निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
अन्जु, यंदा असे होणार याची
अन्जु, यंदा असे होणार याची कल्पना आली होती आधीच. खुप खराब आहे हवा
साधना, बघ! टाकलेत आता परत
साधना, बघ!
)
टाकलेत आता परत फोटो. जमलल्यास आणि वाटल्यास इथे टाकलेस तरी चालतील (तुला येतात ना आता? मला अजुनही येत नाहीत
शेफ्लेराची फुले खुप लहान असतात त्यामुळॅ रियाला ती दिसली नसावीत. आणि होडीच्या आत कापुस तयार व्हायच्या आधीच ती होडी तिच्या हातात आली, त्यामुळे तिला कापसाचय जागी लेअर्स दिसताहेत.
>>>
असं असण्याची शक्यता कमी आहे गं कारण ना त्यातला तो पापुद्रा आहे ना तो होडी वाळून पडली तरी तसाच असतो. म्हणजे जमीनभर ते पापुद्रे विखुरलेले असतात. त्या होडीला वरती एक कव्हरही असतं. हे कव्हर उकललं की त्यातुन हे पापुद्रे बाहेर पडतात. आणि ते कव्हर स्वतःहुन उघडतं
आणि फुलं नसतातच अगं अजिबात. आमच्या ऑफिसात २५ एक झाडं आहेत आणि मी ती सगळीच्या सगळी पाहिली आज . एकावरही फुल नव्हतं. किंवा असं अशू शकतं की आत्ता फुलांचा मौसम संपला असेल पण मग एकाही झाडावर एकही फुल नाही असं होऊ शकतं का?
रिया तुला ऑफिसमध्ये छान वेगळी
रिया तुला ऑफिसमध्ये छान वेगळी झाडे बघायला मिळतात, मस्त वाटत असेलना.
साधना, हो यंदा कल्पना होतीच असं होणार याची. हवामान हल्ली खूपच बेभरवशाचे झालंय. माणसाने निसर्गावर खूप अन्याय केलाय आता निसर्ग बदला घेणारच. तरी कोकणात बऱ्यापैकी निसर्ग टिकून आहे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21956
रिया इथे शेफ्लेरा आणि काटेसावर दोन्ही बघ. शेफ्लेराची फुले खुप बारिक असतात. ती आलीत हे दिसणार नाही.
तुझेही फोटो टाकते इथे. पण
तुझेही फोटो टाकते इथे. पण घरी गेल्यावर.
अंजू, झाडांपेक्षाही जास्त
अंजू, झाडांपेक्षाही जास्त वेगळे वेगळे पक्षी पाहिला मिळतात. आणि खुप क्युट असतात ते


ते जास्त आवडतं मला
साधना, ओकेज
रिया, पक्षी, वॉव.
रिया, पक्षी, वॉव.
साधना, ते झाडं शेफ्लेरा
साधना, ते झाडं शेफ्लेरा नाहीये कारण शेफ्लेराचं झाडही आहे ऑफिसात. त्यावरच्या शेंगा तू दिलेल्या लिंकमधल्यासारख्याच दिसतायेत अगदीच!
शाल्मली असलं तर पुन्हा तोच प्रश्न आहे की मग त्याची फूलं कधीच का दिसली नसावीत.
एकदा निट पहाते की त्याला काटे आहेत का ते. मग शाल्मली आहे की नाही ते ही कळेल.
सावरी आणि शेफ्लेरा नाही हे नक्की!
गेल्या रविवारी सकाळी ६:३०ला
गेल्या रविवारी सकाळी ६:३०ला भांडूप पंपिग स्टेशनला गेलो होतो फ्लेमिंगो बघायला, पण भरतीची वेळ असल्याने एकही फ्लेमिंगो किंवा करकोचा (पेंटेड स्टॉर्क) दिसला नाही. तसंही यावेळेस ऐरोलीच्या खाडीजवळ फारच कमी फ्लेमिंगो आले आहेत. गेल्यावर्षी खारफुटीच्या बाजुला मस्त असा गुलाबी पट्टा दिसायच्या यावर्षी अगदीच विरळ विरळ फ्लेमिंगो दिसत आहे. (ऑफिस ऐरोलीला शिफ्ट झाल्याने बसमधुन जातान रोजच बघतोय).
भांडुपला फ्लेमिंगो जरी नाही दिसले तरी ग्रे श्राईक (खाटिक), खंड्या, बुलबुल, हळद्या, टिटव्या दिसल्या. पळसही मस्तपैकी बहरलाय.
शशांक जी, बेला बद्दल अप्रतिम
शशांक जी, बेला बद्दल अप्रतिम माहिती...
सावरी आणि शेफ्लेरा नाही हे
सावरी आणि शेफ्लेरा नाही हे नक्की! >>>>> रिया ते असं दिसतंय का ??
व्वा! व्वा! व्वा! मस्त
व्वा! व्वा! व्वा! मस्त माहिती, फोटो, लिंक्स.
( सगळ आधी वाचून आले. )
त्याने ऐकले असते तर त्याची बोलती बंद झाली असती. >>>>>>>>>>साधने, इतकी हसले ना मी ह्यावर.
होड्यांच्या झाडाचे फोटो कधी
होड्यांच्या झाडाचे फोटो कधी एकदा पाहीन असे झाले आहे.
अन्जु खर आहे गेली पाच सहा वर्ष आंब्याच असचं चालल आहे. मोहोर येतो पण पुढे कही नाही. मे महिन्यात फळं नसलेली झाड बघवत नाहीत अगदी.
आमच गाव ही को़कणात देवगड तालुक्यातच आहे. नितांत सुन्दर !! कधीतरी माबोकराना त्याची सफर घडवून आणण्याचा विचार आहे.
आज सुट्टी आहे मस्त एंजॉय केल्या नि. ग.
शशांकदादा नाही!
शशांकदादा नाही!
देवगड तालुक्यातच >>> कुठलं?
देवगड तालुक्यातच >>>
कुठलं?
नाडण म्हणून आहे. वाडा पुरळ
नाडण म्हणून आहे. वाडा पुरळ च्या जवळ
वा! मस्त माहिती. बरं़ हे काय
वा! मस्त माहिती.

बरं़ हे काय आहे सांगा. आम्ही हे सध्या सेफवे, होलफूड्स मधून कच्चे टोमॅटो म्हणून आण्तो. बटाट्याच्या भाजीत घालायला, आणि नारळ घालून परतलेल्या कच्च्या टॉमॅतोची चट्णी करायला.
आज याची चव पाहिली तर वेगळीच वाट्ली.
कच्च्या टॉमॅतोला वर पातळ वाळ्कं साल आहे.
बरं... त्या बिल करणृया मुलीलाही हे ़ काय आहे माहिती नव्हतं. ती आम्हालाच विचारू लागली... हे काय आहे?
गंमत म्हण्जे तिला पपई सुद्धा माहिती नव्हती.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Tomatillo
चवीला किंचित तुरट लागतं.
मृण्मयी धन्यवाद. हं.... चव
मृण्मयी
धन्यवाद. हं.... चव घेतली तर ओळखीची वाट्ली खरी. आवळ्याचा वंशातलं फळ असल्याने जराशी आवळ्यासारखीच वाट्ली हं चव. आत्ता तुझे लिंक पाहिल्यावर जाण्वलं.
हेमा,मला माहितेय नाडण, आमचे
हेमा,मला माहितेय नाडण, आमचे गाव वाडा-फणसे. मस्त निवांत समुद्र आहे आमच्या गावाला. विपुत मी लिहिले आहे तुम्हाला ते वाचा.
मानुषी, इथे मुंबईत अशीच
मानुषी, इथे मुंबईत अशीच दिसणारी पिवळी पिकलेली फळे "रसभरी" म्हणुन विकतात. चवीला अगदी यम्म लागतात. मला तर लईच आवडतात
http://en.wikipedia.org/wiki/Physalis_peruviana
माझ्या लहानपणी अशीच दिसणारी फळे शेताच्या बांधावर अशीच स्वतःहुन उगवुन यायची. इथल्या एका फळवाल्याला मी हे सांगितल्यावर तोही म्हणाला आता लोक याची शेती करायला लागलेत आधी अशीच याय्ची शेतात.
यातलीच एक जात शेतात तण म्हणुन उगवुन येते. त्याची फळे आवरणवाली असतात, आकाराने सुपारीएवढी किंवा त्याहीपेक्ष्गा लहान, रंगाने हिरवी. पण ही पिकत मात्र नाहीत. कायम हिरवीच राहतात. तोडली नाहीत तर तशीच हिरवी गळून जातात. ब-याच वर्षांपुर्वी मी गच्चीत भाजी पिकवण्याचे उद्योग करायचे तेव्हा ही हिरवी फळे माझ्या कुंडीत उगवुन आलेली. मी पिकतील म्हणुन वाट पाहात बसले पण पिकली नाहीत.
साधना छान नवी माहिती. ं मी
साधना छान नवी माहिती. ं मी हे चव बघण्यासाठी खाऊन पाहिलं तर इतकंसं नाही आवड्ल. पण मागील वेळ्ची याची चट्णी छान झाली होती.
हो .... आणि आता तू दिलेली लिन्क पाहिल्यावर असं काहीसं शेतात वगिअरे पाहिल्याचं आठवतंय.
इथे मुंबईत अशीच दिसणारी पिवळी
इथे मुंबईत अशीच दिसणारी पिवळी पिकलेली फळे "रसभरी" म्हणुन विकतात. चवीला अगदी यम्म लागतात. मला तर लईच आवडतात>>>>>येस्स्स. मलाही खुप आवडतात.
एकाला मी हे फळ "रसभरी" ऐवजी "रासबेरी" म्हणुन विकताना पाहिलेल. 
साधना ते तण वाले फुगे आम्ही
साधना ते तण वाले फुगे आम्ही पण लहानपणी खुप खायचो. पण त्याला तशी अजिबात चव नसायची.. मजा होती ती त्या वयाची.
होडीचे झाड म्हणतात तसे एक पायमोज्याचे पण झाड असते. बाबूलनाथाच्या दरवाज्यापासून कमला नेहरू पार्काकडे जी वाट जाते तिथे आहे ( होते ?) अगदी घडी घातलेल्या पायमोज्यासारखी फळे येत त्याला.
चेंबूरला जैन मंदीराजवळ एक
चेंबूरला जैन मंदीराजवळ एक बेलाचे झाड आहे पण खास झाड आहे ते ठाण्याला, कळव्याच्या दिशेने रेल्वे लाईनला लागूनच.
खुप मोठी अगदी पपनसा एवढी बेलफळे लागतात त्याला. ( पुण्यात बेलबाग आहे ना ?)
बंगाल आणि एकंदरच पूर्वाचलात घरोघरी बेलाची झाडे असतात असे अविनाश बिनीवाले यांनी लिहिल्रेय. तिथे नाश्त्याला अख्खे बेलफळ खातात. म्हणजे गर चघळून चघळून खायचा, बिया मात्र टाकायच्या. त्या खाल्ल्या तर मुरमुरतात.
पार्वतीने जेव्हा तप केले त्यावेळी ती केवळ बेलाच्या पानावर पडलेले दव चाटूनच दिवस काढत असे. पुढे आणखी कठोर तपश्चर्या करताना तिने तेही सोडले.... म्हणून ती अपर्णा.
भस्म विलेपित रुप साजिरे आणूनीया चिंतनी
अपर्णा तप करते काननी..... ( लता, तांबडी माती, आनंदघन, आशा काळे )
२०१४ सालचे जनकल्याण सहकारी
२०१४ सालचे जनकल्याण सहकारी बँकेचे कॅलेंडर बघितले का ? फुले आणि त्यांचे रंगरूप घेतलेले किटक
अशी थीम आहे.
सीता आणि पार्वती... दोघी निसर्ग कन्या. त्यांच्या नावाने निसर्गात काही ना काही सापडेल. ( गौरीचे हात, उर्फ वाघनखी वगैरे ) पण लक्ष्मीच्या नावे का नाही ? पैसा आणि निसर्ग यांच्यात वैर का असावे ?
नाही म्हणायला बायोडीझेल साठी उपयोगी पडणार्या एका झाडाला लक्ष्मीतरू म्हणतात. पण ते अलिकडचे नाव.
एरवी, कमला हे तिचे नाव हाच काय तो संबंध
( इक्झोराला पण मराठीत रुक्मिणी म्हणतात. )
रसभरी....
रसभरी.... ,'रास्पबेरी' नाही!!!!!!!!
रसभरी.... ,'रास्पबेरी'
रसभरी.... ,'रास्पबेरी' नाही!!!!!!!! >>>>> मुंबईतले फळवाले... बहुतेक उत्तर भारतीय... प्रत्येकाचे उच्चार वेगळे.

त्यांची नावेही वेगळी...
चिबुडा सारखे गोल, पिवळे, पाकळीच्या सांध्यावर हिरवा रंग असलेले फळ "मधुमालती" म्हणून विकतात.
(फोटो ईंटरनेट वरून साभार)
पेर वर्गातले पण आकाराने बरेच लहान, पोपटी रंगाचे, चवीला पेर सारखे पण कमी रसाळ असलेले फळ "गुलाबिया" म्हणून विकतात.

(फोटो ईंटरनेट वरून साभार)
हल्ली बाजारात हिरव्या मोठ्या केळ्यांऐवजी पिवळी मोठी केळी फार येतात. पिवळी केळी म्हणजे वेलची / गोवन आणि लहान असे समीकरण पाठ असते. विकणार्याला विचारले, "ही कुठली केळी?" त्याने ती केळी ज्या बागायतदाराकडून (कंपनीकडून) आली होती त्याचे नाव सांगितले. केळ्याच्या जातीबद्दल नाही सांगितले.
वर्षुताई आणि मधु मकरंद मस्त
वर्षुताई आणि मधु मकरंद मस्त फोटो.
दिनेशदा, अविनाश बिनीवाले लोकसत्तामध्ये वेगवेगळया प्रांतांतील न्याहारी लिहायचे त्यात बेलफळ बंगाल आणि पूर्वांचलमध्ये सकाळी न्याहारीला खातात हा लेख होता, मी तो वाचलाय.
पार्वतीचे नाव अपर्णा कसे पडले, सुंदर माहिती दिनेशदा.
ही फ़ळं आम्ही काशीला पाहिली
ही फ़ळं आम्ही काशीला पाहिली होती. पण चव नाही आवडली.

दिनेशदा, मस्त माहिती.
Pages