निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
झाला एकदाचा upload
झाला एकदाचा upload
हां आता दिसले फोटो.. केव्हढा
हां आता दिसले फोटो.. केव्हढा मोठा घड आहे.. वॉव..
एक सुचवु का? इथे बरेच वेळा
एक सुचवु का?
इथे बरेच वेळा कोणते झाड/ कोणते फुल / कोणते फळ असे प्रश्न विचारुन फोटो दिले जातात. नंतरचा पोस्टसमधे कोणीतरी माहित्गार त्याची माहीती देतात. पण नंतर धागा एकत्रितपणे वाचताना कुठली माहिती कोणत्या फोटोकरता हे कळत नाही, प्रश्नाचे उत्तर मिळण्याकरता पुढचे पानेच्या पाने वाचत बसावे लागते. त्यापेक्षा.
आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ती स्वतःच पोस्ट संपादीत करुन तिथे तो प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तरच लिहीले तर नंतर धागा वाचताना खुप उपयोगी पडेल. >>>> ही सूचना खरोखरच सुयोग्य आहे, सर्वांनी यावर विचार करुन अमलात आणली तर फार बरे होईल .....
मी तरी सुरुवात करतो - माझ्या दोन-चार पानामागील माझी पोस्ट संपादित करतोय.........
जागू, ते हायड्रेंजियाच रोप /
जागू, ते हायड्रेंजियाच रोप / झाड जे लागत असेल ते मला हवं. कस आणि कधी आणि कुठे देशील ?
ह्यायड्रेन्जियाला बीया वगैरे
ह्यायड्रेन्जियाला बीया वगैरे येत नाहीत, त्यामुळे जागुटली रोपे वाटणार कशी?????
नर्सरीत मिळते. मोस्टली निळ्या रंगात मिळतात.. जागुने गुलाबी कुठुन आणले माहित नहई.
सावली, बरोबरे... तिथेच नावे लिहिली तर बरे पडेल.
जागुने गुलाबी कुठुन आणले
जागुने गुलाबी कुठुन आणले माहित नहई. >>> गुलाबी रंग माझा आवडता रंग आहे, त्यामुळेच मोहात पडले आणि तात्काळ मागणी नोंदवली
काहीही विचार न करता.
वरती सर्वांनी टाकलेले फोटो
वरती सर्वांनी टाकलेले फोटो सुंदर आहेत. जागुची केळी बहुतेक वसईची केळी असावीत कारण मी वर लिहिल्याप्रमाणे माझ्याकडे नालासोपा-याला अशीच केळी होती आणि तो भाग वसईजवळच आहे.
नमस्कार लोक्स सध्या कामात
नमस्कार लोक्स

)
सध्या कामात थोडा व्यस्त असल्याने इथे यायला जमले नाही.
मी रविवारी व्हिजेटिआय पुष्पप्रदर्शनाला भेट देऊन आलो. राणीबागेत होती तीच सगळी झाडे तिथेही होती. नविन काहि दिसलं नाही. कॉलेजच्या आत एका रूममध्ये गुलाबांचे प्रदर्शन होते पण त्यात व्हरायटी नव्हती. फुलांच्या रांगोळ्याही दुसर्या दिवशीच पूर्णपणे कोमेजल्या होत्या. (प्रवेश फि १०रू. माणशी आणि कॅमेरा चार्जेस १००रू. :-)) (फोटो फेबुवर अपडेट केले आहेत.
Btw, "पपीहरा" म्हणजे नक्की कोणता पक्षी? (आधी चर्चा झाली असेल तरी इथे पुन्हा सांगा
)
बोले रे पपीSSSSSSSSSSSSSS
बोले रे पपीSSSSSSSSSSSSSS गाण्यात चक्क पोपट दाखवलाय. आणि बोले रे म्हटले की तो पोपटच असणार.... अजुनही संशय येत असेल तर पपीच्या पुढचा शब्द 'हरा' हा पाहावा....
सध्या कामात थोडा व्यस्त
सध्या कामात थोडा व्यस्त असल्याने इथे यायला जमले नाही
सम कधी होणार आहेस??????
व्यस्त हा हिंदी शब्द मराठीत घुसायला सेलफोन वरचा रेकॉर्डॅड मेसेज जबाबदार आहे क??
संशय येत असेल तर पपीच्या
संशय येत असेल तर पपीच्या पुढचा शब्द 'हरा' हा पाहावा....>>>अस्स होय

धन्स साधना
(No subject)
अरे मी फेकलेय ते.. तु लगेच
अरे मी फेकलेय ते.. तु लगेच गंभीरपणे काय घेतोयस?
हा बहुतेक आपल्याकडचा पावश्या पक्षी आहे. मी मैत्रिणिला विचरले , पोपट नाही. brainfever bird
या अशा सुरु होतात "जिप्सी
या अशा सुरु होतात "जिप्सी गप्पा" सुरु ........

अरे मी फेकलेय ते.. तु लगेच
अरे मी फेकलेय ते.. तु लगेच गंभीरपणे काय घेतोयस?>>>ओये, मला खरंच वाटलं.
शशांक
देखो देख रहा था पपीहा.>>>इथे "पपीहा" आहे.
पपीहा की पुकार ये बोली,
लो बसंत अब आया है
आम्र मंजरी बौराई अब,
मधुरस को टपकाया है.
शाल पुष्प से मस्त हो बोली,
हाँ बसंत अब आया है>>>>>>> "पपीहा" म्हणजे "कोकिळ" का?
जिप्स्या हल्ली तू हेच गाण गात
जिप्स्या हल्ली तू हेच गाण गात असशील रोज
ज्ञानेश बर्याच दिवसांनी आलात. वेलकम बॅक. केळीचा घड मस्तच.
ह्यायड्रेन्जिया मी नर्सरीतून आणलाय. त्याला रोपेही नाही फुटलीत खाली. जर तसे काही दिसले तर ते स्निग्धाच्या नावे राखीव ठेवेन. आणि हो ह्याचा रंग बदलतो. थोडा निळसरही होतो.
ज्ञानेश बर्याच दिवसांनी
ज्ञानेश बर्याच दिवसांनी आलात>>>अरे हो, ज्ञानेश खुप दिवसांनी? मागे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात भेटलेलो तेव्हढेच काय ते.
काल रात्री पुन्हा श्रावणीच्या
काल रात्री पुन्हा श्रावणीच्या मैत्रीणीकडून लाल कृष्ण्कमळाची कळी आणली आणि सकाळी असे त्याचे सुंदर फुल फुलले होते. माझी सकाळ आज ह्या फुलाने प्रसन्न झाली.
जागू खूप क्युट फुल आहे.
जागू खूप क्युट फुल आहे.
किती सुरेख आहे फुल ....
किती सुरेख आहे फुल ....
जर तसे काही दिसले तर ते
जर तसे काही दिसले तर ते स्निग्धाच्या नावे राखीव ठेवेन.>>> थांकू थांकू गं
पपीहा" म्हणजे "कोकिळ" का? >>>
पपीहा" म्हणजे "कोकिळ" का? >>> पपीहा माहिती नाही पण कोकिळ नसावी, कारण कोकिळेला 'कोयल' शब्द आहे ना हिंदीत. -- कुहू कुहू बोले कोयलीया / कोयल बोली दुनिया डोली इ.
जागू, मस्त फोटो धन्यवाद
जागू, मस्त फोटो
धन्यवाद स्निग्धा
सापडला पपीहा
सापडला पपीहा
http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A4%BE
पपीहा कीड़े खानेवाला एक पक्षी है जो बसंत और वर्षा में प्रायः आम के पेड़ों पर बैठकर बड़ी सुरीली ध्वनि में बोलता है ।
अरे तेच तर सांगतेय. पपिहा
अरे तेच तर सांगतेय. पपिहा म्हणजे आपला पावश्या. आहे तो कोकीळेचा चुलतभाऊच.
http://en.wikipedia.org/wiki/Common_Hawk-cuckoo
सध्या उन्हाळ्यात ज्या झाडाला
सध्या उन्हाळ्यात ज्या झाडाला होड्या येतात त्या झाडाचं नावं काय आहे?
त्या होड्या खुप क्युट दिसतात. त्यांच्या आत पांढर्या रंगांचे पापुद्रे टाईप्स पदार्थ असतो.
रीया तु धन्य आहेत.. त्या
रीया तु धन्य आहेत..
त्या होड्या दोन झाडांना येतात. एक शाल्मली आणि दुसरी शेफ्लेरा. दोन्ही नावांनाई माबोवर शोध म्हणजे सापडेल.
त्यांच्या आत पांढर्या रंगांचे पापुद्रे टाईप्स पदार्थ असतो
कापुस आहे गं तो. सिल्की कापुस.
हा साधना, त्या हिंदी विकीवरही
हा साधना, त्या हिंदी विकीवरही तेच लिहिलंय.
सध्या उन्हाळ्यात ज्या झाडाला होड्या येतात त्या झाडाचं नावं काय आहे?>>>>सावरीचं झाड का?
अरे तेच आहे ते पान.. मी
अरे तेच आहे ते पान.. मी इंग्रजीतुन दिले आणि तु हिंदीतुन.. आता कोणीतरी मराठीतुनही चिटकवा.
घ्या - सगळ्या भाषांमधुन आनंद लुटा - http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE
उत्तरी भारतीयांना याचा आवाज ’पी-पाहा, पी-कहां’ असा ऐकू येतो. इंग्रजांना तो”हू बी यू, हू बी यू’ असातर काहींना ’ओह लॉर, ओह लॉर’ ’वी फील इट, वी फील इट’असा ऐकू येतो. तर काही फिरंग्यांना तो ब्रे..न फीव्हर, ब्रे..न फीव्हर’ असा वाटतो. यावरूनच या पक्षाला इंग्रजीत ब्रेनफीव्हर पक्षी म्हणतात. बंगाली लोकांना याचा आवाज ’चोख गेलो’ म्हणजे माझे डोळे गेले असा वाटतो.
बिचारा पावशा. तो नुसता 'आहे का कोणी पाव्शीण आजुबाजुला? होईल का ती माझी बायको" एवढेच ओरडत असतो.. लोकांना कैच्याकैच ऐकु येते. त्याने वाचले तर त्याची बोलतीच बंद होईल
वरती साधनाने मराठी विकि लिंक
वरती साधनाने मराठी विकि लिंक दिल्याने प्रतिसाद संपादित
साधना
Pages