जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मण्जूडी.. कान्हेरेंचे देसाई ?
झंपी: हल्ली मी भारतात घरी असतो आणि सा.बा.. बघतात... त्यामुळे....
आबासाहेबः अजून एक आठवडा.. .मग अशोकमामांवर अवलंबून... Happy

मण्जूडी.. कान्हेरेंचे देसाई ?>>> ओ, देसाईचं कान्हेरे झालंय Wink

हल्ली मी भारतात घरी असतो आणि सा.बा.. बघतात... त्यामुळे....>> Lol

>>>झंपी: हल्ली मी भारतात घरी असतो आणि सा.बा.. बघतात... त्यामुळे....<<

म्हणजे बरय की..... इथे अपडेट 'जमले' तर टाका की.

-------------------------------------------------
(स्वगत )
मी आईला आधी तिच्या आवडीच्या सिरियल बघताना हसायची, आता मलाच चोरी झालीय बघायला. सगळे वचपा काढताहेत, अरे बापरे काय ती फालतु सिरियल तुला बघायचीय... शी! काय तुझा चॉईस... सगळा मुर्खपणा आहे ती सिरियल बघणे म्हणजे.... आणि काय नी बोलून आघात करतात. जळ्ळं , रेकॉर्ड करून पण बघु शकत नाही. सगळे तूटून पडतात बोलायला. आईला आवडत नाही खास हि सिरियल. मुलगी फक्त (मला)चिडवायला बघते.
(किती दु:ख आहे मला).

देसाईचं कान्हेरे झालंय <<< मला कसे कळणार..? मी म्हटले D for Desai... आधीचे कि.न्वा आताचे...

५०/५० lifeline
Proud

सुरूवातीची कथा मला माहीत नाही (त्याने फार फरक पडत नाही म्हणा..) हिरविणीचा बाप (बाबाजी बाबाजी) छळतो म्हणून घरातले सगळे कावतात. शुध्दीवर आलेली हिरवीन नवर्‍याबरोबर फिरायला जाते. हे दाखवायला ३० मिनिटे जातात...

अशी गोची होते होय गोगांची... <<< तर काय,,,

संध्याकाळी तीन सिरियल...

१. एका लाल भोपळ्याची सगळे भोपळे वाट बघतात (३० मिनिटे).
२. बाबाजीमुळे सगळे हवालदिल होतात. (३० मिनिटे).
३. एक मुलगी सासवडाला जाणार अशी घोषणा करते (३० मिनिटे).

दिड तास गेला... Sad

संध्याकाळी तीन सिरियल...

१. एका लाल भोपळ्याची सगळे भोपळे वाट बघतात (३० मिनिटे).
२. बाबाजीमुळे सगळे हवालदिल होतात. (३० मिनिटे).
३. एक मुलगी सासवडाला जाणार अशी घोषणा करते (३० मिनिटे).
Lol

काल सतिश म्हणत होता मेघनाला की तू योगिनीबरोबर जिम जॉईन कर. ती वेट लॉससाठी करतेय तू वेट्गेनसाठी कर Uhoh
त्याला उलटं म्हणायचं होतं बहुतेक... या ढम्माडला कसले अजून वेट गेन? Proud

ओके. पर्सनली तुमच्याविषयी काही नाही. पण मराठी मुलींमध्ये अतीहडकुळेपणाची (झिरो फिगर वै.) लाट येऊ नये असं मनापासुन वाटतं. त्यामुळे मेघनाला जाड म्हणणं थोडं खटकलं. (हेमावैम).

आजचे Update : घरात रडारड, मुलाना घेऊन बाहेर जाणे...परत येणे.. मग देसाई घराण्यावर lecture (लेक्टूरे) Proud

ता.क. आज हिरवीण थोडी हसली...

हिरवीण हसली...गोगा....:खोखो:...पण ' हंसी तो फंसी' होणे ही बहुतेक पंचवार्षिक योजना दिसते आहे. त्रेतायुगात जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरल्या घाटात एसट्या १ल्या किंवा २र्या गियरमध्ये प्रचंड कंटाळवाण्या हळू वेगात जायच्या त्याची आठवण झाली.....

झंपी.. हेच अपडेट...

अमित मुलांबर ओरडला.
म्हणून आ-मे त्यांना बाहेर घेऊन गेले. पाणीपूरी , Icrcream खाल्ले.. परत आले.
अमितची बायको Thanks म्हणाली.
माई - नानानी आदित्यचं कौतूक केलं.
मग कळलं की ही Idea मेघनाची.. मग तिचं कौतूक.. देसायांची सून म्हणून.
आदित्य मेघनाला family म्हणजे काय ते सांगतो. (एका छ्पराखाली माणसे नाहीत तर सुखदु:ख वाटून घेणारी माणसे....
आदित्य बालपणीच्या आठवणी सांगतो. आणि मेघना थोडीशी हसते... The ENd

देसाई फॅमिली हॅप्पी फॅमिली.
मेघना कुडाळकर ही 'सुख दुखणारी' एक कॅटेगरी असते त्यातली आहे. स्वर्गात गेली तरी तोंड वाकडंच
अ‍ॅडमिन जरा जास्त भावल्या द्या की उपलभ्द करून.

मेघना कुडाळकर ही 'सुख दुखणारी' एक कॅटेगरी असते त्यातली आहे. स्वर्गात गेली तरी तोंड वाकडंच<<<

Rofl

Pages