जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या *******जी म्हणण्यावर स्थगिती आल्येय. कळल का कोण बोलताय. मी बोलतोय .मी बोलतोय. मी सुरेश कुडाळकर : D मेघनाची आई भलतीच पेटलेय . आरडा ओरडी कमी. नवर्याचा एकदम म्याव करून टाकलाय Lol

आजचा भाग बरा झाला.
भोचक शेजारणी पुकपुकल्याच.
तिथेही दोन अगाथा ख्रिस्ती फॅन निघाले.
मेघनाने आदित्यच्या खांद्याला हात लावला.
त्या बाबाजी बाबाजी वाल्याला एका डॉक्टरने बराच कंट्रोलमध्ये आणला आहे.
जागरण कशामुळे झाले ह्यावर नाजूक मतभेद आहेत.
योगिनी केव्हाही नुकतीच न्हायल्यासारखी दिसते ही एक तांत्रिक चूक आहे.
मेघनाचे ड्रेस बहुधा रविवार पेठेतील होलसेल विक्रेत्याच्या पडीक गोदामातून आणलेले असावेत.
आभारी आहे.

भोचक शेजारणी पुकपुकल्याच.>>> Lol असं काय!! त्यांना काळजी वाटते ना...म्हणुन आपलं कानावर घालतात. (माइच्या खबरीलाल आहेत त्या!!!)

बेफी Lol Rofl आज तुमचा विनोदनिर्मितीचा मूड कळसालाच पोचलाय जणू.

बाबाजी फारच अपमानापस्द बोलतात असं नाही वाटत का कोणाला? अक्कल आहे का? इ.इ. बायकोला मेव्हणीला बोलतात ऐकून खूप चीड येते. आजच्या भागात तर 'शिरलं का टाळक्यात' हे माझ्याच टाळक्यात गेलं...
असं कोणी सुशिक्षित घरात बोलत असेल वाटत नाही.

>>>>आजच्या भागात तर 'शिरलं का टाळक्यात' हे माझ्याच टाळक्यात गेलं...<<<

असतात असतात अशी द्वाड नवरे...

>>>>मेघनाने आदित्यच्या खांद्याला हात लावला.<<<
बस, इतकेच. अजून एवढेच? Proud मला तर ती प्रत्येक वेळेला रडते तेव्हा वाटते की हिंदी सिरीलीतील नायिकेप्रमाणे पटकन मिठी वगैरे मारेल... आणि एक्दम तिला साक्षात्कार होइल आ. दे. च्या प्रेमाचा.(यु नो लव करंट). पण कसचं काय... उगाच रेंगाळतय पात्र(मेघना).

>>>मेघनाचे ड्रेस बहुधा रविवार पेठेतील होलसेल विक्रेत्याच्या पडीक गोदामातून आणलेले असावेत.<<

चला, माझ्याशिवाय आणखी एकाने केले नोटीस.(मी बघा, नुसते +१ दिले नाही ह्या वाक्यला). Proud

कपड्यावरून आठवले, ती विजया आणि हि एकत्रच रविवार पेठेत जावून कपडे घेतात असे वाटते. आजच्या काळात सुद्धा इतके भंगार ड्रेस. ह्यांना स्टायली म्हणजे काय माहितच नाय... Proud

लव करंट.....झम्पी......:खोखो:
या पोस्टीवरून शाळेत असताना ऐकलेलं, गणेशोत्सवात विद्युतरोषणाईवाल्या टिपिकल मंडळांची काही टिपिकल गाणी असतात, त्यापैकी एक अ. आणि अ. धाग्यावर शोभेलसं करंटं ( मराठी अर्थाने) गाणं आठवलं,
बॅक मारती है, फरंट मारती है,
देखो ये लडकी 'करंट' मारती है ।

आणि आदित्यने मेघनाच्या ओठांना" हे राहिलेच की.... <<<

ते तिच्या भोकाड पसरण्याचा आवाज घरच्यांना ऐकू जाऊ नये म्हणून! आपल्याला वाटतोय तसा नव्हता काही त्या स्पर्शाचा अर्थ! चावट कुठले!

Light 1

मेघनाने आता आदित्यच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडले पाहिजे म्हणजे ती जरा धीट होईल Happy

आता हा धागा पण होसुमियाघच्या वळणाने जाणार दिसतय... (प्रतिसादांच्या बाबतीत)

मालिकेबद्दल काही लिहायला नको...

मला तर ती प्रत्येक वेळेला रडते तेव्हा वाटते की हिंदी सिरीलीतील नायिकेप्रमाणे पटकन मिठी वगैरे मारेल...>>>>>> आज काल कमीत कमी मराठी मालिकांमधुन नायक-नायिकेच्या मिठ्या कमी झालेल्या बघुन बर वाटतय पण...

एकदा मिठी मारली की शिरेल संपली.. मग 'होसूमीयाघ' आणि ही दोन्ही सारख्याच.. Happy

(तिकडे लग्न झाल्यावर संपली होती...)
एलतिगो, आणि जाविघेआ या दोन्ही शिरेली लग्नात संपणार.

एकंदरीत लग्न झाले की पुढे सगळे संपले असे समजावे...

आजच्या भागात ऐकलेले 'दिव्य' मराठी:
आ.दे.चा पुतण्या: तो 'हो'च बोलेल.
हिरो आ.दे. स्वतःच्या वहिनीला: तू आणि अर्चना दोघी बोलतात ना त्यांना. ?!#%^*

>>>आजच्या भागात ऐकलेले 'दिव्य' मराठी:
आ.दे.चा पुतण्या: तो 'हो'च बोलेल.
हिरो आ.दे. स्वतःच्या वहिनीला: तू आणि अर्चना दोघी बोलतात ना त्यांना. <<<

अरेरे! काय हि भाषा( संवाद लिहिणारा मुंबईचा असेल... त्याशिवाय नाही) Proud

-----------------

आता मलाहि कंटाळा आलाय ह्या सिरियलचा. नवीन असताना बरी वाटते, मग ३ एक महिने झाले की दळतात दळण....
गाणं बाकी आवडतं मला. निहिरा जोशी चांगले गाते. मी रिंग्टोन घेतलाय जुळून येती चा. भारतात तर हि फॅशन आहे म्हणा असे दिसले.. मग आपण का मागे... Proud

आमच्या कामवाल्या बाईचा रिंगटोन... 'आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं' आहे. प्रत्येक वेळी तिचा फोन वाजला की हसायला येतेच.

ती चिल्लर कंपनी एकदम टाळक्यात जाणारी आहेत.. एकदम आगावु.

त्यात वेड्यासारखे कपडे व वेण्या घालून त्या मुली. इतके आगावु संवाद का असतात त्यांच्या तोंडी कळत नाही.

आमच्या काळी आम्ही न्हवतो असे ..... Proud

ती चिल्लर कंपनी एकदम टाळक्यात जाणारी आहेत.. एकदम आगावु.

त्यात वेड्यासारखे कपडे व वेण्या घालून त्या मुली. >>+१
आणि मुंबईत राहूनसुद्धा आदित्य आणि अमित संध्याकाळी अंधार पडायच्या आत घरी येतात बर्याच वेळा..
कसं शक्य होते त्याना??

५०० Happy

मयेकर,बरे असां ना?

--------------
इथे कोणी फिरकत नाही... अरे देवा. वाईट दिवस आले.

Pages