जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ न बघुनच सायको वाटतो....इतके दिवस कुठे आहे पत्ता नाही.....गर्ल फ्रेंड शी कॉन्टॅक्ट नाही....बावळट....तो आणि तीची जोडी शोभते खरी...बावळट बावळटीण

१५-२० दिवस आंघोळ न केल्यासारखा गच्चाळ....यक.....आ दे क्युट आहे>>+१००
आ दे खुपच क्युट आहे...

आदित्य देसाईची बोलता बोलता 'है ना?' म्हणायची लकब मस्त वाटते मला.>>>>>>>>>.. मलाही.....आणि मधेच ओठ मुरडुन हसतो बोलता बोलता तेही...:)

इतक्या लवकर लव यु वगैरे म्हणाली तर सिरियलीत काय उरणार? डोचकं?

आधी ते उसासे घेइल.. मग आदीत्य काय रे हे किंवा असं काय रे आदित्य... मग पुन्हा गप्प. एक उसासा. पुन्हा मान वर.... मग एक उसासा... तोवर अ‍ॅड सुरु... आम्ही आपलं हातातलं काम सोडून ... बाईसाहेब काय म्हणणार म्हणून चपाती कच्ची भाजून पुन्हा टीवीच्या समोर.... तर बाईसाहेब पुन्हा एक उसासा... असं करत संपेल एक तास.

काही 'खास' झालच तर सांगा.

इथे 'क्यूट' वर चर्चा चाललीय आणि तुम्हाला कथा हवीय. काहीतरी घडायला हवंय... काय हे?.....

अरसिकपणा अरसिकपणा म्हणतात तो हाच...

Proud

आन बहुदा स्टार प्रवाह की ई टिव्ही वरच्या मालिकेच्या पटकथा लिहीतो म्हणून गायब... सोल्लीड बिझी अस्तो तो... Happy पण या मालिकेच्या दिग्दर्शकाने निदान फोनवर खोटं खोटं तरी दाकह्वायचं कीने तो फोन करायचा प्रयत्न कर्तोय वै... अचानक धाडक्न महाएपी ला एन्ट्री घेणार म्हणजे काय!!

मेघनाला डायलॉग्ज पण द्या म्हणाव आता... किती दिवस उसासे नी ह्म्म आणि स्वगत बोलते ते संगीत नाटकातलं स्वगतच वाटतं. स्वतःशीच एवढ्या अवजड भाषेत कोण बोलतं काय? काल गिरीश ओक अमीतला (लोकेश गुप्तेला) समजावत असतात तो भाग आवडला.

सारिका....

मीही हा धागा अगदी मनापासून वाचतो, जरी मालिका पाहणे चुकत असले तरी.... मोह होतो की वेळ काढून ८.३० वाजता नसले तरी रात्री केव्हातरी पुनर्प्रसारण होते त्यावेळी पाहावी..... सुकन्या आणि गिरीश यांच्या अभिनयासाठी तर इथे कुठेच दुमत असल्याचे वाचनात आलेले नाही....दोघेही या क्षेत्रात नावाजलेले असेच कलाकार आहेत.

तो आ न, त्या प्राजक्ता माळि (मेघना) चा प्रत्येक मालिकेत असतो.
स्टार प्रवाह वर एक मालिका होति, 'हे बंध रेशमाचे',त्यात हि दोघ होतिच.
'सुवासिनि' मध्ये हि तोच प्रकार.
पण तो आ ना, वास्तवात्,दिसायला चांगला अहे.इथे त्याचा अवतार करुन ठेवला आहे, ह्या दिग्दर्शकानि

गागो, आता तुम्ही << नव्हे गोगा...

अशोकमामांसारखे Update देणे याजन्मी तरी शक्य नाही...

आजचे Update : सतिशबाबा़जींशी स्प्ष्ट बोलला. बाबाजी वाल्याने खोटी माफी मागितली.
सतिशने घरी जाऊन 'काय काय घडलं ते सांगितलं'
नानानी अमितला डोक्याचा वापर करून Problem सोडव असं सांगितलं , आणि चार दिवस सुट्टीवर जायला सा.न्गितलं.
मेघनाच्या मावशी होत्या आज Problem वर चर्चा करायला...
मेघना: 'झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हटलं तरी असं विसरता येईल थोडंच... '

संपले Update

गागो, आता तुम्ही << नव्हे गोगा...

माफ करा, नजर चुकीने लिहिताना उलटे लिहिले गेले.

कालचा महाएपिसोड पाहीलात का ?? << पाहिला ना... वाढदिवसाचे प्लॅनिंग आणि वाढदिवस यावर भाग .
त्यात बाबाजीना वाटले की मेघना Pregnant आहे..
डॉ. , मेघना , आणि मेघनाच्या आईने निक्षून नाही सांगूनही त्यांनी देसाईवाड्यावर पेढे वाटले..
परत डॉक्टरला फोन केल्यावर भ्रमनिरास झाला.
दुसर्‍या आदित्य ची पावले, बुट, मग हात आणि शेवटी चेहरा दिसेपर्यंत हा भाग संपला...

अजूण एक दिवस .. मग Updates नाहीत.. Happy

परत चाललोय आबासाहेब.. आता तुम्ही Udpdate द्या.. >>> घरचे जोधा अकबर मालिका पाहतात ८ वाजता त्यावेळी रिमोट्ला हात लावु देत नाहीत. मग मीही ८.३० ला ही मालिका लावुन सुड उगवतो Proud

मी वाचेन (दोन्ही अर्थाने).. >>> Rofl Rofl

शेवट....

वाढदिवस झाला. मण्डळी घरी आली.
लहान मुलांना Return gift हवे म्हणून ती काकाच्या बेडवर् अडून बसली.
मेघना बाहेर सोफ्यावर निजायला गेली. माईनी येऊन पोराना बाहेर काढले आणि मेघनाला खोलीत टाकले.
बाबाजी बाबाजीना त्यांचे महाराज आणि सतिश एकत्र चहा पिताना दिसल्याने बाबाजी बाबाजी काळजीत.
त्यात सतिशने महाराजांना देसाईवाड्यावर येण्याचे आमंत्रण आणि पैसे दिले.
मेघना कॉलेजला गेल्यावर कळले की आ. न. परत आला आहे...

मी निवृत्त... Happy

गोगा शतशः धन्स इन शॉर्ट अपडेट्स बद्दल. पाहायचा नी वाचायचा दोन्हीचा वेळ वाचतो... थोडसं अधून मधून कानांवर पडलं तेव्हा नवीन रेसीपीज चालू होत्या... दुधीचं सूप नी केक नी काय काय! पुढे केव्हा सरकणार ही स्टोरी???

तुम्ही तुमच्या घरी अम्रिकेत पण पहा की शिरेल.... मग ती माझ्या घरात शिरेल ना? Wink

मी माबोवर आहेच फक्त दुसर्‍यांचे Update वाचेन म्हणतो... Happy

पुढे केव्हा सरकणार ही स्टोरी??? >>>> स्टोरी पुढे सरकली तर मालिका संपेल, त्यामुळे असं काही होणार नाही ....... Happy

फक्त दुसर्‍यांचे Update वाचेन म्हणतो...
>>
म्हणूनच ना
ते नको! लै भले मोठे आणि अवघड शब्दातले अपडेट्स येतील मग Wink

गोगा अपडेट्स नाही देणार? का बरं? साबांनी बंदी आणली काय त्यांच गुपित(मेघना बद्दलच) कळलं म्हणून की काय? Proud

गोगा, धन्यवाद तुम्ही दिलेलेया अपडेट्स बद्दल.

---
आता कोणीतरी घ्या की हि जबाबदारी.... Wink

Pages