जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे कसे लागत नाहीत फोन? Angry मग ईमेल करा.. कधीतरी तो चेक करेलच. त्याच्या घरी जाऊन धुंडाळा त्याला. सगळे फोन लागत नाही म्हणून हातावर हात धरून बसलेत गप.

बहुतेक या सिरियलमध्ये मेघना आनि आ.दे. चं कसं जमलं तेच दाखवायचं असेल.. ती तशी पण प्रेमात पडायलिये त्याच्या. आता इजहार दाखवा आणि संपवा म्हणावं. Angry
रोज फक्त तो नाश्ता, नणंद जावेच्या दोने तीन उड्या/नानांचा चहा/ तिकडे बाबाजी बाबाजी. मेघना आदित्यचची एक्मेकांना ओफिसला सोडासोडी.... संपलं याउप्पर स्बस्टॅन्शियल असं काही दाखवतच नाहीत.
Angry

आणि आता ती पेटी आईकडे नेऊन टाकणार आहे. मग इकडे आणलीच कशाला? Uhoh

मेघना घाईत बॅगेला कुलूप न घालता गेलीय. ती पेटी आता आईकडे सोडून यायला हवी असाही विचार करताना दाखवलीय. म्हणजे आदेच्या प्रेमात पडण्याची पूर्वतयारी Wink
आता आईकडे पेटी सोडायच्या आत नणंद ती उघडून बघणार. मग घरात हलकल्लोळ होणार. मग आधीच घुसमटलेली मेघना अजूनच घुसमटणार. प्रेम पंख पुरवतं, उडायला शिकवतं म्हणून मग आदित्य तिला घेऊन हैदराबादला रवाना होणार.

असे कसे लागत नाहीत फोन? राग मग ईमेल करा.. कधीतरी तो चेक करेलच. त्याच्या घरी जाऊन धुंडाळा त्याला. सगळे फोन लागत नाही म्हणून हातावर हात धरून बसलेत गप. >>>>>>>>>>. अन हा आ न बरा बसला गप्प....माझी जीएफ मला डिच करुन लग्न करते म्हणजे काय....तो पण या पकाव कबुतरी ला कंटाळला असणार....बोलत असेल जाउदे सुंठी वाचुन खोकला गेला.....

आज ही मेघना म्हणाली, 'निर्णय घ्यायला मला बळ गोळा करावं लागणार आहे.'
थोडी अक्कल गोळा कर म्हणावं जमलं तर.. खूप झालं. Lol Rofl

बेफिकीर....दक्षिणा....:खोखो:
बाकी सीरियलींमध्ये अचानक सोयिस्कररीत्या गायब होणारी पात्रं हा आमच्या घरचा आवडता जोक आहे.
हे सगळे प्रकार ' महाभारतोत्भव' आहेत असं आमचे सा.बु. म्हणतात, कारण ह्या पात्रांचे न लागणारे फोन, न पाठवलेले एस.एम.एस किंवा ई-मेल्स वगैरे सगळं 'कर्णाच्या विद्ये' सारखं आहे. Happy

तो बाबाजी त्या सतिश च्या का मागे लागला आहे?
अर्धवट पाहिल्याने काही कळाले नाही. तो सतिश त्याचा शत्रु का आहे?

तो बाबाजी त्या सतिश च्या का मागे लागला आहे? <<< त्याला वाटते (बाबाजींचा आदेश) की सतीश श्त्रू असावा..
<<<<<<<<< बाबाजीने दृष्टांत दिलेला आहे कि त्या घरात तुझा(उटिचा) एक शत्रु आहे.
+ सतिशने लग्नाअगोदर आजुबाजुला बाबाजीची चौकशी केलेली असते जी आता त्याना कळालीए. त्यामुळे त्याना तस वाटतयं

मी ती जुयेरेगा सिरियल बघितली नाही कित्येक दिवसात.

ते मेघनाचे श्वास घेवून सोडत बोलणे पाहून मलाच श्वास लागायचा...

तरी मेली ती उत्सुक्ता... काय चाललेय पुढे? गंगेत घोडं न्हाहायलं का? झालं का एकदाच? फिदीफिदी

काय चाललेय पुढे? <<< मे..रडतेय...आ.. समजावतो आहे...आ..ना... शांत आहेत. बा़कीचे बाबाजी बाबाजी करताहेत...

घराण्याचे नाव देसाई आहे म्हणून उठाठेवी... मला
Proud

घराण्याचे नाव देसाई आहे म्हणून उठाठेवी... मला>>> Proud तर काय... मलाही त्याच कारणासाठी... पण उत्सुकता! उठाठेवी नाहीत Wink

गो.गा....

प्रथमच या धाग्यावर येत आहे लिखाणासाठी....तसा वाचनमात्र मी आहेच. पण मालिका पाहाता येत असल्याने काही प्रतिसाद देताही येत नाहीत. "जान्हवी" पाठोपाठ तुमची "मेघना" येत असल्याने सलग एक तास टीव्हीसमोर बसण्याची परवानगी नसल्याने ही मालिका पाहाणे हुकत आहे.

तरीही येथील प्रतिसाद वाचता मालिकेची रंगत वाढल्याचे दिसत आहे.

Pages