Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबाजी, या मयेकरांवर नीट लक्ष
बाबाजी, या मयेकरांवर नीट लक्ष असू द्या बाबाजी ...........
बघत नाही ही सिरीयल... सतत
बघत नाही ही सिरीयल... सतत खादाडीच्या विविध पदार्थांची नावे, नणंद आणि शेजारणींचा भोचकपणा, मेघना आणि विजयाचे कंटाळवाणे ड्रेसेस, मेघनाचे उसासे खरंच कंटाळा आलाय आता. तरी त्यातल्या त्यात सुसह्य बाब म्हणजे बाबाजी जरा कंट्रोलमध्ये आलेत. गोगा आणि बेफींचे ब्रीफ अपडेट्स वाचायला बरे वाटतात त्यापेक्षा. मालिकेला खरंच चकवा लागलाय.
मला तरी अजुनही सुसाह्य आहे
मला तरी अजुनही सुसाह्य आहे मालिका
मी पण मालिका पाहत नाही..(फक्त
मी पण मालिका पाहत नाही..(फक्त आदित्य ला पाहते... )
मी पण मालिका पाहत नाही..(फक्त
मी पण मालिका पाहत नाही..(फक्त आदित्य ला पाहते... डोळा मारा )+१००००००
ईईईईईई!
ईईईईईई!
ती ढोल सुकन्या कुलकर्णी बघवत
ती ढोल सुकन्या कुलकर्णी बघवत नाही. माणसानी कीती जाडे असावे
मराठी मालिकेत वजनावर काही बंधन नको का?
वजनावर जाउ नका, अभिनय बघा.
वजनावर जाउ नका, अभिनय बघा. सुकन्या कुलकर्णी मोने आणि गिरिश ओक या दोघांनीही खुप चांगले काम केले आहे या मालिकेत. आणि त्याचप्रमाणे प्राजक्ता ने सुद्धा. तिच्या व्यक्तिरेखेला शोभेल असा रडका चेहरा करून सतत वावरणे इतके सोप्पे नाहिये.
तो मेघनाचा आदित्य सारखा इकडे
तो मेघनाचा आदित्य सारखा इकडे तिकडे फिरत असतो. तिच्या जवळपासच .
आत्ता भेटेल अस वाटत
वजन जास्त असणारे अनेक जण
वजन जास्त असणारे अनेक जण असतात की आपल्या आसपास. त्याने काय फरक पडतो ? तो ललीत आणि ती रडकी कुठे एवढे भारी लागून गेलेत? सुकन्या उत्तम अभिनय करते आणि तिला सतत फक्त वजनावरून बोलणे बरोबर नाही बरे? ती खूप मोठ्या आजारातून जिवानिशी वाचली..अन नंतर हार्मोन्सच्या बिघाडामुळे वजन वाढले आहे तिचे. ती प्रयत्न करूनही उतरत नाहीये ते....तिला प्लीज माफी करा...
वजन जास्त असणारे अनेक जण
वजन जास्त असणारे अनेक जण असतात की आपल्या आसपास. त्याने काय फरक पडतो ?>>+१
ती प्रयत्न करूनही उतरत नाहीये ते....तिला प्लीज माफी करा...>>>माफी कशाला? तिला अहे तसं स्विकारावे ना...
कोणी स्वतःहून जाणून-बुजून जाड होत नाही....आणि कोणी झालेच तरीही दुसर्यांनी का नावे ठेवावित हेच मला कळत नाही.
सुमेधा व सोनाली, आपल्या
सुमेधा व सोनाली,
आपल्या दोघींशी सहमत आहे.
फक्त मला असे वाटते की लोकांना सुकन्या (सुमेधा - करेक्शनसाठी आभारी आहे) जाड असण्यात प्रॉब्लेम नाही आहे, ती जाड असूनही नसल्यासारखी वागते हा प्रॉब्लेम आहे.
बेफि..तुम्हाला सुकन्या
बेफि..तुम्हाला सुकन्या म्हणायचे आहे का ?
म्हणजे त्या मेघनाची सासू
म्हणजे त्या मेघनाची सासू म्हणायचे आहे मला
सुकन्या मोने जीवावरच्या
सुकन्या मोने जीवावरच्या दुखण्यातून ज्या जिद्दीने परत उभ्या राहिल्या ते फार कौतुकास्पद आहे. फार सुरेख अभिनय केलाय. आणि जाडपणाबद्दल बोलायचे तर आपल्या आसपास या वयोगटातल्या इतपत जाड अनेक माता दिसतात त्यामुळे या भुमिकेत तरी त्या शोभून दिसतात.
स्वतंत्र भारतात गाजलेली काही
स्वतंत्र भारतात गाजलेली काही विधाने खालीलप्रमाणे:
१. आणि बुद्ध हासला.
२. गणपती दूध पितो.
३. आदित्यने स्वयंपाक केला
कोटी कोटी प्रणाम ह्या मालिकेला!
ज्यांच्या गाठी जुळायला हव्या आहेत ती रेश्मं राहिली बाजूलाच!
अरे अजून चालू आहे का मालिका?
अरे
अजून चालू आहे का मालिका? मी जरा आठ दिवस चित्रपट काढण्यात गुंतलो होतो. त्यामुळे वेळ मिळाला नाही...
फायन्ली आले आले समोरासमोर आले
फायन्ली आले आले समोरासमोर आले आ मे
भेटले एकदाचे एकमेकांना !
भेटले एकदाचे एकमेकांना !
पुढच्या भागात मोकळं मोकळं वाटणार आहे म्हणे मेघनाला.. नक्की काय केलं कोण जाणे.
>>नक्की काय केलं कोण जाणे.
>>नक्की काय केलं कोण जाणे. <<<
काय हे? बघितलं ना एकमेकांना. आणि नुसतं बघून मोकळं नाहि का वाटू शकत? आँ.
'हम दिल दे चुके सनम' चा track
'हम दिल दे चुके सनम' चा track चालू झालाय का आता?
आ. न. व आ. दे. मेघनाच्या
आ. न. व आ. दे. मेघनाच्या समोरासमोर.
मेघना भाजीत दुप्पट मीठ आणि आमटीत अजिबात मीठ घालत नाही.
मेघना मावशीच्या घरी जाते फोन न करता.
घरचे शोधायला बाहेर जातात.
आता कुणी थांबावे आणि कुणी जेवावे यावर चर्चा..
गोगा तुमच्या अपडेट्स लई भारी
गोगा तुमच्या अपडेट्स लई भारी
आजचा भाग अजून इन्टरेस्टिंग
आजचा भाग अजून इन्टरेस्टिंग असणारे ....
मेघना Upset असल्याचं कारण
मेघना Upset असल्याचं कारण सांगते. (आ. न. ) - गळू फुटले आते पुढे सरका....
बाकी काही न घडणारा episode...
गळू फुटले आहे>>>>
गळू फुटले आहे>>>> ....अत्यंत चपखल शब्दांत वर्णन केल्याबद्दल अभिनंदन गोगा....
गळू फुटले आते पुढे सरका >>>>
गळू फुटले आते पुढे सरका >>>>
बाकी काही न घडणारा
बाकी काही न घडणारा episode...
>>>> घडल ना, अर्चनाने संपुर्ण दिवस स्वत:च्या घरी घालवला. नाहीतर ब्रेफापासुन डिनरपर्यंत खालीच असते ती
मला संपुर्ण देसाई कुटुंबाच्या
मला संपुर्ण देसाई कुटुंबाच्या निरागसतेचे अतिशय कौतुक वाटते..तिचे वागणे पाहुनही तिचे लग्न कदाचित तिच्या मनाविरुद्ध झालेले असेल किंवा तिचे आधी काही असेल अशी शंकाही कोणाच्या(सासू सासर्याना समजा वाटत नसेल पण इतरही कोणाच्या) मनात येत नाही.
मालिकांच्या इतिहासात
मालिकांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडल असेल कालच्या एपिला हरवलेला माणुस परत आला आणि लग्गेच आजच्या एपिला त्याची ओळख योग्य त्या माणसाला मिळाली... नाहितर आजपर्यंत मालिकेतल्या मुख्य पात्रानेच त्याला भेटणे, परत आलेल्या माणसाने ब्लॅकमेल करणे, ते गुपचुप पार पाडत असताना घरातल्या खतरनाक व्यक्तीनेच नेमके बघणे या गोष्टीनी उत आणला होता.
Pages