सग़ळ थांबवुन फ़क्त एवढेच एक काम करत राहाता येणार नाही.>>
तुम्ही धाग्याचा चकवा म्हणा मी देशाचा क्षयरोग म्हणते
भ्रष्टाचार न हटवता कुठली कामे व्यवस्थित करता येणार आहेत यूरो?
स्वागत शांताराम. एण्ट्रीलाच सगळे बाण वापरून टाकले तर तुमच्या भात्यात काय राहणार? की पुढच्या युद्धाला दुसरा आयडी?
<<भ्रष्टाचार न हटवता कुठली
<<भ्रष्टाचार न हटवता कुठली कामे व्यवस्थित करता येणार आहेत यूरो?>>
भ्रष्टाचार झाला म्हणुन कामे व्यवस्थित होत नाहीत पण ती पूर्णपणे थाबवताही येत नाहीत.
कोळसा खाणीमथे भ्रष्टाचार झाला आणि खाणी बंद ठेवल्या कोणाचे नुकसान झाले?
संरक्षण खरेदित भ्रष्टाचार झाला म्हणुन सैन्य बसवुन ठेवता येत नाही.
भ्रष्टाचार असला तरी व्यापारी तुटीवर उपाय योजना ही कराविच लागेल. भ्रष्टाचार आहे तो संपे पर्यंत उपाय योजना करणार नाही असे धोरण ठेवता येणार नाही.
यादी मोठी करता येइल तरी
पंजाब विधानसभा बाय पोल चे निकाल तुम्ही ऐकले असतिलच. दुष्ट बुद्धीने हे विचारले नाही आहे.
भ्रष्टाचार या मुद्या बद्द्ल आक्षेप नाही पण बाकीच्या गोष्टीं बद्दल आआप कधी बोलणार? ते पण लोकांना ऐकायला आवडेल.
<<भ्रष्टाचार असला तरी
<<भ्रष्टाचार असला तरी व्यापारी तुटीवर उपाय योजना ही कराविच लागेल. भ्रष्टाचार आहे तो संपे पर्यंत उपाय योजना करणार नाही असे धोरण ठेवता येणार नाही.>>
बरं, व्यापारीतुटीवर सध्या काय उपाय चालू आहेत?
४९ दिवस हा फार क्षुल्लक काळ आहे. पण भ्रष्टाचारावर उपाययोजना करायची म्हणून त्या काळात आप सरकारने बाकीची कामं बंद ठेवली होती का? चालूच होती ना?
आताचं सरकार आधीच्या सरकारलाही मागे टाकत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे निर्णय घेतंय.
<<पंजाब विधानसभा बाय पोल चे निकाल तुम्ही ऐकले असतिलच. दुष्ट बुद्धीने हे विचारले नाही आहे. >>
हो, पंजाब बायपोल्सचे निकाल ऐकले आणि त्यामुळेच दिल्लीबाहेर सध्या विधानसभा निवडणूका न लढवण्याचा केजरीवालांचा निर्णय अगदी योग्य आहे हे पुन्हा एकदा पटलं.
'प्रचंड लाट' असूनही अमेठी आणि रायबरेलीमध्ये बीजेपी का हरली ह्याचं उत्तर माहीत असेल तर पंजाबच्या निकालांचं आश्चर्य वाटायला नको.
<<भ्रष्टाचार या मुद्या बद्द्ल आक्षेप नाही पण बाकीच्या गोष्टीं बद्दल आआप कधी बोलणार? ते पण लोकांना ऐकायला आवडेल.>>
बोलून उपयोग काय? उदा. - पंप्र आधीही बोलतच होते, आत्ताही बोलतच आहेत !
ह्या धाग्याच्या सुरूवातीला विचारलं गेलं होतं (बहुतेक तुम्हीही विचारलं होतं) की आपची इकॉनॉमिक आणि फॉरिन पॉलिसी काय आहे?
तेव्हाही विचारलं होतं आणि आता पुन्हा मी विचारते की भाजपाची इकॉनॉमिक आणि फॉरिन पॉलिसी काय आहे?
इकॉनॉमिक पॉलिसीत सगळे काँग्रेसचेच कित्ते गिरवत आहेत. मग वेगळं काय?
फॉरिन पॉलिसीत तर सगळाच गोंधळ चाललाय. आधी काय बोलले होते, करत काय आहेत?
मला कल्पना आहे की इथे अनेकांनाच हे वाटतं की केवळ भ्रष्टाचार हा एकच मुद्दा उपयोगाचा नाही. पण मला स्वतःला वाटतं की हाच मुद्दा अतिमहत्वाचा आहे. आणि त्यावर नियंत्रण आणल्याशिवाय इकॉनॉमिक काय आणि फॉरिन काय कुठलीच पॉलिसी कितीही आकर्षक दिसत असली तरी ती कागदोपत्रीच राहणार !!
<<प्रचंड लाट' असूनही अमेठी
<<प्रचंड लाट' असूनही अमेठी आणि रायबरेलीमध्ये बीजेपी का हरली ह्याचं उत्तर माहीत असेल तर पंजाबच्या निकालांचं आश्चर्य वाटायला नको.>>
४ जागा लोकसभेत मिळाल्या नंतर डिपॉझीट जत्प झाले आहे. निदान तेवढे तरी व्हायला नको होते. मलाच तुमच्या पेक्षा जास्त अपेक्षा होती असे वाटते.
बरं, व्यापारीतुटीवर सध्या काय उपाय चालू आहेत?
बजेट च्या धाग्यात यावर आपण बोललो आहोत.
इकॉनॉमिक पॉलिसी मधे कित्ता गिरवणे म्हणजे काय?
भारताने एफ़ डी आय आणले त्या आधी चीन ने आणले इतर सर्व दक्षिण आशियायी देशांनी आणले म्हणजे सगळ्यानी एकमेकांचे कित्ते गिरवले असे होते क?
(प्लॅनिंग कमिशन बद्द्ल माहिती वाचली असेलच असे घरुन चालतो.) पॉलिसी बद्द्ल मतभिन्नता असेल वाद असतिल पण पॉलिसीच नाही असे दिसत नाही.मला तरी असे म्हणता येत नाही.
पंप्र नुसते बोलतत असे तुम्ही म्हणता. निदान काय करायचे आहे हे तरी सांगत आहेत.
फ़ॉरीन पॉलिसीचा गोंधळ काय आहे तो तरी तुम्ही सांगा. ज्ञानात भर पडेल.
लोकसभेच्या जागा लढवणार्या आआप पक्षाबद्दल एवढे साधे प्रश्न पण विचारु नयेत का? फ़ार रागावता बुवा तुम्ही.
<<फ़ार रागावता बुवा
<<फ़ार रागावता बुवा तुम्ही.>>
कायप्पण आं (माझ्या लेकाची इष्टाइल :फिदी:) मी कुठे रागावले आहे? उगीच असं म्हणू नका ब्वॉ सारखंसारखं. जमदग्नीची काकी असल्याचा भास व्हायला लागतो.
<<४ जागा लोकसभेत मिळाल्या नंतर डिपॉझीट जत्प झाले आहे. निदान तेवढे तरी व्हायला नको होते. मलाच तुमच्या पेक्षा जास्त अपेक्षा होती असे वाटते.>>
खरंच तुम्हाला अपेक्षा होती का? मला नव्हती. सरदारांची उगीच चेष्टा करतात सगळे. एवढ्या मोठ्या ११७ आमदारांच्या असेम्ब्लीत १ किंवा २ आपचे आमदार पाठवून काय उपयोग होणार होता?
दोन जागा बघाल तर एक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसच्या अमरिंदर सिंगांनी जेटलींना 'प्रचंड लाट' असतानाही हरवून लोकसभेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांची पटियालाची जागा रिकामी झाली. तिथे त्यांची पत्नी आत्ता उमेदवार होती. जेटली जिथे टिकले नाहीत तिथे आपचा उमेदवार जिंकण्याची अपेक्षा मला नव्हती.
दुसरी जागा - तलवंडी साबु (उच्चार?) हा अकाली दलाच्या बादलांचा बालेकिल्ला. हरसिमरत कौर बादल (पंजाब उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी, सध्या मोदींच्या सरकारात खातं सांभाळत आहेत) ह्यांचा मतदारसंघ.
इथला काँगी आमदार अकाली दलात सामील झाल्याने जागा रिकामी झाली. तिथे अकाली दलाचा उमेदवार जिंकल्यास त्यात आश्चर्य नाही.
पुढच्या विधानसभा निवडणूकीत (जर आपने लढवायचं ठरवलं तर) मतं मिळाली नाहीत तर मला पंजाबचं आश्चर्य वाटेल. (काय लोक आहेत, नुसतेच रोडशोला गर्दी करतात, मतं दुसर्यांनाच देतात वगैरे नावंही ठेवीन कदाचित :फिदी:)
बाकी, मोदींची इकॉनॉमिक पॉलिसी आणि फॉरिन पॉलिसी वेगळी/चांगली कशी हे माझ्या सध्यातरी आकलनाच्या बाहेरचं आहे. त्यावर जाणकारांकडून चर्चा झाली असती. पण धागा पद्धतशीरपणे बुडवला गेला.
एक मात्र नक्कीच दिसतंय की विकासाच्या गप्पा मागे पडल्या आहेत आणि लव जिहाद, हिंदू राष्ट्र असले विषय पुढे यायला लागले आहेत.
सुप्रिम कोर्टाच्या कालच्या
सुप्रिम कोर्टाच्या कालच्या निर्णयाने भ्रष्टाचाराविरोधी आंदोलन करणार्यांना नवीन बळ मिळालं असणार.
कुमार विश्वासांची पोस्ट -
Supreme Court terms all coal block allocations since 1992 illegal.Congratulations the PIL warrior Prashant Bhushan ! The Braveheart son of motherland "Bharat" ! Jai Hind !
" सलमान खुर्शीद से लेकर श्री रविशंकर प्रसाद तक और कपिल सिब्बल से लेकर राम जेठमलानी तक हर कांग्रेसी और भाजपाई वकील फीस लेकर मुक़दमे लड़ता रहा है ! कभी रिलायंस के तो कभी सहारा के ! कभी श्रीमती इंदिरा गांधी के हत्यारों को बचाने के लिए तो कभी एस्सार को सरकारी फायदा दिलाने के लिए !
पर एक और बड़े वकील हैं प्रशांत भूषण ! बड़े वकील पिता के काबिल बेटे ! बरसों से कोई मुकदमा फीस के लिए नहीं लड़ा,न किसी से कोई फीस ली ! दर्ज़नो मुकदमों में भारतमाता की ज़मीन,जंगल,जल और प्राकृतिक साधन नीच राजनेताओं और अफसरशाहों से बचाये ! चुपचाप अपना काम किया ! एक तोड़े-मरोड़े गए बयान के लिए दो भाजपाई गुंडों ने हमला किया तब भी शांत रहे,उन पर मुकदमा नहीं किया ! नहीं तो केस 307 का बनता था ! आज दोनों गुंडे जेल में होते न कि सांप्रदायिक गंदगी फैला रहे होते !
आज सुप्रीम कोर्ट ने प्रशांत भूषण के तर्क-साक्ष्यों को आधार मानते हुए अंतिम निर्णय सुनाया है की NDA-UPA के समय कोयला आवंटन में ज़बरदस्त धांधली हुई है और किसी नियम का पालन नहीं हुआ है ! भारतमाता की कोख इन नेताओं के हाथों लूटने से बचाने के लिए प्रशांत भूषण को दोनों हाथों सलाम ! संजीदा और सच्चे राष्ट्रभक्तों को आज अवश्य ख़ुशी हो रही होगी और वो प्रशांत जैसे भारतमाँ के बेटे को बधाई देंगे ताकि वो हमारे लिए लड़ता रहे इन दरिंदों से !
वैदिक जी के कश्मीर हाफिज सईद को दे देने वाले प्रवचन पर ससुराल में छुप गए कुतर्की भक्तों की गालियाँ आमंत्रित हैं "
अभिनंदन मिर्ची ताई. सरकारचा
अभिनंदन मिर्ची ताई. सरकारचा रेवेन्यु वाढेल . झालं ते चांगलच झालं.
हां घाई करु नका! हा बोनस आहे जो कधी धरण्यातच आला नव्हता.
गेल्या २० वर्षात हे एकच कॅग ऑडीट झाले का?
एअर इंडिया काय होत ते बघायचच आहे. दर वर्षी ३५०० कोटी रुपयांचा तोटा होतो आणि केंद्र सरकार त्याना ते देते. हे नेमाने गेले अनेक वर्ष चालु आहे.
कुमार विश्वास यांच्या पोस्ट मधे भाजप आणि सांप्रदायीकता काय मधेच आणि सीबीआय ला काहीच क्रेडीट नाही का? उत्तर प्रदेशच्या इलेक्शनची तयारी चालु केली आहे अस दिसत आहे?
आता काय होणार कोळशाच्या खाणी
आता काय होणार कोळशाच्या खाणी बंद आणि आपण कोळसा आयात करुन power plant चालवणार. Supreme court should also provide way out on this or else we will loose more forex on improting coal while we have enough coal in our country but we can't use that due to supreme court order.
वरिल प्रतिसाद हे माझे मत आहे.
वरिल प्रतिसाद हे माझे मत आहे. आप च्या बाजुने किंवा विरोधी नाही.:-)
कोळसा घोटाळ्याबाबत सुप्रिम
कोळसा घोटाळ्याबाबत सुप्रिम कोर्टाच्या कालच्या निर्णयानिमित्त जुने काही व्हिडिओज -
१. "हम डिक्टेटरशिप की तरफ बढ रहें हैं" - २१ ऑगस्ट २०१२
२. Govt's clarification on coal scam misleading: Kejriwal
३. Why detain us, we have broken no law: Kejriwal
आता बहुमताने निवडून आलेलं भाजपा सरकार दोषी व्यक्तींवर काय काय कारवाई करतं हे बघायचं.
<<कुमार विश्वास यांच्या पोस्ट
<<कुमार विश्वास यांच्या पोस्ट मधे भाजप आणि सांप्रदायीकता काय मधेच आणि सीबीआय ला काहीच क्रेडीट नाही का? उत्तर प्रदेशच्या इलेक्शनची तयारी चालु केली आहे अस दिसत आहे?>>
हे काही कळलं नाही.
<<आता काय होणार कोळशाच्या खाणी बंद आणि आपण कोळसा आयात करुन power plant चालवणार. Supreme court should also provide way out on this or else we will loose more forex on improting coal while we have enough coal in our country but we can't use that due to supreme court order.>>
का बरं? गोलमाल परवाने रद्द केले आणि योग्य पद्धतीने परवानावाटप करून पारदर्शकरित्या कोळसा उत्खनन केलं तर नाही चालणार का? कोळसा आयातच करायला हवाय का?
माझं कशाला अभिनंदन? पण तरी
माझं कशाला अभिनंदन? पण तरी प्रामाणिकपणे लढणार्यांची समर्थक म्हणून त्यांच्या वतीने धन्यवाद.
<<गेल्या २० वर्षात हे एकच कॅग ऑडीट झाले का?
एअर इंडिया काय होत ते बघायचच आहे. दर वर्षी ३५०० कोटी रुपयांचा तोटा होतो आणि केंद्र सरकार त्याना ते देते. हे नेमाने गेले अनेक वर्ष चालु आहे. >>
ऑडिटं बरीच झालीत. योग्य वेळी त्या त्या पक्षाने राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापरही करून घेतला. पण पुढे काय?
एअर इंडिया सोबत अजूनही बरेच घोटाळे आहेत आणि त्यात आपला प्रचंड पैसा जातोय. कोळसा घोताळाच सुमारे २ लाख कोटी रूपयांचा आहे. म्हणून तर मलाही वाटतंय की ह्या गळतीला थांबवलं तर चित्र बदलेल.
ह्या धाग्यावर ह्या चित्राची गरज नाही. पण चित्रातील महोदय आता विकासराज्यात नसून केंद्रात आहेत. त्यामुळे उल्लेख येत राहणार.
मंदार, तस होईल अस वाटत नाही.
मंदार,
तस होईल अस वाटत नाही. म्हणुनच कोर्टाने वेळ घेतलेला आहे. कोर्टाने तसे म्हटल्याचे ही वाटते. अंतिम निर्णय घेण्यासाठी अजुन हीयरींगची गरज आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करुनच निर्णय होइल.
केवळ पावर जनरेशन नाही तर मेटल इड्स्ट्री सुद्धा त्यांच्या कॅप्टीव कंझमशन साठी होणारी विज निर्मिती आणि फ़रनेस मघे कोळ्सा वापरते. हे सगळे एकदम बसवणार नाहीत.
सरकारचा गेलेल उत्पन्न परत मिळवणेवे हा उद्देश असेल असेच वाटते.
बघा मिर्ची ताई तुमच्या रागाला घाबरुन मंदारने डीस्क्लेमर टाकला.:खोखो:
वचक आहे आपला !
वचक आहे आपला !
Pages