जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हम दिल दे चुके सनम' चा track चालू झालाय का आता?>>>>

तो तर पहिल्या एपिसोडपासुनच चालू होता. फक्त ३ तासाच्या सिनेमाचे शेकडो भागांच्या मालिकेत रुपांतर करताना त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून मालिका वाढवत आहेत इतकेच. बाबाजी, आदित्य देसाईच्या घरची आणि आजुबाजुची मंडळी इ.

याअगोदर मातीच्या चुलीवरून घेतलेल्या तुझं माझं जमेना मालिकेत जरुरीपेक्षा जास्त पाणी घातल्याने मालिका अवास्तवरित्या भरकटली.
त्यावरून शहाणे होऊन यावेळी जास्त पाणी न घालता योग्य वेळी मालिका संपवावी इतकीच अपेक्षा!

सारिकाच्या लेटेस्ट पोस्टला खूप अनुमोदन. सुरूवातीला या सिरीयलचे प्रोमोज बघताना वाटत होतं अरेन्ज मॅरेज मधील हळूवार फुलणारे नाते बघायला मिळेल पण त्यासाठी हे पहीलं अफेअर, त्या विरहाच्या, उदास चित्रीकरणाने, सुस्कार्‍यांनी एका फ्रेश विषयाला शिळं केलं...

पहीलं अफेअर न दाखवता फक्त एकमेकांचे वेगळे स्वभाव ते जपताना चाचपडताना हळूवार फुलणारं नातं पाहायला जास्त फ्रेश वाटलं असतं. असो...

पहीलं अफेअर न दाखवता फक्त एकमेकांचे वेगळे स्वभाव ते जपताना चाचपडताना हळूवार फुलणारं नातं पाहायला जास्त फ्रेश वाटलं असतं. >>>> +१..
अंकुश चौधरीचा एक पिक्चर आहे, थोडाफार असाचं

मला एक सांगा. आदित्य देसाई त्या आदित्य नगरकरला भेटतो निदान १-२ वेळा तरी. मग मेघनाची ओळख करून देतो. घरी आल्यावर कळते आपण भेटलो तोच आदित्य न. मग २-३ वेळा भेटला तेव्हा त्याचे नाव नाही विचारत? आदित्य नगरकर हे विजय पाटिल किंवा मिलिंद जोशी किंवा अमित कुलकर्णी सारखे अत्यंत कॉमन नाव नाही की लिंक लागू नये. Uhoh काय वाट्टेल ते दाखवतात.

मग २-३ वेळा भेटला तेव्हा त्याचे नाव नाही विचारत? >>>
नाही विचारत. तसे तो म्हणतोसुद्धा.
तू बघितला नसशील तो एपिसोड.

आ. दे आणि चड्डी फाटका भेटतात कुठे? की हम दिल दे चुके सारखे, हे दोघे चर्च मध्येच भेटतात का? की मराठी सिरियल म्हणून मंदीरात भेटतात, गप्पा मारतात पण नाव विचारत नाही.

कैच्याकै दाखवलय. डायरे़क्टर बावचळलाय..

प्राची हो मी नाही पाहिलेला तो एपिसोड. पण ओळख झाल्यावर किंवा होताना पहिली पायरी म्ह्णजे नावाची देवाण घेवाण हे ठरलेले असते. आणि हे लोक नाव कसं विचारत नाहीत? कैच्याकैच

लेटेस्ट प्रोमोमध्ये आदे ला अपघात वैगरे झाला आहे असे दाखवले आहे.
हम दिल दे चुके सनम मध्ये नंदिनी (ऐश्वर्या राय) ला अपघात होऊन विराज (अजय देवगण) तिला वाचवतो असे दाखवले होते.
इथे नेमके उलट. म्हणजे 'हम दिल दे चुके सनम' च्या कथानकाला 'Mouna Ragam' या चित्रपटाचे कथानक जोडत आहेत का?
http://en.wikipedia.org/wiki/Mouna_Ragam
म्हणजे आता या चित्रपटाच्या कथेत पाणी घालुन मालिका आणखी लांबवणार तर! अरे देवा!

दक्षिणा,

बहुदा नावाची देवाणघेवाण करायला मराठी मालिकांमध्ये (खासकरून झीच्या) बंदी आहे.

'होसुमीयाघ' मध्ये एकदातरी पहिल्या दुसऱ्या भेटीत कोणी एकमेकांना आपले नाव सांगितले आहे?

त्याशिवाय मालिका कशी लांबणार?

अब्बा! एवढे अपडेट्स आहेत ह्या सिरीयलसाठी? वाचलीच/ पाहिलेच नव्हते. थॅन्क्स टु झन्पी आणी ड्रिमगर्ल फॉर क्लु.

आधी लक्षात येईना हे जुयेरेगा काय आहे, मला वाटले बेफिनी काय नवीन गझल लिहीली की काय.:फिदी:

बेफिकीर.:दिवा:

मेघनाच्या ड्रेसबाबत झन्पीला फुल अनुमोदन.:फिदी:

गोगा आणी बेफिन्चे अपडेट्स म्हणजे चौकार आणी षटकार!

उदय टिकेकर काही वेळेस ओव्हर अ‍ॅक्टिन्ग करतात असे का वाटते? मेघना कायम कातावलेलीच दाखवलीय. समजुतदार नवरा मिळाला हे नशीब!

झन्पी अग तो फाटका चड्डी ( आन) आणी आ दे आधी त्या कॉलेजबाहेरच्या पार्किन्गपाशी भेटलेले दाखवलेत. फा च तेव्हा आ दे च्या बाईकवर बसलेला असतो. मग आदे त्याला गाडी माझी आहे असे सान्गतो, फा च म्हणतो चूकुन झाले तर आ दे म्हणतो, हो ना! तसे असल्याशिवाय आपण दुसर्‍या कुणाच्या वस्तुला हात लावत नाही. ( काय सुचकता आहे)

मेघना सासूच्या गळ्यात पडून रडते...
माई आदित्यला सर्वसाधारण सल्ला देतात...
आदित्यला पेंटीगवर 'मेघना' अशी सही सापडते...
बाकी नेहमीचेच.. (गळू परत तसेच आहे..)

अक्षरशः अत्यंत भिक्कार सिरियल Sad
काय ती मेघना... एरंडेल प्यायल्यासारखं तोंड (मूळात तसंच असल्याने वेगळा अभिनय करावा लागत नाही.)
त्यातल्या त्यात सुकन्या कुलकर्णी आणि गिरिश ओकच काय तेव्हढे सुसह्य आहेत. बाकी सगळे शून्य.

आदित्यला पेंटीगवर 'मेघना' अशी सही सापडते... >> ती पण मिरर इमेज..तो योगायोगाने आरश्यापाशी उभा असतो म्हणून दिसते.. Wink

सुमोचे फंडे जरा मधे मधे फोकस सोडत होते असं वाटलं.. Happy

आज अ‍ॅक्सिडेंट !!!

बाकीच्या मालिका बघता ही मालिका बर्‍यापैकी ट्रॅकवर आहे असे वाटते.
मुख्य कथानकाला जोडलेली उपकथानकं येणारच. कारण, कथेचा जीव फारच लहान आहे, कथा एका एपिसोडमध्ये संपवायची नाहीये.
मला तरी (अजूनतरी) आवडते ही मालिका.

Rofl बेफिकीर आहो मी कुठे रागवलेय्?:हाहा:

बर फाटकी चड्डीवाला.:फिदी:

पूर्वी आमच्या शेजारी एक कुटूम्ब रहायचे. त्यान्चा तिशीतला मुलगा कायम हाफ चड्डी घालुन हिन्डायचा. त्याचे नाव आम्ही हाफ चड्डी ठेवले होते, ते आठवले.:फिदी:

सारिका अग लिहायला काहीतरी नवीन बाफ सापडला, या उत्साहात मी फा च लिहीले.:खोखो:

मला सुद्धा मालिका आवडते आहे.

प्रामा चे काम ती छानच करते आहे. आणि आदित्य देसाई (या कलाकाराचं नाव माहित नाही) सुद्धा. सुमो. आणि गिओ नेहमीप्रमाणे मस्तच. माझ्या मते, कथानकाचा वेग सुद्धा व्यवस्थित आहे, फार वेगात नाही तसंच फार रेंगाळवाणं सुद्धा नाही.

सुमो आणि आदित्य देसाई यांना तर संवाद लेखकांने झुकतं माप दिल्यासारखे एकसे एक लाजवाब संवाद दिले आहेत, पण त्याचबरोबर, हे दोघं अभिनयाद्वारे (एस्पेशिअली डोळ्यांनी) बरेच काही बोलून जातात. हेमावैम.

वाडीतल्या त्या दोन भोचक बायका बर्‍याच दिवसात दिसल्या नाहियेत आणि अर्चना सध्या बराच वेळ तिच्या घरात असते हे दोन मोठ्ठे प्लस पॉइंट्स आहेत या मालिकेत.

प्राची , अरुणला अनुमोदन!
आमच्या घरात परिक्षा चालू असल्याने टिव्ही बंद आहे.

माझ्या मते, कथानकाचा वेग सुद्धा व्यवस्थित आहे, फार वेगात नाही तसंच फार रेंगाळवाणं सुद्धा नाही. >> इतर मठ्ठाड स्लो सिरियली पाहून हे मत व्यक्त करत असलास तर ठिक आहे Happy

फाटकी चड्डीवाला <<< मला वाटते की 'फाटका' आणि 'चड्डीवाला' अशी दोन विशेषणे एका मागोमाग वापरल्यामुळे 'फाटका', 'चड्डीवाला' बरोबर आहे...

मला 'वेग आहे' असं वाटत नाही....

Pages