Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोगा अपडेट्स नाही देणार? का
गोगा अपडेट्स नाही देणार? का बरं? <<< आजपासून परत चाललोय अमेरिकेला घरी.. तिथे कुठे मेघना?
आणि तिचे 'मला खूप काळजी वाटतेय रे..? '
गोगा मस्त अपडेट्स देत होतात..
गोगा मस्त अपडेट्स देत होतात.. प्रत्येक मालिकेचे अपडेट्स देण्याची जबाबदारी कोणीतरी घ्या बर. म्हणजे आम्हाला रोज पाहायला नको
गोगा काळजी करुन नका. बाबाजी
गोगा
काळजी करुन नका.
बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या गोगां वर... एव्हढंच
दुर्वा सावंत कोण ?(वर
दुर्वा सावंत कोण ?(वर कलाकारांच्या यादीत आहेत )
दुर्वा सावंत कोण ?(वर
दुर्वा सावंत कोण ?(वर कलाकारांच्या यादीत आहेत )>>>>>>>मेघनाची आई असावी बहुधा.
गोगा....आपलीमराठी च्या
गोगा....आपलीमराठी च्या संकेतस्थळावर उजव्या बाजूला झी मराठी च्या शिरेलीं च्या रोजच्या भागाचे धागे असतात. जाहिराती वगळून आपल्याला नको तो भाग पुढे सरकवून १० मिनिटांत शिरेल बघून होते. शिरेल 'घरात' न शिरू देता अपडेट्स देणे शक्य आहे, अर्थात कामात बिझी असाल तर नाही....:)
आज.. आ न च्या येण्याने मेघना
आज..
आ न च्या येण्याने मेघना परत झुरायला लागते आणि आ दे तिला 'मनातल्या वादळाची झळ घरच्यांना लागता कामा नये' अशी समज देतो. नाश्त्याच्या वेळी घरातल्या बायका बाबाजीची टिंगल करताना मेघना ऐकते अन निघून जाते. बाहेर योगिनी आणि काकू तिला आदित्यवरून चिडवतात तर ती त्यांना उलट बोलते. तर ह्या लगेच जाऊन माईंना (चुगली) सांगतात. मेघना माहेरी जाते व आई-मावशीला बाबाजीचे प्रताप साण्गते तर तिची आई सांगते कि बाबाना समजावण्यापेक्षा तूच गोड बातमी दे. तेव्हा मी अजून आ न ला विसरले नाही असे सांगुन निघून जाते. आ दे तिला आणायला कॉलेजमध्ये जातो तेव्हा ती आधिच निघून गेलेली असते आणि तिथे आ दे व आ न ची गाठ पडते.
बरं झालं आदित्यने हिच्या मुड
बरं झालं आदित्यने हिच्या मुड स्विंग्स वरून सुनावले ते.. विचित्रच वागते नाहीतरी
हो मेघनाची आई दुर्वा सावंत
हो मेघनाची आई दुर्वा सावंत
मा.बो.मंडळी.... आय अॅम
मा.बो.मंडळी.... आय अॅम कन्फ्युज्ड....मज पामरा कुणी जाणत्यांनी मार्गदर्शन करावे....ह्या कबुतरीण मेघनेला नक्की प्रॉब्लेम काय आहे? म्हंजे इतके दिवस ज्या आदित्य नगरकराला देसायांचा आदित्य आणि स्वतः कबुतरीण शोधत होते, तो आलाय अस ं कळल्यावर ही बया का चिंताक्रांत होती? म्हणे आता सगळ्या आदित्य क्र.१ च्या ( नगरकराच्या) स्मृती माहेरी नेऊन टाकल्या
( :खोखो:, ह्यम, असो) आणि क्र.२ च्या आदित्यशी (देसाई) मैत्री ( ढॅण्टढॅं ;))करण्याचा प्रयत्न करत होते, तर आदित्य क्र.१ परत आला. मला प्रश्न पडले ते असे-
# मुळात क्र.२ आ. शी 'फक्त' मैत्री करायला क्र.१ आ. ला विसरायला कशाला लागतं?
# आदित्य क्र.१ शी लग्न करायचंय (म्हणजे माझा असा गैर (?)समज होता इतके दिवस), की आदित्य क्र.२
बरोबर ऑलरेडी थाटलेला संसार चालवायचाय?
वैसे सध्याच्या सासू- सासर्यांकडे पाहून मेघनाचं 'मतपरिवर्तन ' होणं टोटली लॉजिकल आहे, ती नक्की मनात म्हणाली असेल" जाऊदे तो अदू (क्र.१), अस्संच सासर हवं गं बाई (म्हणजे श्री.(थोरले) देसाई व त्यांच्या सौ. )
होसुमीयाघ मध्ये त्या श्रीच्या
होसुमीयाघ मध्ये त्या श्रीच्या काकाने जशी सणसणीत आपटेच्या कानाखाली वाजवली तशी कोणी या मेघनाच्या कानाखाली वाजवुन तिला जमीनीवर आणेल का?
सखी आणि राज अनुमोदन. आपल्या
सखी आणि राज अनुमोदन.
आपल्या इथे नगाला नग अशीच विचारसरणी असते हे पुन्हा एकदा शिरेलवाल्यांनी सिद्ध केलं.
अर्र्र्र्र्र्र्र्र उगाच मिसला
अर्र्र्र्र्र्र्र्र उगाच मिसला मी हा भाग
रीये, रीपीट असतो म्हणे १२:३०
रीये,
रीपीट असतो म्हणे १२:३० , ३:३० दुपारी पण आम्ही इथे पाट्या टाकत असतो ना हाफिसात...
तु बघ आणि दे अपडेट्स
होसुमीयाघ मध्ये त्या श्रीच्या
होसुमीयाघ मध्ये त्या श्रीच्या काकाने जशी सणसणीत आपटेच्या कानाखाली वाजवली तशी कोणी या मेघनाच्या कानाखाली वाजवुन तिला जमीनीवर आणेल का?>>>>>+१००००००००००००००००००
तशी कोणी या मेघनाच्या
तशी कोणी या मेघनाच्या कानाखाली वाजवुन तिला जमीनीवर आणेल का<<<
का चिडताय सगळे बिचारीवर? प्रामाणिकपणे ती कंटाळा आणण्याचे कार्य करत आहे. एवढे सातत्य राखणे म्हणजे खायची गोष्ट नाही.
मेघनाच्या अगदी कानाखाली नाही
मेघनाच्या अगदी कानाखाली नाही पण आदित्यने तिला या वेळी मस्त झापले. बेफि बरोबर आहे. इतके बाकीचे सगळे हसत असतान हिने मात्र रुसून बसायचा सतत अभिनय करायचा काही खायचे काम नाही . आपल्याला तिची चीड येतेय म्हणजे ती चोख अभिनय करतेय तर
झंपे मी पण हापिसातच असते की
झंपे मी पण हापिसातच असते की त्यावेळेला
(तुला मी शाळेत जाणारी मुलगी वाटले का? )
मेघनाची चीड येते??? तिला
मेघनाची चीड येते??? तिला प्लीज काही बोलु नका ..
जर मालिकेची नायिका(?)च कायम
जर मालिकेची नायिका(?)च कायम सुतकी रडका चेहरा ठेऊन बसत असेल आणि आदित्य १ आणि २ यातच जर ती विचलित असेल तर मग आम्ही मालिका काय बाबाजी बाबाजी साठी बघायची का?
अरे मी दोन दिवस नही आलो तर
अरे मी दोन दिवस नही आलो तर मेघनाला शिव्या?
गोगा.... मेघना 'तुमची' मा.बो.
गोगा....:)
मेघना 'तुमची' मा.बो. भाषेत 'भाची' आहे होय
परवाच्या भागात मेघनाला तो
परवाच्या भागात मेघनाला तो कुणीतरी मुलगा सांगतो ना की आ. न. परत आलाय तेव्हाचा तिचा ड्रेस कित्ती दळभद्री होता. शॉर्ट टॉप आणि शिप कट होता खालून. यक्क. असला ड्रेस मी स्वप्नात सुद्धा घालणार नाही. आणि वर ती दुरंगी ओढणी...बावळटपणाला चारचांद
मेघना 'तुमची' मा.बो. भाषेत
मेघना 'तुमची' मा.बो. भाषेत 'भाची' आहे होय <<< काय करणार ? कुडाळकर मुलगी आणि देसायांच्या घरात दिलेली..
एडिटिंग गंडलं आजच्या भागात !
एडिटिंग गंडलं आजच्या भागात ! ... मेघनाच्या सोशिक आईने वडिलांना 'एक घाव दोन तुकडे' टाईप कठोर भाषेत सुनावण्याचं बळ एकवटलं तरी कसं ह्याचं भयंकर आश्चर्य वाटत होतं. पुढच्या सीनमध्ये ह्या शक्तीचा उगम माईंच्या समजूतदार लेक्चरमध्ये होता हे समजलं
बाबाजीवाले संकटात... माईनी
बाबाजीवाले संकटात...
माईनी मेघनाला समजावले.... Delayed Update from US
मेघनाच्या सोशिक आईने वडिलांना
मेघनाच्या सोशिक आईने वडिलांना 'एक घाव दोन तुकडे' टाईप कठोर भाषेत सुनावण्याचं बळ एकवटलं तरी कसं ह्याचं भयंकर आश्चर्य वाटत होतं...+१
गोगा
गोगा
अमितच्या बॉस साठी नवा जॉब
अमितच्या बॉस साठी नवा जॉब शोधणार अमित/आदित्य....
अदित्यने समजावले मेघनाला...
माधवीबाईनी धमकावले बाबाजीना... (सोडून जाईन म्हणून)
मेघनाने योगिनीशी परत मैत्री केली
माईनी माधवीबाईना बोलावून समजावले (विजयाला कटवले).
अर्चू आणि विजया... 'नक्की काय झालं असेल यावर चर्चा करतात'..
आ. ना. मेघनाला न भेटण्याचा निर्णय घेतो..
गरमा गरम Updates अमेरिकेतून..
गोगा, अपडेट आहेत की मटाच्या
गोगा, अपडेट आहेत की मटाच्या हेड्लाईन्स???
Pages