अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेदींची विधाने बघितली तर त्या आपसाठीच काम करत आहेत ह्याची खात्री पटतेय. पार बुडवणार आहेत भाजपला Rofl

उदय,
पंप्रची कार उचलण्याचं श्रेय घेणं आणि तुम्ही दिलेलं कलाम वगैरेंचं उदाहरण हे वेगळं आहे असं माझं मत.
एखादा अबक लेखक पुस्तक लिहितो, तेव्हा त्यात अनेक छुपे हात मदत करत असतात-उदा.-लेखनिक. पण पुस्तकावर लेखकाचंच नाव असतं. हे स्वाभाविक आहे.
पण लेखनिकाने लिहिलेलं पुस्तक अबक लेखकाने स्वतःच्या नावावर खपवून त्यातून मिळणारे आर्थिक आणि इतर फायदे (मानमरातब) घेतले तर ते समर्थनीय आहे का?

महेश,
तुम्ही लिहिलेलं "जो बोलतो तोच असतो" हे वाचून लहानपणची आठवण आली Lol

<<केजरीवाल यांनी बनारसची निवड केली तेव्हा त्यांना केवळ स्वतः लाईमलाईटमधे येणे हाच मेजर अ‍ॅजेन्डा होता.
आणि आधीच्या दिल्ली निवडणुकीत भाजपच जास्त जागांचा पक्ष होता. त्यामुळे भाजप फक्त केजरीवालांना हरवायला लढत आहे या विधानात काहीच दम नाही.>>

लाइमलाइट मध्ये येण्यासाठी त्यांना राजीनामा द्यायची काय गरज होती? विरोधक म्हणतात ते सत्तेचे लालची आहेत, त्यांना पंप्रपदाची हाव सुटली म्हणून ते दिल्ली सोडून वाराणसीला गेले. विनोदी आहे हे. कुठला सत्तेचा लालची मनुष्य हातातली खुर्ची सोडून देईल ? त्यांना पंप्र व्हायचं असलं तरी त्यासाठी मुमंपदाचा राजीनामा द्यायची अजिबातच गरज नव्हती. मोदी पंप्रपदासाठी लढत असताना ते गुजरातचे मुमं होतेच ना? की राजीनामा दिला होता?

भाजपाचा दिल्लीतला प्रचार पाहिला तर भाजपा केवळ केजरीवालला हरवायलाच लढत आहे हे ठळकपणे दिसून येतंय.

अनिरूद्ध,
बेदी ह्या आप च्या 'स्टार कँपेनर' आहेत ! Lol
त्या आजारी पडल्यामुळे आपचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय.
त्यांचा घसा बसल्यामुळे त्या प्रचार करणार नाहीत असं भाजपाने सांगितलंय, पण खरंतर त्यांना 'वरून' गॅग ऑर्डर्स आल्याची शक्यता जास्त आहे.

बेदींचा नवीन उपद्व्याप--
प्रचारादरम्यान बेदी मोत्यांचे नेकलेस वाटतानाचा व्हिडिओ उघड झालाय. भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देणार्‍या सुपरकॉप ?
Kiran Bedi seen gifting necklaces

Biggrin

पण व्हिडिओत समोर एक वृत्तवाहिनीचा कॅमेरा दिसतोय. खुलेआम असं कसं करतील त्या?
त्यांच्या मुलाखती पाहिल्यावर त्या का ही ही करू शकतील असं वाटतं मात्र.
ही क्लिप चुकवू नका -
Kiran Bedi's First speech as BJP Leader, This is Hilarious

आणि ही मुलाखत ज्यात त्यांचं इंदिरा गांधींची कार उचलण्याचं बिंग फुटलं--
The Kiran Bedi Interview That Has Ravish Kumar Trending

अण्णांचा पवित्रा कळत नाहीये. त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करायचा इशारा दिलाय. आश्चर्य वाटलं. पण टायमिंग बघून शंका येतेय.

भाजपाचा दिल्लीतला प्रचार पाहिला तर भाजपा केवळ केजरीवालला हरवायलाच लढत आहे हे ठळकपणे दिसून येतंय.

अरविंद केजरीवाल दिल्ली चे मुमं बनणारच !!
भाजपाला आ आप प क्ष या वेळी धुळ चारणारच !!

मिर्ची, मानलं तुम्हाला. संयमित उत्तरांना सलाम!
'वरून गॅग ऑर्डर' Wink

(दिल्ली निवडणूकांत स्वारस्य नाही, पण तुमचे प्रतिसाद वाचायला मज्जा येतेय.)

If AAP comes to power, God save Delhi. It will have only Dharana and Andolan as Central govt will not give extra powers to Delhi Govt, they will not allow Delhi Police under Delhi Govt. So again Kejri & gang will sit for Dharana. Traffic jams willl happen & as usual we will suffer. Modi, Kejri will not suffer. So hope God gives some wisdom to Bedi & BJP to talk properly and try to get majority.

Happy

साती, थँक्स. मी जाम एन्जॉय करतेय दिल्लीच्या निवडणूका. Happy

मंदार ?? Uhoh
म्हणजे दिल्लीत महिला सुरक्षित नसतील तरी चालेल, पोलिस कुणालाच अन्सरेबल नसतील तरी चालेल, वीजदर कितीही असतील तरी चालेल, पण केजरी नकोत? वा !
रच्याकने, केजरीवाल मुमं झाल्यावर धरणे-आंदोलनं भाजपावाले सुरू करतात. गेल्या वर्षीचं हर्षुकाका हातात पाट्या घेऊन बसलेलं आठवत नाही का?

>>तुम्ही लिहिलेलं "जो बोलतो तोच असतो" हे वाचून लहानपणची आठवण आली
त्यासाठीच लिहिले होते तसे. Lol

>>त्यांना पंप्र व्हायचं असलं तरी त्यासाठी मुमंपदाचा राजीनामा द्यायची अजिबातच गरज नव्हती. मोदी >>पंप्रपदासाठी लढत असताना ते गुजरातचे मुमं होतेच ना? की राजीनामा दिला होता?
अहो कोणताही मुद्दा कुठेही काय जोडताय ? पंप्र होण्यासाठी मुमंपदाचा राजीनामा दिला असे कुठे लिहिले आहे मी ? माझा मुद्दा बनारसमधल्या उमेदवारीबद्दल होता फक्त.
केजरीवालांसाठी बनारसची जागा ही गाजराची पुन्गी होती, जी नंतर त्यांनी मोडून खाल्ली पुढच्या निवडणूकीत ताकद येण्यासाठी. Wink

तुमचे विधान "भाजप फक्त केजरीवालांना हरवायला लढत आहे" हे फारच अतिशयोक्तीचे वाटते आहे.
खरेतर कुस्तीसंदर्भातली एक उपमा सुचत आहे पण न लिहिणे उचित.

तुम्ही, केजरीवाल, बेदी, मोदी, इ. लोकांशी माझे कोणतेही वैर नाही याची कृपया नोंद घ्यावी.
येथे अनेक आयडी अशा थाटात लिहितात की जसे काही विद्वेषाने नाही लिहिले तर त्यांना शाखा आणि स्वजोचे चित्रपट सक्तीने पहावेच लागायची शिक्षा मिळणार आहे. Lol

मी पण एंजॉय करतेय इथल्या निवडणूका. यावेळी पब्लिक गेल्या वेळेस पेक्षा जास्त व्होकल आहे. कामवाल्या बायका,सायकल रिक्षावाले, भाजीवाले, दुकानदार, इ रिक्षावाले, मेट्रोमधले लोक सगळेच निवडणूकीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करताना दिसत आहेत.

आज कामवाली सांगत होती की आप चा उमेदवार काल त्यांच्या वस्तीत येवून गेला. सहसा बाकी पक्षांचे उमेदवार आले तरी फक्त वस्तीच्या मेन रोडपर्यंतच येतात. आत गल्ल्यांमध्ये येत नाहीत की बघत नाहीत कशी वस्ती आहे म्हणे. हा उमेदवार सगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत होता. छोट्या छोट्या सभा घेत होता.

आमच्या कॉलनीत मात्र नाही आले आपवाले. बहूतेक येणारही नाहीत. काल भाजपाची एक रिक्षा गेली कृष्णा तिर्थला मत द्या सांगत घरासमोरून. पण त्यात भाजपाचा उल्लेख ऐकूच आला नाही. फक्त कृष्णा तिर्थचं नाव ऐकलं मी. दोन दिवसांपूर्वी आप मधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार वीणा आनंदची रिक्षा पण येवून गेली, सकाळच्या वर्तमानपत्राबरोबर तिचं पत्रक पण आलंय. काँग्रेसच्या राजेश लिलोठियांची पत्रक २-३ वेळा येवून गेली.

केजरीवाल यांच सरकार निवडुन येउदे. प्रूफ़ ओफ़ द पूडींग इस इन एटींग, काय करतात ते बघता तरी येइल. देश सुधारण्याचा मक्ता काय फ़क्त एकच पक्षाला दिलेला नाही.

युरो

सहमत !

केजरीवाल यांच सरकार निवडुन येउदे.>>>>>> ते सुध्दा संपुर्ण बहुमताने. मी तर म्हणेन दिल्ली विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागांवर आआपचे उमेदवार विजयी होऊदे. विरोध करायला कोणी उरणारचं नाही मग असा आरोप करता येणार नाही की विरोधक आम्हाला सरकार चालवायलाच देत नाहीत.

Rofl

Rofl

मी हे उपहासाने म्हटलेल नाही. हंग असेंब्ली येण्या पेक्षा हा पर्याय नक्किच बरा आहे. खरच काय करु शकतात ते कळेल. सत्तेत नसताना बीजेपी काय करते आणि सत्तेत आल्यावर आआप काय करुन दाखवणार हे एकदा स्पष्ट होईल.

युरो मी सुध्दा उपहासाने म्हटलेले नाही, कारण गेल्यावेळी केजरीवालांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा तेच म्हणाले होते की काँग्रेस आणि भाजपा त्यांना सरकार चालवायलाच देत नाही. विरोधकच नाही उरले तर हे कारण ते देऊ शकणार नाहीत मग ते काय काय करून दाखवतात ते आपल्याला कळेल.

अमित शाह यांनी दिल्लीची निवडणूक खूपच मनाला लाऊन घेतली आहे. रस्त्यावरून चालताना चार माणसं तुम्हाला धडकली तर नक्कीच भाजपचा आमदार, खासदार नाहीतर एखादा बडा नेता असेल.

Lol Biggrin सुनटुन्या

कारण गेल्यावेळी केजरीवालांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा तेच म्हणाले होते की काँग्रेस आणि भाजपा त्यांना सरकार चालवायलाच देत नाही. >केजरीवालला ४९ दिवसात किती प्रश्न सतत विचारत होते आणि मोदीच्या बाबतीत भक्त बोलत आहे वेळ द्या वेळ द्या अरे ९ महिने झाले काय झाले विकास आला का >? कि अजुन वेळ द्या
Rofl

10959394_1553870914868742_9116994660871610488_n.jpg

Rofl

http://aajtak.intoday.in/story/raining-crorepatis-this-assembly-election...

अगर बात श‍िक्षा की हो तो कुल उम्‍मीदवारों में 295 स्‍नातक हैं, 10वीं पास या उससे कम के 275 उम्‍मीदवार है. सभी पार्टियों में आम आदमी पार्टी में सबसे अध‍िक पढ़े-लिखे उम्‍मीदवार हैं, यहां 48 उम्‍मीदवार स्‍नातक या उससे भी अध‍िक पढ़ें हैं. बीजेपी में 47 और कांग्रेस में ऐसे उम्‍मीदवारों की संख्‍या 39 है.

सगळी तज्ञ लोक या धाग्यावर जमल्या मुळे बाकी धागे ओस पडली आहेत वाटत.
बरिच उपयुक्त माहिती आहे इथे.

1st it was AK Vs Modi
Then it became AK Vs Bedi
Now it has become AK Vs Indian Government.
Bande me hai dum....

बेदीजी को डॉक्टरने गले को आराम देने की और बात ना करनेकी सलाह दी है.सूत्रोंकी माने तो वो डॉक्टर कोई और नही , मोदी है .
उधर दूसरी तरफ आप वाले भगवान से प्रार्थना कर रहे है के किरणजी का गला जल्दी ठीक हो और वे फिरसे अपने पुराने फॉर्म में लौटे

Pages