Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाल्यान यांना त्यांच्या
बाल्यान यांना त्यांच्या पैशांसकट ऑटोक्लेव्ह करून घेतले असेल आपवाल्यांनी , शुद्धं स्वरूपात.
ऑटोक्लेव्ह नव्हे. गोमूत्र
ऑटोक्लेव्ह नव्हे. गोमूत्र शिंपडल्याने शुद्धी होते. शिंपल बाता समजत नाहीत तुम्हाला.
*
पाच कोटी मोजून तिकीट?
'आप'चे मेहरोलीचे उमेदवार नरेश यादव यांच्याकडं जवळपास २६ कोटींची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चौधरी गोवर्धन सिंह यांचं तिकीट कापून अचानक यादव यांना तिकीट देण्यात आलं होतं. यादव यांच्याकडून पाच कोटी रुपये घेऊन पक्षानं त्यांना तिकीट दिल्याचा आरोप गोवर्धन सिंह यांनी केला आहे.
<<
आप चं तिकिट चक्क पाच कोटी देऊन विकत घेत असतील, तर आप निवडून येणारच यावर किती तगडा विश्वास आहे यांचा, हेच दिसतंय. नाही का?
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/tweeters-take-a-dig-at-kir...
'ती कार पंतप्रधानांची नव्हे, तर पीएमओची होती आणि ती आपण नव्हे, तर उपनिरीक्षक निर्मल सिंह यांनी उचलली होती', अशी कबुली किरण बेदी यांनी एनडीटीव्ही इंडिया वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आणि तिथेच त्या फसल्या. कारण, 'आप' समर्थकांनी लगेचच त्यांचं जुनं ट्विटर प्रोफाइल शोधून काढलंय आणि सोशल नेटवर्किंवरून बेदींच्या खोटेपणावर निशाणा साधलाय. जर तुम्ही इंदिरा गांधींची गाडी उचललीच नव्हती, तर मग प्रोफाइलमध्ये तसा उल्लेख का केलात?, असा खोचक सवाल ते करताहेत
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/bjp-asked-5-questions-from-arvind-kejriwa...
मिर्ची ताई तुम्हीच द्या इथे उत्तरे.
इथल्या लोकांना केजरीवालची पटणार नाहीत
<<बेदी यान्नी त्याना मिळालेली
<<बेदी यान्नी त्याना मिळालेली प्रत्येक (तिहारचे अधिक्षक, मिझोरामची जबाब्दारी जेथे जायला बहुतेक नाकारतात, अमली पदार्थ नियत्रण) जबाबदारी परिपुर्ण केली आहे, करण्याचा प्रयत्न केला आहे. ३५ वर्षे सेवाकाळ पुर्ण केल्यावर त्यान्नी राजिनामा दिला आहे, हे करताना त्यान्नी कुठलाही करार मोडला नाही अथवा जाबाबदारी झटकलेली नाही. महत्वाचे त्या देशाच्या पहिल्या महिला (१९७२ बॅच) IPS अधिकारी आहेत. >>
उदय,
त्या देशाच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत हे मान्य. त्याबद्दल त्यांचं कौतुकही आहे. पण बाकी गोष्टी अमान्य.
गोव्यामधील पोलिस अधीक्षकाची आणि मिझोराममधील इन्स्पेक्टरची नोकरी त्यांनी पूर्वानुमतीशिवाय सोडली आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्याविरुद्ध निदर्शने केल्याने मिझोराममधून तर त्या रातोरात पळून आल्या आहेत. हे त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे.
त्यांनी पोलिसखात्यातून राजीनामा दिला कारण त्यांना पोलिस कमिशनर बनवलं नाही. हेही त्यांनी स्वतःच सांगितलंय.
त्यांना डावलून त्यांचे ज्युनिअर--युधवीर सिंग डडवाल ह्यांना कमिशनर बनवलं गेलं, ह्याचा त्यांना राग आला. तेव्हाचं त्यांचं विधान--"Merit has been compromised… I have an outstanding record".
मिझोराममध्ये बदली झालेली असताना स्वतःच्या मुलीला मिझोरामसाठी असलेल्या राखीव कोट्यातून दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेजला MBBS ला प्रवेश घेतला होता. (ह्याविरुद्धच तिथल्या स्थानिकांनी निदर्शने केली होती)
मुलीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं नाही (सीट वाया घालवलं!) ती गोष्ट वेगळी.
इंदिरा गांधींची कार उचलण्याच्या (न केलेल्या) पराक्रमाचं बिंग काल फुटलंच आहे. त्यांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरूनही ह्याबद्दल बिनदिक्कत खोटं बोललं आहे.
एवढ्या मागे जायचीसुद्धा खरंतर गरज नाही. त्यांचे अण्णा आंदोलनाच्या वेळचे ट्वीटस आणि आत्ताची वक्तव्ये दोन्हीमधली अंदाधुंद बघितली तर अशिक्षित-सुशिक्षित कुठलीही व्यक्ती त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून देणार नाही.
केजरीवालांच्या मुद्द्यांवर खूपदा लिहून झालंय. त्यामुळे पुन्हा नको. त्यांनी नोकर्या सोडल्या तरी प्रत्येक कृतीमागचा उद्देश अजूनही स्पष्टपणे एकच आहे, सुसूत्रता आहे.
बेदीतै म्हणाल्या तसं "डोण्ट वि इवॉल्व? डोण्ट वि आऊटग्रो?" तसं केजरीवाल आऊटग्रो झालेत असं समजूया
aschig +१ शांताराम कागाळेंनी
aschig +१
शांताराम कागाळेंनी ज्या गोवर्धन सिंगबद्दल लिहिलंय ते आणि त्यांचं कुटुंब १० जानेवारीला झालेल्या मोदींच्या रॅलीला बसेस भरून माणसं घेऊन जायच्या कामात आढळले. तिकीट रद्द केलं जाणं स्वाभाविक आहे.
अजून एक दुसरा उमेदवार- राजेंद्र डबस-ह्यांचंही तिकीट रद्द केलंय. त्याच्यावर हाय कोर्टात केस चालू आहे, ह माहिती त्याने लपवली होती. अंतर्गत लोकपाल समितीकडे १२ नावे दिली गेली होती, त्यातील ह्या दोघांवरील आरोप खरे असल्याचं आढळल्याने तिकीटं रद्द झाली.
शांका, आपचे उमेदवार करोडपती आहेत त्यात नवीन काय समजलं तुम्हाला? आम आदमी म्हणजे फाटकातुटकाच असायला पाहिजे का?
इतर पक्ष सोडून आपमध्ये येणार्यांबद्दल--
“AAP is a movement for honest and clean politics. Anybody who is clean, believes in honest politics is welcome in the party.”
हायला, शाझिया आप सोडून गेली म्हणजे आप वाईट आणि नरेश बाल्यान भाजप सोडून आप मध्ये आले तरी आपच वाईट??? मज्जाय की !
नरेश बाल्यानची जून २०१३ मधली व्हिडिओ क्लिप.
मी त्या बाल्यान बद्दलच
मी त्या बाल्यान बद्दलच लिहायला आले होते. ते भाजपामधून आपमध्ये आलेत हे मला माहित नव्हतं. परंतू माझा जो कलिग आपच्या स्थापनेपासून आपचा कार्यकर्ता आहे तो त्या मतदारसंघामधला आहे आणि बाल्यान चा बराच जवळचा आहे पूर्वीपासून. त्यामूळे मी पण जरा कन्फुज होते. त्याच्याशी बोललएच शेवटी की हे कसं काय तर तो म्हणाला, की आपच्या स्थापनेपासून बाल्यान केजरीवालना सपोर्ट करत होते. जरी त्यांनी आत्ता प्रवेश घेतला असला आपमध्ये तरी गेल्या निवडणूकीमध्ये सुद्धा त्यांनी /त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला सपोर्ट केला होता.
आप मधे कोट्याधीश असले तर मग
आप मधे कोट्याधीश असले तर मग काय प्रॉब्लेम आहे? का कोट्याधीश आम आदमी असू शकत नाही वा आम आदमीने कोट्याधीश बनायची स्वप्ने बघू नयेत?
मिर्ची मॅडम, ती आजच्या "म
मिर्ची मॅडम,
ती आजच्या "म टा" तली बातमी आहे, त्या प्रतिक्रियेच्या खाली लिंक दिली आहेच.
माझ अस काहीच म्हणण नाहीय आणि महत्वाच म्हणजे माझ अरविंद साहेबांशी काहीच वाकड नाहीय !
किरण बेदींचा शनि वक्री दिसतोय
किरण बेदींचा शनि वक्री दिसतोय सध्या. नवीन विवाद--त्यांच्याकडे दोन वोटर्स कार्ड आहेत, आणि दोन मतदारसंघात नावही आहे.
ह्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच केजरीवालांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की दिल्लीमध्ये सुमारे ८ लाख बोगस मतदार आहेत आणि सुमारे ४ लाख मतदारांकडे १२ लाख ओळखपत्रे आहेत (एका मतदाराकडे ३-४ ओळखपत्रे)
मुख्यमंत्रीपदासाठी उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडेच दोन ओळखपत्रे ?
निवडणूक आयोगाकडून 'क्लीन चीट' लगोलग मिळेलच म्हणा.
दोन ठिकाणी मतदार यादीत नाव
दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणं गुन्हा असतो ना?
येस्स अल्पना. एक वर्ष
येस्स अल्पना. एक वर्ष तुरुंगवास +/१०,००० रूपये दंड.
दिदे,
"दिवसाला ५ प्रश्न" ही खेळीही भाजपाच्याच अंगलट येईल असा अंदाज आहे. तुम्ही लिंक दिली आहे, त्यातील ५ प्रश्न गेल्या २ वर्षांत चावून चोथा झालेले आहेत. भाजपासमर्थक अजूनही तेच प्रश्न विचारतात इथपर्यंत ठीक होतं. पण आता पक्षाच्या नेत्यांकडून असले बालिश प्रश्न विचारले गेले तर त्यांच्यावरच बूमरँग होतील. पुन्हा ओपन डिबेटचा मुद्दा जोर धरेल. बेदींसोबतचा डिबेट बघायला धमाल येईल मात्र
भाजपाने आधी दिलेली वचनं पाळलेली नसल्याने लोक त्यांनाच प्रश्न विचारतील---उदा.- काळा पैसा कधी येणार? ९ लाखाच्या सूटचे पैसे कोण पुरवतं वगैरे वगैरे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे "केजरीवाल नक्षली आहे की पाकिस्तानी एजण्ट, त्याने चार्टर्ड विमानाने प्रवास का केला" असल्या मुद्द्यांशी जनतेचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं नाही. त्यांना त्यांच्या समस्यांवर उत्तरे हवी आहेत. भाजपा लोकांसाठी निवडणूक लढवत नसून केवळ केजरीवालला हरवायला लढत आहे हे चित्र आणखीन अधोरेखित होईल.
>>"त्याने चार्टर्ड विमानाने
>>"त्याने चार्टर्ड विमानाने प्रवास का केला" असल्या मुद्द्यांशी जनतेचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं नाही. <<
सहमत; परंतु पंप्रच्या महागड्या सुटाशी जोडलं गेलेलं आहे अशा अविर्भावात काहि वावरतात तेंव्हा मात्र किंव येते...
>>>परंतु पंप्रच्या महागड्या
>>>परंतु पंप्रच्या महागड्या सुटाशी जोडलं गेलेलं आहे अशा अविर्भावात काहि वावरतात तेंव्हा मात्र किंव येते...>>
या अविर्भावाची किंव करणार्यांची अपाथी बघून आम्हाला भिती वाटते.

<<सहमत; परंतु पंप्रच्या
<<सहमत; परंतु पंप्रच्या महागड्या सुटाशी जोडलं गेलेलं आहे अशा अविर्भावात काहि वावरतात तेंव्हा मात्र किंव येते...>>
चार्टर्ड विमानाचे पैसे आयोजकांनी दिले होते हे आयोजकांनी जाहीरपणे सांगितलं होतं.
पंप्रचे महागडे सूटस नेमकं कोण आणि का पुरवतं हे त्यांनी किंवा त्यांच्या सप्लायरने जाहीरपणे सांगावं मग करदाते गप्प बसतील.
एक्झॅक्टली @ मिर्ची!
एक्झॅक्टली @ मिर्ची!
जाहिरपणे कोणि विचारलं आहे का?
जाहिरपणे कोणि विचारलं आहे का? इथे बोंबलुन काय होणार, थेट पीएमओला विचारा. एक वेबसाइट आहे ना सरकारला प्रश्न विचारण्यासाठी?
स्वत:च्या बायकोला उत्तर देत
स्वत:च्या बायकोला उत्तर देत नाही
आम्हाला देईल? काय बोलू राहीलासा राव
>>या अविर्भावाची किंव
>>या अविर्भावाची किंव करणार्यांची अपाथी बघून आम्हाला भिती वाटते. <<
अहो काहि फुटकळ गोष्टींकडे कानाडोळा करायला शिका, त्याशिवाय तुमच्या डोळ्यांना "बिग पिक्चर" दिसणार नाहि...
निवडणूक लढविण्यासाठी
निवडणूक लढविण्यासाठी आमच्याकडं भाजप, काँग्रेसइतका पैसा नाही असं म्हणत लोकांकडून पैसे गोळा करणारे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी प्रत्यक्षात 'अमीर आदमी पार्टी' असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या 'आप'च्या एकूण ७० उमेदवारांपैकी जवळपास अर्धे उमेदवार करोडपती आहेत.
उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार 'आप'ने यावेळी पाच मुस्लिम, सहा महिला, चार शीख आणि डझनवारी एससी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना तिकीटं दिली आहेत. मात्र, 'आप'च्या यादीवर कोट्यधीश उमेदवारांचे वर्चस्व आहे. बाहेरून पक्षात आलेले व प्रथमच उमेदवारी मिळालेले बहुतेक उमेदवार कोट्यधीश आहेत.
रईस उत्तम नगर येथील उमेदवार नरेश बाल्यान हे 'आप'चे सर्वात धनाढ्य उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ५७ कोटींची स्थावर-जंगम मालमत्ता आहे. आर के पुरम येथील उमेदवार प्रमिला टोकस यांच्याकडं ३० कोटी, तर त्यांचे पती धीरज टोकस यांच्याकडं ६८ कोटींची मालमत्ता आहे.
नझफगडचे उमेदवार कैलाश गेहलोत यांच्याकडे १८ कोटी, घोंडाचे उमेदवार दत्त शर्मा यांच्याकडं १३ कोटी, मटिया महलचे उमेदवार असीम अहमद खान यांच्या नावावर ३ कोटींची संपत्ती आहे. 'आप'चे माजी आमदार व माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडं ४ कोटींहून अधिक संपत्ती आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू व द्वारका येथील उमेदवार आदर्श शास्त्री आणि चांदणी चौकातील उमेदवार अलका यांच्याकडंही एक कोटींहून अधिक संपत्ती आहे. अन्य उमेदवारांकडंही एक ते पाच कोटींपर्यंत मालमत्ता आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडं ९४ लाख तर त्यांच्या पत्नीच्या नावावर एक कोटींपेक्षा जास्त स्थावर-जंगम मालमत्ता आहे.
पाच कोटी मोजून तिकीट?
'आप'चे मेहरोलीचे उमेदवार नरेश यादव यांच्याकडं जवळपास २६ कोटींची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चौधरी गोवर्धन सिंह यांचं तिकीट कापून अचानक यादव यांना तिकीट देण्यात आलं होतं. यादव यांच्याकडून पाच कोटी रुपये घेऊन पक्षानं त्यांना तिकीट दिल्याचा आरोप गोवर्धन सिंह यांनी केला आहे.
वीसहून अधिक उमेदवारांविरोधात खटले
भ्रष्टाचार आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात लढण्याचा आणि व्यवस्था परिवर्तनाचा अजेंडा असलेल्या 'आप'च्या जवळपास दोन डझन उमेदवारांविरोधात न्यायालयात खटले सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/AAP-Arvind-Kejriwal/articl...
पंप्रचे महागडे सूटस नेमकं कोण
पंप्रचे महागडे सूटस नेमकं कोण आणि का पुरवतं हे त्यांनी किंवा त्यांच्या सप्लायरने जाहीरपणे सांगावं मग करदाते गप्प बसतील.>>> +१ : मोदींनी उत्तर द्यायला ह्वे
मिर्ची - मागच्या वर्षीच
मिर्ची - मागच्या वर्षीच केजरीवाल यान्नी स्वत: आपतर्फे दिल्ली मुख्यमन्त्री पदासाठी बेदी यान्ना पसन्ती दिली होती असे वाचले. पण त्यावेळी बेदी यान्नी आप मधे सामिल होण्यास असमर्थता दाखवली होती. मग एकाच वर्षात असा काय बदल झाला.
दिल्लीला गान्धी यान्ची कार नव्हती तर त्यान्च्या ताफ्यातील कार होती हे सर्वान्ना माहित आहे. आता ज्या सिन्ग यान्नी प्रत्यक्ष गाडी हलवण्याचे कृत्य केले ते वाखाणण्यासारखे आहेच. त्या वेळी त्याची सुपर्वायझर या नात्याने बेदी ठामपणे पाठिशी होत्या हे पण थोडके नाही.
एखादी मोहिम पुर्ण झाल्यावर त्यात काम कराणार्या प्रत्येकाचे नाव पुढे येत नाही तर सर्वात वरिष्ठ व्यक्ती जो नियोजन करतो त्याचेच नाव जनसामान्यान्ना माहित असते. पोखरण मधे काम करणार्या प्रत्येकाचे नाव आपल्याला माहित नाही पण माहित आहेत ते काकोडकर, कलाम. यान्नी केले काय ? तर ते त्यावेळी अधिकार पदावर (project Inchage) होते.
येथे चर्चा करत राहू.... शिकायला मिळते आणि नव-नवी माहिती कळते.
पंप्रचे महागडे सूटस नेमकं कोण
पंप्रचे महागडे सूटस नेमकं कोण आणि का पुरवतं हे त्यांनी किंवा त्यांच्या सप्लायरने जाहीरपणे सांगावं मग करदाते गप्प बसतील.>>> +१ : मोदींनी उत्तर द्यायला ह्वे
------ का त्यान्चे स्वतःचे कष्टाने कमावलेले पैशे वापरतात हे कळायला हवे...
अजुन वोडाफ़ोन ला मिळालेल्या कर
अजुन वोडाफ़ोन ला मिळालेल्या कर माफ़ी बद्द्ल आरडा ओरडा झाला नाही इथे. आश्चर्य आहे.
पंप्रचा सुट भारतात शिवला होता की लंडन मधे?
केजरीवालच्या मुलांच्या शपथेचा
केजरीवालच्या मुलांच्या शपथेचा इतका उहापोह केला जात आहे तर उद्या केजरीवाल ने यांच्या शपथांचे दाखले द्यायला सुरुवात केली तर पळती भुई थोडी होईल
कशाकरता कर माफी दिली
कशाकरता कर माफी दिली व्होडाफोनला? काय कारण आहे? रक्कम केवढी आहे, बाबौ! एक नम्बरची भामटी कम्पनी आहे ही. मालक भारतीय असला तरी आहे विदेशीच की.
उदय सर्व मुद्द्यांना +१०१
उदय सर्व मुद्द्यांना +१०१
>>सगळ्यात महत्वाचं म्हणजे "केजरीवाल नक्षली आहे की पाकिस्तानी एजण्ट, त्याने चार्टर्ड विमानाने प्रवास का >>केला" असल्या मुद्द्यांशी जनतेचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं नाही. त्यांना त्यांच्या समस्यांवर उत्तरे हवी आहेत. >>भाजपा लोकांसाठी निवडणूक लढवत नसून केवळ केजरीवालला हरवायला लढत आहे हे चित्र आणखीन अधोरेखित होईल.
माफ करा पण हे आधीच भाजपला मानणारांनी म्हणलेले विधान आहे. केजरीवाल हे केवळ मोदींना आव्हान देण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे आता जो म्हणतो तोच असतो असे वाटले क्षणभर.

केजरीवाल यांनी बनारसची निवड केली तेव्हा त्यांना केवळ स्वतः लाईमलाईटमधे येणे हाच मेजर अॅजेन्डा होता.
आणि आधीच्या दिल्ली निवडणुकीत भाजपच जास्त जागांचा पक्ष होता. त्यामुळे भाजप फक्त केजरीवालांना हरवायला लढत आहे या विधानात काहीच दम नाही. अर्थात लढत म्हणल्यावर कोणी जिंकणार, कोणी हरणार. दोन्ही बाजुंनी तेवढी खिलाडूवृत्ती ठेवावी ही अपेक्षा. शुभेच्छा !
करमाफी देण योग्य ठरेल अस मला
करमाफी देण योग्य ठरेल अस मला वाटत. जर घटनांचा क्रम बघितला तर लक्षात येईल की सरकारची बाजू योग्य होती की नव्हती असा प्रश्न निर्माण होतो.
थोडक्यात सांगायचं झाल तर हचिसन अन वोडाफोन ह्या दोन्ही कंपन्या विदेशी. वोडाफोननी हचिसन ह्या कंपनीची भारतीय उपकंपनी म्हणजे हचिसन एस्सार बाहेरच (केमन आयलंड) विकत घेतली.
आयकरवाल्यांनी नेहेमीप्रमाणे त्या व्यवहारावर कर लावला अन कंपनी कोर्टात गेली. सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध झाल भारतीय कायदयानुसार कर लावला जाऊ शकत नाही. मग सरकारनी वादग्रस्त पूर्वलक्षी कर आकारणी करण्याचा हक्क आयकर विभागाला दिला. त्या कायद्याने २००७ च्या व्यवहाराबद्दल आयकर विभाग कंपन्यांना जरी व्यवहार विदेशी भूमीवर झाला असला तरी कर लावता येईल.
माझ्यामते हे पूर्वलक्षी कर लावण अन्यायकारक आहे. विदेशी भांडवलदार वगरे कितीही वाईट असले तरी ह्या केस मध्ये कंपनी भारतीय कायद्यानुसारच वागली. अन मग जेव्हा कर आकारू शकत नाही असा कळल तर मग नवा पूर्वलक्षी कर आकारणी कायदा करून वोडाफोनला कर द्यायला लावणे हे जरा अतीच होतंय.
बाकी दिल्लीत सो कॉलड मास्टरस्ट्रोक भाजपवर उलटणार अस दिसतंय
केजरीवालना गणतंत्र दिवसाची
केजरीवालना गणतंत्र दिवसाची परेड बघायला बोलावल नाही !!
http://www.dnaindia.com/india/report-arvind-kejriwal-miffed-over-republi...
हेच अरविंद केजरीवाल गेल्यावर्षी मी गणतंत्र परेड होउ देणार नाही अस म्हणत होते.
"What a bundle of contradictions! As Chief Minister, Mr Kejriwal wanted to disrupt the RD celebrations, as a former CM he wants to attend it," said BJP spokesperson Nalin Kohli.
He said Kejriwal had raised the issue of disrupting the Republic Day parade earlier when he sat on a dharna, and this only shows "he has little commitment towards constitutional bodies".
Another BJP spokesperson, Sambit Patra, said, "Republic Day celebration is for the common man. Right from the beginning, Kejriwal was against VIP culture; Now he says he will only attend Republic Day on invitation?"
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-01-25/news/58433390_1_...
<<जाहिरपणे कोणि विचारलं आहे
<<जाहिरपणे कोणि विचारलं आहे का? इथे बोंबलुन काय होणार, थेट पीएमओला विचारा. एक वेबसाइट आहे ना सरकारला प्रश्न विचारण्यासाठी?>>
पीएमओला विचारा??? सहज माहितीसाठी
--- "The Prime Minister’s Office claims it doesn’t have records of the delegates and the financial details are “too wide and vague”.
(दुर्दैवाने (!) माहिती मागवणार्या व्यक्तीचं नाव "मन्सूर दरवेश" आहे !)
<<मिर्ची - मागच्या वर्षीच केजरीवाल यान्नी स्वत: आपतर्फे दिल्ली मुख्यमन्त्री पदासाठी बेदी यान्ना पसन्ती दिली होती असे वाचले. पण त्यावेळी बेदी यान्नी आप मधे सामिल होण्यास असमर्थता दाखवली होती. मग एकाच वर्षात असा काय बदल झाला.>>
तुम्हीच ठरवा कोणामध्ये आणि काय बदल झाला ते.


ह्या आहेत आधीच्या किरण बेदी - ज्यांना आप ने मुमं पदासाठी ऑफर दिली होती --
आणि ह्या आहेत भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतरच्या किरण बेदी --

कोण बदललं आहे हे स्पष्ट कळतंय. बेदी फक्त काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढत होत्या. कोळसा घोटाळ्याविरुद्ध निदर्शने करताना फक्त सोनिया गांधी, मनमोहन सिंग ह्यांच्या घराबाहेर करावीत, नितीन गडकरींच्या घराबाहेर करू नयेत असं त्यांचं मत होतं. केजरीवाल टीमने हे अमान्य केल्याने निदर्शनांच्या दिवशी त्या सामील झाल्या नाहीत. तिथूनच त्यांचे मार्ग वेगळे व्हायला सुरूवात झाली.
ही २०१२ मधील केजरीवालांची मुलाखत - Kiran Bedi wants us to coordinate with BJP: Arvind Kejriwal to ABP News
(लिंकांची अॅलर्जी असणार्यांनी कृपया उघडू नये !)
Pages