जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगा, तुमचे मोजक्या शब्दात पुर्ण एपिसोडच्या अपडेट देण्याचे कौशल्य छानच!<<<

एकाची स्तुती हा दुसर्‍यासाठी टोमणा असू शकतो हे मराठी माणसाच्या लक्षात येत नाही हेच खरे!

बेफिकीर....:खोखो:
आटोपशीर आणि कथानक ज्या 'वेगाने' पुढे सरकतेय त्याला न्याय देणारे अपडेटस दिल्याबद्दल गोगांचे अभिनंदन....;)

मिळेल तशी तुकड्या तुकड्यात पाहते. बाकी गोगांचे अपडेट्स झिंदाबाद! आदे डोळ्यांतून दुखावलेले भाव मस्त व्यक्त करतो. बाकी कथानकाच्या वेगाबद्दल घरोघरी प्रमाणे वाहिनोवाहिनी...
प्राचीची पोस्ट पटली. कारण खरंच ते कथानक वो सात दिन आणि हदिदेचुस वर बेतलंय तर प्रेमाच्या या घासून घासून गुळगुळीत त्रिकोणाला आणखी किती घासणार. तरी नशीब कलाकार (देसाई कुटुंब) बरे आहेत आणि गिओ, सुमो आणि आदे चे डायलॉग्ज! Happy बाकी आनंदी आनंद!

फक्त खरचटलच आहे असं पुढच्या भागात कळणार आहे.. ! माग आदे बेड वर झोपणार.. !

गिओ मेघना आणि सुमो गिओ असे दोन्ही सिन चांगले होते काल..

मला हि कथा 'कसक'(रुशि कपूर आणि हिरविण नाहि आठ्वत) ह्या मोव्हि चा दिशेने जात असल्यासारखि वाटते.

आता हि त्याचि सेवा करणार आणि प्रेमात हि पडणार पण तो मात्र सगळ्यालाच नकार देत राहणार.मग हि त्याचा मागे मागे करणार आणि तो बिचकुन वागणार...

दोघांच सूत जुळेपर्यंत 'त्या रेशिम गाठिचि सुतळि झालेलि असणार'

पण आज मेघनाला शालजोडीतले पण देत होता>>>>>>>>>. भारी होता हा कालचा एपी. आ दे मस्त एक एक करुन ठेउन देत होता मेघनेला.... माझा नवरा पण एन्जॉय करत होता... आ दे च्या प्रत्येक मुव्हमेन्ट ला हा आता तीला देईल असं ही म्हणत होता....मला मस्त मज्जा वाटत होती......मेघनाला असच बोलायला हवं. ( असच पाहीजे.... असच पाहीजे ... ) Wink

पण आज मेघनाला शालजोडीतले पण देत होता
>>>>>>> +१

पण हे त्याच्या स्वभावाच्या विरूद्धच दाखवल ना. तोच तर म्हणालेला मोठा आव आणुन तुझ प्रेम तुला मिळवुन देइन. कि आता तोच तिच्या प्रेमात पडलाय न ती जाइल म्हणुन बिथरलाय Wink

आबासाहेब आ.दे मेघनाच्या प्रेमात डे वन पासुन आहे. इतके दिवस ती आपल्याबरोबर, आपल्या नजरेसमोर आहे हेच त्याला सुखावणार होत, पण आ.न च्या येण्याने आता मेघना त्याच्या नजरेआड होईल ही गोष्ट पचवण त्याला जड जात आहे. घरी कुणालाच याबद्दल माहित नसल्याने तो घरच्यांसमोर मन मोकळ करु शकत नाही रहाता राहिली मेघना तिला डायरेक्ट बोलल तर ती ढसढसा रडुन सगळ्यांसमोर प्रॉब्लेम निर्माण करेल म्हणुन आडुन आडुन मन मोकळ करत होता... हे मा वै म.

रहाता राहिली मेघना तिला डायरेक्ट बोलल तर ती ढसढसा रडुन सगळ्यांसमोर प्रॉब्लेम निर्माण करेल <<<

ती न रडताच इतके प्रॉब्लेम्स निर्माण करतीय की रडल्यावर काय करेल त्याची कल्पनाच करवत नाही असे आपले माझे बिचार्‍याचे मत!

बेफि, वेलकम बॅक Happy

मला तर वाटलेलं अ‍ॅक्सिडेंट च कळल्यावर ती रडून रडून घर डोक्यावर घेइल...

बादवे, काल अ‍ॅक्सिडेंटच कळल्यानंतर घरी जो सीन चालु होता, तेव्हापण विजया स्माइल करत होती.
वेळ काय एक्स्प्रेशन काय Uhoh

त्या आ. दे. त्या मेघनात काय इतकं दिसलं? पण म्हणतात ना प्रेम आंधळं असतं...
प्यार हुवा गधी से.. तो परी क्या चीज है..

नेसणार एकदाची पैठणी पुढच्या भागात! पहिल्या रात्रीसाठी आदित्यने तिला घेतलेली व लपवून ठेवलेली! संपणार एकदाची ही मालिका! वाईट एकच वाटतंय की पैठणी अश्यावेळी नेसणार आहे जेव्हा आदित्यचा एक पाय पूर्णपणे दुखावलेला आहे. त्यामुळे तो आता काहीही करायला लिटरली एक पायावर तयार असू शकेल, पण ...... जाऊदेत!

Pages