जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगा, केक राहिला. आणि विजयाची रडारड राहिली.

राधा, मेघना , स्पृहा खात्यापित्या घरच्या वाटतात >> Uhoh
पण ती बारिक तर मुळीच नाहीये >> ohmy.gif
मग तुम्हाला, म्हणजे रिया आणि अंजली_१२ दोघींना, केतकी माटेगावकर छान बारीक आहे असं वाटत असेल ना?

बाकी काहीही असुदे, पण त्या मेघना ला काही बोलू नका ......... Happy
इतर म्हणजे, राधा, कल्याणी, जान्हवी, माधुरी, इशा याच्यापेक्षा बरीच उजवी आहे .............. Happy

अ आ Happy
निदान सुपर वूमन न दाखवता (अजूनतरी) नॉर्मलच मुलगी दाखवली आहे.
तिचे कॅरेक्टर चांगले लिहीले आहे आणि प्राजक्ता ते चांगल्या रितीने निभावत आहे, असे माझे मत.

तिच्या माहेरी असलेले दडपणयुक्त वातावरण बघता ती अशी मुळूमुळू स्वभावाची होणे स्वाभाविक आहे. त्यातच मनाविरूद्ध लग्न झालेले आहे आणि सासरी मिळणारी आपुलकी तिला याआधी अनुभवायला मिळालेली नाही. त्यामुळे, हळू हळू देसायांच्यात गुंतत जाणे आणि त्याचवेळी नगरकरच्या आठ्वणीने कासावीस होणे चांगले दाखवले आहे.
जसा तिचा स्वभाव दाखवला आहे त्यानुसार ती स्वतः आ नला शोधेल किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करेल हे पटत नाही.
मनाविरुद्ध लग्न झालेली आणि प्रतिकार करू न शकणारी किंवा धाडसी निर्णय न घेऊ शकणारी मुलगी अशी ही व्यक्तिरेखा आहे आणि बरीचशी पटतेदेखील.

'कुडाळकर ' ???

देसाई... कुडाळकर... हे काय माझ्या घरात चाललेले नाटक आहे का ? आता मला अमेरिकेतही बघावी लागेल ही रडारड.... Angry

त्या मेघना ला काही बोलू नका ....

मला तर या सिरियलमध्ये सुकन्या कुलकर्णी, गिरिश ओक आणि तो सतिश चं कॅरेक्टर केलेला माणूस सोडला तर कुणी आवडत नाही. आणि ती दोन तीन बारकी पात्रं सुद्धा बरी आहेत. बाकी सगळे एकजात पाठ करून बोलतात.

मेघनाचं पात्रं लिहिलं चांगलं गेलंय. पण प्राजक्ता माळीला फारसं जमेना ते.
"ए काय रे हे आदित्य" आणि 'ह्म्म्म्म' शिवाय काहीच बोलता येत नाही तिला.

रामायणमधे जसा रावण गेल्यावर काही "राम" राहिला नव्हता.. तसे मेघनाचा मूड चांगला झाल्यावर या मालिकेत काही उरणार नाही सो प्लीज तिला काही बोलु नका.. तिच्या दु:खात आमचे सुख आहे Happy

मन्स्मी, रावणांनंतरही रामायण होतंच की
आणि तितकंच त्रासदायक होतं Sad
(आठवा अग्निपरिक्षा, आठवा सितेचा पुन्हा वनवास, आठवा लव कुशांचा जन्म)
असो!

"ए काय रे हे आदित्य" आणि 'ह्म्म्म्म' शिवाय काहीच बोलता येत नाही तिला.>>>>>>
आणि जे काही बोलते ते वरून फक्त कबुतरासारखं गुटर्र गुटर्र गु करत घशातल्या घशात बोलत राहते. Happy +१
हि दक्षिणाची आधी आलेली पोस्ट! Happy

मी कोणत्या वाट्टेल त्या दैवताची शपथ घेऊन प्रामाणिकपणे सांगतो की आजच्या भागात कैच्याकैच्याकै चाललेले होते.

बेसिकली ही स्टोरी पुढे जातच नाही आहे. रोज एक फुसकुला प्रसंग घेऊन त्यावर प्रत्येकाचे आळीपाळीने मतप्रदर्शन दाखवत आहेत फक्त.

मला आवडतेय हि मालिका .प्राचीला मेघनाच्या बाबतीत पूर्ण अनुमोदन. मेघनाच्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा ती व्यवस्थित निभावतेय. Happy

अमितला वडिलांनी चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या...
सतीश मेघनाच्या माहेरी जाऊन 'एकदाचे काही ते संपवुया' म्हणाला.
मेघनाला काळजी/नेहमीप्रमाणे भीती वाटली, आणि तिने ते आईला कळवले...

भाग संपला.. (दिसायला बरी असल्याने तिने बाकी काही नाही केलं तरी चालतं.. कुडाळकर्/देसाई ... गुन्हे माफ)...

कुडाळकर्/देसाई ... गुन्हे माफ>>> Lol

बाकी, काल सतिशने कुडाळकरांना कसं झापलं ते कोणीतरी साद्यंत वर्णन करून सांगा प्लिज!

कुठलं झापलं? तो आला त्याने त्याचे फोटो आणि B.Com/LLB असल्याची माहिती दिली. आणि बाबाजी भक्त 'आत्ता येतो' म्हणुन जे गेले ते मालिका संपेपर्यंत. लपत लपत त्यानी त्यांच्या गुप्तहेराला फोनवर झापले. आता त्यांचे झापणे कदाचित पुढच्या आठवड्यात कधीतरी.. काळ थांबला.. Happy

>>त्या मेघना ला काही बोलू नका .... >>>>> +१००<<

अच्छा! हे रहस्य आहे काय..(उगाच का ते साबा बघतात म्हणून बघावे लागते सांगायचे) Happy

आम्हाला अपडेट्स मिळतात म्हणून धन्यवाद... (गोगा).
--------------------

आधी सिरियल बघायची चुकली की(कामामुळे, घरच्या कुसक्या कमेटंसमुळे) हळहळायची मी... आता वरचे वाचून वाटते.. ठिक आहे... काही अजून 'खास' होत नाहीये तोवर ठिक आहे. Wink

उगाच का ते साबा बघतात म्हणून बघावे लागते सांगायचे <<<< हा हा हा ....

ते कुडाळकर / देसाई प्रकरण काल परवाच कळले... पण घरचे झाले ना? Wink
तिकडे एलतिगो.. पण काही कारणामुळे घरचे झाले....

मला चित्रपट / नाटक / दुरचित्रवाणी बघायला आवडतात.
काल एका चित्रपटाच्या Preview प्रयोगाला आमंत्रण होते.. जुने कृष्ण (नि. भा. ) भेटले..

काही म्हणा.....प्राजक्ता माळी चे ड्रेसेस लईच छान असतात बुवा....फॅशन डिझायनिंग करणार्यांनी तीच्या आणि ईशा च्या ड्रेसेस वरुन प्रेरणा घ्यावी... Rofl

इतक्यात कदाचित १४३ बोलणार नाही. माझ्या मते, मेघनाचे आ.दे. बद्दलचे मत बदलू लागेल आणि आ.न. ची एंट्री होऊन रविवारचा मए. संपेल.

तो आ न काय म्हणुन घेतलाय.....१५-२० दिवस आंघोळ न केल्यासारखा गच्चाळ....यक.....आ दे क्युट आहे.....:)

Pages