Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<कुणी कितीही आपटो लोकांना
<<कुणी कितीही आपटो लोकांना आपचा खरा चेहरा कळलेला आहे. आप हा पक्ष केन्द्रात सत्तेत कधीही येणार नाही.>>
खरंय तुमचं. म्हणूनच भाजपा दिल्लीत निवडणूका नाकारून (पर्यायाने लोकशाहीची हत्या करून) 'गुप्त मतदान' घेऊन सरकार स्थापन करण्याचे खेळ खेळतंय.
जिंदगी हर कदम इक नई 'जंग' है....:हाहा:
आप हा पक्ष केन्द्रात सत्तेत
आप हा पक्ष केन्द्रात सत्तेत कधीही येणार नाही.
<<
<<
अगदि सहमत,
केंद्रातच काय, आता कुठल्याही राज्यात सत्तेवर येण्याची शक्यता शुन्य आहे, या चमकोगिरी करणार्या पक्षाची.
बायपोल्सचे निकाल लागले म्हणे.
बायपोल्सचे निकाल लागले म्हणे. भाजपा जिंकली असेलच ना उत्तराखंड, पंजाब, कर्नाटक इत्यादि सर्व राज्यांत.... 'प्रचंड बहुमत' मिळवून केंद्रात सत्ता आहे ना त्यांचीच !
विजयजी तुम्ही बोललात आणि लगेच
विजयजी तुम्ही बोललात आणि लगेच दुसर्या मिनीटाला ही बातमी नजरेस पडली.
ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं असं गाणं आहे. इथे थेंब थेंब नाही, चक्क धबधबाछाप गळती लागली आहे आपला.
500 AAP volunteers quit party in Maharashtra
MUMBAI: Claiming to be dissatisfied with AAP's functioning in the state, over 500 volunteers from the party's Maharashtra unit resigned on Saturday.
अगदी परवाच गूगल हँगआऊटमध्ये
अगदी परवाच गूगल हँगआऊटमध्ये ऐकलं -
"जो देश के लिए लडना चाहते हैं, वो पार्टी में रहें, बाकी आज ही पार्टी छोडके चले जाएं"
५०० लोकांना पटलं असावं हे.
आणि असल्या गळतीने पक्ष संपत असता तर भाजपा दिसला असता का?
१. Many BJP workers quit party over demand of new taluka
२. 184 BJP Men Quit Party in Kannur
कैच्याकै.
केळशीकर, आवाम शी संपर्क करा.
केळशीकर, आवाम शी संपर्क करा. लई लोक आहेत तिथे असले, आम्ही आपचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला 'आप मध्ये स्वराज नाही' ह्याविरोधात आवाज उठवायचा आहे म्हणणारे.
(No subject)
केळश्रीकर मंजो आहेत
केळश्रीकर मंजो आहेत
‘आप’च्या निवडणूक निधीवर
‘आप’च्या निवडणूक निधीवर चोरट्यांचा डल्ला; २० लाख पळवले!
पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या खर्चासाठी आम आदमी पक्षाने उभ्या केलेल्या २० लाख रुपयांच्या निधीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेमुळे पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष 'डिनर विथ केजरीवाल' या कार्यक्रमातून निधी उभा करत आहे. अशाच प्रकारच्या कार्यक्रमातून जवळपास २० लाख रुपये पक्षाने जमविले होते. हे पैसे 'आप'च्या माजी आमदार वंदना कुमारी यांच्या बाग परिसरातील घरी ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी रात्री चोरट्यांनी कार्यभाग साधला. तीन दरवाजांचे टाळे तोडून दरोडेखोर वंदना कुमारी यांच्या घरात घुसले. त्यांनी कपाटाचा टाळा तोडला. कपाटातील सगळे सामान अस्ताव्यस्त करून तेथील रोकड रक्कम, चेक आणि दागिने घेऊन पोबारा केला.
रात्री ८ ते ११च्या दरम्यान ही चोरी झाल्याचे वंदना कुमारी यांचे म्हणणे आहे. त्यावेळी त्या पक्षाच्या एका बैठकीला गेल्या होत्या, तर त्यांचे पती मुलाला घेण्यासाठी गेले होते. ही चोरी म्हणजे राजकीय कट-कारस्थान असल्याचा आरोप वंदना कुमारी यांनी केला आहे. तर त्यांचे पती सज्जनकुमार यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावरच संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे
अगं बै चोरटे आम होते की खास ?
अगं बै
चोरटे आम होते की खास ?
२० लाख घरात ठेऊन लोक बिंधास
२० लाख घरात ठेऊन लोक बिंधास बाहेर जातात?
आआप पक्ष जर जमवलेले निधीचे
आआप पक्ष जर जमवलेले निधीचे केवळ २० लाख रुपये सांभाळून ठे ऊ शकत नाही त्यांना
देश / राज्य कस काय देणार सांभाळायला ?
वर हे लोक पोलिसांवरच संशय
वर हे लोक पोलिसांवरच संशय घेताहेत !!
जर ईतकच होत तर पैसे बँकेत का नाही ठेवले ? २० लाख रु काय घरी ठेवायची वस्तु आहे.
आ आ प चा फंड जमवण्याचा फंडा
आ आ प चा फंड जमवण्याचा फंडा !!
अरविंद केजरीवाल बरोबर कॉफी पिण्यासाठी रू २०,००० फक्त आणि केजरीवाल बरोबर सेल्फी साठी फक्त रु ५००
या अगोदर याच रु २०,००० मध्ये केजरीवाल बरोबर डिनर करता येत होते.
ओह म्हणजे आता महागाई फारच
ओह म्हणजे आता महागाई फारच वाढलेली दिसते, २०,००० मधे डिनर नाही तर फक्त कॉफी मिळणार ?
दिल्ली विधानसभेसाठी निवडणुक
दिल्ली विधानसभेसाठी निवडणुक होत आहे... मिर्ची तुमचे मत वाचायला आवडेल. :स्मितः
किरण बेदी, शाजिया इल्मी,
किरण बेदी, शाजिया इल्मी, बिन्नी यान्नी भाजपात प्रवेश केला आहे. सामना अतिशय अव्हानात्मक आहे....
उदय +++++++ सामना अतिशय
उदय
+++++++ सामना अतिशय अव्हानात्मक आहे.... +++++++++
कोणाचा सामना कोणाशी ?
सामना करायला राहीलाय कोण ? केजरीवाल आता दिनवाणा झालाय ! आता एक मनिष सिसोदिया सोडुन त्याच्या बरोबर कोणीही नाही !! अशी परिस्थीती का आली याचा त्याने विचार करावा !
किरण बेदी, शाजिया इल्मी,
किरण बेदी, शाजिया इल्मी, बिन्नी भाजपात सामिल झाल्यापासून बराच जळफळाट झालाय आप कंपुचा. भाजप बद्दल वाट्टेल ते भकत सुटलेत त्यांचे प्रवक्ते टिव्हीवर.
आंग्रे, तरी पण केजरीवालच्या
आंग्रे, तरी पण केजरीवालच्या सभांना गर्दी बरीच जमतेय. अजूनही लोक भरपूर सपोर्ट करत आहेत आपला. ज्या प्रमाणात आप च्या विरोधात प्रचार होतोय त्याप्रमाणात त्यांना मिळणार्या सपोर्टबद्दल आश्चर्य वाटतंय मला. सोशल मिडिया, टिव्ही, एफएम (त्या एका कोणत्यातरी एफएम चॅनेलवर तर धरणाकुमार उर्फ डिके नावानी केजरीवालची भरपूर खिल्ली उडवली गेलीये गेले १० महिने).. सगळीकडे भगौडा म्हणून इतक्या दिवसांपासून आपबद्दल लिहिलेलं /बोललेलं ऐकून मला तरी वाटत होतं की आप पक्ष पुर्णपणे संपलाय. पण आता प्रचारादरम्यान वेगळच चित्र दिसतंय मला आजूबाजूला.
आज सकाळी एफएम वर आधी दोनवेळा आपची तिन वेळा भाजपाची आणि एकदा कॉग्रेसची जाहिरात ऐकायला मिळाली. भाजपाच्या जाहिरातीत विकासासाठी मोदींना सपोर्ट करा म्हटलं होतं, आपच्या जाहिरातीत केजरीवाल मी पळून नाही गेलो, इथेच आहे आणि पुर्ण बहूमत घेवून सरकार स्थापन करणार आहे त्यामूळे माझ्यावर नाराज होवू नका अशी मतदारांना विनंती करत होते तर काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये एक म्हातारे आजोबा तरूणांना कोणत्याही लाटेच्या आहारी न जाता ज्या पक्षाने मेट्रो आणली, शाळा-कॉलेजेस सुरु केले, दिल्लीचा विकास केला त्या पक्षाला मत द्या म्हणत होते.
येताना मेट्रोमध्ये एका मेट्रोत सगळ्या पॅनेल्सवर भाजपाच्या जाहिराती होत्या. दुसर्या मेट्रोत एका डब्ब्यात (फक्त लेडीज) आपच्या जाहिराती दिसल्या. ऑटोवाले परत आपला सपोर्ट करायला लागलेत बहूदा कारण बर्याच ऑटोंच्या मागे आपची पोस्टर्स गेल्या वेळप्रमाणे दिसायला लागली आहेत.
चला एक ही भाजपात लायक नेता
चला एक ही भाजपात लायक नेता नसल्याने इतर पक्षांमधुन आयात केलेल्या नेत्यांवरच डाव खेळणे चालु आहे.
फार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र वाईट वाटते जे कार्यकर्ते नेते २०-२५ वर्ष पक्षात असुन देखील त्यांना डावलले गेले.
बिचारे जगदीश मुखी मनातल्या मनात म्हणत आहेत. केजरीवाल खरच चांगला किमान त्यांच्या जाहिरातीत तरी मला मुख्यमंत्री म्हणुन नॉमिनेट तरी केले होते. इथे तर काहीच नाही.
तेच विजय गोयल म्हणत असतील गेल्यावेळेस इतकी मेहनत घेउन फेसबुकी प्रचार केला तरी मला केला नाही यंदा तर माझे नाव देखील नाही कुठे
अल्पना, जेव्हा एखाद्या
अल्पना, जेव्हा एखाद्या पक्षाची किंवा व्यक्तीची अतिरेकी खिल्ली उडवली जाते किंवा अतिरेकी टिका होते तेव्हा अॅक्चुअली जे तटस्थ असतात/एकंदरच चिखलफेकीचा तिरस्कार करतात त्यांचा, निगेटिव्ह पब्लिसिटीचा वीट येऊन त्या पक्षाकडे किंवा व्यक्तीकडे कल झुकतो. केजरीवालांवर अशी अतीरेकी टिका होत असेल तर त्यांच्याबाबतीतही तसेच होईल :-). हेच मी बहुतेक पुर्वी ह्या धाग्यावरही बोलले होते, तेच दिल्लीत आत्ता दिसून येत असेल. लोकसभा निवडणुकांनंतर मोदींच्याबाबतीत असंच झालं होतं. आधी मी तटस्थ होते पण एकंदरच इतर पक्षांनी (किंवा इथे मायबोलीवरही) त्यांच्यावर जी भयानक वाईट शब्दांत अतीरेकी टिका केली त्यामुळे माझा कलही त्या प्रकाराचा तिटकारा येऊन बीजेपीकडेच झुकला होता. ५ वर्षांत तो झुकलेला राहिल, तटस्थ राहिल की विरोधात जाईल ते आत्ताच सांगता येत नाही कारण अजूनही कुठलाच पक्ष बेस्ट वाटत नाहिये. राजकारण म्हटल्यावर १००% धुतल्या तांदळासारखं कुणीच नसेल पण त्यातल्यात्यात बरा कोणता ते बघत राहायचं सामान्य माणसानं, अजून काय करणार! केजरीवालांना ह्या वेळेस संधी मिळाली तर त्यांनी पुर्वीच्या चुका न करता संधीचं सोनं करायला हवं.
एक मात्र खरं, आत्ता जी राजकारणात अगदी कुणीच नसलेल्या हवश्या गवश्यांचीही आपापसात लाथाळी चालते तशी पुर्वी कधी दिसली नव्हती. लोक सभ्यपणे विरोध का करु शकत नाहीत कुणास ठाऊक! नेत्यांना आणि पब्लिकलाही मिडिया एक्स्पोजर अती झालंय आणि वरच्या दर्जाचं राजकारण नाहिसं होत चाललंय.
केजरीवाल असतील ही मेहनती पण
केजरीवाल असतील ही मेहनती पण सन्धी सोन करण्यात त कमी पडलेच शिवाय त्याना मिडीया अॅटेन्शन, गाजावाजा, प्रसिद्धी याच जास्त पडलेले आहे अशी त्यान्ची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे, कबुल आहे एका रात्रित कूणि मोठा होत नाही( हे खरतर झाले होते, एका छोट्या नविन पक्षाला दिल्लिकरानी सन्धी दिली होति) आणी चुका होतात लोकाकडून पण लोकसभेत उतरण्यापेक्षा दिल्लीला लक्ष ठेवुन पक्ष मजबुत करायला हवा होता.
सध्या मनसे आणी आप एकाच नावेत सवार आहेत.
नो. मनसे पेक्षा आप ची स्थिती
नो. मनसे पेक्षा आप ची स्थिती खूपच चांगली आहे. इव्हन भाजपा सुद्धा विरोधक म्हणून त्यांनाच सिरियसली घेत आहेत. भाजपाच्या यावेळच्या प्रचारात मोदींचं नाव आणि केजरीवालला विरोध हे दोनच महत्वाचे मुद्दे दिसत आहेत अजून तरी. किरण बेदी , शाझिया इल्मी, बिन्नी हे भाजपात आले असले तरी अजून तरी प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये या लोकांची नावं आली नाहीयेत. (अर्थात यांच्या भाजपा प्रवेशाला अजून २-३ दिवसच झालेत.त्यातही फक्त किरण बेदींचं नाव जास्त पुढे येईल प्रचारात असा माझा अंदाज आहे.)
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार निधीचा वापर. काही महिन्यांपूर्वी बातमी वाचली होती कोणत्या पक्षाच्या आमदारांनी जास्त आमदार निधी संपवला. नक्की आकडे आठवत नाही आहेत पण आप चे आमदारांचा निधी सगळ्यात जास्त खर्च झाला होता. बहूतेक अलोकेटेड निधीच्या ८०-९०% निधी त्यांनी आपापल्या मतदार संघात विकास कामांसाठी खर्च केला. बाकी दोन्ही पक्षांची आकडेवारी खूपच वाईट होती. आप याचा सुद्धा मुद्दा करतोय. अजून मोठ्या प्रमाणात प्रचारात हा मुद्दा आला नाहीये. पण २-३ मतदार संघातल्या लोकांकडून ऐकलं, त्यांच्या आपच्या आमदाराने मतदारांशी बोलताना हा मुद्दा वापरायला सुरवात केलीये.
केजरीवालः काँग्रेस और भाजपा
केजरीवालः
काँग्रेस और भाजपा तुमको आके पैसे देंगे (तुम्हारे वोट के बदले मे) तो ले लेना !! मना मत करना !! अगर किसी पार्टीका पैसा नही मिला तो जरुर उनके ऑफिसमे जाके ले लेना !! मगर वोट सिर्फ आम आदमी पार्टीकोही देना !!
असे उद्गार काढणारे केजरीवाल बद्दल काय म्हणणार !
उठ सुट लोकांच्या विजेचे बील कमी करणार, अस म्हणत त्या ना विजेवर सबसीडी दिली!!
अश्याना लोकांचा तत्पुरता सपोर्ट राहील, पण निवडणूकीत खर काय ते कळेलच,
गेला एक आढवडा दिल्लीत होतो.
गेला एक आढवडा दिल्लीत होतो. तिथे जाण्याआधी मलाही वाटलं होतं की बाहेर जशी हवा आहे त्याचप्रमाणे स्थानिकांनाही वाटणार की केजरीवालनी जी माघार घेतली त्यामुळे त्याची पत पूर्ण घसरली आहे. पण टॅक्सी ड्रायव्हर्स, प्रोफेसर्स, डॉक्टर्स, विद्यार्थी यांच्याशी बोलून हे जाणवलं की जी काही चांगली कामं केली गेली ते लोक अजुन विसरले नाहीत, सध्याचं करप्शन त्यांना नको आहे, आणि केन्द्रात आप नको असलेल्या अनेकांना दिल्ली शहरात मात्र आप हवं आहे.
अल्पना, >> ज्या प्रमाणात आप
अल्पना,
>> ज्या प्रमाणात आप च्या विरोधात प्रचार होतोय त्याप्रमाणात त्यांना मिळणार्या सपोर्टबद्दल आश्चर्य वाटतंय मला.
या पाठिंब्याचं कारण म्हणजे आआपकडे असलेली कार्यकर्त्यांची फौज. ही फौज फक्त केजरीवाल यांचंच ऐकते. इल्मी, बेदी वगैरे लोकं सोडून गेली तरी फौजेला फरक पडत नाही. तूर्तास भाजपकडे दिल्लीसाठी दिलखेचक चेहरा नव्हता. तो बेदीबाईंच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे खरी लढत केजरीवाल (+आआपचे कार्यकर्ते) विरुद्ध बेदी (+भाजपचे कार्यकर्ते) अशी आहे. त्यामानाने काँग्रेस लढायच्या मनस्थितीत दिसत नाही. त्यापेक्षा केजरीवालांना छुपा पाठिंबा दिलेला काय वाईट, असा सूर दिसतोय. तसं झालं तर भाजपला निवडणूक अपेक्षेपेक्षा बरीच जड जाईल.
आ.न.,
-गा.पै.
गा पै खर तर आता खरी मजा येईल,
गा पै
खर तर आता खरी मजा येईल,
किरण बेदी नां मुख्यमंत्री पदाचा उ मेदवार करुन भाजपाने चांगलीच गेम खेळली आहे. आता मतदार विचार करणारच की केजरीवाल का किरण, अनुभवात आणि शहाणपणात किरण बेदी फार फार वरचढ आहे.
नो. मनसे पेक्षा आप ची स्थिती
नो. मनसे पेक्षा आप ची स्थिती खूपच चांगली आहे>> असेल! आम्ही फार लान्बुन हे चित्र पाहतोय त्यामुळे तुझी माहिती जास्त योग्य असेल.
70 हजार वकिल बेदीच्या विरूद्ध
70 हजार वकिल बेदीच्या विरूद्ध आहे
Pages