निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
"नवा आसमंत" पुस्तकातील शांता
"नवा आसमंत" पुस्तकातील शांता शेळके यांची हि कविता. (सौजन्य - जिप्सी)
हे एक झाड आहे याचे माझे नाते
वार्याची एक झुळूक दोघांवरून जाते
मला आवडतो त्याच्या फुलांचा वास
वासामधुन उमटणारे जाणीव-ओले भास
पहिल्यानेच त्याची मोहरताना फांदी
ठेवली होती बालगाणी त्याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
त्याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती
ढलपी, ढलपी सुटुन माती झाली सैल
रूजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एक दिवशी मीच झाड होईन
पानांमधुन ओळखीचे जुने गाने गाईन
— शांता शेळके
-----------------------------------------
काय सुपर्ब कविता आहे शांताबाईंची ........
जिप्सी - इथे शेअर केल्याबद्दल मनापासून धन्स ....
व्वा! सुंदर कविता! जिप्स्या
व्वा! सुंदर कविता! जिप्स्या धन्यवाद!
जागूताई, तांबुल करताना
जागूताई, तांबुल करताना गोडासाठी गुलकंद घाल. मस्त चव येते..
मस्त कविता. येस्स सध्या
मस्त कविता.
येस्स सध्या माझ्याकडे गुलकंद आहे. तेंव्हा बडीशोप, गुलकंद घालून सध्या पान बनवेन.
वा सुंदर कविता जिप्सी
वा सुंदर कविता जिप्सी !!!
पानाचा (काथ्या) कूट अजून चालू है... जागु पटकन कर काहीतरी आता तुझ्या पानांचं
जिप्सी , शशांक जी सुंदर
जिप्सी , शशांक जी सुंदर कविता....
त्याच्या पानावरच्या रेषा
त्याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती >>.....अरे वा! जिप्सी धन्यवाद.
जिप्सी, साधनाला आठवत असेल,
जिप्सी, साधनाला आठवत असेल, आमच्या बरोबर राणीच्या बागेत एक विजय म्हणून गृहस्थ होते. मी या झाडाचा पत्ता सांगितल्यावर ते थेट त्या गावी जाऊन त्याला बघून आले.. आणि गाव कुठलं तर पर्वरी, गोवा.
एका झाडासाठी मुंबई ते गोवा प्रवास करणारा तो खरा वृक्षमित्र !
मी गेल्या आठवड्यातच त्याना संपर्क मधुन मेल टाकली. त्यांचा फोन नं. होता माझ्याकडे पण तो हरवला. मेलला त्यांनी लगेच उत्तर दिले. त्यांच्या ऑफिसात मायबोली दिसत नाही अनि घरी यायला खुपच उशीर होत असल्याने इथे यायला जमलेच नाही असे ते म्हणाले.
सगळ्यात भारी म्हणजे ऑफिसमुळॅ झाडांचा छंद जोपासायला मिळत नसल्याने आता लवकरच ऑफिसलाच रामराम ठोकुन पुर्ण वेळ छंदाला वाहुन घेणारे असे ते म्हणाले. खरेच, धन्य ते निसर्ग वेडे ..
जि प्स्या मस्त... लौकर वाच पुस्तक.. मलाही वाचायचे आहे.
नवा आसामंत मधे प्रत्येक
नवा आसामंत मधे प्रत्येक प्रकरणात छान काव्यपंक्ती आहेत. सिंहगडावरच्या बिबळ्याचे प्रकरण खासच आहे.
---
हेमा,
आपल्याकडे सुवर्णपत्रांना फार कमी आणि क्वचित फळे लागतात. आलूबुखारपेक्षा थोडे मोठे फळ असते आणि आत सहा ते आठ पाकळ्यांच्या अर्धपारदर्शक आमलक ( म्हणजे देवळावरचा कळस ) सारखा गर असतो. चव ताडगोळ्यासारखीच असते.
मुंबईतले आणखी एक मजेदार झाड म्हणजे दादर पोस्ट ऑफीससमोरचे आंब्याचे झाड. त्याला वर्षभर अधून मधून आंबे लागत असतात आणि खाली जे लोक पोस्टाचे पार्सल पॅक करून देतात त्यांच्यासमोर पडतात. मी एकदा पार्सल पॅक करुन घेत होतो, तेव्हाच पडला. त्या माणसाने लगेच मला कापून दिला.
वर्षू, काथ्याकूट म्हणजे फार
वर्षू, काथ्याकूट म्हणजे फार वेगळे प्रकरण असते. नारळाच्या वरचे साल ( सोडण ) पाण्यात काही दिवस भिजत ( कूजत ) ठेवतात आणि मग ते फार कष्टाने कुटून त्याच्यापासून दोर मिळवतात. त्याला काथ्याकूट म्हणतात.
आपल्याकडे केरळ आणि बंगालात हा उद्योग चालतो.
आणि वर्षू हे खास
आणि वर्षू हे खास तूझ्यासाठी... http://www.thomascook.in/tcportal/international-holidays/personalised-ho...
थॉमस कूकचे Reunion Island चे मस्त डील आहे.
थॅन्क्स जागु मावशी माझं नाव
थॅन्क्स जागु मावशी माझं नाव अॅड केल्याबद्दल
मला झाडांची तशी काहीच माहिती नाहीये... आईच्या तुलनेत तर काहीच नाही...
पण कुठे काही वेगळे दिसले तर लगेच त्याचा फोटो काढून त्या झाडाची माहिती आईकडून काढून घेते (पण परत विसरते ती गोष्ट वेगळी)
मागे जंगली बदाम ची खूप माहिती सगळे लिहित होते तेव्हा मी इथे टाकायचे विसरले. फोर्ट ला NGMA च्या एकदम समोर म्हणजे त्या गेटला लागुनच एक जंगली बदामाच मोठा झाड आहे.. मला माहित नव्हते काय आहे ते.. मग त्याच् बरच वर्णन केला आईला तरी तिला कळले नाही पण इथे जेव्हा फोटोज पहिले तेव्हा कळले.. मग आई ने ते येऊनच पहिले..
जागूतै, तुम्हाला सवड झाली की
जागूतै, तुम्हाला सवड झाली की माझे पण नाव अॅड कराल का प्लीज?
ओह हे आहे तर रीयुनियन आयलँड
ओह हे आहे तर रीयुनियन आयलँड ... दिनेश, तू जाऊन आलायेस का इथे???
काथ्याकूट ... खरोखरचा काथा असतो.. अच्छा!!!!
आंब्याची फुले वाचायला कस वाटत
आंब्याची फुले वाचायला कस वाटत ?
क्युट आहेत आंब्याची फुलं
क्युट आहेत आंब्याची फुलं
आंब्याची फुले वाचायला कसं
आंब्याची फुले वाचायला कसं वाटतं ?>>>>> "मोहोरल्यासारखं" वाटतं .....
चंद्रा, मागच्या भागातील
चंद्रा, मागच्या भागातील ट्युलिप लागवडीच्या पोस्टसाठी धन्यवाद. (मी विसरलो होतो ).
शशांक.. जागुले क्यूटी आहेत
शशांक..
जागुले क्यूटी आहेत आंब्याची फुलं.. त्यांना बी सेफ म्हणावसं वाटतंय..
सुवर्णपत्र झाडाचे binomial
सुवर्णपत्र झाडाचे binomial name काय आहे?
जागू क्युट आहेत. शशांकजीना
जागू क्युट आहेत. शशांकजीना अनुमोदन.
शोभा, वाढदिवसाच्या खुप खुप
शोभा, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
उरणमध्ये ३-४ झाडे आहेत
उरणमध्ये ३-४ झाडे आहेत सूवर्णपत्राची.
बकुळीची पण बरीच आहेत.
आमच्या घराच्या पाठीमागील बाजूस मध्ये मोठ्या जाळीच कुंपण आहे त्याच्या पलीकडे जवळच एका झुडूपावर असे दोन कोकीळचनेहमी असतात. दोघेही अगदी शांत असतात. आम्हाला बघून पण घाबरून उडून नाही जात. सकाळ-दूपार संध्याकाळ कधीही पाहील तरी असतात. तसेच त्या झुडूपावर मैना, पाणकोंबड्या पण असतात. मधून मधून बरेच पक्षी येतात.
वॉव जागू. शोभाताईना
वॉव जागू.
शोभाताईना माझ्याकडूनपण वाढदिवसाच्या शुभेच्छा.
स्निग्धा, अन्जू, धन्यवाद!
स्निग्धा, अन्जू, धन्यवाद! (स्निग्धा, कमाल आहे तुझी, लक्षात ठेवण्याची. )
जागु, आंब्याची फुले मस्तच!
आंब्याची फुले वाचायला कसं वाटतं ?>>>>> "मोहोरल्यासारखं" वाटतं ..... >>>>>>>शशांकजी,
सुवर्णपत्र Chrysophyllum
सुवर्णपत्र Chrysophyllum cainito - स्टार अॅपल ह्या नावाने वर राणी बागेतल्या झाडांची यादी आहे त्यात आहे बघ.
शोभा केक कुठाय? अशा फुकट मिळतील काय शुभेच्छा?????
Shobha Happy Birth Day.
Shobha Happy Birth Day.
मस्त रंग आहे जागू. माझ्याकडे
मस्त रंग आहे जागू. माझ्याकडे असलेलं झेंडू आकाराने लहान आणि लाल रंगाचे आहे.
शोभा, वाढदिवसाच्या हार्दिक
शोभा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - शांकली व मी, दोघांकडून .....
आमच्या घरची
आमच्या घरची रामफळे.
1.
2.
3.
Pages