निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना,
कोकिळेने मूळात कधी घरटे बांधायला शिकूनच घेतले नाही. कावळा नाहीतर इतर कुठलातरी पर्याय ती शोधणारच.
तिच्या टेहेळणीत तूम्ही देखील आजूबाजूला नाहीत याची खात्री करून घेणे असणार.

सहज मनात आले, तिने कबूतरांना टार्गेट केले तर ! साधना एक निबंध लिहू शकेल त्यावर Happy

कबुतरे तरी कुठे घरटे बांधताहेत?? तेही अशीच देतात आपली अंडी कुठेतरी ढकलुन.. अर्थत ती उबवण्यचे काम मात्र स्व तःच करतात त्यामुळे कोकिळ कदाचित करेल विचार याचा.

आज सकाळी हा खंड्या पाहिला. मी आजवर पाहिलेल्या खंड्यात सगळ्यात मो ठा. साळूं कीपेक्षाही थोडा मोठा. ही बहुतेक मादी असावी कारब्ण अजुन एका खंड्यचा आवाज येत होता की...की.. करत पण मला तो काही दिसला नाही

अन्जु, शांकली, देवकी, मनुषी, दिनेश दा, रिया धन्यवाद....

रिया, मला अस वाटतय की तो स्वर्गिय नर्तक च असावा.. गेल्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही ताडोबा ला
गेलो होतो तेव्हा ह्यचे दर्शन बरेच दा झाले... तेव्हा त्या गाईड नी ह्याचा परिचय करुन दिला होत...

मला असे वाटते की नेट वरुन फोटोज शेयर केलेले चालत असतील, पण जर नसतील तर तध्न्यांनी मदत
करावी....

शांकली तुझ्या मताशी मी १००% सहमत आहे. खरच पक्षी आणि फुलं हि देवाची विशेष लाडकी असावीत....

बी, अप्रतिम फोटो, मी लगेच डेक्सटॉप ब्यागराउंड म्हणुन सेव पण केला..सगळे येवुन बघुन गेलेत..
खुप खुप आवडला... धन्यवाद...

शशांकजी, तबेबुया खुप सुंदर.... पिवळा अमलताष पण असाच खुप सुरेख दिसतो.....

साधना सुरेख फोटो...

सायली, शांकली धन्यवाद! (शांकली तु देण्याआधीच, तुझ्या शुभेच्छा मिळाल्या Wink )

सायली मस्त फ़ोटो. Happy
दिनेशदा, जिप्सीसर पेढे वाटणार आहेत. Wink या खायला. Proud

शोभे, माझ्या वाटणीचा पण घे.... ( कारण नंतर मला हळूच कळव !)

फुले आणि पक्षी मानवाच्या आधी कोट्यावधी वर्षे या पृथ्वीवर आहेत. त्यांना आपले सौंदर्य वाढवायला बराच अवधी मिळाला. आणि आत त्यात मानवाने हस्तक्षेप करुन, नवीन जाती निर्माण करुन, त्यांचे सौंदर्य अजूनच खुलवले...

आपल्याला पण सुधारणेस वाव आहे !

सरिवा मस्त फोटो !! आकाशाच्या निळ्या कॅनव्हासवर पिवळी धरणीकडे झेपावणारी फुलं आ णि तवढीच लडिवाळ पानं. परफेक्ट पिक्चरं !!

हेमा, मॉव तुरेवाला मस्तय.

रिया, तुझेही बरोबर आहे. स्वर्गीय नर्तक मेल पांढरा असतो. त्याची फिमेल वर सायलीने टाकलेला छोटा बाळ आहे ना तशी असते. मेल पांढरा आणि फिमेल मातीच्या रंगाची.

जिप्सीसरांकढे पेढ्यांची मागणी करताना त्याचा अर्थ इथली बनचुके मंडळी काय लावणारेत ते माझ्या तेव्हाच लक्षात आलेलं.. पण म्हटले जौद्या, होऊद्या खर्च... Happy

शशांक, ट्येबेबुया पाहुन जीव जळला. इथे फुललाय पिवळाटॅबेबुया पण पुर्ण निष्पर्ण झाडावर दहाबारा फुले असा प्रकार आहे. आज सकाळीच तिन झाडे पाहिली. त्यामानाने गुलाबी बरा आहे.

साधना खंड्याला बघावं ते माश्यासाठी जेव्हा तो एका जागी स्थिर ऊडत राहतो त्यावेळी. खोटं वाटेल पण अशी जागा पकडण्यात तो सूर्याच्या स्थितीचाही विचार करतो... आणि हे दृष्य मी जास्त वेळा कुठे बघितले असेल ? सावंतवाडीच्या मोती तलावावर !

सर्वांनीच मस्त मस्त फोटो टाकलेत. डोळ्यांना सुखद गारवा मिळतो ह्या धाग्यावर येऊन, मन अगदी प्रसन्न होतं आणि सुंदर माहितीही मिळते. धन्यवाद सर्वांना, इतका एकत्र आनंद देण्यासाठी.

बापरे , सतरावा भाग, भाग भाग भागतोय फास्ट.. दोन दिवस वेळ नाही मिळाला तर एव्हढ्या पोस्टी येतायेत, काय काय पाहू आणी किती किती लक्षात ठेवू असं झालंय..

एक बरंय , काही विसरायला झालं तरमागील पानांवर जाऊन उजळणी करता येते.. Happy

दो दिन मे ये हाल तो महिनेभर मे क्या????????????????

साधना खंड्या मस्त.
काल आकाशात चौफेर अशी एक रेघ असल्यासारखं दिसत होतं. त्यामुळे गोल सभोवार नजर फिरवली तर वरून एक घुमट लालसर राखाडी रंगाचा पालथा घातल्यासारखं दिसंत होतं. ....नाही नीट नाही सांगता येत. निसर्ग शब्दात पकड्णं अबघड्च.



हा!!!!!!!!!! मानुषी... ब्यूटीफुल, मार्वलस!!!!!!!!!!!! Happy

परिराज्यातून परत यावसं वाटतंय कि नै आँ?????????? Lol

Pages